शेतकऱ्यांच्या मोबाइलमध्ये असायलाच हवेत असे शेतीसाठी उपयुक्त ॲप्स

आज रोजी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी महत्वपूर्ण माहिती देणारे शेतीसाठी उपयुक्त ॲप आपल्याला प्ले स्टोअर वर मोफत उपलब्ध आहेत. आज आपण प्रगत आणि आधुनिक शेती करण्यासाठी आवश्यक ज्ञान देणारे काही ॲप्स बद्दल महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत. जेणेकरून या शेतीसाठी उपयुक्त ॲप्स चा वापर करून आपण आपल्या शेतीत भरघोस उत्पन्न घेऊन आपले नाव यशस्वी शेतकऱ्यांच्या यादीत जायला मोलाचा हातभार लागेल. आजकाल स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण प्रचंड आहे. कमी शिकलेली लोक असो की चक्क निरक्षर लोक, पण त्यांना स्मार्टफोन मात्र सहज वापरता येतो. याच गोष्टीला केंद्रस्थानी ठेवून राज्याच्या विविध भागांतील शेतकरी बांधवांनी जर आधुनिक शेतीकडे आपली कूच केली तर त्यांच्या उत्पादनात अन् परिणामी जीवनशैलीत प्रचंड सुधारणा होईल यात शंका नाही.

इंटरनेटचा आपल्या क्षेत्रात प्रभावी वापर हेच खरे यशाचे गमक

प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या या शेतीसाठी उपयुक्त ॲप्स चा वापर करून आपण कशाप्रकारे आपल्या शेतीच्या कार्यात त्याचा उत्पादन वाढीसाठी फायदा करून घेऊ शकता याबद्दल माहिती पुरविण्याचा आमचा या लेखाच्या लिखणामागे उद्देश आहे. आजच्या एकविसाव्या शतकाच्या या प्रगत युगात जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन हा असतोच. इंटरनेटच्या माध्यमातून आज जगातील कुठलीही बातमी व माहिती एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. इंटरनेटचा वापर आपल्या कामात करून घेऊन करोडपती झालेल्या लोकांची संख्या काही कमी नाही.

आजकाल पारंपारिक शेती काही भरवशाची राहिली नसून शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीतून तटपुंजे उत्पन्न मिळून त्यांचा हिरमोड होतो. आधुनिक शेती करायची म्हटल्यावर लागते ते आवश्यक ज्ञान. आधी हे शेतीविषयक ज्ञान मिळवणे खूप अवघड असायचे. नावीन्यपूर्ण आधुनिक शेतीचा अवलंब करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाची भेट घेणे त्यासाठी अनिवार्य असायचे. त्यात भरपूर वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. पण आजच्या प्रगत इंटरनेट सेवेमुळे आधुनिक शेती करणे खूपच सोईस्कर झाले आहे. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ही शेतीसाठी उपयुक्त ॲप?

भारतीय शेतीसाठी उपयुक्त ॲप बद्दल माहिती

1) भूजल ॲप

आपल्या शेतातील विहिरीची पाणी पातळी जर आपल्याला दररोज कळू शकली तर किती छान होईल ना? तसेच त्या पाण्याच्या पातळीच्या नोंदी ठेवणे शक्य झाले तर किती बरं होईल बर! मित्रांनो याच कामासाठी आपल्याला “भूजल” या शेतीसाठी उपयुक्त ॲप ची मदत होणार असून या ॲपच्या सहाय्याने आपल्याला आपल्या विहिरी किंवा बोअरवेल मधील पाण्याची पातळी जाणून घेणे खूप सोप्पे होणार आहे. पावसाचा मौसम संपल्यानंतर रब्बी तसेच उन्हाळी पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या शेतीसाठी उपयुक्त ॲप चा खूप हातभार लागणार आहे.

या शेतीसाठी उपयुक्त ॲप च्या साहाय्याने शेतकरी बांधव आपल्या शेतातील विहिरीची अथवा बोअरवेलची पाण्याची पातळी कितीही वेळा माहीत करून घेऊ शकतात. तसेच त्यांच्या नोंदी या ॲपवर आपोआप घेतल्या जाऊन सेव्ह होतात. परिणामी या शेतिसाठी उपयुक्त ॲप चा वापर केल्यास पिकांच्या नियोजनासाठी शेतकरी बांधवांना निश्चितच फायदा होणार आहे. नियमितपणे पाणीपातळी मोजत राहिल्याने उपसा करण्यासाठी अचूक अंदाज यामुळे शेतकऱ्यांना येईल. पाण्याच्या अनुपलब्धता मुळे कोरडे पंप चालून होणारे पंपाचे नुकसान टाळणे सुद्धा भूजल या शेतीसाठी उपायुक्त ॲप च्या मदतीने शक्य होणार आहे.

2) फुले इरिगेशन शेड्युल

आपण शेतातील पिकाला किती पाणी देतो याचा हिशोब आपण ठेवतो का? तर नाही. पिकांना वाढीसाठी पाण्याची गरज आहे त्यामुळे त्यांना आपण पाणी पुरवत असतो मात्र त्याचा हिशोब ठेवत नाही. आप शेतात पाणी देत असताना नेहमी अंदाजपूर्वक देत असतो. त्यामुळे पिकांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा उसाला जेवढे पाणी लागते तेवढं पाणी जर आपण सोयाबीन पिकाला देत बसलो तर काय परिणाम होतील बर? सोयाबीन पीक अगदी सडून जाईल.

या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की पाणी योग्य प्रमाणात पिकाला देणे हे खूप महत्त्वाचे असते. शेतीतील कोणत्या पिकाला किती पाणी दिले पाहिजे हे सांगणार हे शेतीसाठी उपयुक्त ॲप आहे. या ॲपच्या साहाय्याने आपल्याला योग्य प्रमाणात आपल्या शेतीतील पिकाला पाणी देणे अगदी सोईस्कर होऊन या शेतीसाठी उपायुक्त ॲप चा खूप मदत होणार आहे.

जवळपासच्या परिसरातील हवामानाची माहिती गोळा करून हे ॲप त्यानुसार बाष्पीभवनाचा वेग अन् त्यानुसार किती पाणी पिकाला लागेल याबद्दल इत्यंभूत माहिती पुरवत असते. परिणामी शेती पिकाला योग्य प्रमाणात पाणी तर देता येतेच, याशिवाय पाण्याची सुद्धा खूप बचत होते. राहुरी विद्यापीठाने हे ॲप तयार केले असून सर्व शेतकऱ्यांसाठी हे शेतीसाठी उपयुक्त ॲप अत्यंत महत्वाचे ठरते. हे ॲप आपण प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करू शकता.

3) प्लॅटिक्स ॲप

शेतीसाठी उपयुक्त ॲप पैकी शेतकऱ्यांना पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांची माहिती सहज उपलब्ध होते. रोगाचे निदान ओळखणे तसेच त्या रोगावर असलेले विविध उपचार आणि नियंत्रण याबद्दल सविस्तर माहिती मिळते. हे शेतीसाठी उपयुक्त ॲप शेतकऱ्यांच्या मोबाइल मध्ये असलेच पाहिजे. हे ॲप शेतिपिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी मदत करते. या ॲप द्वारे आपण आपल्या कोणत्याही शेतीविषयक अडचणी शेती तज्ञांसमोर मांडू शकता. अथवा त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला प्राप्त करू शकता.

प्ले स्टोअर वर या ॲप चे 10 मिलियन पेक्षा अधिक डाऊनलोड असून या शेतीसाठी उपयुक्त ॲप ची रँकिंग 4 पेक्षा जास्त आहे. या शेतीसाठी उपयुक्त ॲप मुळे आधुनिक शेतीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळते. तसेच या ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे शेती विषयक आणि पिकांवर पडणाऱ्या विविध रोगांची माहिती होऊन त्यांचे योग्य निदान कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन प्राप्त होते. हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.

4) लोकल रडार वेदर फॉरकास्ट

हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हे शेतीसाठी उपयुक्त ॲप फारच महत्त्वाचे आहे. या शेतीसाठी उपयुक्त ॲप च्याच आधारे आपण हवामानाचा अंदाज घेऊन त्यानुसार आपली शेती विषयक कामे करू शकता. परिणामी याचा सकारात्मक परिणाम आपल्या उत्पादनावर होऊन जास्त उत्पादन घेणे शक्य होते तसेच पिकाची न्हासाडी वेळेवर रोखता येते. आजकाल हवामान सतत बदलत राहते. कधी कडाक उन्ह पडते तर कधी अतिवृष्टी होते.

ग्लोबल वॉर्मिग मुळे पर्यावरणाची हानी झाल्यामुळे असे घडत आहे. बहुतेक वेळा या अस्थिर हवामानाचा शेतकऱ्याला अंदाज घेता येत नाही. त्यामुळे त्यांना शेतीत प्रचंड नुकसान सहन करावे लागते. कधी कधी दुबार पेरणी तर कधी पीक वाया जाऊन बळीराजा मेटाकुटीला येतो. या ॲपच्या साहाय्याने हवामानाचा अचूक अंदाज आपल्याला समजतो ज्याचा योग्य वापर करून आपली शेतीची आवश्यक करते तसेच नियोजन करणे सुलभ होते. प्ले स्टोअरवर या शेतीसाठी उपयुक्त ॲप चे 1 मिलियन पेक्षाही जास्त डाऊनलोड असून या ॲपची रेटिंग 4.5 इतकी असल्यामुळे हे ॲप विश्वासार्ह आहे असे म्हणायला हरकत नाही.

5) महाडीबीटी फार्मर

महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत शेतीसाठी उपयुक्त ॲप असून या ॲप मध्ये आपल्याला शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कार्यान्वित करण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची इत्यंभूत माहिती मिळते. इतकेच काय तर या शेतीसाठी उपयुक्त ॲप च्या माध्यमातून तुम्ही विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा थेट सादर करू शकतात. तसेच तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.

परिणामी विविध शासकीय कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ येत नाही आणि वेळेची बचत होते. शासनाने शेतीसाठी जारी केलेले विविध प्रकारचे अनुदान तसेच योजना यांच्या माहितीसाठी आणि थेट अर्ज सादर करून लाभ घेणयासाठी महाडीबीटी फार्मर ने अत्यंत उपयुक्त असे ॲप आहे. प्ले स्टोअरवर हे ॲप मोफत उपलब्ध आहे.

तर शेतकरी मित्रांनो वरील ॲपच्या साहाय्याने आपल्या शेतीला आधुनिकतेकडे नेण्यास तयार आहात ना? आपल्याला यशस्वी वाटचालीस सहृदय शुभेच्छा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment