भारतातील टेरेस शेतीचे फायदे : भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशात अनेक प्रकारच्या पद्धतींची शेती केली जाते. पारंपरिक शेतीपासून ते आधुनिक प्रगत शेतीपर्यंत एकूण सगळ्याच प्रकारची शेती देशातील वेगवेगळ्या भागांत पाहायला मिळते. आज आपण भारतातील टरेस शेतीचे फायदे जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो अनेक प्रगत देशांत आपण विविध प्रकारची शेती पहिली असेल उदा. समोच्च शेती, हवेमधील शेती, खडकाळ प्रदेशात केल्या जाणारी शेती. मात्र टेरेस शेती ही अगदी हौस म्हणून सुद्धा केल्या जाते. भारतातील टेरेस शेतीचे फायदे जाणून घेतल्यानंतर अनेक श्रीमंत लोक सुद्धा त्यांच्या छतावर अशाप्रकारची शेती करण्यास मोहित होतात.
मागील काही दशकांपासून भारताच्या विविध शहरात टेरेस शेतीचे फॅड खूपच वाढल्याचे पाहायला मिळते. काही जण तर या छतावरील शेतीचा म्हणजेच टेरेस शेतीचे फायदे त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सुद्धा घेऊन आर्थिक उन्नती साधून घेण्याची सुद्धा उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. भारतातील टेरेस शेतीचे फायदे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी टेरेस शेतीबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर आधी जाणून घेऊया छतावरील शेती कशाला म्हणतात आणि कशी करतात याबद्दल महत्वपूर्ण माहिती.
टेरेस शेती म्हणजे नेमके काय?
आपल्या देशातील अनेक शहरांत जमिनी अभावी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक शेती करणे शक्य होत नाही. परिणामी शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या मात्र नोकरीमुळे वेळ न मिळणाऱ्या तसेच शेतीची प्रचंड आवड असणाऱ्या लोकांनी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी त्यांच्या घराच्या किंवा इमारतीच्या छतावर किंवा बाल्कनीत विविध प्रकारचा भाजीपाला तसेच इतर वनस्पती कुंड्यात माती घालून त्यात पेरणी केली. अन् त्या वनस्पतींना किंवा भाजीपाल्याला वाढविण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांना एकतर स्वतः पिकवलेल्या ताज्या पालेभाज्या खायला मिळू लागल्या अन् दुसर म्हणजे त्यांचा फावला वेळ सत्कर्मी लागून त्यांना त्यांची शेतीची आवड जोपासता येऊ लागली.
अशाप्रकारे टेरेस शेतीचे फायदे लक्षात येऊन ही छतावरील शेती म्हणजेच टेरेस शेती करण्याकडे शहरात राहणाऱ्या अनेक श्रीमंत तसेच नोकरदार वर्गाचा कल हळूहळू वाढत गेला अन् आज अशी परिस्थिती आहे की जगातील विविध देशांतच काय तर भारतातील जवळपास सर्वच शहरांत काही हौशी लोक टेरेस शेतीचे फायदे जाणून घेऊन ही शेती एक छंद म्हणून जोपासू लागली.
समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या संपुर्ण माहिती
टेरेस शेती कशी करतात? मशागत बद्दल माहिती
शेतकरी मित्रांनो गच्चीवरील म्हणजेच छतावरील शेती करायची म्हटल तर खूप पैसा अन् खूप जागा लागते हा एक मोठा गैरसमज आहे. मात्र प्रत्यक्षात टेरेस शेती करण्यास खूप सोपी अन् कमी खर्चिक आहे. तुम्ही जर तुमच्या बाल्कनीत किंवा छतावर लागवड करू इच्छित असाल तर लक्षात घ्या की ही टेरेस शेती करण्यापूर्वी म्हणजेच लागवड करण्यापूर्वी तुमच्या मनात तुम्हाला कशा प्रकारे कुंड्या अन् कोणत्या प्रकारचा भाजीपाला किंवा इतर वनस्पतीची लागवड करायची आहे याचा एक कच्चा आराखडा बनवून घ्या.
तुमच्या या लागवडीसाठी एक धोरण बनवून घ्या म्हणजे पुढील गोष्टी अगदी सोप्या होतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बसण्यासाठी या टेरेस शेतीच्या मध्यभागी तुम्ही व्यवस्था करून घ्या. कारण त्यामुळे शहरात असून सुद्धा तुम्ही अगदी निसर्गाच्या सानिध्यात असण्याची मज्जा अनुभवू शकता.
भारतातील टेरेस शेतीचे फायदे आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्याआधी या छतावरील शेतीची लागवड करण्यासाठी तयारी कशी करावी अन् काय साहित्य/साधने लागतात याबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे. तर टेरेस गार्डन करताना तुम्हाला फावडे, बागकाम दंताळे, पाणी देण्याची कॅन, होसपाईप, ट्रॉवेल, कुंड्या आणि मशागतीयोग्य माती या सर्व गोष्टींची गरज पडेल. सर्वात आधी माती आणि शेणखत/कंपोस्ट खत साहाय्याने मिश्रण तयार करून घ्या. माती अतिशय हलक्या दर्जाची नसावी तसेच अतिशय कॉम्पॅक्ट सुद्धा नसावी. तसेच मातीचा पोत संतुलित ठेवा. माती खताशी चांगली एकजीव करून घ्या. कुंडी मध्ये वापरण्यास योग्य होण्यासाठी हे मातीचे मिश्रण एक किंवा 2 आठवडे चांगले एकजीव होऊ द्या.
नंतर शेवटी कुंड्या मध्ये तुम्ही तुम्हाला हवी ती वनस्पती पेरू शकाल. तुमच्या टेरेसला किती वेळ सूर्यप्रकाश मिळतो याचा अंदाज घेऊन त्यानुसार योग्य तो भाजीपाला किंवा वनस्पती निवडा. लक्षात घ्या वाटाणे, पालक, गाजर, कोबी बीट इत्यादी अनेक वनस्पतींना 4 ते 6 तास जरी पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला तरीही त्यांची योग्य वाढ होते. ज्या लोकांना थेट छतावर माती पसरवून ही लागवड करायची असते असे लोक टेरेस वर वॉटर प्रूफिंग करतात त्यामुळे गळती होत नाही. यामध्ये काँक्रिट स्लॅबवर पॉलिमरचे कोटिंग लावल्या जाते. तशा वॉटर प्रूफिंग करण्याच्या अनेक पद्धती आहेत मात्र जास्तीत जास्त वापर होणारी पद्धत ही पॉलिमर कोटींग ही आहे.
जाणून घ्या भारतातील टेरेस शेतीचे फायदे
शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊयात या भारतातील टेरेस शेतीचे फायदे म्हणजेच छतावरील शेती करण्याचे नैसर्गिक फायदे कोणते आहेत याची सविस्तर माहिती.विशेष म्हणजे टेरेस शेती सुरू करण्यासाठी कोणत्याही विशेष शेतीविषयक ज्ञानाची आवश्यकता नसते. टेरेस गार्डन किंवा शेतीतील बाग वाढवण्यासाठी त्याला चांगला सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळणे मात्र आवश्यक असते. खाली भारतातील टेरेस शेतीचे फायदे दिलेले आहेत जे निसर्गाच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरतात.
चीन देशातील शेती प्रगत असण्याची अचंबित करणारी कारणे
पौष्टिक हिरव्या भाज्या
जे लोक शहरात राहतात त्यांना बाजारातून 1 ते 2 दिवस पूर्वी आलेल्या भाज्याच जास्त मिळत असतात. मात्र स्वतः टेरेस शेती करून पिकविलेल्या ताज्या आणि घरगुती भाज्या तसेच फळे त्यांना त्यांनी सुरू केलेल्या टेरेस शेती किंवा टेरेस गार्डन या उपक्रमाच्या माध्यमातून मिळतात. अशा हौशी अन् शेती बद्दल विशेष आवड असणाऱ्या लोकांना म्हणजेच शेतकऱ्यांना यांच्या टेरेस गार्डनमध्ये सेंद्रिय भाज्या आणि फळांचा असा उपयुक्त साठा मिळतो, जो ताजा आणि पौष्टिक भाजीपाला सुपरमार्केटमधून खरेदी केलेल्या फळांपेक्षा त्यांच्या उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
आजच्या या धकाधकीच्या अन् प्रदूषण युक्त युगात रोज ताजा भाजीपाला खाणे कोणाला आवडणार नाही बरं? आपल्या कुटुंबाचे दैनंदिन पोषण उच्च दर्जाचे होण्याची हमी या टेरेस शेतीच्या माध्यमातून मिळाल्याचे समाधान या लोकांना मिळत असते हे मात्र नक्की. हे भारतातील टेरेस शेतीचे फायदे आहेत.
शहरातील उष्णता कमी होते
मित्रांनो शहरात औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर असते. परिणामी प्रदूषण सुद्धा तेवढ्याच प्रमाणावर होते याची आपल्याला कल्पना आहेच. मात्र टेरेस गार्डन किंवा टेरेस शेती हे तुमचे घर तसेच आजूबाजूचे वातावरण थंड ठेवण्यासाठी मदत करते. जे लोक मुंबईसारख्या दमट आणि उष्ण हवामानात राहतात त्यांच्यासाठी टेरेस शेती म्हणजे एकप्रकारची नैसर्गिक सानिध्यता असते. हे भारतातील टेरेस शेतीचे फायदे मानवी मनाला अत्यंत सुखावून जातात.
टेरेस गार्डन वर लावलेली सर्व झाडे सूक्ष्म वातावरण तयार करतात ज्यामुळे घराचे आणि सभोवतीचे वातावरण थंड होण्यास मदत होते. या प्रकारचा आरोग्यदायी घरगुती अन्नाचा आनंद घेता घेता महागड्या एअर कंडिशनिंग उपकरणांवर येणारा खर्च सुद्धा वाचू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. भारतातील टेरेस शेतीचे फायदे जाणून घेतल्यानंतर अनेक शहरी लोक, अगदी नोकरदार वर्गापासून ते गर्भ श्रीमंत लोक या टेरेस गार्डनच्या प्रेमात पडले नाही तर नवलच. भारतातील टेरेस शेतीचे फायदे यामध्ये हा सर्वात समाधानकारक फायदा आहे.
कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते
तुम्हाला जर पर्यावरणाला अडत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या टेरेस शेतीच्या माध्यमातून पर्यावरणाला संतुलित राखण्यासाठी तुमचा खारीचा वाटा देऊ शकतात. तुमच्या घराच्या छतावर बाग लावून तुम्ही हवेतील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकता. ही छोटी छोटी झाडे हवेची गुणवत्ता सुधारण्यास अवश्य हातभार लावतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यात सतत वावरणारा मानवी समाज आज निसर्गाच्या असंतुलित प्रमाणाचे गंभीर परिमाण भोगण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र आता प्रत्येकाने आपापल्या परीने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
शहरात सुद्धा मिळते नैसर्गिक सानिध्य
तुम्ही जर टेरेस शेती सुरू केली तर तुमची टेरेस गार्डन तुम्हाला 24 तास निसर्गाच्या सानिध्यात ठेवायला एक रामबाण उपाय म्हणून कामी येईल यात शंका नाही. शहरातील दगदगीच्या जिवनात वावरत असताना कामावरून थकून भागून घरी आलात अन् तुमच्या इवल्याशा टेरेस शेतीच्या मध्यभागी बसून इवल्याशा रोपांकडे बघत बसलात की तुमची सगळी मरगळ, तुमचा सगळा तणाव अगदी क्षणात नाहीसा होईल. भारतातील टेरेस शेतीचे फायदे जाणून घेतानाच जर तुम्हाला प्रसन्नतेचा अनुभूती येत असेल तर तुम्ही एक अस्सल पर्यावरणप्रेमी तसेच शेतीविषयी आपुलकी असणारे सद्गृहस्थ आहात याची खात्री कोणीही देऊ शकेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल कमेंट करून नक्की सांगा.