नुकतेच बारामती कृषी प्रदर्शन 2025 मोठ्या थाटामाटात पार पडले. देश विदेशातील सामान्य शेतकऱ्यांपासून ते अग्रणी अमेरिकन मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांनी सुद्धा या कृषी प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला. याशिवाय विवीध राजकीय नेते आणि अभिनेते यांनी उपस्थिती दर्शविली. यावर्षी संपन्न झालेल्या बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी ऐकून तुम्हाला सुद्धा खूप नवल आणि कौतुक वाटेल. चला तर जाणून घेऊया यंदाच्या बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी कोणत्या आहेत याची रोचक माहिती.
ऊस लागवडीत ए आय तंत्रज्ञानाचा वापर
आजच्या या आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजेच AI technology मुळे शेती क्षेत्रात सुद्धा क्रांती घडून येताना दिसत आहेत. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची लागवड करण्यात आली आहे. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला यांनी सुद्धा घेऊन त्यांनी सोशल मीडियावर या बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी बद्दल एक पोस्ट प्रसारित केली आहे. परिणामी हे कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित करणाऱ्या एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं सर्वत्र कौतुक होत आहे.राज्यातील एक हजार शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ऊस पिकावर एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
प्रदर्शनात इस्रायली ठिबक सिंचन पद्धतीचे प्रात्यक्षिक
बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी आपण जाणून घेत आहोत. यापैकी आणखी एक आकर्षण ठरलं आहे ते इस्रायली ठिबक सिंचन पद्धतीचा वापर. हे ठिबक सिंचन इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर केलेले आधुनिक सिंचन पद्धतींपैकी एक आहे. सिंचन पद्धतीत ग्राविटी इरिगेशन प्रणालीचा वापर होतो.याचा वापर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर शेततळे असेल किंवा पाण्याचा इतर स्त्रोत उदा. नदी, कालवा असेल तर आणि या पाण्याच्या स्त्रोतांची उंची 2 फूट जरी असेल तर यातून या इस्रायली ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून गुरुत्वाकर्षण शक्ती वापरून पाणी ओढत आणल्या जाते.यासाठी प्रेशरची गरज नसते. सुमारे 10 एकर शेत भिजवू शकेल इतकी क्षमता या इस्रायली ठिबक सिंचन पद्धतीत असते. याचा खर्च आपण वापरतो त्या ठिबक सिंचन इतकाच येतो. मात्र यासाठी विद्युत पुवठ्याची गरज नसते.
काळ्या टोमॅटोची शेती
शेतकरी मित्रांनो दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळ्या टोमॅटोची शेती हेसुद्धा बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी पैकी एक आकर्षण ठरले. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या 29 पेक्षा जास्त जातींची लागवड या प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला मिळाली. या लागवडीचा फायदा म्हणजे यासाठी जास्त खर्च येत नाही. मात्र काळे टोमॅटो हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त असल्यामुळे त्यांना भरघोस भाव मिळतो. परिणामी काळ्या टोमॅटोची शेती करून शेतकऱ्यांना आर्थिक मिळकतीत वाढ करता येऊ शकते. म्हणूनच यंदाच्या बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी पैकी एक महत्वाची गोष्ट ही काळ्या टोमॅटोच्या शेतीचे प्रात्यक्षिक हे होते.
11 कोटींचा घोडा आणि मुका घेणारा बैल विशेष आकर्षण
यंदाच्या कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी पैकी 11 कोटी रुपयांचा देखणा, दिमाखदार मारवाडी जातीचा घोडा, खिल्लार कालडी, विविध प्रकारचे पक्षी, दीड टन वजनाचा एक कोटी रुपये किंमत असलेला कमांडो नावाचा रेडा आणि माणसाळलेली अन् माणसांचा मुका घेणारी सोन्या-मोन्या या बैलांची जोडी या सर्वच अभूतपूर्व गोष्टींनी बारामती कृषी प्रदर्शन 2025 अतिशय अविस्मरणीय ठरले.
हा 11 कोटींचा घोडा कोटी रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा या प्रदर्शनात हैदराबादचे नवाब हसन बिनत्रिफ यांनी आणला होता. तर संतोष कोकणे याच्या मालकीची सोन्या मोत्याची बैलजोडी यांना मुका घे म्हटल्यावर ते चटकन लोकांचा मायेने मुका घेतं होते. हे पाहून प्रदर्शनातील शेतकरी आणि इतर लोक पुरते भारावून गेले. या मुका घेणाऱ्या बैलांचा या प्रदर्शनातील सहभाग हा बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी पैकी एक महत्वाची आणि मुक्या प्राण्यांच्या प्रेमाची चाहूल दाखवणारा एक मायाळू अनुभव होता.
विविधांगी ठरले बारामती कृषी प्रदर्शन
शेतकऱ्यांना पशुपालन करण्यास आवश्यक असणाऱ्या उत्तम दर्जाच्या जनावरांच्या जातींचे गुणविशेष आणि त्यांची माहिती देण्यात आली. नविन पशुपालन व्यवसायात नवनवीन संधी उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने बारामती कृषी विज्ञान केंद्राने कृषिक प्रदर्शनाच्या माध्यमातून अश्व प्रदर्शन आणि पशुपक्षी प्रदर्शन उभारले. या प्रदर्शनामध्ये मारवाडी तसेच भीमथडी उत्तम जातीचे घोडे पाहून सर्वांनी कौतुक केले. अशाप्रकारे अनेक अविस्मरणीय प्रात्यक्षिके आणि विविध प्राण्यांचा सहभाग, परदेशी तंत्रज्ञानाशी परिचय या बारामती कृषी प्रदर्शनातील अद्भुत गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या याबद्दल तुमचे अभिप्राय कमेंट करून नक्की कळवा. तुमचा मोलाचा सल्ला आमच्यासाठी आमचे साहित्य अधिकाधिक उपयुक्त आणि माहितीपूर्ण करण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करेल तसेच तुमचा पाठिंबा आम्हाला प्रेरणा देईल यात शंका नाही.