तुर्की बाजरी लागवड…आजच्या आधुनिक युगात सगळ्याच क्षेत्रात मानवाने दैदिप्यमान प्रगती केली आहे. यात शेती हे सर्वात महत्वाचे क्षेत्र कसे मागे राहील बर? शेती सुद्धा आत आधुनिक पद्धतीने करण्यास बळीराजा आपली पसंती दर्शवत आहे. बाजारात रोज काही ना काही नवीन वाण, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पारंपरिक बाजरीचे कणीस तसे आकाराने लहानच असते. मात्र आता बाजरीचे एक नवीन वाण बाजारात आले आहे. या बाजरीचे कणीस तब्बल 3 ते 4 फूट इतके मोठे असते. कोरडवाहू शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळवून देण्यास हे वाण निश्चितच फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया या बाजरीच्या नवीन वाण विषयी महत्वपूर्ण माहिती.
तुर्की बाजरीचे झाड वाढते 15 फूट उंच
तर शेतकरी मित्रांनो, या वाणाचे नाव तुर्की बाजरी असून याचे झाड तब्बल 13 ते 15 फूट वाढते. या वाणाचे कणीस 3 ते 4 फूट लांबीचे असल्यामुळे या तुर्की बाजरीची आपल्या शेतात लागवड केल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ शकते यात शंका नाही.
तुर्की बाजरी कोणत्या ऋतूत पेरणे फायद्याचे असते?
खरीप, लेट खरीप व रब्बी अशा तीनही वातावरणात ‘तुर्की’ बाजरी लागवडीसाठी अनुकूल आहे. तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना तर हे तुर्की बाजरीचे पीक अत्यंत जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी सक्षम आहे. कारण तुर्की बाजरीचे हे वाण लागवडीसाठी अत्यंत कमी पाण्याची गरज असते. तसेच अत्यंत कमी कालावधीत या पिकाचे उत्पन्न घेता येते.
तुर्की बाजरी लागवड करणारा अनुभवी शेतकरी
राहता तालुक्यात असलेले कोऱ्हाळे या गावातील शेतकऱ्याच्या शेतात सध्या तुर्की वाणाची लागवड केलेली आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे गौरव रविंद्र कोऱ्हाळकर. सदर शेतकऱ्याकडे वडीलोपार्जित ५ एकर कोरडवाहू शेती आहे. ज्या पैकी ३ एकर क्षेत्रात ‘तुर्की’ या वाणांच्या बाजरीची जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड या शेतकऱ्याने केलेली आहे. त्यासाठी त्यांनी इंटरनेट वरून आधी माहिती गोळा करून आवश्यक ज्ञान प्राप्त करून नंतर राजस्थान तुर्की बाजरीचे वाण मागविले अन् या बाजरी लागवडीचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे.
फक्त अडीच महिन्यातच या तुर्की बाजरीने कमाल केली असून या तुर्की बाजरीची रोपे तब्बल तेरा ते पंधरा फुट ऊंच झालेली आहेत. इतकेच काय तर तीन ते चार फुट लांबीचे दमदार कणीस सुद्धा तयार झाले आहे. ही तुर्की बाजरी अधिक उंच वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुंसाठी जास्त चारा उत्पादन मिळण्यास निश्चितच मदत होते. तसेच या तुर्की बाजरीची कणीस गावरान बजरीपेक्षा जास्त लांब असल्यामुळे गौरव कोऱ्हाळकर यांना तीन पट अधिक बाजरीचे उत्पादन होणार यात शंका नाही.
भरघोस उत्पन्नाची हमी देईल तुर्की बाजरीची लागवड
शेतकरी भावांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे पारंपरिक पिके घेऊन पसरी जास्तवेळ निराशाच येत असते. त्यामुळे आधुनिक शेतीची कास धरणे आपल्यासाठी अन् आपल्या उन्नतीसाठी आवश्यक ठरते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पारंपारिक बाजरीतून नेहमी कमी उत्पादन मिळत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना ‘तुर्की’ बाजरी नक्कीच वरदान ठरेल यात शंका नाही. ‘आम तो आम, गुठलीयो के भो दाम* या उक्तीप्रमाणे या तुर्की बाजरीची फक्त कणीसच जास्त उत्पादन देत नाही तर यांच्यापासून अधिक चारा उत्पादन होत असल्याने दुष्काळात देखील ‘तुर्की’ बाजरी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरू शकते. परिणामी कोरडवाहू शेतकऱ्यांनी आता पारंपरिक बाजरीला रामराम ठोकत या आधुनिक ‘तुर्की’ वाणाच्या बाजरीची लागवड करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
तुर्की बाजरी देते एकरी 40 क्विंटल उत्पादन
या तूर्की बाजरीचे एक महत्वपूर्ण वैशिष्टय म्हणजे ही बाजरी खायलाही अत्यंत चविष्ट आहे. तसेच आगामी काळात कोरडवाहू शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात उत्पन्नात भरघोस वाढ मिळवून देण्यासाठी रामबाण उपाय असणार आहे. तुर्की बाजरीतून प्रति एकरात सुमारे ४० क्विंटल उत्पन्न प्राप्त होते. सध्या राज्याच्या बऱ्याच भागातून बाजरी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असताना कोऱ्हाळकर यांनी केलेल्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे परिसरातून कौतुक होत आहे.
तुर्की बाजरीचे गुणधर्म अन् पोषक तत्वे
शंभर ग्रॅम तुर्की बाजरीत 67 ग्रॅम कर्बोदके, 12 ग्रॅम प्रथिने, 5 ग्रॅम फॅट तसेच 1 ग्रॅम मिनरल असते. या तुर्की बाजरीची भाकरी खायला चवदार असून ती रंगाने पांढरी अन् हिरवट असते. या तुर्की बाजरीच्या भाकरीचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करणे अत्यंत उपयुक्त ठरते. यातील विवध पोषक तत्वे मानवी आरोग्यास हितकारक असतात.
या तुर्की बाजरीचे वाण कुठे मिळते?
सध्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा अनेक शेतकरी हे तुर्की बाजरी आपल्या शेतात पेरायला प्राधान्य देत असल्यामुळे या तुर्की बाजरीचे वाण अगदी सहज उपलब्ध होते. अमेझॉन वर सुद्धा हे तुर्की बाजरीचे वाण सध्या उपलब्ध आहे. तसेच विविध शेतकरी ज्यांनी आधी लागवड केलेली आहे त्यांच्याकडे सुद्धा हे वाण मिळू शकते. त्यासाठी यूट्यूब किंवा गूगल वर सर्च केल्यास आपल्याला सहज हे वाण मिळू शकते.