नांदुरा तालुक्यातील रील स्टार प्रतीक जवरे यशोगाथा : जिद्द अंगी असल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नसते याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते. अशाच प्रकारे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करणारे आणि त्यातून दैदिप्यमान यश संपादन करणारे फार थोडे असतात. असाच एक होतकरू तरुण शेतकरी युवक नांदुरा तालुक्यातील प्रसिद्ध रिल स्टार बनला असून संपूर्ण जिल्ह्यात या युवकाने अपार प्रसिद्धी मिळवून आई वडिलांचे नाव रोशन केले आहे. या होतकरू युवकाचे नाव आहे प्रतीक जवरे. आज आपण प्रतीक जवरेची यशोगाथा या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
गरिबीतून कष्टाने स्वतःला सावरले
लोणवडी हे नांदुरा तालुक्यातील एक छोटेसे गाव. या गावातील लोकसंख्या सुद्धा जेमतेमच. या गावातील प्रतीक जवरे नावाच्या 22 वर्षीय तरुणाने लहानपणापासूनच घरची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे शिक्षण घेत शेती सांभाळून आपला चरितार्थ यशस्वीरीत्या चालवला. प्रतिकच्या अंगात सुप्त गुण हे आधीपासूनच होते. त्या गुणांना चालना देण्याच्या हेतूने तसेच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याच्या जिद्दीने प्रतीक जवरे या तरुणाने साधारणतः वर्षभराआधी एक इंस्टाग्राम अकाउंट तसेच यूट्यूब चॅनल सुरू केले. प्रतिकचे वकृत्व कलेवर असलेले प्रभुत्व तसेच शेतीची प्रचंड आवड या दोन गुणांची सांगड घालत त्यांनी इंस्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. त्यांच्यात असलेली बोलण्याची कला अपलावधितच परिसरातील लाखो लोकांना आवडत गेली आणि प्रतीक जवरे हे नाव नांदुरा तालुक्याच्या घराघरात पोहोचले.
शेतीचे व्हिडिओ अपलोड करून मिळवली प्रसिद्धी
रील स्टार प्रतीक जवरे यांचे गावात अल्प शेत असून जबाबदारीची जाण असल्यामुळे या शेतीत ते दिवस रात्र राबून चांगले उत्पादन घेत असतात. शेतीच्या याच ज्ञानाचा उपयोग लोकांना व्हावा यासाठी त्यांनी इंस्टाग्राम आणि यूट्यूब सुरू केले. ते रोज शेतीत काम करत असतानाचे व्हिडिओ त्यांच्या दोन्ही सोशल मीडिया अकाऊंटवर न चुकता टाकत असत. हळूहळू त्यांचे हे ज्ञानवर्धक तसेच उपयुक्त व्हिडिओ लोकांना फार आवडायला लागले.
त्यातच त्यांच्या घरी साप निघाला. या सापाला न मारता जीवदान देण्याचे काम करत या सापाला त्यांनी दूर जंगलात सोडून दिले. याचा व्हिडिओ बनवून त्यांच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलवर प्रसारित केला. त्यांच्या या व्हीडिओला लोकांनी खूपच चांगला प्रतिसाद देऊन हा सापाला जीवदान देण्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होऊन प्रतीक भाऊंना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रतीक जवरे यांचे यूट्यूब वर 28 हजार फॉलोवर असून इंस्टाग्राम वर त्यांचे दीड लाखाच्या आसपास चाहते आहेत.
तालुक्यातील अनेक तरुण आज बेरोजगार असून तालुक्यात शेतीशिवाय दुसरे काही काम मिळत नाही. व्यवसाय करायचा म्हटला तर भांडवल लागते. बरेच तरुण आर्थिक दृष्ट्या गरीब असून व्यवसाय करण्यास असमर्थ ठरतात. मात्र या सर्व अडचणींवर मात करून रील स्टार प्रतीक जवरे यांनी आपल्या शोधक बुद्धीने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी तर मिळवलीच त्यात भर म्हणून आज हा होतकरू तरुण स्पॉन्सरशिपद्वारे तसेच स्थानिक जाहिराती करून चांगली आर्थिक मिळकत सुद्धा करत आहे. असे म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे. या तरुणाने इतक्या कमी वयात घरची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून वेगळ्या क्षेत्रात निर्माण केलेली ओळख ही खरंच कौतुकास्पद आहे.
रील स्टार प्रतीक भाऊंचे तालुक्यात हजारो चाहते
प्रतीक भाऊंना अल्पावधीतच नांदुरा तालुक्यातील जनता रील स्टार म्हणून ओळखायला लागली. आज अशी परिस्थिती आहे की अनेक राजकीय लोकांपासून ते सामान्य जनतेपर्यंत प्रतीक जवरे या युवकाची प्रचंड क्रेझ तालुक्यातील गावागावात पाहायला मिळते. प्रतीक भाऊ ज्या गावात जातील तिथे त्यांच्या चाहत्यांची त्यांना पाहायला आणि सेल्फी काढायला प्रचंड गर्दी होत असते. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाने केलेली ही कामगिरी तालुक्यातील इतर तरुणांसमोर एकप्रकारची प्रेरणा बनली असून जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर काहीही शक्य होऊ शकते याची पुन्हा एकदा प्रचिती प्रतीक जवरे सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर यांच्या या यशोगाथेमधून प्रकर्षाने जाणवते. रील स्टार प्रतीक जवरे यांचा मागील महिन्यात आपल्या भागाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सत्कार सुद्धा झाला आहे.
इंजिनीअरिंग सोडून सुरू केले शेळीपालन, महिन्याला कमावतो 10 लाख रूपये, वाचा प्रेरणादायी यशोगाथा
काहीतरी वेगळे करून स्वतःची वेगळी ओळख केली निर्माण
आज देशातील अनेक युवक फक्त सोशल मीडियाच्या जोरावर करोडो रुपये कमावत असून नांदुरा तालुक्यातील युवक युवकांना याबद्दल जास्त ज्ञान नाही. तुम्ही जर एखाद्याला म्हटल की तुम्ही ऑनलाईन काम करून पैसे कमवू शकता तर लोक तुम्हाला वेड्यात काढतात इतके अज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात तालुक्यात आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत इंस्टाग्राम तसेच यूट्यूबच्या माध्यमातून यशस्वी होऊन तालुक्यातील घराघरात ओळख निर्माण करून या एका छोट्याशा गावातील होतकरू तरुणाने यशस्वी रील स्टार बनून इतर युवकांसमोर एक पायंडा पाडून दिला आहे. आजकाल ब्लॉगींग, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ईन्फ्लुएन्सर, तसेच फ्रिलान्सर याबद्दल जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अनेक युवकांना या क्षेत्रात त्यांचा त्यांचा रोजगार तसेच नावलौकिक मिळवता येऊ शकेल. मात्र यासाठी जिद्द, संयम आणि सातत्य या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करणे ही अनिवार्य अट असते.
मनापासून धन्यवाद भाऊ…🙏🏻😊❤️,
तुम्ही माझा video चा आधारावर सर्वकाही बारीक निरीक्षण करून, तुमचं मत मांडलं. अन् खरंच खूप भारी वाटलं मला हे वाचताना, अजून ही काही लोकांना वाटते मी व्हिडिओ बनवून फक्त टाईमपास करत आहे पण ह्याचामागे पण एक आर्थिक स्त्रोत निर्माण करता येते, हेच मला दाखवून द्यायचं होत…
अन् सोबतच एवढे लाखो लोक आपले व्हिडिओ पाहतात ह्याच भान ठेवूनच मी नेहमी व्हिडिओ एडिट करतो….🙏🏻🙂❤️
भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भाऊ 💐💐❤️
Aamcha gavala bhet dya aale ki gadegaon khurd
Keep it up
Pratik bhau 💐💐
King
Pratik jaware patil