शिक्षक दिवस (teachers day), महत्व 5 सप्टेंबर दिनाचे

भारत हा गुरूला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या अशा महान संस्कृतीचा देश आहे. आपल्या देशात Guru हा शब्द जरी ऐकला तरी वंदन करायचे मन होते इतकी गुरूची महिमा अपार आहे. याच पार्श्वभूमीवर 5 September 2024 रोजी शिक्षक दिवस (teachers day) असून या दिवसाचे महत्व, शिक्षक दिनाचा इतिहास, शिक्षक दिवस कसा साजरा केला जातो, तसेच या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना काय गिफ्ट देऊ शकता, शिक्षक दिवस संबंधी छान छान व्हॉट्सअँप शुभेच्छा मेसेज (teachers day wishes)आणि guru प्रती आदर दर्शविण्यासाठी विद्यार्थी शिक्षक या पवित्र नात्यावर नात्यावर बनविलेले बनलेले 5 प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

teachers day 2024 significance and history

शिक्षक दिवस (teachers day) दरवर्षी 5 September रोजीच का साजरा केला जातो?

मित्रांनो आपल्या देशात एक विद्वान गृहस्थ होऊन गेले. त्यांचे नाव आहे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रख्यात तत्त्ववेत्ते, आदर्श शिक्षक, प्रकांड पंडित असे सर्वगुणसंपन्न असलेले भारतरत्न सन्मानाने गौरविण्यात आलेले डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा 5 September रोजी झाला असल्यामुळे त्यांच्या महान कार्याला समर्पण म्हणून दरवर्षी संपूर्ण भारतात हा दिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या गौरवाने साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी महत्वाचे

शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म एका गरीब ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांनी त्याकाळी त्यांचे संपूर्ण शिक्षण शिष्यवृत्ती मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केले. इतकेच काय तर त्यांनी फिलॉसॉफी (तत्त्वज्ञान) विषयात एम. ए. ची सन्मानाची पदवी सुद्धा संपादन केली. त्यांनी 1931 ते 1936 या कालावधीत तत्कालीन आंध्रा युनिव्हर्सिटी तसेच 1939 साली बनारस हिंदू युनिव्हर्सिटी चे व्हाइस चान्सलर पद भूषविले. सन 1917 आली त्यांनी (The Philosophy of Rabindranath Tagore) रवींद्रनाथ टागोरांचे तत्त्वज्ञान हे पुस्तक प्रकाशित केले .

प्रखर बुद्धिमत्ता आणि साधेपणा होती त्यांची ओळख

आज आपण ज्या हर्ष उल्हासाने डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस (teachers day) म्हणून साजरा करतो ते विद्येचे धनी लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले तेव्हा ते सर्वच विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षक बनले.

शिक्षक दिवस (teachers day) साजरा करण्यामागचा इतिहास

1962 साली जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार करायचे ठरवले. 5 September हा त्यांचा वाढदिवस. हाच दिवस सत्काराचा ठरला. त्यांची शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी बघता 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांच्या प्रती असलेली आत्मीयता तसेच त्यांच्या पावन स्मृतीस उजाळा देण्यासाठी संपूर्ण देशात 5 September या दिवशी मोठ्या उत्साहाने देशाच्या प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक दिवस (teachers day) साजरा केला जातो.

पंडित नेहरूंनी काढले होते गौरवोद्गार

स्वतंत्र भारताचे पहिले उप राष्ट्रपतिपद भूषविणाऱ्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी बोलताना एकदा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, “डॉ. राधाकृष्णन यांनी खूप क्षेत्रात देशाचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते एक आदर्श शिक्षक असून आपण सर्व त्यांच्यापासून खूप काही शिकलो आहेत अन् भविष्यात सुद्धा शिकत राहू.” अशाप्रकारचे गौरवोद्गार देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या तोंडून डॉ. राधाकृष्णन यांच्याविषयी निघाले होते. अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करूनसुद्धा डॉ. राधाकृष्णन स्वतःला मात्र नेहमी एक शिक्षक म्हणायचे. इतका साधेपणा या महान पुरुषाच्या अंगी होता.

