केंद्र सरकारच्या वतीने देशातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे लाभ अनेक योजनांचा माध्यमातून देण्यात येत असतात. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सारख्या आर्थिक लाभाच्या योजनांना अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता राज्य सरकार कडून शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान देण्यात येत आहे. मात्र अनुदानाची ही योजना गट शेतकऱ्यांसाठी असून 15 लाखाचे अनुदान वैयक्तीक शेतकऱ्यांना देण्यात येत नाही.
यासाठी अनेक शेतकऱ्यांना एकत्र येऊन त्यांच्या गटाची नोंदणी करून घ्यावी लागते. यालाच गटशेती असे सुद्धा म्हणतात. नंतर सरकार या संपूर्ण शेतकऱ्यांच्या गटाला विविध योजनांचा लाभ देत असते. आज या माहितीपूर्ण लेखातून आपण शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान मिळवून देणारी हो योजना कोणती आहे तसेच या योजनेसाठी शेतकरी गट नोंदणी कशी करावी तसेच शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया तसेच निकष काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पीएम किसान एफपीओ योजना
तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या या योजनेचे नाव आहे पीएम किसान एफपीओ योजना. देशातील शेतकऱ्यांना व्यावसायिक बाबतीत सक्षम करण्याचा हेतू समोर ठेवून तसेच बळीराजाला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत सरकारकडून एकूण 11 शेतकऱ्यांच्या समूहाला म्हणजेच शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेचा फुल फॉर्म आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन योजना. या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेती व्यवसायाला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
इतक्या शेतकऱ्यांचा असावा लागतो गट
शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर माहीत नसेल तर जाणून घ्या की पीएम किसान एफपीओ योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान मिळविण्यासाठी किमान 11 शेतकऱ्यांचा गट तयार करावा लागतो. तसेच त्याची नोंदणी करावी लागते. कुण्याही शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या पीएम किसान एफपीओ योजना अंतर्गत लाभ देण्यात येत नाही. शेतकरी गट नोंदणी ही एक अनिवार्य अट असून शेतकऱ्यांच्या गटाला या पीएम किसान एफपीओ योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान मिळणार आहे.
आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा गट स्थापन करुन त्यांच्या गटाची स्थापना करून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान योजना याशिवाय अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या गटाला देण्यात येत असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरातील किमान 11 शेतकऱ्यांचा गट तयार करून त्या गटाची नोंदणी करू शकता आणि या सर्व योजनांचा लाभ घेण्यास पात्र होऊ शकता.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोक्रा योजना 2.0 कार्यान्वित, योजनेसाठी इतके कोटी झाले मंजूर
असा करा पीएम किसान एफपीओ योजना लाभासाठी ऑनलाइन अर्ज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की पीएम किसान एफपीओ योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा गट तयार केल्यानंतर त्याची नोंदणी कुठे करावी? तर काळजी करू नका. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांचा गट तयार करू शकत असाल तर शेतकऱ्यांना 15 लाख अनुदान योजनेच्या लाभासाठी या पीएम किसान एफपीओ योजना अंतर्गत सहभागी होण्यासाठी तुम्ही खालील वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी https://enam.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.
एकदा तुम्ही वेबसाईटच्या होम पेजवर गेलात की त्यावर तुम्हाला नोंदणी करा हा पर्यायावर क्लिक करून विचारलेली माहिती भरून यशस्वीरीत्या नोंदणी करून घेता येईल. एकदा तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की लॉग इन करण्यासाठी तुम्ही नोंदणी करतेवेळी दिलेला ईमेल तसेच तुम्ही तयार केलेला पासवर्ड यांच्या साहाय्याने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आवश्यक असलेली उर्वरित माहिती भरून घ्या. सर्वात शेवटी अर्ज सबमिट या पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करा.
कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात?
या योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गटाला पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. यामध्ये एफपीओचे एमडी, सीईओ किंवा मॅनेजरचे नाव, पत्ता, ई मेल आयडी आणि कॉन्टॅक्ट नंबर ही सर्व माहिती सादर करावी लागते. एकदा तुम्ही विचारलेली सर्व माहिती भरली आणि कागदपत्रे अपलोड केले की काही दिवसांतच तुमची नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन तुमची शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला यासंबंधी सदर वेबसाईट वर तसेच तुमच्या मोबाइल नंबर आणि ईमेलवर तुमच्या गटाच्या यशस्वी नोंदणीचा मेसेज येईल. एकदा तुमची नोंदणी सक्रिय झाली की मग तुम्ही शेतकऱ्यांना 15 लाखाचे अनुदान याशिवाय शेतकरी गटाला देण्यात येणाऱ्या इतर अनेक महत्वाकांक्षी योजनांचा लाभ घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा वेगळा अर्ज सादर करावा लागेल. यानंतर त्या योजनेचा लाभ देण्यात येईल.