सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली, असे करा कागदपत्रे अपलोड

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा चलित कृषी पंप घटकाच्या लाभासाठी अर्ज सादर केलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली आहे. या घटकासाठी लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढण्यात आला असून यामध्ये पात्र ठरलेल्या सर्व शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टल कडून मेसेज प्राप्त झाले आहेत.सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली असून यापुढचा टप्पा काय असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

सौर ऊर्जा चलित कृषी पंप प्रकार

राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. त्यापैकी सौर ऊर्जा चलित कृषी पंप या घटकांतर्गत 3 hp, 5 hp, 7.5 hp आणि 10 hp या प्रकारचे सौर ऊर्जा चलित कृषी पंप अनुदान स्वरूपात वाटप करण्यात येत असतात. राज्यातील असंख्य शेतकरी या पोर्टल वर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करत असतात. या योजनांमध्ये विहीर बांधकाम तसेच दुरुस्ती, ठिबक तसेच तुषार सिंचन, ट्रॅक्टर, बियाणे, यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. एकच ठिकाणी सर्व प्रकारचे अर्ज करण्याची सवलत या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली

असे करा पोर्टलवर कागदपत्रे अपलोड

तुम्हाला जर महाडीबीटी पोर्टल कडून तुमचे नाव सोडत मध्ये निघाले असा मेसेज आला असेल तर तुम्हाला 7 दिवसांच्या आत सदर वेबसाईट वर जाऊन तुमचे संबंधित कागदपत्रे अपलोड करावे लागतील. अन्यथा तुम्हाला सौर ऊर्जा चलित कृषी पंप योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. तशा प्रकारची सूचना सुद्धा मेसेज मध्ये देण्यात आलेली आहे. कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती लागणार आहोत. त्याआधी लाभ मिळण्याची प्रक्रिया काय असते याबद्दल जाणून घेऊया.

अशी असते लाभ मिळण्याची प्रक्रिया

या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा चलित कृषी पंप अनुदान योजना या घटकासाठी अर्ज सादर केलेले असतील आणि सोडत मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आले असेल अशा शेतकऱ्यांना मेसेज प्राप्त झाला की पहिला टप्पा म्हणजेच महाडिबीटी पोर्टल वर जाऊन कागदपत्रे अपलोड करावी लागत असतात. या कागदपत्रांत तुमच्या शेतीचा सात बारा आणि आठ अ उतारा तसेच तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक ही कागदपत्रे असतात.

त्यानंतर सुमारे एक आठवड्यात पूर्वसंमती मिळते. ती सुद्धा सदर वेबसाईट बर जाऊन चेक करावी लागते. एकदा का तुम्हाला पुर्वसंमती मिळाली की पुन्हा तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतात. त्या कागदपत्रांत तुम्ही सौर ऊर्जा चलित कृषी पंप विकत घेतले असल्याची पावती अपलोड करावी लागते. याशिवाय खरेदीची एकूण रक्कम आणि विक्रेत्याचा जीएसटी क्रमांक सदर करावा लागतो. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे सौर ऊर्जा चलित कृषी पंप अनुदान मंजूर होते.

सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली, कागदपत्रे अपलोड प्रक्रिया

टप्पा पहिला : कागदपत्रे अपलोड

तुम्ही सदर वे वेबसाईट वर तुमच्या आधार कार्डच्या साहाय्याने लॉग इन केल्यावर तुम्हाला मी सदर केलेले अर्ज या विकल्पावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केले की तुम्ही जितक्या घटकांसाठी अर्ज सादर केले असतील त्या सर्व घटकांचा तपशील तुमच्यासमोर येईल. त्यानंतर तुम्ही सौर ऊर्जा चलित कृषी पंप हा घटक त्यातून शोधून त्यापुढे अपलोड डॉक्युमेंट असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. यात फक्त ज्या घटकांसाठी लॉटरी पद्धतीने निवड झाली असेल त्याच घटकांपुढे अशा प्रकारचा पर्याय येईल.

इतर घटकांसमोर eligible for lottery असे लिहिलेले असेल. तुम्ही सौर ऊर्जा चलित कृषी पंप या योजनेपुढे असलेल्या अपलोड डॉक्युमेंट या विकल्पवार क्लिक केलं की तुमच्यापुढे नवीन विंडो ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमच्या शेतीचा सात बारा, आठ अ तसेच तुमचे आधार कार्ड आणि आधार सोबत लिंक केलेले बँक पासबुक हे सर्व कागदपत्रे अपलोड करू शकाल. ही सर्व कागदपत्रे पिडीएफ स्वरूपात असायला हवी.तसेच त्यांचा आकार 135 kb ते 5 mb दरम्यान असावा.

रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना अंतर्गत मोफत बियाणे, असा करा ऑनलाईन अर्ज

टप्पा दुसरा : पूर्व संमती

एकदा तुम्ही हे सर्व कागदपत्रे यशस्वीरीत्या अपलोड केले की तुम्हाला पूर्वसंमती मिळण्याची वाट पाहावी लागेल. साधारणतः एक आठवड्यात तुमचे कागदपत्रे संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडून छाननी केल्या जाऊन तुम्ही सादर केलेली कागदपत्रे योग्य असल्यास तुम्हाला पूर्व संमती देण्यात येईल. तुम्हाला पूर्वसंमती मिळाली की नाही हे तुम्हाला सदर पोर्टल वर चेक करावे लागेल. त्यासाठी वेबसाईटच्या डावीकडे शेवटून दुसरा पर्याय लिहिलेला आहे पूर्व संमती. त्यावर क्लिक करून पहावे लागेल.

एकदा का तुम्हाला पूर्व संमती मिळाली की त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही ते पूर्वसंमती पात्र डाऊनलोड सुद्धा करू शकाल. एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचे सौर ऊर्जा चलित कृषी पंप घटकासाठी सोडत मध्ये नाव आले म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झाला असे अजिबात नाही. परिणामी तुम्हाला पूर्व संमती मिळेपर्यंत सौर ऊर्जा चलित कृषी पंप परस्पर खरेदी करायचे नाहीत. असे केल्यास काही कारणास्तव तुमचे नाव योजनेतून बाद केले गेल्यास तुम्हाला अनुदान मिळू शकणार नाही.

तिसरा टप्पा : बिल/ देयक अपलोड

तुम्हाला सरकारकडून पूर्व संमती मिळाली की पुढचा टप्पा म्हणजे तुम्ही सौर ऊर्जा चलित कृषी पंप खरेदी करून त्याच्या खरेदी बिलाची प्रत सदर वेबसाईट वर डाव्या बाजूला असलेल्या कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर जाऊन अपलोड करू शकता. या पर्यायावर 3 केल्यानंतर 2 पर्याय तुम्हाला दिसतील. त्यातील पहिला पर्याय म्हणजे वैयक्तिक कागदपत्रे अपलोड. मात्र तुम्ही जर आधीच वैयक्तिक कागदपत्रे अपलोड केली असतील तर पुन्हा अपलोड करायची गरज नाही.

त्यावर असलेला दुसरा पर्याय म्हणजे बिल/ देयक अपलोड. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचे सौर ऊर्जा चलित कृषी पंप खरेदी केल्याचे बिल अपलोड करावे लागेल. तसेच बीलावर असलेली एकूण किंमत तिथे दिलेल्या रकान्यात टाकावी लागेल. आणि दुसऱ्या रकान्यात सौर ऊर्जा चलित कृषी पंप विक्रेत्याचा जीएसटी क्रमांक टाकावा लागेल. महाडीबीटी पोर्टल वर गे वर दिलेले तिन टप्पे पार पाडले की झाल. तुमचे अनुदान एका महिन्याच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

या सर्व बाबी लक्षात घ्या

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सौर ऊर्जा चलित कृषी पंप अनुदान योजना या घटकाचा लाभ मिळणार आहे. मात्र काही गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्हाला अनुदान घेण्यात काहीही अडचण येणार नाही. तुम्हाला जर महावितरण कंपनी कडून सौर ऊर्जा चलित कृषी पंप अनुदान मिळाले असेल तर तुम्ही या योजनेतून अर्ज करू शकतात. मात्र तुम्हाला यात प्राधान्य क्रमात अंतिम स्थानी ठेवण्यात येऊ शकते.

बऱ्याचवेळा पुन्हा या घटकाचा लाभ देण्यात येत नाही. ही योजना फक्त अनुसूचित जाती, जमातीसाठीच असल्यामुळे तुम्हाला अधिकाऱ्यांनी मागितले आता जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागू शकते. याशिवाय तुम्ही खरेदी केलेले सौर ऊर्जा चलित कृषी पंप पाहण्यासाठी संबंधित अधिकारी पाहणी करू शकतात. या पहणीला तुमचा आक्षेप असू शकत नाही. या योजने अंतर्गत 95 टक्के अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येते. तसेच 5 टक्के रक्कम ही लाभार्थ्याला भरावी लागते.

तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे शासनाची पूर्व संमती मिळाल्यानंतरच तुम्हाला सौर ऊर्जा चलित कृषी पंप विकत घ्यायचा आहे. तसेच अधिकृत आणि जीएसटी क्रमांक असलेल्या विक्रेत्याकडूनच सौर ऊर्जा चलित कृषी पंप विकत घ्यायचा आहे. तुम्ही जर परस्पर खरेदी केली अथवा खोटे बोल देऊन या घटकाचा लाभ घेतला असे निदर्शनास आल्यास तुमच्याकडून अनुदानाची संपूर्ण रक्कम वसूल केल्या जाऊ शकते तसेच तुमच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही सुद्धा केल्या जाऊ शकते ही बाब लक्षात घ्या.

सरकार गरजू शेतकऱ्यांच्या हितासाठी अशाप्रकारच्या योजना राबवत असते. मात्र बऱ्याचवेळा अनेक जण या योजनांचा गैरफायदा घेत असल्याचे आढळून येते. परिणामी सरकारकडून कडक अंमलबजावणी होत असते. तसेच योजनेची प्रक्रिया अधिक किचकट केल्या जाते. जेणेकरुन गरजू शेतकरी बांधवांना या योजनांचा लाभ मिळून बोगस लाभार्थ्यांना वगळता येणे शक्य होईल जा त्यामागील सरकारचा हेतू असतो.

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सौर ऊर्जा चलित कृषी पंप अनुदान मिळावे यासाठी शुभेच्छा. मात्र वरील संपूर्ण लेख व्यवस्थित वाचून त्यानुसार तुम्ही सर्व प्रक्रिया अचूकपणे पूर्ण करून घ्या. म्हणजे सौर ऊर्जा चलित कृषी पंप अनुदान मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment