तणनाशक योग्य प्रकारे कसे वापरावे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शेतातील पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे, पोटच्या लेकराप्रमाणे जपावे लागते. कधी निसर्गाची अवकृपा तर कधी पिकांवर येणारे विविध रोग यामुळे पिकांची कधी नासाडी होईल, सांगता येत नाही. आज तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अनेक नवीन नवीन शेतीचे यंत्र तसेच औषधी विकसित झाल्या आहेत. त्यातीलच एक औषधी म्हणजे तणनाशक.
परंतु तणनाशकाचा वापर करताना पिकाला काही नुकसान होणार नाही याची काळजी घेणे सुध्धा तितकच महत्वाचं.तणनाशकाचा वापर करताना जर काळजी घेण्यात आली नाही तर संपूर्ण पिकाचा नाश सुद्धा होऊ शकतो. मागील पंधरवड्यात आष्टी तालुक्यातून अशीच एक बातमी आली होती. तणनाशकाचा वापर केल्यामुळे दीडशे एकर शेतातील सोयाबीन पीक जळून 26 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
सर्वच पिकातील वेळेत आणि एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. एकात्मिक तण व्यवस्थापनामध्ये शेतीच्या मशागत, प्रमाणित बियाण्यांचा वापर, वाणाची योग्य लागवड अंतरावर तसेच वेळेवर पेरणी करणे आवश्यक असते. तर आपण आज शेतातील तणाचे निर्मूलन करण्यासाठी तणनाशकाचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा याबद्दल माहिती घेणार आहोत.
आजच्या लाडक्या बहिणींच्या काळात शेतकरी वर्गाला शेतातील पिकांमध्ये निंदणी खुरपणीसाठी किंवा शेतीच्या इतर कामासाठी ग्रामीण भागात मजुर भेटणे जणू एक दुष्कर कार्यच असते. पिकांमध्ये खुरपणीसाठी मजूर वेळेवर मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना वेळेचे व आर्थिक नुकसान या दोन्ही गोष्टीना सामोरे जावे लागते. परिणामी बहुसंख्य शेतकरी खुरपणी ऐवजी तणनाशकाची फवारणी करून तणांचे नियंत्रण करण्याचा मार्ग अवलंबत असतात. तणनाशक फवारणी करताना खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
तणनाशक फवारतांना घ्यावयाची काळजी
तणनाशक कंपन्यांचे प्रॉडक्ट पडताळून घ्यावे. तणनाशक ची गुणवत्ता तपासूनच ते खरेदी करावे. सोबतचे लेबल निट वाचून घ्यावे.- तणनाशकची फवारणी दिलेल्या विशिष्ट मात्रेत अन् वेळेनुसार वेळेनुसार करावी.- उगवणपूर्व तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळे रहित व सपाट जमिनीवर पुरेसा ओलावा असतांना फवारल्यास फायदेशीर ठरते.- उगवणपश्चात तणनाशकाची ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पूस असतांना तसेच कडक उन्हात फवारणी करणे टाळावे.- फवारणी साठी स्वच्छ पाण्याचा वापर करणे सुद्धा अगत्याचे ठरते.- सतत समान कंपनीच्या तण नाशकाचा वापर करू नये.- तण नाशकासाठी वेगळा पंप असावा.- फवारणी करण्यासाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझलचा वापर करावा.- फवारणी यंत्राचे अंशीकरण करून घ्यायला विसरू नये.- तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी जाणकारांचा तांत्रिक सल्ला अवश्य घ्यावा.-
तणनाशक फवारणी करतांना फवारा शेजारच्या शेतातील पिकांवर उडणार नाही याची दक्षता घ्यावी.- फवारणी करतेवेळी स्वतः हजर रहावे शक्य नसल्यास फवारणी करणाऱ्या व्यक्तीला संभाव्य उद्भवणाऱ्या समस्यांची जाणीव करून देणे सुद्धा महत्वाचे आहे.पिकाची फेरपालट, संतुलित खतांचा वापर, आवश्यकतेनुसार डवरणीच्या आणि निंदनाच्या पाळ्या या सर्व बाबींचा काळजीपूर्वक वापर केल्यास कमी खर्चात तण व्यवस्थापन शक्य आहे. वरील सर्व बाबींचा वापर करून तण व्यवस्थापन न झाल्यास सर्वात शेवटी रासायनिक तणनाशकचा वापर करावा.
50 गुंठे शेतात कोथिंबीर लागवड करून तीन महिन्यात मिळवले साडेआठ लाखाचे उत्पन्न
• कृषी केंद्रामधून तणनाशक विकत घेताना मुदत संपलेली तणनाशक खरेदी करू नयेत. • विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशके दिलेल्या मात्रेत वापरावी. • तणनाशकची फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असावा. • तणनाशके फवारलेल्या जमिनीत दरवर्षी कंपोस्ट, गांडूळखत या खतांचा वापर भरपूर करावा. • तणनाशकची फवारणी जोराचे वारे नसताना करावी तसेच २-३ तास सूर्यप्रकाश राहील हे पाहूनच फवारणी करावी.रासायनिक तणनाशकाचा अंश कमी रहावा यासाठी काय उपाय करावे?तणनाशक जर जास्त प्रमाणात वापरले तर अशा वापरामुळे भविष्यात तणनाशकाचा अंश वाढीचा धोका वाढण्याची शक्यता असते.
जमिनीमध्ये असे अंश वाढू नये यासाठी खालील उपाययोजना करणे आवश्यक असते.
कृषितज्ज्ञ तसेच जाणकारांच्या शिफारशीच्या मात्रेतच तणनाशकाचा वापर करावा.- जमिनीत तणनाशकाचा अंश वाढू नये म्हणून त्यास आळा घालण्यासाठी वारंवार एकच एक तणनाशक न वापरता तणनाशकांचा आलटून पालटून उपयोग करणे कधीही चांगले.- पेरणीपूर्व एकदाच अन् दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्चात तणनाशक वापरावे.- शेतात एकच एक पीक घेऊ नये पिकांची फेरपालट करावी. असे केल्याने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होण्यास मदत होते.- सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीतील तणनाशकांचे अंश धरून ठवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुद्धा वाढते.
सामान्यतः तणनाशक हे निरुपयोगी वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे. पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव. आजकाल शेतात पीकसंरक्षणासाठी तणनाशके वापरावी लागतात. परंतु अशा तणनाशकांचा वर सांगितल्या प्रमाणे जाणीवपूर्वक आणि योग्यशिर वापर करणेही तितकेच महत्त्वाचे. परिणामी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तणनाशकांचा वापर कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक करावा.