एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) अर्ज प्रक्रिया सुरू, 20 ऑक्टोबर शेवटची तारीख

हुशार पण गरीब विद्यार्थ्यांसाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याची अधिसूचना जारी केली आहे. एसबीआयच्या CSR शाखेने एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) योजनेची अधिकृत अधिसूचना जारी करून अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) योजना?

ही योजना ही SBI फाउंडेशनच्या शैक्षणिक शाखेअंतर्गत चालवण्यात येते. आशा शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश हा भारतातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करणे हा आहे. या एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) मुळे देशातील हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहू शकते आणि असे विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय सहजपणे उच्च शिक्षण प्राप्त करू शकतात. एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) चा लाभ माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी घेऊ शकतात. IIT आणि IIM मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी सुद्धा सदर योजने अंतर्गत अर्ज करू शकतात. या स्कॉलरशिप योजनेमार्फत 15 हजार रुपयांपासून ते साडेसात लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती थेट पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो.

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship)  2024 संपूर्ण माहिती

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) अंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे स्वरूप

या योजने अंतर्गत 6 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांसाठी 1500 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. तसेच पदवी अभ्यासक्रम मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये आर्थिक पाठबळ या योजनेमार्फत देण्यात येते. याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रम मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 70 हजार तर IIT मध्ये MBA सारख्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या अन् शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना 2 लाखाची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. इतकेच काय तर आयआयएम मध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना तब्बल साडेसात लाख रुपयांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत होती. मात्र आता अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. SBI आशा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप बघता देशातील अनेक गरीब हुशार विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करून या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला तर त्यांच्या शिक्षणात आर्थिक विवंचनेमुळे खंड पडणार नाही. तसेच या शिष्यवृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांच्या पालकांना त्यांच्या शिक्षणासाठी काळजी करण्याची गरज भासणार नाही. परिणामी या योजनेतील प्रत्येक घटकासाठी असलेली पात्रता अन् आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी सोईस्कर होईल.

6 वी ते 12 वी साठी पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची वेबसाईट

पात्रता

  • फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले.
  • अर्जदार चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 ते 12 मध्ये शिकत असले पाहिजेत.
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात 75% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.
  • अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3,00,000 रू. पर्यंत असणे आवश्यक आहे.
    टीप:
  • ५०% स्लॉट महिला अर्जदारांसाठी राखीव असतील.
  • अनुसूचित जाती (SC) च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि
    अनुसूचित जमाती (ST) प्रवर्ग.
  • पुरस्कार
  • ⚫ इयत्ता 6 ते 12 मधील पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रत्येकी 15,000 रुपये देण्यात येते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • मागील शैक्षणिक वर्षातील मार्कशीट (वर्ग 12/पदवी/पदव्युत्तर लागू)
  • सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड)
  • चालू वर्षाची फी पावती
  • चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
    ⚫ अर्जदाराचे किंवा पालकाचे बँक खाते तपशील
  • उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र/पगार स्लिप्स,
    इ.)
  • अर्जदाराचे छायाचित्र.
  • जातीचे प्रमाणपत्र (जेथे लागू असेल तेथे)

अर्ज प्रक्रिया

  • खालील अधिकृत संकेतस्थळ वर जा.
    ⚫ तुमच्या नोंदणीकृत आयडीसह खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर वर लॉग इन करा आणि ‘अर्ज फॉर्म पेज’ वर जा.
    ⚫ नोंदणीकृत नसल्यास – सदर वेबसाईट वर जाऊन तुमच्या ईमेल/मोबाइल/Gmail खात्यासह नोंदणी करा.
  • तुम्हाला आता एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) कार्यक्रम 2024′ अर्ज फॉर्मवर पुनर्निर्देशित केले जाईल.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) अंतर्गत विविध घटकांतील अभ्यासक्रम शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ खालीलप्रमाणे आहे.

https://www.buddy4study.com/application/SBIFS7/instruction

या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला apply online आणि register असे दोन पर्याय दिसतील. त्यावरील रजिस्टर पर्यायावर क्लिक करून विचारलेली संपूर्ण माहिती भरून यशस्वीरीत्या नोंदणी करायची आहे. त्यानंतर लॉग इन करून apply online या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या विद्यार्थांसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) पात्रता निकष

  • अर्जदार भारतीय नागरिक असावेत.
  • अर्जदारांनी प्रीमियरकडून पदवीपूर्व अभ्यासक्रम (कोणत्याही वर्षी) केलेला असणे आवश्यक आहे
    भारतातील विद्यापीठ/कॉलेज, नवीनतम NIRF नुसार शीर्ष 100 संस्थांमध्ये सूचीबद्ध क्रमवारी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करता येईल.
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात 75% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.
  • अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6,00,000 रूपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
    टीप:
  • प्रीमियर संस्था आणि नामांकित महाविद्यालये शीर्ष 100 मध्ये सूचीबद्ध केलेल्यांचा समावेश करतील
    नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) विद्यापीठांसाठी यादी आणि 100 मधील शीर्ष
    2023 आणि 2024 साठी महाविद्यालयांसाठी NIRF यादी (शिक्षण मंत्रालयाने जारी केलेली). याव्यतिरिक्त, सर्व राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITS) देखील असतील त्या समाविष्ट.
  • प्रति 3,00,000 रूपये पर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल
    वार्षिक
  • ५०% स्लॉट महिला अर्जदारांसाठी राखीव असतील.
  • अनुसूचित जाती (SC) च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि
    अनुसूचित जमाती (ST) प्रवर्ग.

पुरस्कार

  • अंडरग्रेजुएट विद्यार्थी: 50 हजार रुपये प्रती विद्यार्थी

शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) आवश्यक कागदपत्रे

  • मागील शैक्षणिक वर्षातील मार्कशीट (वर्ग 12/पदवी/पदव्युत्तर,
    लागू)
  • सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड)
  • चालू वर्षाची फी पावती
  • चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड
    प्रमाणपत्र)
  • अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
  • उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र/पगार स्लिप्स,
    इ.)
  • अर्जदाराचे छायाचित्र.
  • जातीचे प्रमाणपत्र (जेथे लागू असेल तेथे)

पदव्युत्तर अभ्यासक्रम मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असावेत.
  • अर्जदारांनी प्रीमियरकडून पदव्युत्तर अभ्यासक्रम (कोणत्याही वर्षी) केलेला असणे आवश्यक आहे
    भारतातील विद्यापीठ/कॉलेज, नवीनतम NIRF नुसार शीर्ष 100 संस्थांमध्ये सूचीबद्ध क्रमवारी असलेल्या विद्यापीठात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्ती साठी अर्ज सादर करता येईल.
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात 75% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.
  • अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6,00,000 रूपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
    टीप:
  • प्रीमियर संस्था आणि नामांकित महाविद्यालये शीर्ष 100 मध्ये सूचीबद्ध केलेल्यांचा समावेश करतील
    नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) विद्यापीठांसाठी यादी आणि 100 मधील शीर्ष
    2023 आणि 2024 साठी महाविद्यालयांसाठी NIRF यादी (शिक्षण मंत्रालयाने जारी केलेली यादी). याव्यतिरिक्त, सर्व राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITS) देखील समाविष्ट असतील.
  • प्रति INR 3,00,000 पर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल
    वार्षिक
  • ५०% स्लॉट महिला अर्जदारांसाठी राखीव असतील.
  • अनुसूचित जाती (SC) च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्ग.

पुरस्कार

  • पदव्युत्तर विद्यार्थी: 70,000 रुपये शिष्यवृत्ती

आवश्यक कागदपत्रे

  • मागील शैक्षणिक वर्षातील मार्कशीट (वर्ग 12/पदवी/पदव्युत्तर लागू)
  • सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड)
  • चालू वर्षाची फी पावती
  • चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड
    प्रमाणपत्र)
    ⚫ अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
  • उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र/पगार स्लिप्स,
    इ.)
  • अर्जदाराचे छायाचित्र.
  • जातीचे प्रमाणपत्र (जेथे लागू असेल तेथे)

आयआयटी (IIT) मंध्ये शिकत असलेल्या ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) पात्रता

  • अर्जदार भारतीय नागरिक असावेत.
  • अर्जदारांनी भारतीयाकडून पदवीपूर्व अभ्यासक्रम (कोणत्याही वर्षी) केलेला असणे आवश्यक आहे
    भारतातील तंत्रज्ञान संस्था (IIT) मधून
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात 75% किंवा त्याहून जास्त गुण मिळवलेले असावेत.
  • अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6,00,000 रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
    टीप:
  • प्रति 3,00,000 रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल
    वार्षिक
  • ५०% स्लॉट महिला अर्जदारांसाठी राखीव असतील.
  • अनुसूचित जाती (SC) च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि
    अनुसूचित जमाती (ST) प्रवर्ग.

पुरस्कार:
⚫ IIT मधील पदवीधर विद्यार्थी: 2,00,000 रुपये शिष्यवृत्ती

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) आवश्यक कागदपत्रे

  • मागील शैक्षणिक वर्षातील मार्कशीट (वर्ग 12/पदवी/पदव्युत्तर,
    लागू)
  • सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड)
  • चालू वर्षाची फी पावती
  • चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड
    प्रमाणपत्र)
  • अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
  • उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र/पगार स्लिप्स,
    इ.)
    ⚫ अर्जदाराचा फोटो.
  • जातीचे प्रमाणपत्र (जेथे लागू असेल तेथे)

आयआयएम (आयआयएम) मंध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) पात्रता निकष

  • अर्जदार भारतीय नागरिक असावेत.
  • अर्जदारांनी भारतीय संस्थेतून एमबीए/पीजीडीएम अभ्यासक्रम (कोणत्याही वर्षी) केले पाहिजेत.
    भारतातील व्यवस्थापन (IIM) मधून
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शैक्षणिक वर्षात 75% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत.
  • अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6,00,000 रूपये पर्यंत असणे आवश्यक आहे.
    टीप:
  • प्रति INR 3,00,000 पर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल
    वार्षिक
  • ५०% स्लॉट महिला अर्जदारांसाठी राखीव असतील.
  • अनुसूचित जाती (SC) च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि
    अनुसूचित जमाती (ST) प्रवर्ग

पुरस्कार:

  • IIM चे एमबीए विद्यार्थी: 7,50,000 रुपये पर्यंत शिष्यवृत्ती

एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) आवश्यक कागदपत्रे

  • मागील शैक्षणिक वर्षातील मार्कशीट (वर्ग 12/पदवी/पदव्युत्तर,
    लागू)
  • सरकारने जारी केलेला ओळख पुरावा (आधार कार्ड)
  • चालू वर्षाची फी पावती
  • चालू वर्षाच्या प्रवेशाचा पुरावा (प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड
    प्रमाणपत्र)
  • अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
  • उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाचे उत्पन्न प्रमाणपत्र/पगार स्लिप्स,
    इ.)
    •अर्जदाराचे छायाचित्र.
  • जातीचे प्रमाणपत्र (जेथे लागू असेल तेथे)

वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न

प्रश्न: एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) ची निवड प्रक्रिया कशी असते?

उत्तर: विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती या निकषांवर आधारित अशी या शिष्यवृत्ती योजनेची निवड प्रक्रिया टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेऊन पूर्ण केल्या जाते. यामध्ये अर्जदारांना अर्ज मंजूर झाल्यानंतर एक कॉल येतो त्या कॉल मध्ये तुमच्याशी संवाद साधला जातो तसेच तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केल्या जाते. त्यानंतर पात्र ठरल्यास तुमच्या अकाउंट मध्ये सदर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येते.

स्वाधार योजने अंतर्गत बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत आहे 51 लाखाची वार्षिक शिष्यवृत्ती

प्रश्न: सदर शिष्यवृत्तीचा लाभ कशाप्रकारे देण्यात येतो?

उत्तर: जर एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) साठी तुमची निवड झाली तर शिष्यवृत्तीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नसते. ही खूप सुलभ प्रक्रिया आहे.

प्रश्न: ही शिष्यवृत्ती एकदा निवड झाल्यानंतर सदर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी मिळते का?

उत्तर: नाही, एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) ही केवळ एक वेळच मिळते. तुम्ही एकदा या योजनेतून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असेल तर पुन्हा त्याच अभ्यासक्रमासाठी तुम्ही पात्र ठरत नाही.

प्रश्न: ही शिष्यवृत्ती आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे?

उत्तर: एसबीआय आशा शिष्यवृत्ती (SBI Aasha Scholarship) ही स्टेट बँक फाउंडेशन तर्फे 2022 पासून सुरू करण्यात आली आहे. 2022-23 मध्ये 125 विद्यार्थांना या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली असून 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मध्ये 3073 विदयार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप केल्या गेले आहे.

ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती, जाणून घ्या पात्रता निकष

SBI फाउंडेशन बद्दल माहिती

SBI फाउंडेशन ही स्टेट बँक ऑफ इंडियाची CSR शाखा आहे. बँकिंगच्या पलीकडे आपल्या सेवेची परंपरा कायम ठेवत, फाउंडेशन भारतातील 28 पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध क्षेत्रात सदैव कार्यरत असते. ग्रामीण विकास, आरोग्यसेवा, शिक्षण, उपजीविका आणि उद्योजकता, युवा सक्षमीकरण, क्रीडा प्रोत्साहन अशाप्रकारचे अनेक कल्याणकारी उपक्रम या फाउंडेशन मार्फत राबविण्यात येत असतात.एस बी आय फाउंडेशन सामाजिक-आर्थिक विकास आणि समाजातील वंचित घटकांच्या आर्थिक सुधारणेसाठी योगदान देण्यास सदैव समर्पित असते. विकास समानता आणि सकारात्मक सामाजिक प्रभाव इत्यादी घटकांना चालना देणारे नैतिक उपक्रम राबवून चालवून हे फाऊंडेशन SBI समूहाचे नैतिकता प्रतिबिंब सादर करते. एस बी आय फाऊंडेशन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खालील वेबसाईटला भेट देऊ शकता.

https://sbifoundation.in

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment