सारथी कृषी प्रशिक्षण 2026: ड्रोन पायलटसह 5 प्रशिक्षणांची संधी, अर्जाच्या अंतिम तारखा जाणून घ्या

सारथी कृषी प्रशिक्षण 2026: महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील शेतकरी, युवक-युवती तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे.

या प्रशिक्षणांमध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण, कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण, कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा समावेश आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षण

शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ असून, आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे कार्यालयास पाठविण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२६ आहे.

ड्रोन पायलट प्रशिक्षण

ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सारथी संस्थेच्या संबंधित विभागीय कार्यालयास १५ दिवसांच्या आत पाठविणे आवश्यक आहे.

मधुमक्षिकापालन व पशुसंवर्धन प्रशिक्षण

मधुमक्षिकापालन तसेच कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ असून, आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी संबंधित विभागीय कार्यालयास १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात.

कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे संबंधित सारथी विभागीय कार्यालयास १० दिवसांच्या आत पाठविणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणासाठी पात्रता व कागदपत्रे

प्रशिक्षणासाठीचे पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचे ठिकाण, अर्ज प्रक्रिया व इतर सविस्तर माहिती संबंधित जाहिरात व माहितीपत्रकात नमूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.

अर्ज कुठे करावा?

अधिक माहितीसाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना फलकास भेट द्यावी. सारथीचे संकेतस्थळ sarthi-maharashtra.gov.in असून, शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणासाठी sarthi.mahamcdc.com या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

शेतकरी व युवकांना काय फायदा होणार?

या प्रशिक्षणांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. कृषी क्षेत्र अधिक सक्षम, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणांचा लक्षित गटातील पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांनी केले आहे.

सारथी कृषी प्रशिक्षण – महत्त्वाच्या तारखा

सारथीच्या विविध प्रशिक्षणांची संपूर्ण माहिती

प्रशिक्षणपात्र लाभार्थीऑनलाइन अर्जाची अंतिम तारीखहार्ड कॉपी सादर करण्याची अंतिम मुदत
🚁 ड्रोन पायलट प्रशिक्षणमराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा लक्षित गटातील पात्र उमेदवार31 ऑक्टोबर 2026ऑनलाइन अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत
🐝 मधुमक्षिकापालन प्रशिक्षणपात्र शेतकरी, युवक-युवती व संबंधित लक्षित गटातील उमेदवार31 ऑक्टोबर 202610 नोव्हेंबर 2026
🐄 कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षणपात्र शेतकरी, पशुपालक, युवक-युवती व संबंधित लक्षित गटातील उमेदवार31 ऑक्टोबर 202610 नोव्हेंबर 2026
🌾 कृषी विज्ञान केंद्राद्वारे अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणपात्र शेतकरी, युवक-युवती व संबंधित लक्षित गटातील उमेदवार31 डिसेंबर 2026ऑनलाइन अर्ज केल्यानंतर 10 दिवसांच्या आत
🏢 शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी प्रशिक्षणशेतकरी उत्पादक कंपन्या (FPC)30 सप्टेंबर 202610 ऑक्टोबर 2026

📌 महत्त्वाची सूचना: ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ज्या प्रशिक्षणासाठी हार्ड कॉपी सादर करणे आवश्यक आहे, त्या उमेदवारांनी संबंधित कागदपत्रे निर्धारित मुदतीत संबंधित सारथी विभागीय कार्यालयात किंवा संबंधित कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.

माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा
लेखक : भूषण इंगळे
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment