आजकाल देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना लाखो इंजिनीयर कामाच्या शोधात भटकत असताना स्वतः यशस्वी इंजिनिअर असूनही ते क्षेत्र सोडून शेळीपालन करण्याचा निर्णय घेऊन आज वर्षाला सव्वा कोटी पेक्षा जास्त कमाई करणाऱ्या एका मेहनती व्यक्तीबद्दल एक प्रेरणास्थान म्हणून हा लेख आहे.
महाराष्ट्रातील लक्ष्मण टकले यांनी शेळी पालनाला एका नव्या उंचीवर नेऊन कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर लक्ष्मण यांनी शेळीपालन हा व्यवसाय म्हणून स्वीकारून त्यात यशाचा नवा आदर्श घालून दिला आहे.
लक्ष्मण टकले यांचा शेळी पालन व्यवसायातील प्रारंभिक प्रवास
लक्ष्मण टकले यांनी 2013 साली देशी व स्थानिक जातीच्या शेळी पालनाला प्रारंभ केला होता. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांना शेळीपालन बद्दल पुरस ज्ञान नसल्यामुळे म्हणावा तेवढं उत्पन्न काही भेटत नव्हत. पण लक्ष्मण साहेब हे जिद्दी स्वभावाचे. हार मानणे त्यांच्या शब्दकोषात असेल ते शप्पथ. त्यांनी आधुनिक शेळी पालन करण्याचा ठाम निर्धार केला. पण आधुनिक पद्धतीने शेळीपालन करणे काही खायचे काम थोडीच आहे. त्यांनी हे जाणले अन् आधुनिक शेळीपालनाच्या विविध पद्धतींचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी लागले अभ्यासाला.त्यांना फारसा फायदा झाला नाही.
डॉक्टर बाबासाहेबांनी एकदा म्हटले होते ना की, ” मी आजपर्यंत जे जे काही आत्मसात केले आहे, त्यात फक्त माझी एक टक्का बुद्धीचे श्रेय असून बाकी 99 टक्के हे माझ्या मेहनतीचे श्रेय आहे.” बाबासाहेबांचे हे वाक्य चिक्कार मेहनत करून सार्थक करणाऱ्या लक्ष्मण टकले साहेबांनी अल्पावधीतच सगळ आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून अस दैदिप्यमान यश प्राप्त केलं की आज त्यांच्या प्रगतीबद्दल इतर बेरोजगार तरुणांना तसेच जोडधंदा म्हणून शेळीपालन करत असलेल्या किंवा शेळीपालन सुरू करण्याचा विचार सुरू असलेल्या शेतकऱ्यांना एक प्रेरणास्रोत म्हणून हा प्रेरणादायी लेख लिहिण्यात येत आहे.
शेळी पालन व्यवसाय नोकरीवर भारी
शेळी पालन हा पुरातन काळापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा एक उत्कृष्ट स्रोत म्हणून अंगिकारल्या गेला आहे. सध्या सुद्धा देशाच्या सर्वच खेड्यात एक जोडधंदा म्हणून शेतकरी शेळीपालन करतात. जी शेळी वागवणे काही लोकांसाठी एक प्रकारचे कनिष्ठ काम होते आणि आमच्या लहानपणी आमचे बाबा म्हणायचे की चांगली शाळा शिक, नाहीतर शेतात बकऱ्या चारायची पाळी येईल. पण ह्याच बकऱ्या एका सामान्य माणसाला करोडपती बनविण्याचे सामर्थ्य ठेवतात याबद्दल बाबांना नक्कीच आश्चर्य वाटते. एक यशस्वी अभियंता इंजिनीअरिंग ची नोकरी सोडून फक्त शेळीपालन करून 10 यशस्वी इंजिनीयरवर निश्चितच भारी पडतो. अशी पॉवर आहे शेळीपालन व्यवसायात.
आजच्या काळात बहुतांश शेतकरी आपली शोधक बुद्धी वापरून शास्त्रोक्त पद्धतीने योग्य जातींची निवड करायला शिकले आणि त्याचा व्यवसाय म्हणून स्वीकार करून लाखो करोडो रुपयांची भरघोस कमाई करत आहेत. आता शेळीपालन काही फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही. मोठमोठ्या शहरात सुद्धा सुशिक्षित लोक तुम्हाला शेळीपालन हा एक व्यवसाय म्हणून अंगिकारून यशस्वी झालेले दिसतील. काही लोकांना याबद्दल आश्चर्य वाटणे साहजिक आहे. पण याची प्रत्यक्ष साक्ष देणारे मूर्तिमंत उदाहरण हे सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मण टकले आहेत. महाराष्ट्रातील लक्ष्मण टकले यांनी इंजिनीअरिंगची यशस्वी नोकरी सोडून आत्मविश्वासाने शेळीपालनाला सुरुवात केली आणि आज वर्षाला कोट्यवधी रुपये कमावत आहेत तसेच इतरांसाठी एक प्रेरणास्रोत बनले आहेत.
लक्ष्मण टकले यांच्या शेळी पालनाची पद्धत जाणून घेऊयात.
लक्ष्मण टकले यांचे अभियांत्रिकी कौशल्याची छाप त्यांच्या शेळीपालनात स्पष्टपणे दिसून येते. टकले साहेबांनी 2013 मध्ये उस्मानाबादी, जमुनापारी, सिरोही आणि सोजत क्रॉस ब्रीड, भारतीय आफ्रिकन डुक्कर यांसारख्या स्थानिक आणि स्थानिक जातींसह शेळीपालन सुरू केले, परंतु त्यातून फारस उत्पन्न मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते नवीन तंत्र शिकण्यासाठी परदेशात गेले आणि शेळीपालन क्षेत्रातील इत्यंभूत माहिती घेऊन स्वदेशी परतले. आता मात्र त्यांची तपश्चर्या कामाला आली अन् सन 2017 मध्ये त्यांनी 100 टक्के आफ्रिकन ब्रोअर जातीच्या 25 शेळ्या आणि 4 शेळ्यांचे संगोपन सुरू केले. त्यासाठी त्यांना भलेमोठे असे शेड उभारणे अगत्याचे होते. त्यांनी पद्धतशीरपणे एक एकर शेतीत शेळ्यांना ठेवण्यासाठी शेड उभारणी केली.
आधुनिक शेळी पालनातून करतात करोडोंची कमाई
लक्ष्मण टकले त्यांच्या अनुभवावरून सांगतात की 100 टक्के आफ्रिकन ब्रोअर जातीच्या शेळ्यांची वाढ शिघ्रगतीने होते. इतकेच काय तर देशी शेळ्यांच्या तुलनेत त्यांचे वजन सुद्धा खूप जास्त असते. या शेळ्यांचे वजन एका महिन्यात 8 ते 10 किलोने वाढते आणि त्यांना विशेष आहाराची गरज नसते. ही आफ्रिकन ब्रोअर जातीच्या शेळ्यांची खासियत आहे.
लक्ष्मण टकले सांगतात की, या जातीच्या शेळ्या स्टॉल फीडिंगद्वारे बंदिस्त वातावरणात पाळल्या जातात. आजच्या घडीला त्यांच्या शेतात 125 शेळ्या आहेत आणि जेव्हा शेळ्या सरासरी 40 ते 50 किलो वजनाच्या होतात तेव्हा ते दरवर्षी सुमारे 100 ते 125 शेळ्या तयार करून त्यांची विक्री करतात अन् भरघोस कमाई करतात. या वजनापर्यंत पोहोचण्यासाठी 6 ते 8 महिने लागतात. प्रजननासाठी तसेच ग्राहकांची वाहतूक करण्यासाठी मुख्यतः या जातीच्या शेळ्या चांगल्या किंमतीत विकल्या जातात.
शेळी संगोपनासाठी 25 लाख वार्षिक खर्च, दीड कोटीची विक्री, सव्वा कोटीची भरघोस कमाई
लक्ष्मण टकले यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार त्यांना एक बोकडाची अडीच लाख ते तीन लाख रुपये किंमत मिळते तसेच एक शेळी एक ते दोन लाख रुपयांपर्यंत विकल्या जाते. ही शेळीची 100 टक्के शुद्ध जात असल्याने त्यांना एवढी जास्त किंमत मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी ते आफ्रिकन बोअर जातीची शुद्धता राखण्यावर विशेष भर देतात. ज्यामुळे वार्षिक दीड कोटी रुपयांपर्यंत विक्री होते.
शेळ्यांच्या संगोपनासाठी अंदाजे 25 ते 30 लाख रुपयेपर्यंत वार्षिक खर्च होतो, त्यामुळे सुमारे 1.25 कोटी रुपयांची भक्कम कमाई होते. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून वर्षभरात 100 ते 125 शुद्ध जातीच्या आफ्रिकन बोअर शेळ्या व शेळ्यांचे उत्पादन लक्ष्मण टकले यशस्वीरित्या करतात. अशाप्रकारे आता लक्ष्मण टकले शेळी पालनातून वर्षाला करोडो रुपये कमावत आहेत. हा जातीच्या शेळ्यांची बाजारात प्रचंड मागणी असल्यामुळे, टकले प्रजननासाठी त्यांच्या फार्ममध्ये 50 शेळ्या आणि 2 बोकड वाढविण्यावर विशेष भर देतात
👉 हे सुध्दा वाचा
रताळे शेती करून इंजिनीयरने कमावले 3 महिन्यात 6 लाखाचे उत्पन्न
इतरांची नोकरी ते यशस्वी शेळी उद्योजक हा प्रवास
लक्ष्मण टकले हे एकेकाळी कोणासाठी तरी काम करणारी ही व्यक्ती अशी असणारी ओळख अन् आता ते स्वतः अनेकांच्या रोजगाराचे साधन बनत आहेत. लक्ष्मण टकले यांच्या गावी त्यांच्या शेतीवर गावातील अनेक लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. इतकेच नाही तर शेळीपालन व्यवसायास तंत्रज्ञान आणि विज्ञानाची जोड दिल्या गेली तर शेळीपालन हा व्यवसाय अधिकाअधिक उत्पन्न प्राप्त करून देऊ शकतो, अशी आशावाद सुद्धा लक्ष्मण टकले यांनी बोलून दाखवला.
लक्ष्मण टकले यांच्या या यशोगाथेतून प्रेरणा घेतलेल्या माझ्या बांधवांसाठी थोडेसे
आता आपण लेखाच्या उत्तरार्धात आला आहात तर निश्चितच आधुनिक शेळीपालन करण्याची आपल्या मनात इच्छा आहे हे स्पष्ट होते. तर मित्रांनो चला लागा तयारीला. अरे हे काय? मान्य आहे भाऊ की सगळ्याच शेतकऱ्यांसाठी थेट विदेशी ब्रीड चे शेळीपालन करणे शक्य नाही. पण आपल्या हातात आपल्या आर्थिक ऐपत क्रमाने देशी शेळीपालन सुरू करण्याचा निर्धार तर आहेच ना. तर मग इतक्या मोठ्या प्रमाणात नाही तर 2..4 देशी शेळ्यांपासून सुरुवात तर आपण नक्कीच करू शकतो ना. अफाट होण्याआधी प्रत्येक कार्य हे छोटेच असते. पण त्या कार्यास जिद्द, चिकाटी अन् मेहनतीची जोड दिली की यश आपलेच आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही.
1 thought on “इंजिनीअरिंग सोडून सुरू केले शेळीपालन, आज पठ्ठ्या कमावतोय वर्षाला सव्वा कोटी”