चिया लागवडीतून भरगच्च नफा, प्रती क्विंटल 14 हजाराचा हमीभाव, वाशिम जिल्हा ठरतोय अग्रेसर

चिया सीड्स बद्दल आपण नक्कीच ऐकले असेल. मात्र वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिया सेड्स ची लागवड करून वाशिम जिल्हा चिया सिड्स लागवडीत संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरले आहे. चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळत असल्याने राज्यातील अनेक भागांतील शेतकरी आता चिया बियांची लागवड करण्याकडे वळताना दिसून येत आहेत. आज आपण प्रती 14 लाखाचा हमीभाव मिळत असलेल्या चिया बियांची लागवड करणे फायदेशीर कसे आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वाशीम जिल्हा ठरतोय चिया लागवडीत अग्रेसर

वाशीम जिल्ह्यातील शेतकरी चिया लागवडीतून भरगच्च नफा कमवून आर्थिक स्थैर्य निर्माण करताना दिसत आहेत. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून वाशिम जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देऊन नवनवीन तसेच आधुनिक पिकांकडे वळताना दिसत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळत असल्यामुळे हे पीक अल्पावधीतच शेतकऱ्यांचे आवडते लीक म्हणून समोर आले आहे. याशिवाय चीया सीडस आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असून प्रती एकर 14 हजाराचा हमीभाव मिळाल्यामुळे वाशिम जिल्ह्यात चिया बियांची लागवड मोठ्या प्रमाणावर होताना निदर्शनास येत आहे.

चिया लागवडीतून भरगच्च नफा, प्रती क्विंटल 14 हजाराचा हमीभाव, वाशिम जिल्हा ठरतोय अग्रेसर

एवढ्या क्षेत्रावर होत आहे चिया बियांची लागवड

वाशीम जिल्ह्यात चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळत असल्याने या जिल्ह्यात सध्या 3 हजार 608 हेक्टर क्षेत्रावर चिया बियांच उत्पादन घेतले जात आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यात 1 हजार 169 हेक्टर, रिसोड तालुक्यातील 972 हेक्टर, वाशिम तालुक्यात 753 हेक्टर, मंगरूळपीर तालुक्यात 598 हेक्टर, मानोरा तालुक्यात 44 हेक्टर आणि कारंजा तालुक्यात 72 हेक्टर चिया बियांची लागवड करण्यात आली आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुका चिया बियांच्या लागवडीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळत असल्यामुळे तसेच पुण्यातील एका नामांकित कंपनीने चिया पिकाला प्रती 14 हजाराचा हमीभाव मिळवून दिल्याने शेतकऱ्यांची चिया बिया लागवड करून आणखीनच भरपूर कमाई होणार हे उघड आहे.

पुण्याच्या नामांकित कंपनीने दिला 14 हजाराचा हमीभाव

चिया बिया अत्यंत आरोग्यवर्धक असल्यामुळे या पिकाला प्रचंड मागणी असते. या पिकासाठी बाजारभाव अगदी सहज उपलब्ध होतो.याशिवाय प्रचंड बाजारभाव मिळतो. चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्याच्या शेतात येऊन मोठमोठे व्यापारी माल घेऊन जास्त असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो. तसेच चिया बियांच्या भावात जास्त अस्थिरता आणि चढउतार दिसून येत नाही. वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल विकत घेण्यासाठी पुण्यातील एका नामांकित कंपनीने 14 हजार रुपये प्रति क्विंटल दराने सेंद्रिय पद्धतीने उत्पादित चिया खरेदी करण्याचा करार जिल्हाधिकारी यांच्यासोबत केला आहे. परिणामी या जिल्ह्यातील बहुसंख्य चिया लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठेची हमी मिळाली आहे.

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड अशा पद्धतीने करा, मिळेल बक्कळ बाजारभाव

वाशीम जिल्ह्याचे पुढील उद्दिष्ट काय आहे?

चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळत असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेती क्षेत्राला उन्नतीचा नवीन मार्ग सापडला आहे. वाशीम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळविणे शेतकऱ्यांसाठी सोप्पे आणि उत्पन्नात अधिकची भर टाकण्यासाठी अनुकूल ठरला आहे. हाती आलेल्या संधीच या भागातील शेतकरी जर सोन करू शकले, तर पुण्याप्रमाणे एक प्रगत कृषी जिल्हा म्हणून वाशीम जिल्हा नावारूपास यायला उशीर लागणार नाही. चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळवून जिल्ह्याला चिया बिया उत्पादनाचे राज्यातील प्रमुख केंद्र बनविणे, स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे तसेच सेंद्रिय शेतीला चालना देऊन पर्यावरणपूरक शेतीस प्रोत्साहन देणे हे वाशीम जिल्ह्याचे कृषी विषयक उद्दिष्ट आहे. यंदा रब्बी हंगामात चिया बियांची लागवड एक हजार एकर क्षेत्रावर विस्तरतीत करण्याचे ध्येय सुद्धा ठेवण्यात आले आहे.

चिया लागवडीतून भरगच्च नफा, प्रती क्विंटल 14 हजाराचा हमीभाव, वाशिम जिल्हा ठरतोय अग्रेसर

या यशात जिल्हाधिकारी साहेबांचा आहे मोलाचा वाटा

चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा लाभला आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेला चिया बियांच्या लागवडीसाठी उत्कृष्ट नियोजन कसे करावे याबद्दल सातत्याने मार्गदर्शन केले आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे तर मिळत आहेच, शिवाय चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळविण्यासाठी मानसिक आधार सुद्धा मिळत आहे.

चिया बियांचे आरोग्यदायी फायदे

चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळविण्यासाठी चीया पिकाची लागवड कशा पद्धतीने करावी हे वाचवण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण जगात प्रचंड लोकप्रिय असलेल्या चिया बियांना सुपरफूड या नावाने ओळखल्या जाते. चीया बिया पोषणतत्वांनी समृद्ध असून या बियांमध्ये समाविष्ट असलेले प्रथिने आणि तंतूमय पदार्थ शरीराला उर्जा देतात. तसेच या बियांच्या दररोज सेवनाने पचनशक्ती सुधारते. ओमेगा 3 फॅटी ऍसिडने परिपूर्ण असलेल्या या चीया बिया हृदयविकाराचा धोका कमी करण्यास प्रभावी ठरतात. तसेच डायबिटीस असलेल्या लोकांचे सुद्धा साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात. या बियांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स मानवी त्वचेला चमकदार आणि टवटवीत ठेवण्याचे काम करतात. तर अशा या शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे पीक असलेल्या चिया लागवडीतून भरगच्च नफा मिळविण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment