दीड एकर शेतात तैवान पेरू लागवड करून शेतकऱ्याने कमावले एका वर्षात 24 लाख रुपये

आजकालची तरुणाई शेतीकडे यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. उच्चशिक्षित तरुण सुद्धा आता शेतीत नवनवीन प्रयोग करून यशस्वी झाल्याचे अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळते. आजच्या लेखात अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाची.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या उच्चशिक्षीत शेतकऱ्याने तैवान पेरू लागवड करून भरघोस उत्पादन घेतले आहे. या तैवान पेरू लागवड मुळे सदर शेतकऱ्याची आर्थिक भरभराट झाली आहे. राज्यातील शेतकरी पुत्र तसेच उच्चशिक्षित युवकांसाठी या यशस्वी शेतकऱ्याने एक पायंडा घालून दिला आहे. तसेच कमीत कमी क्षेत्रात पेरू लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. सदर शेतकऱ्याने फक्त दीड एकर शेतात तैवान पेरू लागवड करून पहिल्याच वर्षी 24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे.

तैवान पेरू लागवड 2024, यशस्वी शेतकरी

अशी केली दीड एकरात तैवान पेरू लागवड

करमाळा तालुक्यात वाशिंबे नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात राहणाऱ्या उच्चशिक्षित शेतकरी तरुणाचे नाव आहे विजय जगदाळे. त्यांनी पत्नी प्रियंका जगदाळे सोबत मिळून शेतात पारंपरिक पिके न घेता तैवान पेरू लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मागील वर्षी मार्च 2023 मध्ये त्यांनी त्यांची ही कल्पना सत्यात उतरवली. मात्र या तैवान पेरू लागवड साठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त केले. यासाठी त्यांनी इंटरनेटची मदत घेतली. तसेच परिसरातील अनुभवी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे मार्गदर्शन मिळवले.

आता तैवान पेरू लागवड विषयक आवश्यक ज्ञान प्राप्त केल्यावर जगदाळे भाऊंनी त्यांच्या दीड एकर शेतात 1550 तैवान पिंक जातीच्या रोपांची पेरू लागवड केली. तैवान पेरू अधिकच उत्पादन देतात हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी शेतात हा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचे ठरवून पहिलीच वर्षी भरघोस उत्पादन तर घेतलेच, शिवाय पेरू उत्पादनात वाढ करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या पेरू लागवड साठी त्यांनी देशी गायीचे शेण शेतात टाकले. तसेच सेंद्रिय खतांचा सुद्धा योग्य प्रमाणात वापर केला. ठिबकच्या सहाय्याने काळजीपूर्वक शेताला पाणीपुरवठा केला. या त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून त्यांना लाखो रुपयांचे उत्पादक या तैवान पेरू लागवड मधून घेणे शक्य झाले आहे.

दीड एकरात तैवान पेरू लागवड करून कमावले तब्बल 24 लाख रुपये

विजय जगदाळे यांनी केलेल्या या यशस्वी तैवान पेरू लागवड संबंधी परिसरातील शेतकरी आणि इतर लोक त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. मात्र यासाठी त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय अन् त्यांचे कष्ट हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. केवळ दीड एकर शेतात 1550 तैवान पेरूची रोपं लावून एकच वर्षात तब्बल २४ लाख रुपये इतकं उत्पादन घेऊन त्यांनी कमाल केली आहे.

त्यांच्या या तैवान पेरू लागवड मधून फक्त दीड एकर शेतात त्यांनी चक्क ३६ टन उत्पादन घेतले. विजय जगदाळे यांना या तैवान पेरू लागवड साठी लागवडीपासून तर विक्री पर्यंत लागणारा खर्च लक्षात घेता एकूण सुमारे साडे पाच लक्ष रुपये एकंदर खर्च आला. या प्रगत शेतकऱ्याला दीड एकर शेतजमिनीतून तब्बल 36 टन तैवान पेरूचे भरघोस उत्पादन मिळाले. त्यांना तब्बल 24 लाख 20 हजार रुपयांचा नफा झाला.

तैवान पिंक पेरूच्या जाती

१ ) तैवान मध्ये पिंक व सफेद
२ ) ललित
३ ) रेड डायमंड
४ ) लखनौ 49
५ ) अर्का किरण
६ ) G विलास
७ ) अलाहाबाद सफेदा.
८ ) V N R

लागवड हंगाम, योग्य शेतजमीन, पाणीपुरवठा

तैवान पिंक पेरू लागवड कुठ्ल्याही हंगामात 12 महिने करता येते. या पेरू लागवड साठी शेतजमिन काळी, लाल, मुरमाड, माळराण यापैकी कुठलीही असली तरी उत्पादन घेता येते. मात्र शेतजमीन ही पाण्याचा निचरा होणारी असणे गरजेचे असते. कमी पाण्यात सुद्धा तैवान पिंक पेरू लागवड करता येते.

तैवान पेरू लागवड संबंधी रोपांतील अंतर

तैवान पेरू लागवड करताना इजरायल तंत्रज्ञानाचा वापर करून 6×10 ,6×12, 8×12, 8.5×5, किंवा 6X9 घनदाट पद्धतीने केल्यास प्रती एकर 1 हजार रोपांची लागवड शक्य होते.

तैवान पेरू लागवड करताना

शेतात तैवान पेरू लागवड करताना १X१ चे खड्डे करून घ्यावेत तसेच या खड्यात कुजलेले शेणखत टाकावे. त्यानंतर तैवान पेरू रोपांची एका सरळ रेषेत लागवड करावी आणि पाणीपुरवठा करण्यासाठी ड्रीप पद्धतीचा वापर केला तर त्यामुळे पाण्याची बचत होऊन रोपांच्या पाण्याच्या आवश्यकता अनुसार पाण्याची योग मात्रा देता येते.

तैवान पेरू फळाची वैशिष्टये

तैवान पेरू फळाची टिकवन क्षमता 8 ते 10 दिवस असते. हे फळ अत्यंत स्वादिष्ट आणि गोड असते. तैवान पेरूमध्ये बीयांचे प्रमाण इतर पेरुंच्या जातीच्या तुलनेत अत्यंत कमी असते. या फळांत गराचे प्रमाण अधिक असते. तैवान पेरू फळाचे वजन सुमारे 300 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत असते. तैवान पेरूला रंग चव तसेच आकारमानानुसार बाजारात प्रचंड मागणी असल्याचे पाहायला मिळते.तैवान पेरू लागवड मध्ये जास्त जोखीम नसते कारण या लागवडीत रोगांचे प्रमाण नगण्य असते. मात्र फळ माशीसाठी योग्य वेळी फवारण्या करणे आवश्यक असते.

तैवान पेरू लागवड साठी प्रति एकर खर्च व उत्पादन

तैवान पेरूच्या एका रोपाची किंमत अंदाजे 50 ते 70 रुपये इतकी असते. एका एकरात अंदाजे एक हजार रोपे लावताना येतात परिणामी रोपांचा खर्च लक्षात घेता एकरी 70 हजार रुपये लागतात. तसेच तैवान पेरू लागवड साठी 10 हजार रुपये किंमतीचे
ड्रीप लागते. याशिवाय तैवान पेरू फळबागेसाठी सुमारे 10 हजार रुपये मजुरी खर्च जातो. याशिवाय 10 हजार रुपये इतर किरकोळ खर्च पकडुन अंदाजे प्रति एकर शेतीचा खर्च 1 लाख रुपये इतका येतो.

तैवान पेरू प्रती एकर उत्पादन माहिती

तैवान पेरूच्या एका झाडास 20 ते 30 किलो पेरू लागतात. बाजारात त्यांचा प्रति किला भाव 30 ते 60 रुपये इतका मिळतो. घाऊक दरात विक्री केल्यास 20 रुपये प्रति किलो किंमत याप्रमाणे
600 रू एका झाडाचे उत्पन्न मिळते. यानुसार एका एकरात एक हजार झाडे याप्रमाणे एकूण 6 लाख रुपये उत्पादन मिळते.

लागवडीपूर्वी मार्गदर्शन महत्वाचे असते

तैवान पेरू लागवड करून पाणी, पैसा, मेहनत आणि वेळ यांचे कमीत कमी भांडवल वापरून प्रचंड उत्पादन मिळवू शकतो. मात्र तैवान पेरू लागवड करत असतांना योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक असते. त्यामुळे आपल्याकडून चुका होण्याचे प्रमाण कमी होते अन् उत्पादनात घट होत नाही. तैवान पेरू लागवड झाल्यांनंतर उत्पादन घेत असतांना बाजाराचा आणि सरासरी दराचा विचार करून त्यानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन करावे. उदा. बाजारपेठ जवळ आहे किंवा दूर आहे, आपल्या मालासाठी योग्य बाजारभाव कुठे मिळेल इत्यादी बाबींचा आधीच विचार करून त्यानुसार पूर्वनियोजन केल्यास फायदेशीर ठरते. उत्पादन प्रक्रिया सुरू असताना उत्पादन टप्प्याटप्प्याने घेणार की एकाचवेळी, की संपूर्ण वर्षभर या सर्व घटकांना गृहीत धरून योग्य नियोजन असणे म्हणजेच भरघोस उत्पादन घेण्याची एकप्रकारची निश्चिंतता असते.

64 वर्षाची महिला केशर शेती करून झाली लक्षाधीश, वाचा प्रेरणादायी यशोगाथा

भरपुर फुलकळी साठी ड्रिचिंग व फवारणीबद्दल माहिती

प्रश्न : ड्रिप कोणते वापरावे?

आशिर्वाद अर्थप्लस १०लिटर प्रती एकर

आशिर्वाद अर्थप्लस ड्रिचींग केल्याने पांढरी मुळी, अपटेक व झाडांची 7 दिवसात झिज भरून निघते तसेच स्टोरेज वाढवते, याशिवाय काडीतील CN Ratio नियंत्रित होतो तसेच काडीतील कार्बोहाइड्रेटस वाढुन 21 दिवसात झाडांना मुबलक फुले येऊ लागतात. भरपुर शेटिंग होते आणि स्ट्रोक जाड व लांब निघतात त्यामुळे फळांचा आकार वाढतो.

प्रश्न : फवारणीचे कोणती करावी?

उत्तर : आशिर्वाद दशावतार १०मिलिलिटर

आशिर्वाद दशावतारची फवारणी केल्यामुळे रसशोषक किटक, बुरशीजन्य तसेच विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध करता येतो. परिणामी फुलगळ होत नाही. आशिर्वाद दशावतार काडित उष्णता निर्माण करते त्यामुळे भरपुर फुले लागतात. आशिर्वाद दशावतारची बहार काळात 4-5 वेळेस फवारणी केल्यास लाभ होतो. (टीप: वर दिलेले प्रॉडक्ट चे नाव हे केवळ माहितीसाठी देण्यात आले असून तुम्ही वापर करताना योग्य प्रॉडक्ट निवडावे. तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच कुठ्ल्याही प्रोडक्ट्सचा वापर करणे योग्य असते. ही माहिती ही केवळ ज्ञानाच्या दृष्टीकोनातून देण्यात आली असून प्रत्यक्ष लागवड करताना या अनुभवी तज्ञाकडून माहिती घेऊनच त्यावर अंमल करावे.)

पेरू बागेची घ्यावयाची योग्य काळजी

तैवान पिंक पेरू लागवड केल्यानंतर बागेची काळजी घेताना एक महिन्याच्या आत गॅप भरणे आवश्यक असते.सर्व रोपांची उंची समान राहण्यासाठी या रोपांना आधार देणे आणि छाटणी वळण गरजेचे असते. समान आणि संतुलित वाढ होण्यासाठी आणि आकारासाठी लहान रोपांची छाटणी आवश्यक असते. निवडलेल्या बहाराच्या फुलांच्या अगोदर योग्य छाटणी करण्याची सुद्धा तज्ञांकडून शिफारस केल्या जाते. छाटणी केल्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होते आणि फवारणी, कापणी यासारख्या विविध प्रक्रिया सुलभरित्या पार पाडतात.

पेरू झाडाला कोणते कोणते बहर येतात?

पेरू पिकाचे मृगबहार, हस्तबहार, आणि अंबाबहार असे एकूण तीन बहार असतात. यामध्ये बहार फुलण्याआधी पाणी देण्याची प्रक्रिया थांबवायची असते. एकूण तीन बहार पैकी आपण दोन बहार एका वर्षामध्ये घेतल्या जाऊ शकतात.

तैवान पेरू लागवड प्रक्रियेत बहार निवडताना बहारोपचारात सहाय्यक उपचार म्हणून रूट छाटणी म्हणजेच मुळांची छाटणी करणे आवश्यक असते. याशिवाय अंकुराची छाटणी सुद्धा करावी. पेरू पिकाच्या फळ धरणीच्या हंगामात पेरूच्या झाडांना नियमितपणे योग्य तेवढेच पाणी द्यावे. फुलोरा येण्यापासून ते फळ काढणीपर्यंत आवश्यक तेवढेच पाणी पिकाला देण्यात यावं.

तैवान पेरू पिकाला पाण्याचे प्रमाण अधिक झाल्यास फळाच्या गुणवत्तेवर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. पाण्याच्या अती वापराचा दुष्परिणाम असा दिसतो की फुटवे अधिक प्रमाणात फुटायला लागतात. परिणामी फळांची वाढ खुंटण्याची शक्यता असते. तसेच तैवान पेरू पिकासाठी केलेला पाण्याचा अतीवापर बुरशीच्या रोगांना सुद्धा आयत आमंत्रण देण्यासारखी गोष्ट आहे. पेरू लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन वापरणे खूपच जरुरी आहे. फर्टीलायझेशनचा वापर सुद्धा केल्या जाऊ शकतो. वॉटर सोलिबल फर्टीलायझर्सच्या माध्यमातून ड्रीपच्या माध्यमातून या पेरूच्या फळ पिकांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा करू शकतो. असे केल्याने खतांवर होणारा अधिकचा खर्च वाचतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment