स्वाधार योजना 2024 अर्ज भरायला सुरुवात, “या” विद्यार्थांना मिळेल योजनेचा लाभ

गरीब विद्यार्थ्यांना नेहमीच सरकार ते शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी नवीन नवीन योजना काढून गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने अनेक योजना राबवत असतात. महाराष्ट्र सरकार सुद्धा आशा गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक माध्यमांतून नवीन नवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना या योजनांचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होऊन आर्थिक दृष्ट्या अशा महत्त्वपूर्ण योजना मुळे मदत होत असते.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अशीच एक महत्वपूर्ण योजना आहे. त्या योजनेचे नाव आहे स्वाधार योजना. या योजनेद्वारे सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य प्रदान करत असते.

स्वाधार योजना संपुर्ण माहिती 2024

काय आहे स्वाधार योजना?

ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च या योजनेच्या माध्यमातून सरकार करत असते. अशा विद्यार्थांच्या राहण्याचा, जेवणाचा, शालेय साहित्याचा तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी लागणारा खर्च स्वाधार योजनेच्या माध्यमातून शासन उचलत असते. आणि अशा विद्यार्थांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात येतात.

कोणाला मिळतो स्वाधार योजना अंतर्गत लाभ?

ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी लागू करण्यात आली आहेत. अनुसूचित जातीचे विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरतात.

स्वाधार योजना अंतर्गत मंजूर केलेल्या शिष्यवृत्तीचा तपशिल

सर्व घटक मिळून वार्षिक एकूण 51 हजाराची शिष्यवृत्ती
1. बोर्डिंग सुविधा – 28,000 रुपये
2. लॉजिंग सुविधा – 15,000 रुपये
3. मेडिकल आणि इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी – 5,000 रुपये (अतिरिक्त)
4. विविध खर्च – 8,000 रुपये
5. इतर शाखांसाठी – 2,000 रुपये (अतिरिक्त)
एकूण रक्कम – 51,000 रुपये

👉 हे सुध्दा वाचा

ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना मिळत आहे एक लाख रुपये शिष्यवृत्ती, असा करा ऑनलाईन अर्ज

स्वाधार योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हि इयत्ता 10 वी व 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करणे करिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंमलात आणण्यास सरकारने दिनांक 06 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयान्वाये मान्यता दिलेली आहे.

स्वाधार योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना किती रक्कम मिळते?

लाभार्थी विद्यार्थ्यांना भोजन, राहणे आणि शालेय खर्च तसेच इतर खर्चासाठी शासनाकडून दरवर्षी 51000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

काय आहेत स्वाधार योजना संबंधी लाभाचे निकष?

या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा.
विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल.
विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेडयूल्ड बँकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किमी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात, शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
विद्यार्थी इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा.
इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे.

स्वाधार योजना लाभासाठी अटी आणि शर्ती

1) स्वाधार योजना अंतर्गत लाभासाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे शिक्षण हे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या उच्च शिक्षण घेणारा असावा.

2) 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला 10 वी मध्ये किमान 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थी 12 वी नंतरचा दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावे.

3) विद्यार्थ्याला 12 वी नंतर पदविका किंवा पदवीसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर अभ्यासक्रम हा २ वर्षापेक्षा कमी नसावा.

4) निवड झालेल्या विद्यार्थी संबधित अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण करेल तेव्हाच तो स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असेल.

5) निवड झालेल्या विधार्थी संबधित अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण करेल तेव्हाच तो स्वाधार योजनेचा लाभासाठी पात्र असेल.

6) स्वाधार योजनेसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल.

7) दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणाची पात्रता ही किमान 50 टक्के असेल.

8) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून प्रत्येक सत्राची परीक्षा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.

9) स्वाधार योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे नाहीतर ज्या विद्यार्थ्याला 60 टक्के पेक्षा कमी गुण मिळतील असा विद्यार्थी ह्या योजनेस पात्र ठरणार नाही.

स्टेट बँक देत आहे गरीब विद्यार्थ्यांना साडे सात लाखापर्यंत शिष्यवृत्ती, असा करा ऑनलाईन अर्ज

स्वाधार योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला नागपूर विभागात सुरुवात झाली असून जास्तीत जास्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.

ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट https://hmas.mahait.org

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी स्वाधार योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://hmas.mahait.org हे असून या पोर्टल द्वारे नागपूर जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन सदर अर्जाची प्रत सहाय्यक आयुक्त. समाज कल्याण, नागपूर येथे सादर करण्यात यावे, असे जाहिर आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर यांनी केले आहे. स्वाधार योजने बाबत सविस्तर माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय आय. टी. आय समोर, श्रध्दानंद पेठ, दीक्षाभूमी चौक, नागपूर या कार्यालयाशी संपर्क करावा

ऑनलाईन अर्ज कसा भरावा?(swadhar scheme apply online)

स्वाधार योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी आधी त्यांचे नाव register करून लॉग इन करावे. नंतर नवीन अर्ज या विकल्पावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती भरावी.

नविन अर्जासाठी भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील माहिती अचूक भरावी.

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव
२. वडिलांचे संपूर्ण नाव
३. अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
४. आधार कार्ड क्रमांक
५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख
६. अर्जदाराचे वय
७. अर्जदाराचे लिंग
८. आईचे संपूर्ण नाव
९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता
१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

6 वी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना स्टेट बँक फाउंडेशन देत आहे तब्बल साडे सात लाखापर्यंत शिष्यवृत्ती, असा करा ऑनलाईन अर्ज

११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र
१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न
१५. शैक्षणिक गॅप आहे का? ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )
१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा
१७. अभ्यासक्रम
१८. शिक्षण घेत असलेला वर्ग
१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव
२०. शिक्षण घेत असलेली शाखा (उदा. कला, वाणिज्य, विज्ञान इत्यादी)
२१. महाविद्यालयातील नोंदणी क्रमांक/ ओळख पत्र क्रमांक
२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.
• प्रवेश वर्ष / दिनांक
• उत्तीर्ण महिना / वर्ष
• प्राप्त गुण
• एकूण गुण
याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे


१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते असल्याचा पुरावा म्हणून पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक सादर करावा.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा भोगौलिक असलेला फोटो अपलोड करणे
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबत चा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC
११ स्थानिक रहिवाशी नसल्या बाबतचे प्रमाणपत्र
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
१५ शपथपत्र / हमीपत्र
१६ भाडे करारनामा

ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

दिनांक ०२ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या शासन निर्णयानुसार स्वाधार योजनेसाठी 83 कोटी निधी मंजूर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यासाठी सहायक अनुदाने या सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी रू. 250 कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आलेली आहे. त्यापैकी रू. 8300 लाख इतका निधी वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे. वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सहाय्यक अनुदाने या उदिष्टाखाली एकूण रक्कम रू. 83 कोटी (अक्षरी रक्कम रूपये त्र्याऐंशी कोटी फक्त) इतका निधी वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.5

या योजनेसाठी अर्जाचे नूतनीकरण (swadhar scheme online form renewal) करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी

1) चालू वर्षाचा बोनाफाईड दाखला

2) गत वर्षाचे गुणपत्रक

3) जातीचे प्रमाणपत्र

4) चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

5) बँक खात्याचा तपशील

6) भाडे करारनामा

7) भाड्याने राहत असलेल्या जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो

8) मेस / भोजनालय खर्चाची पावती

नोट : अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी हमीपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

स्वाधार योजना अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख (swadhar scheme apply last date

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे असतील अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.

स्वाधार शिष्यवृत्तीकडेच विद्यार्थ्यांचा जास्त कल

बऱ्याच वेळा शासकीय वसतिगृहातील गैरसोयींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा स्वाधार शिष्यवृत्ती कडेच असतो. मात्र आता शासनाकडून एक नवीन अट घालण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल पण त्यांना प्रवेश मिळू शकला नसेल, फक्त असे विद्यार्थीच ‘स्वाधार योजना लाभासाठी अर्ज करू शकतात. परिणामी आता फक्त वसतिगृहापासून वंचित असणारे विद्यार्थीच ‘स्वाधार योजना अंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment