अजित पवार यांचा गोठा, फार्महाऊस आणि गांडूळ खत प्रकल्प

अजित पवार यांचा गोठा आणि शेती : माणसं मातीशी नाळ जोडलेली असावी लागतात. काही माणसे कितीही मोठी झाली तरी आपली संस्कृती आपल्या चालीरिती सोडत नाहीत. आज आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गोठा जवळून अनुभवणार आहोत. अजितदादा पवार यांचे शेतीप्रेम काही जगाला नवीन नाही. आधीपासून शेतीविषयी अत्यंत जवळीक असलेला हा माणूस आजही शेतीत रमतो. अजितदादा पवार यांना त्यांच्या शेतीत राबणाऱ्या तसेच गोठा आणि शेती सांभाळणाऱ्या घरगड्यांची सुद्धा किती काळजी आहे हे त्यांनी गाड्यांसाठी केलेल्या राहण्याच्या व्यवस्थेतून आपल्याला दिसून येईल. अजित पवार यांचा गोठा हा इस्रायल पद्धतीचा असून आजच्या या लेखातून आपण अजितदादा यांच्या गोठ्या विषयी तसेच गांडूळ खत प्रकल्प आणि गोबर गॅस या सर्व गोष्टी जवळून अनुभवणार आहोत.

अजित पवार यांचा गोठा आणि गुरेढोरे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा गोठा सांभाळणारे व्यवस्थापक बापू पवार हे 1991 पासून अजित पवार यांचा गोठा आणि शेती सांभाळत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार 8 एकर क्षेत्रात अजित पवार यांचा गोठा असून या 8 एकरात गुरांसाठी चारा, ऊस यांची लागवड करण्यात आली आहे. अजित पवार यांचा गोठा हा सात प्रकारच्या गायींना सजलेला आहे. यात जर्सी, काळी कपिला फारफर, गिर या जातींच्या गायी आपल्याला पाहायला मिळतील. गोठ्याच्या शेजारी गांडूळखत निर्मिती प्रकल्प आणि गोबर गॅस सक्रिय आहेत. अजित दादा पवार हे आजही गावी असले की सकाळी साडेपाच वाजताच तयार होऊन शेतात हजर होतात. कारण शेतीविषयी अपार प्रेम असलेले अजित पवार हे स्वच्छता प्रेमी असून त्यांना टापटीप, नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ही लागतेच असे बापू पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांचा गोठा आणि गुरेढोरे

शेतात उसाची लागवड आणि चारा

अजितदादा पवार यांच्या शेतात आजही ऊस आणि चारा यांचे उत्पादन घेतल्या जात आहे. अजित पवार यांचा गोठा तर आकर्षणाचे केंद्र आहेच याशिवाय त्यांच्या शेतात उसाच्या 205, 1512, 8005 आणि 86032 या वरायटी लावलेल्या तुम्हाला दिसतील. शेतातील काही भाग हा गुरांच्या वैरणासाठी राखून ठेवलेला आहे. याशिवाय त्यांच्या शेतात तुम्हाला मोठमोठी नारळाची झाडे दिसतील. त्यांच्या शेतात 20 ते 25 घरगडी कामाला असतात. त्यांच्या शेतात नेहमी 2 मोठमोठ्या कार आणि ट्रॅक्टर आवश्यक कामासाठी नेहमीच उपलब्ध असतात. शेतातील अस एकही यंत्र नाही जे तुम्हाला त्यांच्या शेतात दिसणार नाही. त्यांच्या शेतात रांगेने नांगर पासून ते शेतीत उपयोगी पडणाऱ्या अत्याधुनिक यंत्रांचा समावेश आहे. त्यांचे टुमदार फार्म हाउस तुमचे नक्कीच लक्ष वेधून घेईल.

अजित पवार यांचा गोठा आणि फार्म हाऊस

अजितदादा पवार यांची स्वतःची दूध डेअरी

अजितदादा पवार हे शेतीत इतके गढून जातात की त्यांना त्यांचा विरंगुळा पूर्ण करण्याचे सामर्थ्य हे या शेतीत आहे असे म्हणायला हरकत नाही. अजितदादा पवार यांचा गोठा हे दूध उत्पादन करण्याच्या शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या गोठ्यात सुमारे 100 ते 150 लिटर दूध सर दिवशी निघते. हे सर्व दूध त्यांच्या स्वतःच्याच डेअरीवर जाते. अजित पवारांची स्वतःची दूध डेअरी आहे. एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून नक्कीच अजितदादा पवार यांचं नाव घ्यायला हरकत नाही. शेतीविषयक सर्वच कामे अजितदादांना स्वतः येतात. त्यांना शेतीची जाणं तर आहेच मात्र आजही इतक्या मोठ्या पातळीवरील नेते असूनही शेतीकडे ते आवर्जून लक्ष देतात ही बाब इतर सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

अर्ध्या एकरात 3 महिन्यांत 2 लाखांचा नफा, सरकारी योजना आली कामाला

अजित पवार यांचा गोठा

घरगड्यांसाठी आहे राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था

श्रीमंत माणूस त्याच्या नोकरदार वर्गाशी कसे वागतात यावरून त्या माणसाची किंमत ठरत असते. एरवी राजकारणात रागीट स्वभावाचे म्हणून ओळखल्या जाणारे अजितदादा पवार यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांनी मात्र याबद्दल एकदम विपरीत मत मांडले आहे. त्यांचे व्यवस्थापक बापू पवार यांच्यानुसार अजितदादा हे खूपच काळजीवाहू व्यक्ती आहेत. त्यांचा स्वभाव रागीट जरी वाटत असला तरी त्यांची माया आणि प्रेमळ भावना नेहमी त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या माणसांना जाणवते. अजितदादा पवार यांचा गोठा सांभाळणाऱ्या तसेच त्यांच्या शेतीत काम करणाऱ्या घरगड्यांसाठी सुद्धा त्यांनी छान असे मुंबईतील चाळीसारखी छान अशी घरे बांधून ठेवलेली आहेत. सर्व घरगड्यांना राहण्यासाठी या खोल्यांची व्यवस्था केलेली तुम्हाला त्यांच्या शेतात दिसेल. अजितदादा यांचा गोठा आणि त्यांची शेती पाहून आणि तिथले वातावरण पाहून तुम्ही त्या मनमोहक निसर्गाच्या सानिध्यात रमल्याशिवाय राहणार नाही.

सेंद्रिय शेती करुन 2 हजार बचतगटाच्या महिला झाल्या मालामाल, जाणून घ्या अर्धा एकर मॉडेल

अजित पवार यांचा गोठा आणि शेती सांभाळणाऱ्या घरगडी माणसांच्या राहण्याच्या खोल्या

या कारणामुळे ठरतात अजितदादा अस्सल शेतकरी

आजकाल नेत्यांकडे आणि मोठमोठ्या श्रीमंत लोकांकडे शेती असणे काही मोठी गोष्ट नाही. शेती विकत घेणे हा फायद्याचा सौदा ठरत असतो. बरेच श्रीमंत लोक शेती घेऊन ठेवतात. मात्र शेतीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. मात्र अजित पवार यांचं शेतीशी असलेले नातं हे त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. अजित पवार यांचा गोठा तसेच शेती यांचा उल्लेख करणे इतकेच पुरेस नाही. तर शेतातील प्रत्येक गोष्टीत आणि कामगिरीत ते जातीने लक्ष घालून कामगिरी करून घेतात. शेतीतून समृद्धीकडे वाटचाल कशी करावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा पवार यांची शेती आणि शेतीविषयक तळमळ. इतकी मोठी माणसे जर शेतीकडे आजही लक्ष देतात तर सामान्य शेतकऱ्याने शेतीत राबून मेहनतीने नक्कीच स्वतःचा उद्धार करण्याची मानसिकता ठेवणे ही काळाची गरज आहे.

अजितदादा पवारांनी स्वतः केली शेती

अजितदादा पवार यांनी अनेक मुलाखतीत सांगितले आहे की जरी ते शरद पवारांचे पुतणे असले तरीही त्यांनी स्वतः शेती केलेली आहे. एवढंच काय तर पोल्ट्री फार्म सुद्धा चालविला आहे. त्यांनी पशुपालन आणि विक्रीचा तसेच दुधाचा व्यवसाय केलेला आहे. शेतकरी कुटुंबातील आणि शेतकरी असल्याचे अभिमानाने सांगणारे अजितदादा पवार हे स्वतः शेतीत घाम गाळणारे नेते आहेत. सक्रिय राजकारणात सहभागी होण्यापूर्वी आणि एक यशस्वी राजकीय कारकीर्द स्थापन केल्यानंतर अलीकडच्या काळात सुद्धा त्यांनी शेतीची कास धरून ठेवली आहे. जिवनात यशस्वी झाल्यानंतर सुद्धा शेतीशी नाळ आणि आपल्या शेतिरूपी काळ्या आईबद्दल प्रेम असणारे अजितदादा पवार यांच्यासारखे नेते बरेच कमी असतात.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment