खुशखबर! राशन वर मिळणारे तांदूळ होणार बंद, त्याऐवजी मिळणार या 9 वस्तू

केंद्र सरकारच्या वतीने देशातील सुमारे 90 कोटी कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत राशन धान्याचे वाटप करण्यात येत असते. त्यामुळे मुख्यत्वे गहू, तांदूळ, साखर आणि तेल हे घटक असतात. आता केंद्र सरकारने तांदूळ वितरण बंद करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला असून गरीब देशातील जनतेचे आरोग्य सुधारावे यासाठी तांदळाऐवजी आता वेगवेगळ्या 9 जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार आहेत.

राशन कार्ड वर मिळणार या 9 जीवनावश्यक वस्तू

तांदूळ वितरण का होणार बंद?

बरेच शिधा धारक कुटुंबे यांचे फक्त तांदळामुळे योग्य पोषण होत नाही. तसच रोज रोज तांदुळाच्या भाताची सवय सुद्धा बऱ्याच कुटुंबांना नसते. परिणामी या तांदळाची हे कुटुंब मिळेल त्या भावात विक्री करण्याचे प्रकार दिसतात. अन्न सुरक्षा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट देशातील गरीब लोकांना पोषणयुक्त अन्नधान्य पुरविणे हे आहे. त्यामुळेच राशन कार्ड वर मिळणारे तांदूळ आता हद्दपार होणार असून त्याऐवजी गरिबांना आता विविध जीवनावश्यक 9 वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

कोणत्या 9 वस्तू आता राशन कार्ड वर मिळणार?

देशातील विविध राज्यांत पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना राशन धान्य मिळत असते. त्यात आता महत्वाचा बदल करण्यात आला असून तांदूळ धान्याऐवजी आता खालील धान्य आणि जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत.

गहू

डाळी

हरभरा

साखर

मीठ

मोहरीचे तेल

पीठ

सोयाबीन

मसाले

कोरोना काळात नरेंद्र मोदींनी सुरू केली होती मोफत धान्य वाटप योजना

या नवीन बदलामुळे नक्कीच सामान्य जनतेला या जीवनावश्यक वस्तूंचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे योग्य पोषण होणार आहे. केंद्र सरकार नेहमीच गोरगरीब जनतेसाठी हितावह निर्णय घेत असते. कोरोना साथ आल्यापासून तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पिवळ्या आणि केशरी शिधा धारकांना मोफत राशन धान्याचे वितरण सुरू केले असून पुढील 5 वर्ष देशातील पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना या मोफत राशन धान्याचा लाभ होणार आहे.

मित्रांनो राशन कार्ड हा एक महत्वाचा आणि खूप कामात येणारा दस्तावेज आहे हे लक्षात घ्या. शासनाच्या विवीध योजनांपासून ते फुकट दवाखान्याचा लाभ आणि फुकट धान्यापासून ते आपल्या विविध कागदपत्रांसाठी राशन कार्ड अत्यंत उपयोगी आहे. तुम्हाला जर राशन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात पाहिजे असेल तर खालील पोस्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. यात तुम्हाला राशन कार्डच्या प्रकारापासून ते राशन दुकानदारांची तक्रार यासंबंधी संपूर्ण माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केल्या गेला आहे. आपण खालील लिंक वर क्लिक करून ही पोस्ट अवश्य वाचा.

राशन कार्ड बद्दल संपूर्ण माहिती

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment