सुर्य घर मोफत वीज योजना 2024, जाणुन घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

सुर्य घर मोफत वीज योजना 2024: आजकाल प्रत्येक जण वाढत्या वीजबिलाने त्रस्त असतो. आता मात्र तुम्हाला वीजबिल बद्दल अजिबात काळजी करायचं काम नाही.कारण देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने अनेक सोईसुविधा आणि योजना राबविण्यात येत असतात. त्यापैकी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे सूर्य घर मोफत वीज योजना. आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

या योजनेचे स्वरूप काय आहे?

सुर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात येते. यासोबत h सौर आच्छादन बसवण्यासाठी सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार येते. या अनुदानाची रक्कम ७८ हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. आता या योजनेसंबंधी एक महत्वाची माहिती समोर आली असून त्यानुसार पीएम सूर्य घर योजनेंतर्गत लवकरात लवकर अनुदान देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं बोलल्या जात आहे. त्यामुळे आता सूर्य घर योजनेबद्दल नागरिकांनी अधिकची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.

पी एम सुर्य घर मोफत वीज योजना 2024, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे, अटी शर्ती, ऑनलाईन अर्ज, अधिकृत संकेतस्थळ, संपूर्ण माहिती

सुर्य घर मोफत वीज योजना संदर्भात शासनाचे उद्दिष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सौर घर मोफत वीज योजना संदर्भात महत्वाची घोषणा केली. ही एक रूफटॉप सोलर योजना असून या योजनेच्या माध्यमातून ७५,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्प साकारून दर महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे या योजनेच्या कार्यान्वयन मागे शासनाचे उद्दिष्ट आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय या योजेअंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे उत्पन्न वाढवणे, वीज बिल कमी करणे तसेच नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा सूर्य घर मोफत वीज योजना संदर्भात शासनाचा मुख्य उद्देश आहे.

सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत एका आठवड्यात मंजूर होईल अनुदान

या योजनेअंतर्गत अनुदान वाटप शीघ्र गतीने करण्याराठी सरकारच्या वतीने अंमलबजावणी केल्या जात असून पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता एका आठवड्यात अनुदान मिळू शकणार आहे. साधारणपणे या योजनेअंतर्गत सबसिडी मंजूर होण्यासाठी सुमारे एक महिन्याचा वेळ लागत असतो. मात्र आता हे अनुदान एका आठवड्यात मंजूर करण्याच्या योजनेवर सरकार कार्यरत असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत लाभ घेता येईल याबद्दल सरकार आता आशावादी आहे.

सदर योजनेत आतापर्यंत दीड कोटी लोकांनी केली नोंदणी

सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत देशभरात आतापर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली असून फेब्रुवारी पासून ते ऑगस्ट पर्यंत सुमारे सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत 18 लाख अर्ज सादर करण्यात आले आहेत.

सुर्य घर योजनेत समाविष्ट बाबी

या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत 300 युनिट पर्यंत मोफत वीजबिल उपलब्ध करून देण्यात येते अशाप्रकारचे लाभाचे स्वरुप आहे. तसेच या योजनेद्वारे घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जातात, त्यासाठी सरकार अनुदान उपलब्ध करून देते. त्यामुळे वीज बिल कमी होते. याशिवाय, लाभार्थी जास्त वीज तयार करून सरकारला ही वीज विकून पैसै सुद्धा मिळवू शकतात.

सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत किती अनुदान देण्यात येते?

सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत लाभार्थी व्यक्तीने सोलर रुफटॉप बसवल्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येते. परिणामी लाभार्थ्यांचा सोलर पॅनल बसविण्यासाठी लागणारा खर्च प्राप्त होऊन त्यांचा आर्थिक भार कमी होतो. केंद्र सरकार 2 किलोवॅट पर्यंत 30 हजार रुपये प्रति किलोवॅट, 3 किलोवॅट पर्यंत 48 हजार रुपये आणि 3 किलोवॅट पेक्षा जास्त 78 हजार रुपये प्रति किलोवॅट याप्रमाणे अनुदान मंजूर करत असते.

आगामी काळात Npci नुसार झटपट अनुदान मिळणार

एका शासकीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सध्या अनुदानाचे दावे एका महिन्यात निकाली काढण्यात येतात. मात्र सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत आगामी काळात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा समावेश केला जाईल, ज्यामुळे धनादेश आणि बँक खाती तपासण्याची गरज राहणार नाही. या निर्णयामुळे अनुदान मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. नॅशनल पोर्टलच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बँक-एन्ड इंटिग्रेशन सुद्धा शिघ्रगतीने केले जात आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांचे वीजबिल माफ

सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड

२) अर्जदाराचे मासिक वीजबिल पत्रक

३) अर्जदाराचे राशन कार्ड

४) उत्पन्नाचे प्रमाणपत्र

५) पत्त्याचा पुरावा सादर करणारे कागदपत्रे

६) अर्जदाराचे बँक पासबुक

७) अर्जदार व्यक्तीच्या जागेचा आठ अ नमुना

८) मोबाइल क्रमांक

९) पॅन कार्ड

१०) हमीपत्र/ शपथपत्र

११) अर्जदाराच्या नावे असलेली वीज बिलाची प्रत

सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत पात्रता निकष

१) अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.

