आधुनिक शेती म्हणजे नेमके काय? ग्रामीण शेतकऱ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन

भारतातील जवळपास 70 टक्के जनता ही खेड्यात राहते. खेड्यात राहणाऱ्या बहुतांश लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा असतो. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय असा प्रश्न आजही बऱ्याच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडतो कारण ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी आजही केवळ पारंपरिक शेतीच करत आहेत. आधुनिक शेती म्हणजे काय याबाबत हे शेतकरी अगदीच अनभिज्ञ नसले तरी यंत्राचा वापर करून केल्या जाणारी शेती याव्यतिरिक्त इतर आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख मात्र या शेतकऱ्यांना झालेली नाही हे सुद्धा वास्तव आहे. आज आपण आधुनिक शेती म्हणजे नेमके काय असते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आधुनिक शेती ही पारंपरिक शेतीपासून वेगळी का ठरते तसेच या आधुनिक शेतीचे फायदे तसेच नुकसान याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान तसेच प्रगत शेतीचे मार्ग

तर शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती म्हणजे नेमके काय या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. लक्षात घ्या आधुनिक शेती हा व्यवसाय म्हणजेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळी विविध दिशांनी सर्वच बाबतीत शेतजमीन विकसित करून भरघोस उत्पादन घेणे अशी ढोबळ व्याख्या तयार होईल. मात्र आधुनिक शेतीचा प्राथमिक उद्देश हा उत्तम नियोजन आणि हुशारीने केलेल्या व्यवस्थापनाद्वारे पीक उत्पादन वाढविण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे आहे हा आहे.

आज भारतात अधिक कार्यक्षम तसेच शाश्वत शेती पद्धतींचा प्रचार प्रसार करून नव्याने विकसित झालेले शेतीतील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आजच्या कृषी व्यवसायात समृद्ध होण्यास वापर करण्यास शिकविणे तसेच त्यांना या नवीन तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्यांच्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचणे यासाठी सचोटीने प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आधुनिक शेतीमध्ये पीक रोटेशन आणि नवीन कृषी तंत्रज्ञान उदा. यंत्रसामग्री आणि उपग्रह प्रतिमा किंवा विशेष शेती सॉफ्टवेअरसह शेतातील उत्पादकतेचे निरीक्षण करणे यासारख्या वेळ-चाचणी पद्धती, या सर्व पद्धतींचा वापर करून शेतीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करणे तसेच मानवी बाळाचा वापर कमी करणे हे आधुनिक शेतीचे उद्दिष्ट आहे.

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय? ग्रामीण शेतकऱ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन

आधुनिक कृषी तंत्रज्ञानात या गोष्टींचा होतो समावेश

हळूहळू का होईना पण भारतात आधुनिक शेतीची पाळेमुळे रुजताना दिसून येत आहेत. नव्याने विकसित होणारे कृषी तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगतीची नवीन शिखरे गाठत आहे. कृषी तंत्रज्ञानास “ॲग्रीटेक” या नावाने सुद्धा अनेक शेतकरी परिचित आहेत. मात्र या आधुनिक कृषी तंत्रज्ञानात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तसेच आधुनिक शेती म्हणजे नेमके काय याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात आजही साशंकता आढळते किंवा माहितीचा अभाव आढळतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पादनात सुधारणा करणाऱ्या विविध शाखा आणि उपकरणांचा समावेश आधुनिक कृषी तंत्रज्ञानात समावेश होतो. या तंत्रज्ञानात स्वयंचलित वाहने, रोबोटिक्स, संगणक, उपग्रह, ड्रोन, मोबाइल उपकरणे तसेच सॉफ्टवेअर या सर्व बाबींचा समावेश होतो. कृषी क्षेत्रातील बिग डेटा ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा प्रभावी पद्धतीने केल्या जात असून याचा उत्पादनावर सकारात्मक परिणाम दिसून येत असून त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता आली असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

भारतात मागील काही दशकांमध्ये शेती आणि क्षेत्र व्यवस्थापनात झालेले अमुलाग्र बदल हे भारतीय शेतीला नवीन दिशा देणारे ठरले आहेत. पीक व्यवस्थापनातील हल्लीच्या काळात मिळालेले प्रचंड यश आणि उत्पादनात झालेली प्रचंड वाढ याचे संपूर्ण श्रेय शेतीतील आधुनिक, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरास देणे ही अतिशयोक्ती ठरणार नाही. अर्थातच शेतकऱ्यांची मेहनत ही केंद्रस्थानी असतेच तर शंका नाही. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय हे तर आपल्याला काही प्रमाणात कळलेच असेल. मात्र या आधुनिक शेतीचे फायदे काय आहेत हे सुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे. आणि आधुनिक शेतीसाठी लागणारे कौशल्य भारतातील शेतकरी आत्मसात करू शकेल का या प्रश्नाचे उत्तर शोधणे सुद्धा आवश्यक आहे. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय याचे उत्तर तुम्हाला मिळाले असेलच मात्र काही प्रतिकूल गोष्टी सुद्धा यात सामाविष्ट आहेत याची सुध्दा जाणीव झाली असेल.

कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे विविध फायदे

अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी कृषी-अन्न साखळीतील सर्वच बाबतीत अत्यंत उपयुक्त ठरते. विविध कृषी क्रिया आणि मशागतीसह इतर कामे स्वयंचलित करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने भरघोस उत्पादन घेणे सहज शक्य आहे तसेच या आधुनिक उपकरणाच्या तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकरी बांधवांना त्यांचा वेळ वाचवणे आणि मेहनत कमी करणे या सर्व गोष्टी सोईस्कर होणार आहेत. कृषी तंत्रज्ञानातील या अभूतपूर्व प्रगतीमुळे शेतीला कसा फायदा होत आहे याची काही मूर्तिमंत उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.

आज या आधुनिक शेतीची कास धरून बळीराजा अत्यल्प पाणी, खते, कीटकनाशके आणि इतर निविष्ठा यांचा प्रभावीपणे वापर करता येईल तसेच शेती मशागतीसाठी लागणारा खर्च सुद्धा कमी होईल परिणामी त्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवता येऊन अधिक नफा मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. जलमार्गांमध्ये रासायनिक प्रवाहाचे प्रमाण रोखून किंवा तीव्रपणे कमी करून पर्यावरणावरील जास्तीचा ताण सुद्धा शिथिल होण्यास हातभार लागेल. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय हे शेतकऱ्यांना कळल्यानंतर तसेच त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली तर त्यांच्या जिवनात अमुलाग्र बदल घडवून आणता येतील.

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय? ग्रामीण शेतकऱ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन

कमी मेहनत घेऊन सुद्धा पीक उत्पादन वाढेल

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय हे जाणून घेतल्यास शेतकरी, कृषीशास्त्रज्ञ किंवा इतर कृषी कामगारांना मोबाइल डिव्हाइस, ॲप्स किंवा वेब-आधारित संसाधने यांचा प्रभावीपणे वापर करता येऊन त्यांचे निसर्गाच्या असंतुलित व्यवहारामुळे होणारे संभाव्य नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर टाळता येईल. कृषी विमा आणि वित्तीय सेवा तसेच बाजार आणि तांत्रिक डेटा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांची शेती प्रगत होईल. पिकावरील किड, नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानामुळे होणारे नुकसान कमी होण्यास या आधुनिक कृषी निरीक्षण प्रणालींच्या वापराची मोलाची मदत होईल. शेती पिकाची उत्पादन गुणवत्ता तसेच कमी शेतजमिनीत भरघोस उत्पादन या सर्व बाबी शेती उत्पन्नात वाढ होण्यास कारणीभूत ठरतील.

टेरेस गार्डनचे फायदे आणि मशागतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घ्या

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय तर या अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वनस्पतींमध्ये पोषक तत्वांची कमतरता वेळेवर ओळखणे याशिवाय शेतकऱ्यांना खताचा प्रकार आणि प्रमाण आणि इतर आवश्यक सुधारणा यांची पूर्वसूचना मिळणे तसेच त्यांच्या योग्य वापर करण्याची जबाबदारी पार पाडता येणार आहे. जेणेकरुन खतांच्या अती वापरामुळे शेतजमिनीचे नुकसान होणार नाही. सद्यस्थितीत तसेच मागील काळातील कृषी डेटाच्या विश्लेषणातून मिळालेल्या उत्पादन पद्धती आणि ट्रेंडच्या सखोल विश्लेषण द्वारे शेतातील संभाव्य समस्यांचा अंदाज घेण्याची क्षमता शेतकऱ्यांत विकसित होणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण पीक उत्पन्नाचा अंदाज घेऊन, हे शेतकरी त्यांच्या पुढील हंगामासाठी अचूकपणे अंदाजपत्रक तयार करू शकतील तसेच शेतीत येणाऱ्या नैसर्गिक संकटाना सामोरे जाण्यासाठी आणि इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी चांगली तयारी करू शकतील. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय हे कळणे आणि या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याचे कौशल्य अंगी विकसित करणे ही खर तर काळाची गरज आहे.