शिक्षकांचे समाजातील महत्व

आजचा हा शिक्षक दिवस (teachers day) प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खास असतो. कुंभार जसा मातीच्या घड्याला हवा तसा आकार देऊन त्याच रुप सुरेख करतो, त्याचप्रमाणे शिक्षक मुलांच्या आयुष्यात शिस्त लावून त्यांच्या नाजूक मनाला हवा तसा संस्कृतीचा, मूल्यांचा आकार देऊन एक उत्कृष्ट नागरिक देशाला देत असतात. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्राशन करणारा व्यक्ती गुरगुरल्या शिवाय राहत नाही.” बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सुविचार मध्ये शिक्षणाचं अपार महत्व सांगितल आहे. आणि हेच शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यात स्वाभिमानाने जीवन जगायचं कौशल्य अन् सामर्थ्य निर्माण करण्याचं महान कार्य शिक्षक करत असतात.

शिक्षकांची महिमा अपरंपार

चांगला समाज अन् चांगले नागरिक घडविण्यामागे शिक्षकांचे योगदान वाखणाण्याजोगे असते. आई वडील आपले प्रथम गुरू असतात. आयुष्यात शालेय शिक्षकांव्यतिरिक्त असे अनेक जण आपापल्या भेटतात अन् काहीतरी नवीन शिकवून जातात. आयुष्याची खडतर लढाई लढत असताना अनेकांचे मार्गदर्शन आपल्याला जीवन जगत असताना होत असते. अशा सर्वच ज्ञात अज्ञात शिक्षकांचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा 5 September हा शिक्षक दिवस (teachers day) आपल्या संस्कृतीत खूप महत्वाचा असून या दिनाची महती शब्दांत सांगणे अवघड आहे. सर्वच शिक्षकांच्या चरणी नमन करून त्यांच्याबद्दल प्रेम दाखवून त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता दाखवून त्यांना या दिवशी समर्पण द्यायचे असते. तसेच त्यांच्या या भरीव सामाजिक कार्यासाठी त्यांचे आभार मानायचे असतात.

शिक्षक दिवस (teachers day) असा केला जातो साजरा

देशातील प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये 5 September रोजी शिक्षक दिवस साजरा केल्या जातो. या दिवशी विद्यार्थी विद्यार्थिनीच शिक्षक बनून इतर विद्यार्थांना शिकवत असतात. आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवता यावे यासाठी महिनाभर आधीपासूनच शिकविण्याचा सराव अन् अभ्यास करत असतात. हा दिवस सर्वच विद्यार्थ्यांसाठी खूप मौजमजेचा असतो. कारण एरवी अध्ययनाचे कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना या खास दिवशी अध्यापन करण्याची संधी मिळते.

तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांना एक दिवसापुरते का होईना, पण नवीन शिक्षक मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांचे सार्वजनिक संभाषण कौशल्य निखरण्यास मदत होते. तसेच त्यांच्यात वकृत्वकलेचा आत्मविश्वास निर्माण होण्यास मोलाचा हातभार लागतो. सर्व तासिका पूर्ण झाल्यानंतर डॉ. राधाकृष्णन यांना सार्वजनिक श्रद्धांजली देण्यात येते. आणि अनेक विद्यार्थी त्यांच्या कर्तृत्व आणि भरीव कामगीरी विषयी भाषणे देतात.

या 5 प्रकारे द्या तुमच्या शिक्षकांना या शिक्षक दिनी खास गिफ्ट/ teachers day gifts

1) तुम्ही जर कुकिंग विषयी जाणकार असाल तर तुमच्या शिक्षकांसाठी एखादा छान केक बनवून त्यांना या शिक्षक दिनी (teachers day) आश्चर्याचा सुखद धक्का देऊ शकता.

2) तुमच्या शिक्षकांप्रती प्रेम आणि आदर दर्शविण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी कोलाज चित्रे तयार करू शकता. तुमचा ग्रुप तयार करून चित्रांचा संग्रह बनवा. तुम्ही स्वतः बनविलेल्या विविध चित्रावर त्यांच्यासाठी सहृदय संदेश लिहून त्यांच्या कार्याचा सन्मान करून तुमची आत्मीयता दाखवू शकता.

3) आपल्या प्रिय शिक्षकांना 5 September या पवित्र शिक्षक दिवशी ( teachers day) आपण thank you कार्ड सुद्धा देऊन त्यांच्याप्रती तुमची कृतज्ञता व्यक्त करू शकता. आभार कार्डवर मस्तपैकी छान छान मेसेज लिहून त्यांना तुम्ही तुमच्या मनातील त्यांच्याविषयी असलेल्या आदराने भारावून टाकू शकता

4) तुम्हाला जर तुमच्या शिक्षकांची आवड माहीत असेल तर त्यांना त्यांच्या आवडीचे एखादे छोटेसे गिफ्ट देऊन खुश करू शकता. बरेच विद्यार्थी शिक्षक दिनी (teachers day) अशाप्रकारे सुंदर गिफ्ट देऊन शिक्षकांना अनदित करत असतात.

5) तुम्ही जर पर्यावरण प्रेमी असाल तर तुमच्या शिक्षकांना गिफ्ट देण्यासाठी त्यांच्या नावाने तुमच्या शाळेतील आवारात एखादे झाड लावू शकता. हे आपल्या शिक्षकांना आनंदी करण्यासाठी एक नवीन पण प्रभावी माध्यम असू शकते. कारण जेव्हा जेव्हा तुमचे शिक्षक तुम्ही लावलेल्या झाडाकडे बघतील तेव्हा त्यांना तुमचे त्यांच्याप्रती असलेले प्रेम अन् आदर याची त्यांना जाणीव होत राहील

ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना मिळत आहे 1 लाखाची शिष्यवृत्ती, असा करा अर्ज

शिक्षक दिवस( teachers day) साठी व्हॉट्सॲप शुभेच्छा शुभेच्छा/ teachers day wishes/teachers day whatsapp messages

1) “तुमच्यासारखा शिक्षक मिळणे आशीर्वादापेक्षा कमी नाही.” शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा सर

2) “गुरु विना ना मिळे ज्ञान
ज्ञानाविना ना होऊ सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदुया गुरुराया”

3) “आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रिय शिक्षकांना शतशः नमन”

4) “शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा,
तत्वातून मूल्य फुलविणारा,
शिक्षक म्हणजे अखंड झरा
अखंड वाहत राहणारा”

5) “दिले ज्ञानाचे आम्हाला भंडार
केले आम्हाला भविष्यासाठी तय्यार,
सदैव ऋणी असू त्या गुरूंचे
ज्यांनी दिला आमच्या आयुष्याला आकार”

6) “आई गुरू आहे, वडीलही गुरू आहेत. आयुष्यात ज्यांनी आपल्याला काही शिकवलं ते सगळेच आपले गुरू आहेत.”
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

7) “उत्तम शिक्षक तुम्हाला आयते उत्तर देत नाहीत, तर ते तुम्हाला उत्तर शोधण्याचे कौशल्य निर्माण करून देतात.”
happy teacher’s day

8) “अज्ञानाचा अहंकार दूर सारून आमचे जीवन ज्ञानरूपी प्रकाशने उज्ज्वल करून टाकणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा”

9) “जर सूर्याची किरणे उगवली नसती,
तर आकाशाचा रंगच दिसला नसता
जर सावित्रीबाई फुले जन्मल्या नसत्या,
तर स्त्रिया आज चूल अन् मुल यातच अडकून पडल्या असत्या.”
happy teacher’s day

10) “आदरणीय सर, आपण माझ्या आयुष्याला जो संस्कार आणि ज्ञानाचा आकार दिला, त्यामुळेच मी आज अभिमानाने जीवन जगण्याचा आनंद घेत आहे.” शिक्षक दिनाच्या सहृदय शुभेच्छा सर

शिक्षण क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणारे अन्य महापुरुष

1) राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य अफाट होते. त्यांच्या काळात वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय करत असत. महात्मा जोतीबा फुले आणि त्यांची अर्धांगिनी सावित्रीबाई यांनी उच्च वर्णीय समाजाचा तीव्र विरोध आणि त्रास सहन करून दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी पार पडली. शाहू महाराजांनी सन १९१७ मध्ये कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला.

हा कायदा करताना महाराजांनी पालकांसाठी दंड सुद्धा ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रुपया इतका त्याकाळच्या मनाने जास्त दंड ठेवला. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणावर भर देऊन शिक्षणाचा पाया भक्कम केला. माणसाची शैक्षणिक प्रगती झाली तरच आर्थिक आणि सामाजिक उन्नती होऊ शकेल असा त्यांचा ठाम विश्वास होता. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे शाहू महाराज म्हणायचे. शिक्षण घेताना तत्कालीन विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी लक्षात घेऊन महाराजांनी त्यावर प्रभावीपणे उपाययोजना आखल्या.

आर्थिदृष्ट्या मागासलेले तसेच गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी त्यांच्या संस्थानात अनेक वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल अन् कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेजमध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना शाळेच्या व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे खडतर शासन करून त्या अनुचित प्रकाराला आळा घातला. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम जारी केला. संस्थानातील ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची आर्थिक सहाय्य तसेच इतर सवलती बंद करण्याचे सक्त आदेश काढले.

2) स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले

महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया रचण्यासाठी कोणत्या महापुरुषाचे सर्वात जास्त योगदान असेल तर ते आहे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे. महात्मा फुले यांनी तत्कालीन समाजातील कर्मठ पुराणमतवाद्यांचा अन् सवर्णांच्या प्रखर विरोधाला अजिबात न जुमानता मुलींच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन केल्या आणि खऱ्या अर्थाने भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा जोतिबा फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील हे भरीव कार्य शतशः नमन करण्यासारखे आहे.

महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी 1848 शाळामध्ये सुरु केली. मुलींच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेतले. सर्वप्रथम त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन शिक्षित केले अन् शिक्षित समाजाची सुरुवात स्वत:पासून केली. माणसाने पक्का निर्धार केला तर समाजात अमुलाग्र बदल घडवता येतो हे महात्मा फुले यांच्या उदाहरणावरून आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखे आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत महात्मा फुले यांनी स्वखर्चाने अनेक शाळा चालवल्या.

सावित्रीबाई फुले यांच्या चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तत्कालीन स्त्री शिक्षणाचं कार्य जोमात सुरू होऊन स्त्रियांना आपले अधिकार कळून बंधनापासून मुक्त होता आले यात शंका नाही. शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या दुःखमुक्तीचा आणि शोषणमुक्तीचा ध्यास जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घेऊन तो पूर्णत्वास नेल्यामुळेच आज स्त्रिया पुरूषांसोबत खांद्याला खांदा लावून कठीनातील कठीण कार्य मोठ्या कर्तबगारीने करताना दिसून येतात. देशातील करोडो स्त्रियांचे खरे उद्धारकर्ते हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही.

3) परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,’ हा उद्धाराचा राजमार्गच बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीयांना दिला. त्यांचे गुरू महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक विषमतानिर्मूलनाच्या कार्याचा वारसा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे यशस्वीरीत्या चालविला अन् ज्योतीबा फुले यांचे सामाजिक क्रांतीचे कार्य अधिक सक्षम बनविण्याचे काम केले. स्वतः शोषित असल्यामुळे जीवनभर भोगलेला प्रचंड त्रास आणि अपमान यांची जाणीव असलेले एकमेव महापुरुष म्हणजे डॉ. आंबेडकर. समाजाच्या तळागाळातील शोषित लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे असा त्यांचा ठाम आग्रह होता. देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे त्या समाजाला शिक्षित करणे हा आहे, असे त्यांचे मत होते.

प्रचंड बुद्धिमत्ता असलेले, प्रचंड विपरीत परिस्थितीत जिद्दीने देश विदेशात शिकून 32 पदव्या संपन्न केलेले महापुरुष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल बोलायचे झाल्यास एक कादंबरीचं लिहावी लागेल. त्यांच्या काही शैक्षणिक कार्याची माहिती संक्षिप्त स्वरूपात देता येईल.

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना

तत्कालीन कनिष्ठ जातीतील समाज बांधवांत शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा तसेच त्यांची सामाजिक-आर्थिक उन्नती व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्कृत हितकारिणी संघटनेची’ स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे जानेवारी ४, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासह शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली. डॉ. आंबेडकरांनी सदर हॉस्टेलला सोलापूर नगर पालिकेकडून चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळवून दिले. नंतर या अनुदानाच्या साहाय्याने या संस्थेने ‘सरस्वती विलास’ नावाचे मासिक काढले. याशिवाय एक मोफत लायब्ररीसुद्धा कार्यान्वित केली.

दलित शिक्षणसंस्थेची स्थापना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ जून १९२८ साली दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस सहाय्य करावे असे आवाहन बाबासाहेबांनी केले. कारण माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नव्हती. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/– चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांनी आर्थिक मदत त्यांना देऊ केली.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना

अस्पृश्य लोकांपासून ते निम्न मध्यमवर्गातील लोकांना उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ साली मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय स्थापन केले

शिक्षक दिवस(teachers day) निमित्त शिक्षकांचे महत्व पटवून देणारे 5 प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट

1) चक दे इंडिया

शाह रुख खान या अभिनेत्याने रेखाटलेल्या हॉकी शिक्षकाची अप्रतिम अभिनयाची झलक या चित्रपटातून दिसून येते. खेड्यापाड्यातील मुलींना शिस्त लावून त्यांच्याकडून कठोर मेहनत करून घेऊन भारताला महिला हॉकी विश्वचषक प्राप्त करून देण्याची प्रेरणादायी कथानक असलेला हा उत्कृष्ट चित्रपट सर्व शिक्षक आणि विद्यार्थांनी एकदा तरी पहावा. यातून तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल.

2) सुपर थर्टी

हृतिक रोशन अभिनित या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बक्कळ कमाई केली होती. हृतिक रोशन ने यात स्पर्धा परीक्षा शिक्षकाची भूमिका बजावली होती. बिहारमधील एका शिक्षकाच्या सत्य कथेवर आधारित हा चित्रपट असून या शिक्षकाचे नाव प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्यावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला आहे. आयआयटी जेईई सारख्या महागड्या स्पर्धा परीक्षेसाठी फी भरू न शकणाऱ्या झोपडपट्टीतील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेऊन त्यांचे जीवन घडविण्याचे कथानक आपल्याला या चित्रपटात दिसून येईल. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या युवक युवतींनी आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे.

3) तारे जमीन पर

बॉलिवूड मधील आघाडीचा अभिनेता आमिर खानचा हा चित्रपट आहे. एका मतिमंद विद्यार्थ्यांला शिक्षकच काय तर आई बाबा सुद्द्धा कंटाळलेले असताना त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण बाहेर आणून त्या विद्यार्थ्याला आत्मविश्वास मिळवून देण्याचे प्रेरणादायी कथानक या चित्रपटात आहे. मी स्वतः कॉलेजमध्ये असताना हा चित्रपट 10 रिलिज झाला तेव्हा पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे तरी मला कंटाळा आला नाही. इतकी खुर्चीला खिळून ठेवणारी या चित्रपटाची स्टोरी आहे. शंकर महादेवन यांनी संगीतबद्ध केलेली सुमधुर गाणी ऐकून वातावरण अगदी झक्कास होते.

4) लक्ष्य

या चित्रपटात सुद्धा तुम्हाला हृतिक रोशन मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसेल. एक बेपर्वा तरुण या चित्रपटात कशा पद्धतीने आपल्या करिअर प्रती गंभीर होऊन लष्करात मोठ्या पदावर स्थानापन्न होतो हे तुम्हाला या चित्रपटातून जाणवेल. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका सामान्य बेफिकीर तरुणाचे भविष्य घडून आणले आहे. लष्कर किंवा पोलिस होणे हे ज्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे अशा विद्यार्थांनी हा चित्रपट जरूर पहावा.

5) हिचकी

राणी मुखर्जी या चित्रपटात एका शिक्षिकेच्या भूमिकेत दिसून येईल. या चित्रपटात या नैना माथूर ची भूमिका केलेल्या हा शिक्षिकेला एक विचित्र आजार असतो. या आजारावर मात करत ती कशाप्रकारे तिच्या विद्यार्थ्यांचे जीवन घडवते, आणि जीवनाच्या या खडतर प्रवासात तिला तिचे विद्यार्थी कशाप्रकारे सपोर्ट करतातयाविषयी कथानक फिरते. शेवटी ती सर्व चॅलेंजेसवर मात करून कशाप्रकारे तिच्या या आजारावर मात करते याविषयी हा चित्रपट आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment