भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी एक महिला असून 2024 या विद्यमान वर्षाच्या देशातील सर्वात श्रीमंत शेतकरी असण्याचा मान एका महिलेला मिळणे ही गौरवास्पद गोष्ट आहे. आज महिला कुठ्ल्याही क्षेत्रात पुरुषांना पुढे जाऊ देत नाहीत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला की यावर्षी सुद्धा मुलींनी मारली बाजी” असा मथळा आपण वाचत असतो.
शैक्षणिक क्षेत्रच काय तर इतर सर्व क्षेत्रात आजच्या या एकविसाव्या शतकात महिला अग्रेसर ठरत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अंतराळात जाणारी भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला/सुनीता विल्यम्स ते ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकवणारी मनू भाकर या सर्वच महिलांनी भारत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आज आपण शेती क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करून 2024 या वर्षाचा भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी असा मान मिळविणाऱ्या मनुबेन पटेल यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कुठल्या आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नितुबेन पटेल?
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नीतुबेन पटेल या मूळच्या गुजरात जिल्ह्यातील राजकोट येथील आहेत. नुकतेच मिलियनर फॉर्मर ऑफ इंडिया 2024 हा भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून देण्यात येणारा पुरस्कार नितुबेन पटेल यांना देण्यात आला आहे. तसे पाहिल्यास भारतात शेती हा पुरुषप्रधान तसेच मेहनतीचा व्यवसाय मानल्या जातो. मात्र आज या महिलेने शेती क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडून देशातील इतर महिलांना विशेषतः खेड्यातील महिलांना प्रेरणादायी ठरेल असा भक्कम पायंडा पाडून दिला आहे यात शंका नाही.
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी तीसुद्धा एक महिला असणे ही खूपच गौरवास्पद बाब आहे. नितुबेन पटेल या प्रगतिशील महिलेने आज गुजरात राज्यातीलच काय तर संपूर्ण देशातील शेती क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. निश्चितच या यशामागे या महिलेची जिद्द मेहनत शोधक बुद्धी आणि नवनवीन प्रयोग करण्याची क्षमता या सर्व गुणांमुळे आज भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून नितुबेन पटेल आज संपूर्ण देशात गौरवल्या जात आहेत. चला तर जाणून घेऊया या महिलेची वाटचाल कशी यशस्वी झाली याबद्दल सविस्तर माहिती.
नितुबेन पटेल यांचा प्रेरणादायी प्रवास
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी 2024 म्हणून बहुमान मिळविलेल्या नितुबेन पटेल यांनी राजकोट जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून आपला प्रवास सुरू केला. शेतीची उज्वल परंपरा, शेती व्यवसायातील नावीन्य स्वीकारण्याचे धाडस आणि शेतीप्रती खोलवर म्हणजेच मनापासून समर्पण असलेल्या नितुबेन यांचा शेती विषयक हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. नितुबेन पटेल यांचे गुरू दिपकभाई सचदे यांच्या मार्गावर चालून शेती म्हणजे लोकांच्या कल्याणाचे साधन अस मानून नितुबेन यांनी प्रारंभीपासूनच शेती म्हणजे लोकांना काहीतरी अमूल्य देण्याचे साधन या दृष्टीने शेतीकडे पाहिले.
त्यांनी संजीवन फाउंडेशनची स्थापना केली. तसेच पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक प्रभावी उपक्रमांचे नेतृत्व सुद्धा केले. ज्याचा फायदा गुजरात राज्यातील अनेक शेतकऱ्यांना झाला. त्या पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणार्थ अनेक उपक्रम राबविले आणि सध्याही राबवत आहेत. प्लास्टिकमुक्त राजकोट या तिच्या उल्लेखनीय प्रकल्पांपैकी एक होता. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि पर्यावरणास अनुकूल पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवन फाउंडेशन कडून दरवर्षी 10,000 कापसाच्या पिशव्या मोफत वितरित केल्या जातात.
इतर शेतकऱ्यांना करतात मोफत मार्गदर्शन
यंदाच्या भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नितुबेन पटेल या वार्षिक वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करत असतात. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाने 1,000 झाडं लावून त्यांचे संरक्षण सुद्धा त्या करतात. इतकेच नाही तर आजच्या तरुण पिढीमध्ये पर्यावरण जागरूकता वाढविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत असतात. त्यांनी राबविलेल्या ‘रुषी कृषी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाद्वारे नितुबेनने देशातील 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कीटकनाशक-मुक्त सेंद्रिय शेतीच्या फायद्यांबद्दल जागरूक केले असून, नैसर्गिक आणि शाश्वत कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांना शिक्षित केले आहे.
नितुबेन यांच्या अद्वितीय कार्याविषयी थोडेसे
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी 2024 म्हणून गौरव तसेच पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी नितुबेन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संजीवन फाऊंडेशनने विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. तसेच त्यांनी कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अवघ्या दीड महिन्यात संजीवन फाऊंडेशनने 84 शेतकरी उत्पादक संस्थांची (FPO) नोंदणी केली आहे. 100% सेंद्रिय शेतकऱ्यांना गुजरात सरकारच्या उपक्रमांशी यशस्वीपणे जोडले आहे. यामुळे राजकोटमध्ये एक समृद्ध फार्म-टू-प्लेट मॉडेल देखील स्थापित झाले असून संपूर्ण प्रदेशातील कृषी उद्योजकांसाठी एक बेंचमार्क स्थापित केला आहे, ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.
इतकेच काय तर भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नितूबेन पटेल यांनी अथक प्रयत्नांनी गुजरात सरकारच्या सहकार्याने अंतर्गत क्लस्टर प्रणाली (ICS) च्या अंमलबजावणीचे नेतृत्व केले आहे. याचा परिणाम म्हणून बहुतांश शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पुर्णपणे बदलून सकारात्मक झाला. शेतकऱ्यांना शेती फायदेशीर तसेच कमी खर्चिक कशी करता येईल याचे ज्ञान मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चात कपात करणे शक्य झाले.
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नितुबेन यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज गुजरात नैसर्गिक शेतीत संपूर्ण देशात आघाडीवर आहे. त्यांनी नैसर्गिक शेतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली आहे. आणि देशभरातील शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास त्या आजही प्रेरित करत आहे. नैसर्गिक शेतीतून समृद्धीकडे कसे जाता येते याचा जणू आराखडाच भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नितुबेन पटेल यांनी आखून दिला आहे.
नितुबेन पटेल यांचा जीवन परिचय
एक अभ्यासू आणि पर्यावरण प्रेमी व्यक्तिमत्व श्री नितुबेन पटेल यांच्या जीवनाविषयी जाणून घेऊया. त्यांचे अध्यात्मिक गुरू दीपक भाई यांच्या कार्याने प्रभावित नितु बेन यांच्यानुसार जीवनरेषा स्वतःच आपल्याला सूचित करतात की हा आत्मा त्यांचे संवर्धन आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी किती उत्कट असेल. अशी भावना मनात बिंबवून त्या समाजकार्य करण्यास प्राधान्य देतात. श्री नितुबेन पटेल हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपले जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या विविध प्रयत्नांद्वारे सजीवन ऑरगॅनिक नावाने एक अनोखे मिशन घेऊन त्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या फाउंडेशनचे नाव संजीवन फाउंडेशन ठेवले आहे. ‘सजीवन’ म्हणजे एक नवीन जीवन देणे, पुनरुज्जीवन करणे. नितुबेन यांचा शेतकरी वर्गाच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा संकल्प आहे.
नितुबेन यांच्या उपक्रमांचा विस्तृत गोषवारा
नितुबेन यांचे हे अविरत प्रयास नैसर्गिक शेतीला नवजीवन देणारे ठरत आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नितुबेन पटेल यांच्या मोठेपणाचा भव्यपणा तसेच व्यक्तिमत्त्वाचे मोठेपणा सिद्ध करतात. त्यांनी 2003 मध्ये स्पार्कल ग्रुपसह ‘दंतांत्र चावोम च्युएम च्युएम स्टिक आणि सेव्ह टूथ) या मोहिमेसह वसुंधरेचे जतन आणि पालनपोषण करण्यासाठी तिची मोहीम सुरू केली. लोकांना कीटकनाशक मुक्त अन्नाशी जोडण्यासाठी 2006 मध्ये त्यांनी सत्यम ऑरगॅनिक मॉल उघडण्याचा पुढचा उपक्रम हाती घेतला होता. लोकांच्या उदंड प्रतिसादाने आणि त्यांच्या पाठिंब्याने २००९ मध्ये सत्यम चॅरिटेबल ट्रस्टची पायाभरणी करण्यात आली. यामागील हेतू समाजाचे आणि मुख्यतः त्याच्या दोन महत्त्वाच्या शाखा, महिला आणि मुलांचे कल्याण हा होता.
अबब! तब्बल 8 फूट खोल पाण्यात ज्वारीची शेती आणि भरघोस उत्पादन
नितुबेन यांनी सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजेच 2018 मध्ये सजीवन ऑरगॅनिक नावाच्या अनोख्या संस्थेच्या स्थापनेच्या रूपाने भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी नितुबेन यांच्या अफाट ज्ञानाचा आणि अनुभवाचा समाजाला फायदा करून घेता आला. सजीवन म्हणजे जीवन देणारा. मानवजातीला सेंद्रिय उत्पादने, निसर्गोपचार आणि आयुर्वेदाशी जोडल्यामुळे ही संस्था समाजासाठी वरदान ठरली आहे. सजीवन फाऊंडेशनची स्थापना 2019 या सलग वर्षात महिला सबलीकरणावर आणि फ्रेमर्सच्या चांगल्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी विविध प्रकल्पांद्वारे महिला, शेतकरी तसेच प्राण्यांचे जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी केल्या गेली आहे.
संजीवन ऑरगॅनिक फार्म
गुजरातमधील सेंद्रिय शेती आणि दुर्मिळ औषधी वनस्पतींचे पहिले आणि सर्वोत्तम मॉडेल असलेल्या श्री नितुबेन पटेल यांनी तयार केले आहे. दोनशेहून अधिक औषधी वनस्पतींचे घर हे पृथ्वीवरील जणू स्वर्ग आहे. येथे केलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत. या दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या लागवडीच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्यावहारिक ज्ञान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या संस्थेद्वारे मोफत मिळते. वन्य वनस्पतींच्या वेशातील औषधी वनस्पती आणि आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींची काळजी त्यांच्या या USDA प्रमाणित ऑरगॅनिक फार्ममध्ये घेण्यात येते.
5 हजार एकरपेक्षा जास्त जमीन सेंद्रिय पद्धतीने लागवड
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून सन्मान मिळालेल्या नितुबेन यांच्या ऑरगॅनिक शेतीमध्ये 45 हून अधिक औषधी वनस्पतींचा संग्रह आहे. याशिवाय 100 हून अधिक दुर्मिळ औषधी वनस्पतींचे पालनपोषण या ऑरगॅनिक शेतीमध्ये केले जाते.
सेंद्रीय शेतीचा प्रचार प्रसार आणि जागरूकता
गुजरातच्या प्रगतशील महिला शेतकरी नितुबेन यांनी बियाणे पेरण्यापासून मूल्यवर्धन आणि ब्रँडिंग सेवांपर्यंत संपूर्ण प्रक्रियेद्वारे औषधी वनस्पतींची अत्यंत काळजी घेत आहेत. इतकेच नाही तर भाजीपाल्याचे बियाणेही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. 5 हजाराहून अधिक कुटुंबांना त्यांच्या जीवनाचा आवश्यक भाग म्हणून सेंद्रिय अन्नाचा अवलंब करण्यास प्रेरित केले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी म्हणून सन्मानित श्री. नितुबेन यांची सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे सेंद्रिय शेतीद्वारे तयार केलेल्या औषधांनी 5 हजारांहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
अशी करतात अंतराळात शेती, पद्धत जाणून व्हाल चकित
नितुबेन यांचे हर्बल संग्रहालय
नितुबेन या व्यावसायिक बाबतीत सुध्दा खूप जागरूक आहेत. त्यांनी शेती सोबतच त्यांना अर्थार्जन करण्याचा मार्ग मोकळा करणारा शेतीशी निगडित व्यवसाय सुरू करून त्यात प्रचंड यश मिळविले. शेतीवर आधारित विविध व्यवसाय फुलविले.सौंदर्य प्रसाधने तसेच क्रियाकलापांमध्ये वैविध्यपूर्ण परंतु ध्येयांमध्ये एकरूप असलेले, श्री नितुबेनचे जीवन हे वनौषधी संग्रहालय आहे जेथे विविध औषधी वनस्पती तयार केल्या जातात आणि तीन सुंदर शाखा आहेत. त्या म्हणजे हर्बल किचन गार्डन, मच्छरविरोधी उद्यान, फ्रूट गार्डन (मोठ्या अमृत मातीच्या भांड्यांमध्ये वाढलेली रोपटी). अशाप्रकारे भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी 2024 म्हणून नावारूपाला आलेल्या नितुबेन पटेल यांनी महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे त्यांच्या अफाट कार्यातून सिद्ध करून दाखविले आहे हे मात्र नक्की.