दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड, येथे मिळवा फुकट बियाणे

आज एक विशेष बातमी घेऊन आलो आहोत. दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड कशी करावी याबद्दल महत्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आहे. आजवर आपण टोमॅटो फक्त लाल आणि हिरव्या रंगाचा असतो अशी समजूत करून बसलो होतो. मात्र बारामती कृषी प्रदर्शन 2025 येथे शेतकऱ्यांना दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड कधी केली आहे आणि या टोमॅटोच्या झाडांना कशाप्रकारे आरोग्यवर्धक काळे टोमॅटो लागले आहेत याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखविण्यात येत आहे.

या काळ्या टोमॅटोची लागवड करणे इतके फायदेशीर आहे की तुम्हाला अगदी कमी खर्चात दहापट उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता या देशी वाणाच्या पिकात आहे. चला तर जाणून घेऊया दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड कशी करावी, बियाणे कुठे मिळेल, या काळ्या टोमॅटोला काय बाजारभाव मिळतो तसेच आरोग्याच्या दृष्टीने हा काळा टोमॅटो किती महत्वपूर्ण आहे या सर्व बाबींची आजच्या दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड या विशेष लेखातून सखोल माहिती.

काळा टोमॅटो कसा पिकविला गेला?

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांनी राखून ठेवलेली विविध 29 प्रकारच्या टोमॅटोच्या जातींची लागवड केलेली असून या कृषी प्रदर्शनात ती शेतकऱ्यांसाठी खुली केली आहे, जेणेकरुन राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शेतकऱ्यांना दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड कशी करतात याबद्दल मार्गदर्शन व्हावे. हा यामागील उद्देश. काळ्या टोमॅटो चे हे वाण इंग्लंड देशातील असून पारतंत्र्याच्या काळात या दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड केल्या जात असे. बऱ्याच शेजाऱ्यांनी त्यावेळी या आरोग्यवर्धक काळ्या टोमॅटोच्या बिया संवर्धित करून ठेवल्यामुळे बारामती कृषी विज्ञान केंद्राला ही दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करणे शक्य झाले.

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड

या विविध आकाराचे आहेत 29 प्रकारचे काळे टोमॅटो

आरोग्याच्या दृष्टीने काळे टोमॅटो हे खूप लाभदायक असतात. या टोमॅटोचा आकार लांब गोलाकार असून त्यांचा रंग काळा किंवा जांभळा असतो. या काळ्या टोमॅटोच्या रोपांची वाढ ही 10 फूट उंच होते. वांग्यासारखा दिसणारा हा काळा टोमॅटो शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे ही बाब राज्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे. या 29 प्रकारच्या काळ्या टोमॅटोचा आकार हा यांच्या जाती प्रमाणे वेगवेगळा असतो. खाचा असणारा टोमॅटो, हाताच्या मुठीसारखा आकार असणारा टोमॅटो, लंब गोलाकार टोमॅटो इत्यादी विविध प्रकारची दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड बारामती कृषी प्रदर्शन 2025 मध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येत आहे.

सेंद्रीय शेती करून या गावातील महिला बचत गटाच्या महिला झाल्या मालामाल, जाणून घ्या त्यांचे अर्धा एकर मॉडेल

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड कशी करावी?

काळ्या टोमॅटोची शेती करून शेतकरी आर्थिक स्थैर्य स्थापन करून शकतात. काळ्या टोमॅटोची शेती करण्यासाठी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत लागवड करणे फायद्याचे ठरते. या दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करण्यासाठी खुले शेत सुद्धा अतिशय उपयुक्त ठरते. पॉलीहाऊस साठी होणारा खर्च हा अल्पभूधारक असलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना परवडण्यासारखा नसतो. यामुळे खुल्या शेतीत घेता येणार हे फायदेशीर पीक असल्यामुळे काळ्या टोमॅटोची लागवड करणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे असे म्हणायला हरकत नाही. या टोमॅटोची लागवड सुद्धा आपण जे लाल टोमॅटो शेतात लावतो त्यांच्यासारखीच असते. त्यामुळे दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करण्यासाठी जास्त काही विशिष्ट मेहनत घेण्याची गरज नसते.

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड

कुठे मिळणार हे काळ्या टोमॅटोचे बियाणे?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करण्याची मनातून इच्छा असेल तर तुम्ही या काळ्या टोमॅटोचे बियाणे बारामती कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून घेऊ शकता. यासाठी तुम्ही थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन किंवा शक्य असल्यास सध्या सुरू बारामती कृषी प्रदर्शनात सहभागी होऊन घेऊन येऊ शकता. हे बियाणे अस्सल देशी वाण असून आरोग्याच्या दृष्टीने विविध रोगांच्या प्रतिकाराची फायदेशीर असल्यामुळे दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करून तुम्ही भरघोस उत्पन्न मिळवू शकता.

काळ्या टोमॅटोची शेती अशी होते

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करण्याआधी काही याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या. हे काळे टोमॅटो आपल्या नेहमीच्या लाल जातींपेक्षा हळूहळू पिकतात. खरं तर, दहापट उत्पन्न मिळवून देणारे काळ्या टोमॅटोचे पीक परिपक्व होण्याआधी लागवडीपासून 93 दिवसांचा कालावधी लागू शकतो. काळे टोमॅटोचे पीक काढणीस तयार होण्यापूर्वी ते पिकण्याच्या दोन टप्प्यांतून जाते.

नाना पाटेकर यांचे शेती विषयक योगदान आणि एक शेतकरी म्हणून जीवन जाणून घ्या

जेव्हा हे आरोग्यवर्धक काळे टोमॅटो पहिल्यांदा वेलीवर दिसतात तेव्हा त्यांचा रंग हिरवा असतो. मात्र तर जसजसे परिपक्व होत जातात तसतसा त्यांच्या रंग जांभळा काळसर पडू लागतो. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांना काळा रंग प्राप्त होतो. पिकाच्या परिपक्वता काळात हे टोमॅटो अतिशय सुंदर आकाराचे दिसतात. या सुंदर काळ्या टोमॅटोच्या सुवासाने तुमचं शेत सुगंधी होऊन जाते इतका छान गावरान सुगंध या काळ्या टोमॅटोला येतो.

वरून जरी ही टोमॅटोची चविष्ट जात काळी दिसत असली तरी आतून मात्र काळा टोमॅटो लाल रंगाचा असतो. एकदा का तुमचे पीक परिपक्व झाले की त्याची काढणी करता येते. दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करून राज्यातील शेतकरी एक नावीन्यपूर्ण शेती करण्याचे समाधान तर मिळवूच शकतो, याशिवाय भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक उन्नती सुद्धा साध्य करू शकतो.

हवामान आणि शेतजमिनीची निवड

थंड हवा वाहणाऱ्या भागात काळ्या टोमॅटोचे भरघोस उत्पादन मिळते. उन्हाळ्यात सावलीचे नियोजन करावे लागते. सरासरी 18 ते 30 अंश सेल्सिअस तापमान हे टोमॅटो लागवडीसाठी अनुकूल आहे.

उष्णतेच्या काळात सावलीचे नियोजन करावे. काळ्या टोमॅटोची शेती मध्यम काळ्या, वालुकामय चिकणमाती (Sandy Loam) जमिनीत चांगले उत्पादन देते. यासाठी शेतजमिनीचा सामू 6 ते 7.5 (मध्यम आम्लीय ते थोडीशी अल्कधर्मी). असायला हवा. लागवडीपूर्वी शेणखत, कंपोस्ट किंवा जैविक खत मिसळल्यास मातीची गुणवत्ता वाढून भरगच्च उत्पन्न मिळू शकते.

    काळे टोमॅटो लागवडीसाठी बियाण्याची निवड

    मित्रांनो काळ्या टोमॅटोची लागवड करण्यासाठी तीन प्रकारचे बियाणे उपलब्ध आहे. काळ्या टोमॅटोच्या वाणांमध्ये भारतात खालील वाणांची लागवड केल्या जाते.

    1) Indigo Rose: या वाणाचे टोमॅटो गडद जांभळा-काळसर रंगाचे असून याची चव गोडसर असते.

    2) Black Krim: या जातीच्या टोमॅटोची चव उत्तम असून याचा रंग हलका काळसर असतो.

    3) Cherokee Purple: टोमॅटोच्या या जातीचा रंग गडद जांभळट असून याची चव सौम्य असते.

    बीजप्रक्रिया करण्याची पद्धत

    काळ्या टोमॅटोची लागवड करण्यासाठी उच्च दर्जाचे, रोगमुक्त बियाण्याची निवड करणे आवश्यक असते. तसेच बीज लागवड करण्यापूर्वी कॅप्टन किंवा थायरम (2 ग्रॅम प्रति किलो बियाणे) या बुरशीनाशकाने प्रक्रिया केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. या काळ्या टोमॅटोची रोपे नर्सरीमध्ये 10-15 दिवसांत तयार होतात. या रोपांना पुरेशी उष्णता व आर्द्रता मिळण्यासाठी प्लास्टिक मल्चिंग वापरल्यास उत्तम.लागवड करताना ओळींचे अंतर हे 3 फूट ठेवा. तसेच रोपांमधील अंतर दीड फूट ठेवा.

    खतांचा वापर या पद्धतीने करा

    काळ्या टोमॅटोची लागवडीपूर्वी 10 टन प्रति एकरात शेणखत/कंपोस्ट खत मिसळा. तसेच रासायनिक खते ही लागवडीनंतर एका महिन्याने NPK (10:26:26) हे खत द्या. तसेच फुलोरा येण्यापूर्वी रोपांना कॅल्शियम नायट्रेट आणि पोटॅशियम सल्फेट द्या. ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर करा. अबू
    उन्हाळ्यात दर 2 ते 3 दिवसांनी पिकाला पाणी द्या. पिक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पाणी देण्याचे प्रमाण कमी करा. या पिकात तण नियंत्रणासाठी प्लास्टिक मल्चिंगचा वापर करा. तसेच शेतातील तण
    दर 15 ते 20 दिवसांनी काढल्या गेले पाहिजे याची दक्षता घ्या. रोपांना आधारासाठी लाकडी/लोखंडी खांब वापरा. असे केल्यास या काळ्या टोमॅटोच्या फळांना पुरेसा प्रकाश मिळेल.

    रोग आणि कीड नियंत्रण

    कुज रोग (Blight): या रोगाच्या बंदोबस्तासाठी मँकोझेब किंवा क्लोरोथॅलोनील यासारखे बुरशीनाशक फवारा.

    पानगळ रोग (Leaf Curl): शेतातील रोगट रोपे शिघ्रगतिने काढून टाका आणि त्या रोपांची विल्हेवाट लावा.

    फळमाशी (Fruit Borer): या कीडीसाठी स्पिनोसॅड किंवा क्लोरपायरीफॉस फवारणी केल्यास उत्तम परिमाण मिळतो.

    थ्रिप्स/माइट्स: या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी जैविक कीटकनाशक किंवा निम तेल (Neem Oil) यापैकी वापर करा.

    काढणी केव्हा आणि विक्री कशी करावी?

    काळ्या टोमॅटोची काढणी करायची योग्य वेळ कोणती तर फळांचा रंग काळसर-गडद जांभळा झाल्यावर हे पीक काढणीस तयार आहे असे समजून काढणी करून घ्या. या शेतमालाची थंड ठिकाणी साठवणुक करा. या काळ्या टोमॅटोला प्रचंड मागणी असल्यामुळे याची विक्री करताना काही अडचणी येत नाहीत.यासाठी थेट ग्राहक मिळतो. किंवा सुपरमार्केट, जैविक उत्पादने विक्री केंद्रे तसेच अमेझॉन सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सद्वारे विक्री करून बक्कळ नफा कमावता येतो.

    लागवडीचा एकूण सरासरी खर्च

    बियाणे व रोपे विकत घेण्यासाठी सुमारे 8 ते 10 हजार खर्च येतो. तसेच खते व कीटकनाशके यांसाठी 15 ते 20 हजार खर्च येतो. सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी सुमारे 10 हजार रुपये लागतात. अशाप्रकारे 40 ते पन्नास हजार रुपये प्रति एकर एकूण खर्च येतो. आता उत्पन्न किती मिळते याचे गणित काढल्यास एका एकरातून सुमारे 8 ते 10 टन उत्पादन होईल. या काळ्या टोमॅटोच्या पिकाला बाजारभावानुसार किमान 50 ते कमाल 200 रुपये दर मिळतो. यानुसार प्रती एकर सरासरी 4 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यातून खर्च वजा केल्यास साडे सुमारे तीन लाख रुपये नफा होईल.

    शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार घरबसल्या कमवा

    काळ्या टोमॅटोमध्ये असलेले पौष्टिक मूल्य

    टोमॅटोच्या सर्व प्रकारांप्रमाणे काळे टोमॅटो हे त्यांच्या फायबरच्या प्रमाणामुळे पचन आणि आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. काळे टोमॅटो व्हिटॅमिन ए ने समृद्ध असतात ज्यामुळे निरोगी दृष्टी, निरोगी त्वचा तसेच त्यांच्या रोगप्रतिकारक गुणांमुळे खूपच उपयुक्त ठरतात. ब्लॅक टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

    दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड

    शरीरातील टिश्यू दुरुस्त करण्यास सुद्धा याची मदत होते. या काळ्या टोमॅटोच्या सेवनाने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड किती महत्वाची आणि फायदेशीर आहे याची प्रचिती तुम्हाला या फळाच्या गुणधर्मातून दिसून येईल. हे आरोग्यवर्धक काळे टोमॅटो त्यांच्या लाइकोपीन, ल्युटीन आणि बीटा-कॅरोटीनच्या गुणांमुळे डोळ्यांच्या आरोग्यास सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे डोळ्यांना प्रकाश-प्रेरित नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते परिणामी मोतीबिंदूसारख्या आजारांना आळा बसतो.

    विशिष्ट गडद जांभळा रंग असलेला हा काळा टोमॅटो त्याच्या उच्च पातळीच्या अँथोसायनिन्स, शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्समुळे गुणांमुळे कर्करोगापासून बचाव करण्यासाठी रामबाण ठरतो. दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळा टोमॅटो लागवड करून तुम्ही लोकांचे आरोग्य सुधारण्यास हातभार सुद्धा लावू शकता. शेतकरी मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

    ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

    Leave a Comment