बुरुंडी हा आफ्रिका खंडातील एक अविकसित देश असून सीमित उत्पादन क्षेत्र असलेला तसेच संसाधन-गरीब देश म्हणून जगभरात ओळखला जातो.जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण बुरुंडी देशाबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. बुरुंडी देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा असून हा वाटा एकूण जीडीपी च्या ४०% पेक्षा जास्त आहे. बुरुंडी देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९०% पेक्षा जास्त लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच असून रोजगार मिळविण्यासाठी शेती या देशाची तारणहार बनली आहे. बुरुंडी देशात आजही प्रगतीची कुठलीही मागमूस सुद्धा दिसत नाही हे वास्तव आहे. येथील बहुतांश लोकसंख्या ही अत्यंत दयनीय स्थितीत जीवन जगते.
आजच्या या आधुनिक काळात सुद्धा हा आफ्रिकन देश अतिशय मागास राहिला आहे हे या देशाचे तसेच तेथील सरकारी यंत्रणांचे दुर्दैव म्हणावे लागेल. लक्षात घ्या बुरुंडीची प्राथमिक निर्यात कॉफी आणि चहा आहे. या निर्यातीमुळे जे परकीय चलन प्राप्त होते ते देशाच्या सर्वच क्षेत्र मिळून येणाऱ्या परकीय चलनाच्या कमाईच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. आज आपण या जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
बुरुंडी देशाविषयी थोडीशी माहिती
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण बुरुंडी देशाबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत. ग्रेट लेक्स प्रदेशात वसलेला बुरुंडी हा देश रवांडा, टांझानिया आणि काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक या देशांच्या सिमांना लागून आहे. बुरुंडी हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. दहापैकी या देशात दर दहापैकी नऊ लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन व्यतीत करतात. येथील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 15 वर्षांपेक्षा कमी आहे. तसेच हा आफ्रिकेतील सर्वात दाट लोकसंख्या असलेला देश आहे.
शेती हा बुरुंडी देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. शेती हा व्यवसाय येथील पाचपैकी चार लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो बुरुंडी देशातील शेती ही प्रामुख्याने निर्वाह निर्वाह करण्यासाठी केल्या जाते. कौटुंबिक शेती 95 टक्के अन्न पुरवठा पुरवते. या देशाच्या मुख्य पिकांमध्ये कॉफी, चहा, मका आणि बीन्स यांचा समावेश होतो. आजच्या या तंत्रज्ञानाने युक्त आधुनिक काळात सुद्धा आधुनिक शेती तंत्रांपर्यंत या देशाची पोच अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. या देशात वस्तूंच्या किमतीत चढ-उतार आणि हवामानातील बदल यांचा उत्पादकता आणि उपजीविकेवर विपरीत परिणाम होतो.
देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व लक्षात घेता सरकार सध्याच्या काळात कृषी उत्पादनाचे आधुनिकीकरण आणि वैविध्य आणण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. सरकार विविध प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करण्यास प्रयत्नशील आहे. देशात प्रवेश सुधारण्यासाठी, वाहतूक खर्च कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी हा अत्यंत गरीब देश हळूहळू पायाभूत सुविधा विकसित करत आहे.
बुरुंडी देशापुढील इतर आव्हाने
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याची कल्पना तुम्हाला देण्यापूर्वी या देशासमोर कोणती आव्हाने आहेत याबद्दल थोडी माहिती बघुया. जातीय तणाव दूर करण्यासाठी आणि सर्वसमावेशक प्रशासनाला चालना देण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असूनही, राजकीय अस्थिरता आणि सामाजिक आव्हाने काही कमी झालेली नाहीत. या देशात जिकडे तिकडे गरिबी, असमानता याची प्रकर्षाने जाणीव होते. येथे आरोग्यसेवेचा अभाव आहे.
अन्न असुरक्षितता आणि कुपोषण काही केल्या या देशाचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. आजही या देशाची 43 टक्के लोकसंख्या अन्न असुरक्षिततेने ग्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. स्थानिक अन्न उत्पादन देशाची मागणी तसेच गरज पूर्ण करण्यास असमर्थ ठरते. परिणामी अन्नाची गरज भागविण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. हा देश आदिवासी लोकांचा देश म्हणून प्रचलित आहे. सकस आणि पोषक अन्नाची कमतरता यामुळे बहुतांश बुरुंडियन लोकसंख्येच्या आहारात कंदमुळे हा प्रमुख घटक असल्यामुळे पोषणाची कमतरता बुरुंडी देशाच्या जनतेत, त्यांच्या शारीरिक व्यक्तिमत्त्वात मोठ्या प्रमाणात दिसून येते.
बुरुंडी देशापुढील नैसर्गिक आव्हाने
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याचा विचार करता शेती करताना या देशाला बऱ्याच नैसर्गिक आव्हानांचा सुद्धा सामना करावा लागतो याचा सुध्दा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम येथील शेतीवर दिसून येतो. कुपोषण म्हणा किंवा आनुवंशिकता, मात्र बऱ्याच बुरुंडियन लोकांमध्ये वाढत्या तापमान आणि अतिवृष्टीशी जुळवून घेण्याची क्षमता फारच मर्यादित स्वरूपाची आहे. बुरुंडीमधील प्रमुख पर्यावरणीय समस्यांमध्ये जंगलतोड, जमिनीचा ऱ्हास, जैवविविधतेचे नुकसान, नैसर्गिक धोके, धूप आणि हवा आणि जलस्रोतांचे प्रदूषण यांचा समस्यांचे जाळे जणू या देशाच्या प्रगतीला बाधक ठरत आहेत.
सरकारच्या धोरणांची महत्वकांक्षी भूमिका
बुरुंडी देशातील सरकारी यंत्रणेला बऱ्याच गोष्टी घडवून आणणे या देशाच्या विकासाला बळ देण्यास आवश्यक आहेत. देशातील प्रशासन सुधारणे, पारदर्शकता वाढवणे आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करणे हे सरकारचे आर्थिक विकास आणि स्थैर्य वाढवण्याचे प्राधान्य आहे. या क्षेत्रांमध्ये शाश्वत प्रगती साध्य करण्यासाठी देशाच्या सामाजिक-आर्थिक आव्हानांना तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करणे हे देशांतर्गत सरकारचे धोरण असणे आणि त्या धोरणांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय भागधारकांकडून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. अनेक देश बुरुंडी देशाची मदत करण्यास प्रयत्नशील आहे. या देशांची मदत ही फक्त उपजीविका भागविण्यापर्यंतच मर्यादित न राहता देशाचा भरीव विकास करण्याकडे सरकारचे लक्ष आणि लक्ष्य असणे अनिवार्य ठरते.
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात; जाणून घ्या
पूर्व आफ्रिकेतील जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याबद्दल.आपल्याला उत्सुकता असेलच. तर मित्रांनो या देशात शेती ही अत्यंत पारंपरिक पद्धतीने केली जाते. शेती करण्यासाठी आजही जनावरांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. या देशातील प्रमुख पिके चहा, कॉफी, मका, तांदूळ, सोयाबीन इत्यादी आहेत. प्रती शेतकरी सरासरी 2 एकर शेती या देशातील लोकांकडे आहे. बुरुंडीमध्ये प्रती शेतकऱ्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न 10,235 FBu म्हणजेच बुरुंडियन फ्रँक इक्वल (स्थानिक चलन) एवढे आहे. हे भारतातील सुमारे 294 रुपये होतात. निसर्गाने साथ दिली आणि सर्व गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडून आल्या तरच इतके सरासरी उत्पन्न मिळते.
अंतराळात शेती कशी केल्या जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात तर तुम्हाला सांगू इच्छितो या देशात पिकांना पाणी देण्यासाठी बहुतांश शेतकरी प्लास्टिकच्या कॅन वापरतात. कारण साधारण ठिबक सिंचन आणि इतर उपकरणे विकत घेणे सुद्धा येथील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नसते. बरेच शेतकरी कांदा लागवड करतात ते रोपांना हाताने या प्लास्टिक कॅनच्या साहाय्याने पाणी देतात. या उदाहरणावरून तुम्हाला या देशाची गरिबी किती आहे याचा अंदाज नक्कीच आला असेल.
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात तर येथील शेतीला पाणीपुरवठ्यासाठी पूर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागते. येथील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दोन हंगामांत घेता येते. उदा. सीझन A म्हणजेच आपल्याकडील रब्बी हंगाम हा सप्टेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सुरू होतो. तर हंगाम B म्हणजेच आपल्याकडे उन्हाळी हंगाम हा फेब्रुवारीमध्ये सुरू होतो आणि मे मध्ये संपतो. सीझन सी म्हणजेच आपल्याकडील खरीप हंगाम हा त्यांच्यासाठी पर्यायी साधन सामग्री अन् नैसर्गिक आव्हानांचा विचार करता हद्दपार होत आहे.
जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याबद्दल ही माहिती तुम्हाला अचंभित करेल. या देशात आधुनिक तंत्रज्ञान हे बहुतांश लोकांच्या आवाक्यात नाही. शेतकऱ्यांचे जीवनमान अतिशय खालावलेल्या दर्जाचे आहे. येथील बहुतांश लोकांचे वाहन हे आजही सायकल आहे. रस्त्याने जाताना बऱ्याच कमी स्वयंचलित वाहनांची वर्दळ दिसते. मात्र जास्तीत जास्त सायकल दिसून येतात. यावरून जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात याची कल्पना करणे काही कठीण कार्य नाही.
पाकिस्तान देशातील शेतीविषयी या गोष्टी तुम्हाला माहित नसतील
प्रगत तंत्रज्ञानाचा विचार करता हा देश खूपच पिछाडीवर असल्याचे दिसून येते. GII 2022 च्या विकसित तंत्रज्ञानाचा वापर होणाऱ्या देशांत बुरुंडी हा देश 129 आणि 131 च्या दरम्यान आहे . बुरुंडी 2022 मधील इनोव्हेशन आउटपुटपेक्षा इनोव्हेशन इनपुटमध्ये चांगली कामगिरी करते . 2023-24 या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीत बुरुंडी नावीन्यपूर्ण इनपुटमध्ये 127 व्या क्रमांकावर आला आहे आणि गेल्या वर्षी ते स्थान मिळाले नव्हते. इनोव्हेशन आउटपुटसाठी, बुरुंडी 130 व्या क्रमांकावर आहे.
बुरुंडी देशात भात शेती अन् मशरूम शेतीला मिळत आहे प्राधान्य
अलिकडच्या काही वर्षात अनेक अल्पभूधारक शेतकरी तांदूळ आणि मशरूम शेतीकडे वळत आहेत. ज्यात त्यांना चांगला नफा मिळतो. सध्या बुरुंडी देशात तांदूळ लागवडीचे क्षेत्र सुमारे 50000 हेक्टर इतके असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय अनेक शेतकरी किमान शेतजमिनीत मशरूम शेतीचा प्रयोग करून उत्पन्नात वाढ करत आहेत. बरेच शेतकरी हे पालेभाज्या आणि बटाट्याची शेती करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात शेती कशी करतात हे आपण पाहिले. हळूहळू का होईना, मात्र बुरुंडी देश स्वतःला सावरण्यासाठी पाऊले उचलताना दिसत आहे हे मात्र नक्की.