२) अर्जदाराच्या परिवारातील कुठलीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.

३) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

४) अर्जदार व्यक्तीकडे स्वतः ची जमीन असावी.

५) अर्जदार व्यक्तीने या योजनेसाठी असलेले सर्व कागदपत्रे सादर करता येणे आवश्यक आहे.

६) अर्जदार व्यक्तीकडे कुठलेही चारचाकी वाहन नसावे.

७) अर्जदार व्यकी ही आयकर भरणारी नसावी.

८) अर्जदाराने याआधी सौर पॅनल अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नोंदणी तपशील भरून नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, तुमची विद्युत वितरण कंपनी निवडायची आहे. तसेच तुमचा विद्युत ग्राहक क्रमांक सुद्धा टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल द्यावा लागेल. एकदा तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही लॉगिन ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून सदर संकेतस्थळावर लॉगिन करन रूफटॉप सोलर साठी अर्ज सादर करू शकता.

सदर ऑनलाइन अर्ज भरताना सर्व बाबी काळजीपूर्वक भरायच्या आहेत. तुमचा अर्ज भरून झाल्यावर तुम्हाला पात्रता पूर्तीची वाट पाहावी लागेल. एकदा तुमचा अर्ज DISCOM कडून मंजूर करण्यात आला की तुमच्या DISCOM मध्ये नोंदणीकृत विक्रेत्यांकडून संयंत्र स्थापित करायचा असेल. त्यानंतर संयंत्र बसविल्याचा तपशील जमा करावा लागेल तसेच नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल. सौर पॅनलची स्थापना पूर्ण झाल्यानंतर तसेच नेट मीटर स्थापना केल्यानंतर DISCOM द्वारे तपासणी केल्या जाईल. DISCOM द्वारे तपासणी झाल्यानंतर, ते पोर्टलवरून कमीशनिंग प्रमाणपत्र तयार करून तुम्हाला देतील. हा कमीशनिंग अहवाल मिळाल्यानंतर तुम्हाला सदर पोर्टल वरून तुमचे बँक खाते तपशील तसेच रद्द झालेली चेक यांची प्रत जमा करावी लागेल. यानंतर तुमच्या बँक खात्यात एका महिन्याच्या आत सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत अनुदान तुमच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.

या योजनेसाठी असलेली अधिकृत वेबसाईट

सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला 7https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जाऊन वर दिलेली प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्हाला अर्ज भरण्यासाठी लागणारे आवश्यक मार्गदर्शन वरील परिच्छेदात केला आहे. या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेद्वारे तुम्ही सोलर पॅनल बसवून अनुदान प्राप्त करू शकता. परिणामी तुमच्या विजबिलाची कटकट कायमची संपेल. तसेच तुम्ही तयार केलेली वीज सरकारला सुध्दा विकू शकता. यातून तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मदत देखील होईल.

या योजनेअंतर्गत पुणे विभागात २७४८ घरांचे मासिक वीजबिल झाले शून्य

घरगुती आणि गृह संकुलांसाठी खूपच फायदेशीर असलेल्या अन अंदाजे २५ वर्षापर्यंत मोफत वीज देणाऱ्या सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत पुणे परिमंडल विभागात आतापर्यंत घरगुती वीजग्राहकांचे १३ हजार ६७७ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे शहरात १३९१, पिंपरी चिंचवड शहरामध्ये ७७१ आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांत ५८६ सौर प्रकल्प सुरू झाले आहेत. घरगुती ग्राहकांनी या योजनेत या सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत लाभासाठी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडून करण्यात आले.

या योजनेअंतर्गत घराच्या छतावर किंवा परिसरात १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे मासिक अंदाजे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत प्राप्त करण्याची सुवर्णसंधी सूर्य घर मोफत वीज योजनेतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सौर प्रकल्प अंतर्गत सौर पॅनल उभारण्यासाठी विविध बँकांकडून अतिशय कमी व्याजदराने कर्जाची सवलत मिळते. सुर्य घर मोफत वीज योजना योजनेची अंमलबजावणी शिघ्रगतिने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार महावितरणकडून १० किलोवॅट पर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजूरी तर मिळणारच आहे , शिवाय सौर नेटमीटर सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

संभाजीनगर परिमंडळात 3653 नागरिकांना मोफत वीज

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात आतापर्यंत ३ हजार ६५३ ग्राहकांनी सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत सौर पॅनल बसवून योजनेचा लाभ घेतला. या लाभार्थींनी त्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरवात केली आहे. संभाजीनगर परिमंडळात सदर योजनेबद्दल लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक परिमंडळात योजनेला उस्फूर्त प्रतिसाद

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत महावितरणच्या पोर्टलवर एकूण अर्ज केलेल्या ग्राहकांमध्ये नाशिक परिमंडळातील २२ हजार ८३९ ग्राहकांनी अर्ज केलेला असून त्यातील ५ हजार १४८ ग्राहकांनी १८.५ मेगावॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली असून उर्वरित ग्राहकांचे घरे सुद्धा सुर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत सौर ऊर्जेने प्रकाशमान होणार आहेत.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment