64 वर्ष वयाची महिला केशर शेती करून झाली लक्षाधीश

आज महिला पुरुषांपेक्षा कुठ्ल्याही क्षेत्रात कमी नाहीत. शिक्षण असो की इतर कुठलेही क्षेत्र, महिला मात्र पुरुषांवर वरचढ झालेल्या दिसतात. अशीच किमया करून दाखवली आहे. एका 64 वर्षीय महिलेने. या महिलेने केशर शेती करून केवळ लाखो रुपयेच कमावले नाहीत तर 20 पेक्षा जास्त महिलांना रोजगार सुद्धा निर्माण करून दिला. चला तर जाणून घेऊया कोण आहेत या महिला. आणि त्यांनी कशाप्रकारे केशर शेती करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली याबद्दल सविस्तर माहिती.

मूळच्या उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असलेल्या शुभा भटनागर त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध संसारात व्यतीत केला. मुलांचे संगोपन पासून सर्व जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पाडल्या. मात्र मुले मोठी होऊन त्यांची लग्न झाल्यानंतर मात्र शुभा भटनागर यांच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या. त्यांना शेतीची लहानपणापासूनच अतिशय आवड होती.

केशर शेती यशस्वी शेतकरी 2024

आता या उतारवयात आपली ही केशर शेतीची आवड जोपासायची हे त्यांनी मनाशी पक्क केलं. नंतर त्यांनी त्यांच्या मनातील ही गोष्ट त्यांच्या कुटुंबाला सांगितली. कुटुंबातील सदस्यांना ही गोष्ट आधी थोडी विचित्र वाटली. आता या वयात कशाला हवी शेती? अशा प्रथम दृष्ट्या त्यांच्या भावना झाल्या. मात्र शुभा ताई त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत हे बघून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा भेटला.

केशर शेती संबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी काश्मीरला प्रस्थान

शुभा ताई भटनागर या अतिशय जिद्दी आहेत. त्यांनी ठाम निर्णय घेऊन केशर शेती करायचं ठरवलं. जर केशर शेती यशस्वी करायची असेल तर त्यासाठी योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन लागणार हे मात्र नक्की याची त्यांना जाणीव होतीच. त्यानंतर त्यांनी कुटुंबाला विश्वासात घेत थेट काश्मीर गाठले. तिथे केशर शेती कशा पद्धतीने केल्या जाते, केशर शेतीमधील बारकावे काय, या शेतीसाठी आधुनिक पद्धती अन् तंत्रज्ञान या सर्व बाबींचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

त्यांनी लागवडीची प्रक्रिया, केशर शेतीसाठी आवश्यक असलेला मातीचा प्रकार, केशर वाढण्यासाठी लागणारे योग्य तापमान इत्यादी सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला. यासाठी त्यांना एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी काश्मीरमध्ये घालवावा लागला. काश्मीरमध्ये थोड्याच दिवसांत त्यांनी सर्वांना आपलंसं केलं. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून केशर बल्ब सुद्धा खरेदी केले. नंतर त्या गावी परतल्या.

अशी केली केशर शेतीची सुरुवात

केशर शेती विषयक संपूर्ण ज्ञान घेऊन गावी आलेल्या या ताईंनी केशर शेतीतच आपले आणि आपल्या कुटुंबाचे प्रमुख व्यवसाय म्हणून भवितव्य घडववयचे याचा शुभा ताईंना ध्यास लागला. आता गावी आल्यावर त्यांनी अजिबात वेळ न दवडता केशर शेतीचा श्रीगणेशा केला. त्यासाठी त्यांनी 560 चौरस फूट शीतगृह (Cold Storage) तयार करून घेतले अन् नियंत्रित वातावरणात ट्रे वापरून केशर पिकवण्याचा प्रयोग सुरू केला.

आधुनिक केशर शेती साठी मुलगा आणि सून यांचा मोलाचा हातभार

शुभा ताई शिक्षित एक शिक्षित व्यक्तिमत्त्व. त्यांनी त्यांच्या मुलाला अगदी उच्च दर्जाचे अभियंता केलं. कधीही आईचा शब्द खाली पडू न देणारा त्यांचा मुलगा आईच्या या नवीन उपक्रमाच्या खूप कमी आला. शुभा ताईंचा मुलगा आणि सून यांनी त्यांच्या अभियांत्रिकी पार्श्वभूमीसह, एरोपोनिक्स (Aeroponics Technique) वापरून त्यांच्या घरामध्ये केशरची लागवड करण्याच्या पद्धतींवर बारकाईने संशोधन केले. त्यांच्या अभ्यासू बुद्धीने त्यांनी अनेक पद्धतींचा अभ्यास केला होतं मात्र ही एरोपोनिक्स पद्धत त्यांना केशरसाठी योग्य वाटली. ज्यासाठी विशिष्ट तापमान आणि आर्द्रता पातळी आवश्यक असते.

बंद खोलीत तयार केले काश्मीरसारखे वातावरण

शुभाताईंच्या मुलाने अन् सुनेने काश्मीरच्या हवामानाची प्रतिकृती तयार करण्यासाठी ख्यो मेहनत घेतली. त्यांनी दोघांनी सुद्द्धा विविध उपकरणे आणि सेन्सरचा वापर आणि केशर उत्पादनाच्या दहा वर्षांच्या डेटाचे अभ्यासपूर्ण निरीक्षण अन् विश्लेषण केल्यानंतर त्यांच्या शीतगृहात केशर लागवडीसाठी आदर्श परिस्थिती तयार केली. त्यांनी त्या केशर शेती बद्दल आशावाद असल्यामुळे खूप काळजीपूर्वक मशागत केली.

तीन महिन्यांत त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळायला सुरुवात झाली. सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांत त्यांच्या केशर केशरचे जांभळ्या रंगाचे सुंदर फूल उमलले तेव्हा त्यांना अपर आनंद झाला.आता शुभाताईंची अन् त्यांच्या परिवाराची जिद्द अन् मेहनत यांचं सार्थक झाल होत. केशर पीक कापणीसाठी तयार झालं होत. याचवेळी कुटुंबाने त्यांच्या केशर शेती उपक्रमाला एका व्यवसायाच्या स्वरूपात घेतले अन् त्यांच्या या व्यवसायाचे ‘शुभवनी स्मार्टफार्म्स’ असे नामकरण केले.

इंजिनियरने फक्त 60 गुंठे रताळे शेती करून 3 महिन्यात कमावले 6 लाख रुपये

या केशर शेती मधून मिळाले लाखो रुपयांचे उत्पन्न

शुभा भटनागर यांच्या केशर शेती फार्म हाऊस मध्ये लागवडीनंतर तीन महिन्यांनी झालेल्या पहिल्या कापणीमध्ये केशराचे लाखो रुपये भरघोस उत्पादन त्यांना प्राप्त झाले. या कुटुंबाने त्यांच्या केशर शेतीमधून प्राप्त झालेले हे केशर उत्पादन लक्षणीय नफा मिळवून विकले. शुभा ताई भटनागर यांनी जिद्दीने उभारलेल्या या यशस्वी केशर शेतीतून दाखवून दिले की, महिला सुद्धा आजच्या या प्रगत युगात काहीही साध्य करू शकतात. त्यासाठी गरज असते ती दुर्दम्य इच्छाशक्ती बन कुटुंबाच्या पाठिंब्याची.

आधी त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या केशर शेती बद्दलच्या या निर्णयावर नाराजी दाखवली खरी मात्र शुभा ताईंनी हे त्यांना आणि जगाला दाखवून दिले की त्यांचा उपक्रम अगदी व्यवहार्य होता. त्यांनी त्यांची केशर शेतीची ही कल्पना डोक्यातच न ठेवता अथक परिश्रम घेऊन सत्यात उतरण्यासाठी जे प्रयत्न केले हे त्यांच्या या केशर शेती मधील यशाकडे पाहून आपल्याला दिसून येते.

प्रतिकुलता असूनही जिद्दीने तयार केले केशर शेती करीत अनुकूल हवामान

शुभा ताई यांचे खंबीर नेतृत्व आणि ठाम भूमिका यांच्या जोरावर उत्तर प्रदेश सारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात सुद्धा काश्मीरच्या हवामानाची प्रतिकृती तयार करणे हे काही सोप्पे काम नव्हते. मात्र त्यांनी आणि त्यांच्या मुलाने अन् सुनेने सुद्धा यासाठी खूप अभ्यास करून खूप मेहनत घेऊन आधुनिक उपकरणे आणि सेन्सर यांचा योग्य वापर करून तसचं केशर उत्पादनाच्या दहा वर्षांच्या डेटाचे विश्लेषण करण्याचे कष्ट घेतले अन् त्यांच्या घरातील शीतगृहात केशर लागवडीसाठी अनुकूल हवामान आणि पोषक वातावरण निर्माण केले.

या दरम्यान शुभा भटनागर अनेक अडचणींना हिंमतीने सामोऱ्या गेल्या. उदा. मैनपुरीमध्ये काश्मीरच्या थंड, कोरड्या हवामानाची प्रतिकृती बनवणे हा सर्वात मोठा दुष्कर असा प्रसंग होता. मात्र हार मानतील त्या शुभाताई कसल्या? त्यांनी जिद्दीच्या आणि जोखीम पत्करण्याच्या जोरावर तसेच कुटुंबाच्या पाठिंब्याने मार्गात आलेल्या सर्व आव्हानांवर यशस्वीपणे मात केली. मात्र शुभा भटनागर यांची हीच मेहनत आज त्यांना एक लखपती केशर उत्पादक ही ओळख निर्माण करण्यास कारणीभूत ठरली.

स्थानिक महिलांना दिला रोजगार

आपण समाजाचे देणे लागतो ही भावना असल्यामुळे जिवनात समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी करता यावे अशी त्यांची मनोमन इच्छा होतीच. तीच इच्छा पूर्ण करण्याची आता वेळ आली होती. शुभा ताईंनी त्यांच्या या केशर शेती प्रकल्पाच्या कामात अनेक स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. परिसरातील अनेक स्त्रिया आज त्यांच्या त्यांनी काम शुभवनी स्मार्ट फार्म मध्ये कामाला आहेत. या सर्व स्त्रियांना त्यांनी रोजगाराची एक उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिली .

आजचा घडीला शुभवनी स्मार्ट फार्म्स मध्ये सुमारे वीस पेक्षा जास्त स्त्रिया केशर उत्पादनाच्या विविध टप्प्यांत काम करताना दिसतात. त्यांची कामे बल्ब सुकवण्यापासून ते केशर कापणी आणि केशरची पॅकेजिंग करणे इत्यादी प्रकारचा रोजगार आज त्यांनी त्यांच्या एका कंपनीने उभा केला.

ऑनलाईन पद्धतीने करतात मालाची विक्री

शुभा ताईंची केशर शेती दिवसेंदिवस चांगलीच फुलत असल्यामुळे त्यांनी केशर माल विकण्यासाठी विविध पद्धतींचा वापर त्या करत आहेत. ते त्यांचा माल ठोक व्यापारी ते मोठमोठ्या बाजारपेठेत विकत असतात आता त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा ऑनलाइन पद्धतीने त्यांनी पिकवलेला केशर यशस्वीपणे विकायके सुरुवात केली आहे. शुद्धता आणि गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्यांचा उत्कृष्ट दर्जाच्या केशरची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.

उत्पन्न आधिकाधिक वाढविण्याकडे शुभाताईंचा कल

शुभा भटनागर इतक्या मेहनती आहेत की थांबणे त्यांना माहीतच नाही. या वयात इतकी प्रगती केली तर इतर बहुतांश स्त्रिया आरामात बसल्या असत्या. मात्र शुभा भटनागर यांनी त्यांच्या या केशर शेती मधून अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याकडे त्यांचे लक्ष वळवले आहे. केशर लागवडीतील यशामुळे अभिमानाने हरकून न जाता शुभाताई आणि त्यांचे कुटुंब यांनी उत्पादन वाढवण्यासाठी अजून संशोधन करायला सुरुवात केली आहे. याबाबत त्या अनेक योजना आखत आहेत. त्यांच्या शुभवणी स्मार्ट फार्मच्या माध्यमातून अजून अनेक महिलांना रोजगार मिळून जास्तीत जास्त स्त्रियांना सक्षम करण्याचा त्यांचा मानस आहे. यासोबतच इतर शेतकऱ्यांना सुद्धा आधुनिक शेती करण्यासाठी प्रेरित करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment