बांबू लागवड; पेरणीपासून विक्री पर्यंतची संपूर्ण माहिती आणि शेतकरी यशोगाथा

बांबू लागवड ते विक्री, संपूर्ण माहिती : सध्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांची शेतीपिके नष्ट होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. पारंपरिक पिकांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती अन् हवामान सध्याच्या काळात अजिबात नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करणे अगत्याचे झाले आहे. अशाच प्रकारचा एक आगळा वेगळा यशस्वी प्रयोग केला तो धुळे जिल्ह्यातील शेतकरी शिवाजी राजपूत यांनी.

या शेतकऱ्याने त्यांच्या 25 एकर शेतात बांबू लागवड करून ते दर वर्षाला बसून 25 लाखाचे सरासरी उत्पन्न घेत आहेत. इथे नमूद करायची महत्वाची बाब म्हणजे बांबु लागवड करण्यासाठी सरकार घसघशीत अनुदान सुद्धा विवीध योजनेच्या माध्यमातून देत आहे. बांबू लागवड करून निश्चितच प्रगती साधता येऊ शकते हे आपल्याला ही यशकथा वाचून पटल्याशिवय राहणार नाही. चला तर जाणून घेऊया धुळ्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा.

बांबू लागवड : बांबूंची उंच झाडे

आजवर मिळाले 30 पेक्षा जास्त राज्यस्तरीय दर्जाचे पुरस्कार

धुळे जिल्ह्यात एका छोट्याशा गावातील या शेतकऱ्याची शेती विषयक कामगिरी वाखाणण्याजोगी आहे त्यांना आज पर्यंत 30 पेक्षा जास्त शेती विषयक राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. शिवाजी राजपूत यांच्याकडे एकूण 49 एकर शेती आहे. वडिलोपार्जित शेती असल्यामुळे त्यांना लहानपणापासून शेतीची प्रचंड आवड आहे.

शेतीची असलेली आवड, मेहनत घेण्याची तयारी, चौकस बुद्धी आणि चिकाटी या चार गुणांमुळे या शेतकऱ्याने शेती व्यवसायात आपली वेगळीच छाप पाडली आहे. पारंपरिक शेतीची झंझट सोडून त्यांनी केलेली बांबू लागवड त्यांच्यासाठी फलदायी ठरत आहे. या शेतकऱ्याने 25 एकर शेतात केलेल्या बांबू लागवड मधून दरवर्षी सरासरी 25 लाखाचे उत्पन्न मिळवत लखपती शेतकरी म्हणून नाव कमावले आहे.

पारंपरिक शेतीत होत प्रचंड नुकसान

राजपूत काही वर्षांपूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपरिक शेती करत होते. घरी बऱ्यापैकी शेती. मात्र हवामानाच्या चंचलतेमुळे अन् पावसाच्या लहरीपणामुळे त्यांना नफा मिळणे तर दूर उलट त्यांचे नुकसानच जास्त व्हायचे. पारंपरिक शेतीत आता काहीच पडलेले नाही असा विचार करून त्यांनी नावीन्यपूर्ण शेती करण्याचा ठाम निर्णय घेतला. अन् त्यांच्या 49 एकर शेतीपैकी 25 एकरात बांबू लागवड केली.

बांबू लागवड झाली यशस्वी

बांबू लागवड करून या शेतकऱ्याने या पिकाविषयी अधिकाधिक माहिती मिळविण्यासाठी मेहनत सुद्धा घेतली. आज त्यांच्या शेतात सुमारे 20 प्रकारच्या बांबू ताठ मानेने शेतात उभे असल्याचे पाहायला मिळते. हे विविध प्रकारचे बांबू अगरबत्ती, कोळसा आणि बायोगॅस ऊर्जा उत्पादनासाठी वापरल्या जातात. याशिवाय बांबूचे खोड, पान आणि पावडर पासूनही बरीच उत्पादने निर्माण होत असतात. तुम्हाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटेल ते म्हणजे तीन दशकांपासून त्यांनी त्यांच्या शेतात बांबू लागवड करून लाखो रुपयांत वार्षिक उत्पन्न घेऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल केलेली आहे.

25 एकरात गत तीन दशकांत लावली 7 लाख झाडे

प्रयोगशील शेतकरी शिवाजी राजपूत यांना बांबू लागवड करण्याचा खूप अनुभव रोजी आलेला असून त्यांना या पिकाने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. त्यांनी मागील 3 दशकांत त्यांच्या 25 एकर शेतात बांबू लागवड करून आजपर्यंत सुमारे 7 लाख झाडे लावली आहेत. ज्या काळात लोक नावीन्यपूर्ण शेतीचा विचार सुद्धा करू शकत नव्हते, अशा काळापासून त्यांनी केलेली बांबू लागवड शेती खरचं स्तुत्य उपक्रम आहे अस म्हणायला हरकत नाही. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा या यशस्वी शेतकऱ्याकडून निश्चितच खूप काही शिकण्यासारखे आहे.

सीताफळ शेती करून हा अल्पभूधारक शेतकरी कमावतो वर्षाला लाखो रूपयांचा नफा, वाचा प्रेरणादायी यशोगाथा

बांबू लागवड करण्याचे अवलंबिले विशिष्ट तंत्र

शिवाजी राजपूत यांनी त्यांच्या शेतात बांबू लागवड सुरू केली मात्र तर एवढ्यावरच थांबले नाहीत. ही शेती यशस्वी करण्यासाठी जीवाचे रान केले. आवश्यक ती माहिती मिळवली. पिकाच्या सुरुवातीच्या वर्षी त्याची योग्यरीत्या जोपासना केली. योग्य नियोजन करून ठिबक सिंचनासारखे आधुनिक तंत्रे वापरली आणि अशी ही बांबू लागवड सफल झाली आहे. या बांबूच्या वेगवेगळ्या जाती आहे. बांबू लागवड करण्यासाठी तुम्हाला बांबूच्या विशिष्ट जातींची माहिती करून घेणे गरजेचे असते.

कारण बांबूचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या प्रकारानुसार त्यांचा विविध इंडस्ट्रीत वापर होत असल्यामुळे कोणत्या बांबू लागवड मुळे किती नफा होऊ शकतो याचा आधीच अंदाज येऊ शकतो. उदा. जर तुम्हाला अगरबत्तीसाठी लागणारा बांबू उत्पादित करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ट जातीच्या बांबूची लागवड करावी लागेल. तसेच फर्निचर आणि बायोगॅसच्या उत्पादनासाठी वेगळ्या प्रकारच्या बांबूची जात निवडावी लागेल.

असे करत असताना कोणत्या प्रकारच्या बांबूला जास्त बाजारभाव आहे, त्या त्या प्रकारच्या बांबुंची विक्री करण्यास योग्य मार्केट कुठे आहे या सर्व बाबींचा अभ्यास अन् ज्ञान घेणे क्रमप्राप्त असते. तुम्ही स्वतः जर बांबू लागवड करून स्वतःच त्यासंबंधी व्यवसाय उभारण्याचा विचार करत असाल तर उत्तमच. अशा शेतकरी बांधवांनी आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे, त्या दृष्टीकोनातून बांबूची योग्य जात काळजीपूर्वक निवडणे हा यशाचा पहिला टप्पा आहे.

बांबू लागवड साठी योग्य शेतजमीन

बांबू ही वनस्पती विविध प्रकारच्या मातीत चांगला वाढू शकते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन बांबूसाठी सर्वोत्तम असते. शेतजमीन ही जास्त उंच ठिकाणी नसावी. कारण त्यामुळे जोराचे वारे वाहून बांबू पिकाला नुकसान होण्याचा संभव असतो. जास्त वाऱ्यामुळे बांबू वाकडे होऊ शकतात. मध्यम उताराची पडीक जमीन सुद्धा बांबू लागवड साठी योग्य असते.

बांबू लागवडीच्या पद्धती

1) कंदाद्वारे बांबू लागवड

तुमच्याकडे पाण्याची अजिबातच व्यवस्था नसेल तर कंद लागवड पद्धती योग्य ठरते. कंदाद्वारे बांबू लागवड करण्याचा एक फायदा होतो. अशा लागवडीमुळे बांबू 2 वर्षे आधीच तयार होतात. बांबूचे कोंब हे सुरवातीपासूनच चांगल्या जाडीचे येतात. याचे कारण नवीन कोंबांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये कंदामध्ये आधीच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पावसाळा संपला तरीही बांबू शेतीला पाण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था (ड्रीप) करावी लागत नाही.

केवळ पावसाच्या पाण्यावर बांबू जगू शकतो. तुम्हाला जर बांबू लागवड मोठ्या प्रमाणात (100 ते 1000 झाडे) करायची असेल तर अशा वेळी बांबूचे एवढे कोंब उपलब्ध होणे कठीण असते. बांबूचे कोंब मिळवले तरी ते बांबूच्या रोपांपेक्षा 40% महाग पडतात. कंद काढले की लगेचच कंदाची लागवड काढल्यापासून करावी लागते. कंद लागवडीसाठी वेळेवर मजूर मिळाले नाहीत तर मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असते ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. त्यामुळे कोरडवाहू जमिनीत बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कंद लागवड पद्धती सरस ठरते. मात्र यात आव्हाने देखील आहेत.

2) रोपांव्दारे बांबू लागवड पद्धती

रोपांद्वारे बांबू लागवड पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यासाठी करता येतो. हजार पेक्षा जास्त बांबूची लागवड करायची असल्यास कंदापासून लागवड करणे बहुधा शक्य होत नाही. याचे कारण म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कंद उपलब्ध होत नाही. याशिवाय कंदाचा भाव हा रोपांच्या भावापेक्षा साधारणतः दुप्पट असतो. कंद लागवड केल्यास बांबूची वाढ लवकर होते मात्र उपलब्धता व खर्चाकडे पाहता रोपांपासून बांबू लागवड करणे हे जास्त सोईस्कर ठरते. लागवड करण्यासाठी रोपांना नर्सरीतून किंवा बाजारातून आणल्यापासून त्यांची लगेचच लागवड करण्याची गरज पडत नाही. रोपांची बांबू लागवड उशिरा केली तरी काही फरक पडत नाही. तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर रोपांची लागवड करणे योग्य राहते. पेरणीवेळी मजुरांचा तुटवडा असेल तरी ही लागवड टप्प्याटप्प्याने करता येऊ शकते.

बांबूच्या वेगवेगळ्या जाती

ज्या शेतकऱ्यांना बांबूची शेती करायची आहे अशा शेतकरी बांधवांनी बांबु लागवड करण्यासाठी खाली बाबूंच्या काही जातींची नावे दिलेली आहेत. तुमच्या भागातील शेतजमीन आणि हवामान यानुसार तज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊन आपण योग्य त्या जातीच्या बांबूची लागवड करू शकता.
एस्पर, बुल्का, वनन, ब्रांडीसी, कटांग, काष्टी, काटे कळक, काटोबां, टूल्डा, जाती, मित्रींगा, नुटन्स, मल्ल बांस, भालुका, बराक, बाल्कू, भीमा, माणगा, मेस, मानवेल

बांबु लागवड पूर्वमशागत

उन्हाळ्यात शेतजमिनीत 10 x 10 फुटांवर दोरीच्या साहाय्याने मार्किंग आणि यंत्रांच्या साहाय्याने 3 x 3 x 3 फुटाचे खड्डे करावी. खड्ड्यात तळाला मुठभर मुंगी पावडर व दाणेदार फोरेट टाकावी. खड्ड्याला उन्हात तापू द्यावे. खड्डा खोदल्यामुळे वर आलेल्या मातीत 2 टोपले शेणखत + (500 ग्रॅम SSP (सिंगल सुपर फॉस्फेट) + 1 मूठ मुंगी पावडर + 1 मुठ फोरेट टाकून मातीत फावड्याच्या साहाय्याने चांगले मिसळून घ्यावे अन् खड्डा बुजवून घ्यावा. (टीप : यावेळी पेरणीची प्रक्रिया सुरू नये)

बांबू लागवड प्रत्यक्ष पेरणी कशी करावी?

बांबू लागवड करताना 10×10 फूट अंतरावर पेरणी करावी. इतके अंतर सोडल्यामुळे बांबुंचा एकमेकांना आधार मिळून त्यांची सरळ वाढ होते. एक एकर क्षेत्रात सुमारे 400 रोपे लावताना येऊ शकतात. लागवड सरळ रेषेत करावी त्यामुळे ड्रीप इरिगेशन पद्धतीने शेतीला पाणी देणे सोयीस्कर होते. तसेच इतके अंतर ठेवून बांबू लागवड केल्यामुळे बांबूच्या तोडणी वेळी बांबू काढणे सुलभ होते.. दर 1 0 ओळींनंतर 10 फूट जागा सोडली तरी चालते. यामुळे बांबू तोड करताना मजुरांना पुरेशी जागा उपलब्ध होते.

कढीपत्ता शेती अन् त्याच मालाची पावडर बनवून व्यवसाय यशस्वी करणारा आणि करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा

वर दिलेली पूर्वमशागत केलेली असते. प्रत्यक्ष लागवड करताना मातीने भरलेले खड्डे रोप लावण्यापुरते फावड्याने खोदावे आणि पेरणी करावी. यावेळी हा रोपांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. रोपांच्या ऐवजी कंद पद्धतीने लागवड करायची असल्यास लगेच त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी पेरणी सुरू करणे आवश्यक आहे. रोपे मात्र आठवडाभर सावलीत ठेवून नंतर पेरणी केली तरीही काही फरक पडत नाही.

बांबू लागवड पाणी व्यवस्थापन

पावसाळ्याच्या काळात रोपे लावल्याने या 4 महिन्याच्या कालावधीत पाण्याची व्यवस्था करावी लागत नाही. आम्ही ड्रीप द्वारे पाणी देण्याची व्यवस्था मात्र शक्य असल्यास डिसेंबर महिन्यात करा. यासाठी ड्रीप करता प्रेशर कॉम्पेन्सेटेड (PC) ड्रिपर्सच यांचा वापर करावा. किंवा ठिबक सिंचन पद्धती वापरावी. याचा एक फायदा म्हणजे पाण्याचा दाब जास्त झाला तरीही प्रेशर कॉम्पेन्सेटेड ड्रिपर्स पाण्याचा प्रवाह एकसमान ठेवण्याचे करू करते.

जर तुम्ही कंदाचा वापर करून बांबू लागवड केली असेल तर ऑक्टोबरनंतर पाणी देण्याची आवश्यकता पडत नाही, मात्र या काळात 15 ते 20 टक्के कंदांची मर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंद लागवड पद्धती वापरल्याने ड्रीप वरील खर्च कमी होईल. पहिली दोन वर्षे ऑक्टोबर ते मे पर्यंत पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर प्रत्येक रोपाला आठवड्यातून कमीतकमी दोन वेळा 20 लिटर पाण्याची गरज भासते. मात्र उन्हाळ्यात पहिली दोन वर्षे पाणी न दिल्यास रोपे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असल्यास उन्हाळ्यात पाणी द्या.

खत व्यवस्थापन

बांबूच्या सुकलेल्या पानांचा कचरा बांबूच्या मुळांत जमा करावा तसेच दोन टोपले (अंदाजे 10 किलो) सुकलेले शेणखत द्यावे. त्यावर दोन टोपले (10 किलो) नवीन माती टाकावी. असे केल्यास पावसाळ्यात बांबूच्या बेटामध्ये गांडुळांची संख्या वाढते आणि त्या पानांचे गांडूळ खत बनते. आपोआपच हे खत बांबूला मिळून बांबू वाढीस लागतो. शक्य असल्यास शेणखत प्रत्येक वर्षी द्यावे. किंवा एक वर्षाआड द्यावे. मात्र हे शेणखत चांगले सुकविलेले असणे आवश्यक असते अन्यथा त्यात अळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

नवीन कोंबांना सुरवातीच्या वाढीसाठी नायट्रोजनची जास्त आवश्यकता असते. शेणखतामध्ये NPK ( नैट्रोजन: फॉस्फोरोस: पोटॅशियम ) हे 3:2:1 प्रमाणात असते. शेणखत हे मातीतील आद्रता दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते. परिणामी जमिनीची गुणवत्ता वाढते. तद्वतच प्रत्येक झाडाला संथगतीने पोषण देते. तशेणखत वापरल्यास जलप्रदूषण होत नाही म्हणूनच उत्पादवाढीसाठी शेणखत हा सर्वात चांगला व सुरक्षित पर्याय असतो.

तण नियंत्रण आणि फवारणी

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला बांबू लागवडीतील तण विळ्याने कापावे. कुंपणाच्या कडेने 150 Glyphosate 5 लिटर स्वच्छ पाण्यात मिसळून या तणनाशकाची फवारणी स्प्रे पंपद्वारे करावी. त्यात केसाला लावण्याचा शाम्पूचा छोटा सॅशे टाकावा (यामुळे फवारलेले केमिकल पानावर चिटकून राहते). फवारणी करताना गवत हिरवे व ओले असणे आवश्यक असते. हे केमिकल पानांमार्फत शोषले जाऊन मुळांपर्यंत पोहोचते त्यामुळे मुळांसकट गवत मरते व परत वाढ होत नाही. जेव्हा आपण नींदणी करून तण काढतो तेव्हा ते पुन्हा उगवते मात्र या फवारणीमुळे तण कायमस्वरूपी नष्ट होते. फवारणीची ही प्रक्रिया दरवर्षी याच वेळी करावी.

बांबूतोड करण्याबद्दल माहिती

बांबू लागवड केल्यापासून पहिली तोड ही लागवडीच्या 4 वर्षांनंतर केल्या जाते. त्यानंतर दर एक वर्ष आड बांबू तोड करावी. केवळ 2 ते 3 वर्ष वयाचे अधिक जुने बांबू तोडावे. उदा. जून 2024 मध्ये उगविलेले कोंब हे नोव्हेंबर 2026 मध्ये 2-3 वर्षांचे होतात त्यामुळे हे बांबू तोडण्यास काहीही हरकत नसते. बांबू तोड ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात करावी कारण या काळात तोडलेल्या बांबूला वाळवी लागण्याचे प्रमाण कमी असते.

बांबू लागवड करण्यासाठी येणारा खर्च

1 एकर क्षेत्रात 10×10 फूट अंतर ठेवल्यास सुमारे 400 रोपे असतात. मजुरांमार्फत कामगिरी करून घ्यायची असल्यास बांबू लागवड साठी पहिल्या वर्षी सुमारे दीड लाख रुपये प्रति एकर शेताला खर्च येतो. तिसऱ्या वर्षापासून केवळ खतांकरता खर्च येतो.

बांबू लागवड मधून मिळणारा नफा

बांबू लागवड केल्यापासून 4 वर्षांनंतर 1 वर्षाआड बांबूतोड करता येते. पहिल्या तोडीला मिळणाऱ्या काठ्या या कमी जाडीच्या असतात मात्र दुसऱ्या तोडीपासून मिळणाऱ्या काठ्या या जास्त जाडीच्या असतात. जास्त जाडीच्या काठ्यांना चांगला बाजारभाव मिळतो. बांबूचे दर हे काठीच्या उंचीप्रमाणे आणि जाडीनुसार बदलत असतात. 12 फुटी, 18 फुटी अशा उंचीप्रमाणे वेगवेगळे दर मिळतात. 1 एकर शेतीतून अंदाजे साडे तीन रुपयांचे द्वीवार्षिक उत्पन्न मिळू शकते. यात एक वर्षाआड केलेला खताचा खर्च वजा करून 3 लाख ते 3 लाख 10 हजार रुपये नफा एक वर्षाआड मिळू शकतो. दरवर्षी खत व्यवस्थापन योग्यरीत्या केल्यास अधिकच चांगला नफा मिळू शकतो.

बांबूची विक्री कुठे करता येईल?

बांबुंचे अनेक उपयोग आहेत. विविध क्षेत्रातील वाढती मागणी बघता अनेक व्यवसायांसाठी कच्चा माल म्हणून बांबूचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. अगरबत्ती व्यवसाय, फर्निचर, बांबु प्लेट्स, कॉस्मेटिक, बांधकाम उद्योग इत्यादी अनेक क्षेत्रांत बांबुची मोठ्या प्रमाणावर गरज पडते. अशा व्यावसायिकांना बांबूंचा थेट पुरवठा करता येऊ शकतो.

बांबूच्या बाजारपेठेत येत्या काही वर्षांमध्ये भरीव वाढ होत आहे. बांधकाम, कापड आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये बांबूचा वापर वाढल्याने बांबू पॅनेलची मागणीही प्रचंड प्रमाणात आहे. शाश्वतता आणि पर्यावरणाविषयी जागरूकता सतत वाढत असल्याने, बांबू उत्पादनांना जगभरातील विविध उद्योगांमध्ये अधिक आकर्षण मिळत आहे. एकंदरीत बांबू लागवड एक फायदेशीर व्यवसाय ठरत आहे हे मात्र नक्की.

बांबुंच्या लागवडीचे फायदे आणि महत्व

बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते. बांबू लागवड अत्यंत कमी खर्चात केल्या जाऊ शकते. बांबू लागवड साठी पाण्याची जमीन नसली तरी हे लोक घेता येऊ शकते.लागवडीयोग्य नसलेल्या पडीक जमिनीत सुद्धा बांबु लागवड करता येते.

शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती आहे. बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. महाराष्ट्रात बांबू लागवड साठी हवामान पोषक आहे. या लागवड मध्ये आंतरपिके सुद्धा घेता येतात. दरवर्षी पेरणी करायची गरज नसते. एकदा झाडे मोठी झाली 40 वर्षे उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साध्य करता येते. सर्व प्रकारच्या जमिनीत बांबू लागवड करता येते. अद्रक,हळद,भाजीपाला यांसारखी आंतरपिके घेता येतात.

बांबु लागवड केल्यामुळे जमिनीची धूप व पर्यावरण समतोल राहतो. बांबूपासून वेगवेगळी साहित्य उदा. घर,छप्पर,चटई, टेबल,पंखा हातमाग वस्तू,प्लाई, दागिने ,टाईल्स,वाद्य यंत्र, अगरबत्ती,एक्स्पोर्ट दर्जाचे कपडे तयार होतात. या उद्योगांत बांबूंचा कच्चा माल म्हणून उपयोग होतो. बांबू पासून इथेनॉल बनविता येते आता पेट्रोलियम मंत्रालय भारत सरकार यांनी 20% इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करण्यास परवानगी दिलेली असल्यामुळे बांबू लागवड करून चांगल्या किंमतीत विकता येऊ शकते.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment