यंदा अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचा नुसता ह्रास केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन ही दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. अशातच आता या अतिवृष्टीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बऱ्याचशा भागात उदा. बीड जिल्ह्यातील तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधव चिंताग्रस्त दिसत आहेत. निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे बळीराजा हवालदिल झाला असून आता तुर पीक तरी तारणार असा आशावाद बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव त्यांच्या तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने पुन्हा संकटात सापडले आहेत. आपण आजच्या या माहितीपूर्ण लेखातून तुरीवर पडलेल्या किडीचा बंदोबस्त कसा करायचा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी तूर हे पीक असते तारणहार
राज्यातील विविध भागांत तूर हे एक महत्वाचे तसेच मोठ्या क्षेत्रावर घेतल्या जाणारे पीक असून अनेक शेतकरी तुरीची लागवड करून भरघोस नफा सुद्धा घेत असतात. मात्र त्यासाठी निसर्गाचा हात डोक्यावर असायला हवा हे मात्र खर आहे.राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी कापूस आणि सोयाबीन या पिकानंतर खरीप हंगामामध्ये तूर या पिकाला महत्त्व देतात. यावर्षी तुरीचे पीक जवळपास सर्वच जिल्ह्यात अगदी टवटवीत वाढून शेतकरी वर्ग अगदी आनंदात होता.
मात्र परतीच्या कोसळधार पर्जन्यवृष्टीने तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या या स्वप्नांवर जणू पाणी फेरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण आता अचानकच राज्यातील अनेक जिल्ह्यांत तुर पिकावर अळीचा प्रादुर्भाव पडलेला दिसून येत आहे. तुरीचे पिक शेंगावर आल्यानंतर तीन किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिकावर होत आहे. यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग तसेच शेंग माशी या तीन किडींचा प्रामुख्याने समावेश असून या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त कसा करायचा याबद्दल आपण या महत्वपूर्ण लेखातून माहिती घेणार आहोत.
अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक संकटे जणू चलचित्र प्रमाणे एकामागोमाग एक असे सुरूच राहतात. एकतर सोयाबीन पिकाचे अती पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान, त्यावर भर म्हणून सोयाबीनला मिळालेला अतिशय कमी बाजारभाव यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च सुद्धा निघू शकला नाही. आता तूर पिकाकडे दोन पैसे मिळतील या आशेवर असणाऱ्या शेतकरी बांधवांना आता तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने असंख्य शेतकरी बांधव सध्या अतिशय चिंतेत आहेत. तूर पिकाने जर अपेक्षित उत्पादन मिळवून दिले नाही तर पुढे कसे होणार ही चिंता शेतकऱ्यांना लागून राहणे स्वाभाविक आहे.
शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक संकटे जणू चलचित्र प्रमाणे एकामागोमाग एक असे सुरूच राहतात. एकतर सोयाबीन पिकाचे अती पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान, त्यावर भर म्हणून सोयाबीनला मिळालेला अतिशय कमी बाजारभाव यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च सुद्धा निघू शकला नाही. आता तूर पिकाकडे दोन पैसे मिळतील या आशेवर असणाऱ्या शेतकरी बांधवांना आता तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने असंख्य शेतकरी बांधव सध्या अतिशय चिंतेत आहेत. तूर पिकाने जर अपेक्षित उत्पादन मिळवून दिले नाही तर पुढे कसे होणार ही चिंता शेतकऱ्यांना लागून राहणे स्वाभाविक आहे.
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काय होते?
शेतकरी मित्रांनो आपण जाणताच की तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने अळ्या शेंगा पोखरून टाकतात. सध्या राज्यातील विविध भागातील शेतामध्ये तुरीच्या शेंगा लागल्या असून मागील महिन्यात तुरीचे पीक हे फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना राज्यातील अनेक भागांत बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. याचा अनिष्ट परिणाम तुर पिकावर झाल्याचे आता निदर्शनास येत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी तुरीच्या पानावर अळीमुळे तुरीची पाने हे गुंडाळली जात आहेत. अशा परिस्थितीत एका झाडावर जर 2 ते 3 अळ्या दिसून येत असतील तर त्यावर फवारणी करणे आवश्यक झाले आहे. वेळेवरच तुरीवरील अळीचा बंदोबस्त करणे आता शेतकऱ्यांसाठी आवश्यक झाले आहे. चला तर जाणून घेऊया कसा करायचा तूरीवरील अळीचा बंदोबस्त याची इत्यंभूत माहिती.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी करताना घ्या ही खबरदारी, बोगस बियाणे असे ओळखा
असा करा तुरीवर पडलेल्या अळीचा बंदोबस्त
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत असणे स्वाभाविक आहे. मात्र या तुरीवर पडलेल्या अळीचा बंदोबस्त वेळेवर केल्यास पिकास होणारी हानी टाळता येऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जास्त आर्द्रता असलेल्या भागात तूर पिकामध्ये पाने गुंढाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशा परिस्थितीत ह्या अळ्या कोवळ्या देठांवर अथवा पानांच्या घड्या करून आत लपून बसतात आणि त्यावर उदरनिर्वाह करत असतात. याव्यतिरिक्त ही अळी तुरीची पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्याचा गुच्छ तयार करते.
या तुरीवर अळीच्या प्रादुर्भाव पडल्यामुळे तुरीच्या झाडावरील वाढणारे कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटून जातात. परिणामी तुरीच्या शेंगामध्ये लक्षणीय घट दिसून येते आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी होते. जर तुमच्या सुद्धा शेतातील तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी घटक असणारे अमेझ एक्स कीटकनाशक 0.6 ग्रॅम याशिवाय पिकात फुलोरा वाढून शेंगांच्या वाढीसाठी आवश्यक असे प्रोटीन हायड्रोजीलेट घटक असणारे फ्लोरोफिक्स 1.5 ग्रॅम प्रति लिटर एकत्र करून फवारणी करा. या फवारणीमुळे तुरीवर पडलेल्या अळीचा बंदोबस्त करता येतो. तसेच यामुळे तूर उत्पादनात होणारे नुकसान टाळता येऊ शकेल.