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे तोटे

प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच त्यांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान सुद्धा असतात. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय याबाबत आपण साविस्तर माहिती जाणून घेतली आहेच. आधुनिक शेतीमुळे अनेक लाभ शेतकऱ्यांना मिळतात. शेतकऱ्यांची उन्नती होते. कमी श्रमात, कमी शेतजमिनीत प्रचंड उत्पादन घेणे शक्य होते. मात्र या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे काही तोटे सुद्धा असतात जे माहीत असणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. चला बघुयात काय आहेत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे तोटे याबद्दल सविस्तर माहिती.

आधुनिक शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान

प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आधुनिक शेतीने उच्च कार्यक्षमता, कमी खर्च आणि मोठ्या उत्पन्नाच्या दृष्टीने तांत्रिक विकासाचे अनेक फायदे मिळविण्यात यश मिळवले आहे हे जरी खरे असले तरी या तंत्रज्ञानाच्या बाबतीत नाण्याची आणखी एक बाजू आहे, जी विशेषतः मोठ्या प्रमाणावर विस्तृत शेतीशी निगडित आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा धोका हा निसर्गाला आहे. या तंत्रज्ञानाच्या अती प्रमाणात वापरामुळे निसर्गावर त्याचा हानिकारक प्रभाव पडणार नाही अस म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. पर्यावरणावर नकारात्मक परिणाम या कृषी तंत्रज्ञानाच्या अधिक वाढत जाणाऱ्या वापरामुळे भविष्यात जाणवतील याबाबत सर्वांचे एकमत असावे.

काय आहेत विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या, जाणून घ्या सविस्तर

कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे माती आणि जल प्रदूषण

शेतकरी मित्रांनो पारंपरिक शेती ऐवजी नवनवीन पिके घेतल्याने अनेक देशी प्रजाती नष्ट होऊ शकतील आणि त्यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. याशिवाय शेतजमिनीसाठी मार्ग तयार करण्यासाठी जंगले साफ केल्यामुळे तसेच यंत्रसामग्रीचा पुढील अतिवापर हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होईल. आधुनिक शेती म्हणजे नेमके काय आणि याचे विविध फायदे हे लक्षात घेताना हे सुद्धा जाणून घ्या की कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे सर्व तोटे फक्त पर्यावरणाच्या प्रभावाशी जोडलेले नाहीत.

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय तर या कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या समस्यांना सुद्धा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सर्वच शेतकरी या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील का हा गहन प्रश्न उपस्थित होतो. आवश्यक यासाठी लागणारे आवश्यक शिक्षण कौशल्य तसेच अनुभवाचा अभाव असलेले शेतकरी यंत्रसामग्री आणि सॉफ्टवेअर प्रभावीपणे हाताळण्यात असमर्थ ठरतील. परिणामी असे ग्रामीण भागातील शेतकरी आजच्या युगातील या प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकणार नाहीत हे सुद्धा वास्तव आहे.

आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे या आधुनिक यंत्रसामग्रीची देखभाल करण्याचा खर्च सुद्धा सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यापलीकडचा आहे. आजच्या आधुनिक काळातील हे प्रगत कृषी तंत्रज्ञान जगाच्या वाढत्या लोकसंख्येच्या अन्न विषयी गरजा पूर्ण करण्यास मोलाचा हातभार लावतील यात दुमत नाही. मात्र यासाठी पर्यावरणपूरक पद्धतींशी हातमिळवणी करणाऱ्या अचूक कृषी तंत्रांचा वापर करून तसेच त्यात वेळोवेळी आवश्यक सुधारणा करून आपण त्यांचे नकारात्मक परिणाम बऱ्याच प्रमाणात शिथिल शकतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment