अकोला रोजगार महाकुंभ | २९ सप्टेंबरला ११ ठिकाणी रोजगार मेळावे: वाचा सविस्तर माहिती

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे ‘अकोला रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, अकोला जिल्ह्यात एकाचवेळी ११ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नामांकित कंपन्यांबरोबरच स्थानिक उद्योगांच्या समावेशासह होणाऱ्या या मेळाव्यांमध्ये शेकडो पदांची भरती होणार आहे. अकोला जिल्ह्यातून अधिकाधिक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

मेळाव्याचे वैशिष्ट्य व पूर्व प्रशिक्षण

या मेळाव्याचे वैशिष्ट्य असे की, नोंदणी करणाऱ्या उमेदवारांचे पूर्व प्रशिक्षण व मुलाखतीची तयारी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यामुळे उमेदवार थेट मुलाखतीसाठी अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतील.

अकोला रोजगार महाकुंभ: जिल्ह्यातील ११ मेळावे स्थळे

अ. क्र.स्थळ
अकोला इंडस्ट्री असोसिएशन हॉल, औद्योगिक वसाहत, अकोला
शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, अकोला
श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला
दि प्रोफेशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, गौरक्षण रस्ता, अकोला
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूर
रसिकलालजी धारीवाल खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलेगाव, ता. पातूर
डॉ. एच. एन. सिन्हा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पातूर
मानव स्कूल ऑफ पॉलिटेक्निक, व्याळा
श्रीमती कमलाबाई देशमुख खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कान्हेरी, ता. बार्शिटाकळी
१०श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट
११डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय, तेल्हारा

अकोला रोजगार महाकुंभ: नोंदणी प्रक्रिया

राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी अर्जात आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. नोंदणीसाठी लिंक : https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7

संपर्क व आवाहन

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे किंवा ९१३०४१९५८५, ९७६७८५२७५८, ९५४५००००९३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अकोला जिल्ह्यातून अधिकाधिक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा
लेखक : भूषण इंगळे
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment