शेतकऱ्यांनो यंदाचा प्रजासत्ताक दिन असा बनवा विशेष, करा हे संकल्प

सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्ताक दिन 2025

शेतकरी मित्रांनो यंदाचा हा प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपल्याला एक शेतकरी म्हणून काही गोष्टींचा संकल्प करून साजरा करायचा आहे. प्रजासत्ताक दिन आपल्या जीवनात खूप महत्व ठेवतो. देश कसा चालवावा यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याविषयी धोरणे ठरवून ती राबविण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली. आणि बघा याच मौल्यवान धोरणांचा अवलंब करून आज आपला देश दिवसेंदिवस यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे.

म्हणूनच यंदाचा प्रजासत्ताक दिन आपण एक शेतकरी म्हणून काही धोरणे ठरवून ती आपल्या शेतात वैयक्तिकरीत्या राबविण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प केला तर आपल्याला शेतीतील नुकसान टाळता येणे शक्य होऊ शकते. शेती यशस्वी होण्यासाठी एका शेतकऱ्याचे शेतीविषयक धोरण कसे असावे याबद्दल आजच्या या लेखातून आपण चर्चा करणार आहेत. हल्लीच्या काळात बहुतांश शेतकऱ्यांना एकतर नैसर्गिक आपत्तींचा किंवा कमी बाजारभावाचा फटका बसून शेतीत नुकसान होऊन आपले जीवन चिंताग्रस्त होते तसेच जिवनात नैराश्य येते.

मात्र शेती व्यवसाय करताना कोणत्या गोष्टींत आपण बदल किंवा सुधारणा करू शकतो, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती फायद्याची होऊन आर्थिक स्वातंत्र्य लाभेल. शेतकरी बांधवांनो यंदाचा प्रजासत्ताक दिन हा आपल्या शेतीत आपण काय नवीन करू शकतो तसेच शेती व्यवसाय लाभदायक ठरण्यासाठी आपण काही महत्वाची धोरणे राबविण्याचा संकल्प केला आणि त्याप्रमाणे कृती केली तर आपल्याला शेतीतून समृद्धीकडे जाण्याचा निश्चितच मार्ग सापडेल यात शंका नाही. यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना अशा कोणत्या गोष्टी आपण शेतीत अवलंब करण्याचा संकल्प करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शेवग्याची शेती आणि शेवगा प्रॉडक्ट्स मधून ही मुलगी कमवते वर्षाला तब्बल पाऊने दोन कोटी रुपये

नावीन्यपूर्ण शेतीचा करू अभ्यास

शेतकरी मित्रांनी आपले वाड-वडील तसेच पूर्वजांनी संपूर्ण आयुष्यभर पारंपरिक पद्धतीने शेती केली आणि त्यातच त्यांची मेहनत करून करून मती झाली मात्र आपली गरिबी काही दूर झालीच नाही. पारंपरिक शेती आजच्या या अस्थिर बदलत्या हवामानाचा काळात यशस्वी होण्याची शक्यता फारच कमी असते. परिमाण आपल्या परिसरातील इतर सर्व शेतकरी करतात म्हणून किंवा आपल्या शेतात आपले आजोबा आणि वडील फक्त काही विशिष्ट पिकेच घेतात म्हणून आपण सुद्धा तीच ती नुकसानकारक ठरणारी पारंपरिक पिके घेत असतो.

शेतकऱ्यांनो यंदाचा प्रजासत्ताक दिन असा बनवा विशेष, करा हे संकल्प , प्रजासत्ताक दिन झेंडावंदन

जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाची लागवड करण्याचा नुसता विचार सुद्धा आपण करत नाही. मात्र आता आपल्याला डोळे उघडे ठेवून आपल्या शेतात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारी कोणती पिके घेऊ शकतो याचा अभ्यास करून त्या पिकांच्या लागवडीविषयी पुरेस ज्ञान प्राप्त करून नावीन्यपूर्ण पिकांची लागवड करण्याचा संकल्प करून यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करूया.

सेंद्रिय शेतीची धरूया कास

रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून आपण आपल्या शेतजमिनीची उपजाऊ क्षमता पार नष्ट करत आलेलो आहोत. याचाच परिणाम आपली काळी आई आपल्याला भरघोस उत्पादन देत नाही. शेतीतील केमिकलचा वाढता वापर शेतीसाठी नाराज ठरत आहे. त्यामुळे भरघोस उत्पादन घेण्याचं शेतकऱ्यांचं स्वप्न स्वप्नच राहत आहे. आता मात्र आपण यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना यावर्षी पासून शेतात कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करण्याचा किंवा शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करायचा संकल्प करूया. सेंद्रिय शेतीचा अवलंब करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे यश आपण प्रसारमाध्यमांतील बातम्यांत पाहत असतो. त्यांनी कशा पद्धतीने शेती केली किंवा करत आहेत याचा अभ्यास करून शेतीत कोणतेही रासायनिक प्रॉडक्ट न वापरून नैसर्गिक खतांचा वापर करून जैविक शेती करू असा संकल्प करून यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करूया.

शेतकऱ्यांनो यंदाचा प्रजासत्ताक दिन असा बनवा विशेष, करा हे संकल्प , प्रजासत्ताक दिन झेंडावंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

शेतीविषयी अधिकाधिक ज्ञान मिळविण्याचा करूया प्रयास

राज्यातील अनेक शेतकरी शेतीत व्यवस्थित लक्ष न पुरवता जसे सुरू आहे अगदी तशीच पारंपरिक पद्धतीने चालत आलेली शेती करून शेतीत नुकसान होण्याची संभाव्यता वाढवतात. कारण राज्यातील विविध कृषी विद्यापीठांनी त्या त्या विशिष्ट पिकांसाठी ठरवून दिलेले नियोजन तसेच शिफारशी आपण पिकांत अवलंब केल्या नसतात. योग्य बीजप्रक्रिया करत नसतो तसेच पिकाचे पाणी व्यवस्थापन चुकीचे असते. तसेच इतर सर्व बाबी आपण लक्षात न घेतल्यामुळे पिकाचे अपेक्षित उत्पादन घेऊ शकत नाही. हे सर्व टाळण्यासाठी आपण विविध कृषी विद्यापीठांनी दिलेल्या सल्ल्याचा तसेच शिफारशींचा वेळोवेळी अभ्यास केला पाहिजे.

तसेच आपण ज्या पिकांची लागवड केलेली आहे त्या पिकांची पूर्वमशागत करतेवेळी सखोल अभ्यास करून इत्यंभूत ज्ञान प्राप्त केले पाहिजे. जे शेतकरी एकदमच अशिक्षित असतील त्यांनी यूट्यूबवर असलेल्या कृषी विभागाच्या चॅनल जाऊन तसेच सह्याद्री चॅनल आणि इतर बरेच विश्वासू अशा कृषी तज्ञांच्या व्हिडिओतून पुरेस ज्ञान घेऊन त्यानुसार पिकाचे नियोजन करायला हवे. यंदाचा प्रजासत्ताक दिन आपण ज्या पिकाची लागवड करायची आहे त्या पिकाचा सखोल अभ्यास आणि त्यात आलेले नावीन्य काय याबाबत सखोल माहिती मिळविण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून सखोल अभ्यास करून ज्ञान प्राप्त करण्याचा संकल्प करूया.

गाजराचे गाव म्हणून प्रसिद्ध या गावातील शेतकरी घेताहेत गाजर लागवडीतून एकरी अडीच लाख रुपये उत्पन्न, करतात झीरो बजेट शेती

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारला धोरणे राबवायला करावे अनिवार्य

आज बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था पाहिजे तेवढी चांगली नाही. आता आठवे वेतन आयोग लागू होणार असून त्यामुळे नोकरदार वर्गाचा पगार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तसे पाहिल्यास सर्वात जास्त कष्ट शेतकरी करत असतो. मात्र सरकार एसी ऑफिस मध्ये बसून अगदी कासवगतीने काम करून पोट मोठं करून घेणाऱ्या नोकरदार वर्गावर फार मेहेरबान असल्याचे दिसून येते. मात्र शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत व्हावी यासाठी ठोस पाऊले उचलताना दिसून येत नाही. ही शेतकऱ्यांची अवस्था बदलणे खरंच खूप आवश्यक आहे. राज्यातील शेतकरी स्थानिक पातळीवर पाहिजे तेवढा संगठित असल्याचे दिसून येत नाही. सर्व शेतकऱ्यांनी एकी करून संघटना करण्याचा संकल्प करून यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करूया. यामुळे शेतकरी सरकारकडून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतात.

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी होऊया परिचित

यंदाचा प्रजासत्ताक दिन तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी सुजलाम सुफलाम जीवन घेऊन येवो, ही कामना करत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आज कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या शेतात प्रचंड उत्पादन मिळवू शकतो. शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या वापराने आपण शेतीला सुजलाम सुफलाम करून आर्थिक उन्नती साधू शकतो. आज ए आय मध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान म्हणजेच रिमोट सेंसिंग, आधुनिक ड्रोन प्रणाली इत्यादींच्या साहाय्याने शेती कमी कष्टाची तसेच प्रचंड उत्पादन देण्यास फायदेशीर ठरत आहे. याशिवाय बदलत्या हवामानामुळे होणारे नुकसान सुद्धा टाळता येते.

मात्र सामान्य शेतकऱ्यांनी या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण हे तंत्रज्ञान खूपच महाग आणि सामान्य शेतकऱ्याला न परवडण्यासारखे आहे. मात्र यावर जालीम उपाय म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचा गट तयार करून सरकारकडून या आधुनिक ए आय तंत्रज्ञान उपलब्धतेसाठी अनुदान देण्यात येते ते अनुदान मिळवले पाहिजे. सामूहिक दृष्ट्या शेतीतील ai technology वापरण्यात आली तर खर्च आपापसात विभागल्या जाणार असल्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करता येणे शक्य होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या गटाला आधुनिक कृषी ड्रोन तसेच इतर साहित्य विकत घेण्यासाठी अनुदान देणाऱ्या विविध योजना राबविणे सुरू केले आहे.

याशिवाय इंटरनेटच्या माध्यमातून शेतीतील ai technology कशासाठी वापरतात तसेच या शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तसेच कार्यप्रणाली काय आहे याची माहिती घेतली पाहिजे. आजचा शेतकरी सुद्धा आधुनिक झाला पाहिजे. चला तर यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करताना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित होण्याचा संकल्प करूया.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!