महिला आणि मुलींना मिळणार पिंक ई रिक्षा योजना, जीआर आला, योजना लागू

पिंक ई रिक्षा योजना 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या लाडक्या बहिणींना खुश करण्याची एकही संधी गमावत नाही आहेत. राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशा गरजू होतकरू महिलांसाठी पिंक ई रिक्षा अनुदान देण्याची मध्यंतरी घोषणा केली होती. आता या संदर्भात नवीन महत्वपूर्ण आणि आनंददायक माहिती समोर आली आहे.

पिंक ई रिक्षा योजना 2024 संपूर्ण माहिती

पिंक ई रिक्षा योजना संबंधी सरकारचा हेतू काय आहे?

राज्यातील महिलांसाठी पिंक ई रिक्षा अनुदान चा नवीन जीआर आला आहे . राज्यातील स्त्रिया आणि मुली आर्थिक दृष्ट्या सबळ व्हाव्या, हा सरकारचा हेतू आहे. त्यामुळे आता गरजू महिलांना ई रिक्षा साठी अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून ई रिक्षा अनुदान वाटप प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

या योजनेसाठी असणारी पात्रता काय आहे?

पिंक ई-रिक्षा योजना अंतर्गत लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

अर्जदारा महीलेचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असावे.

महिलेकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.

दारिद्र्यरेषेखालील महिलांना योजनेत प्राधान्य असून,

सर्व प्रवर्गातील महिलांना योजनेत अर्ज करता येईल.

कोणत्या शहरातील महिला असतील या योजनेसाठी पात्र

पिंक ई रिक्षा योजना अनुदानाचा लाभ पुढील शहरातील गरजू महिला तसेच मुलींना देण्यात येणार आहे . यात मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर आणि सोलापूर. या सर्व शहरातील गरीब गरजू महिला तसेच मुलींना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि रिक्षा चालविण्यासाठी इतर सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरीब गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजना राज्यात सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा👉

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कार्यान्वित, शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष वीज मोफत

पिंक ई रिक्षा योजना साठी शासनाकडून किती अनुदान मिळेल?

या ई-रिक्षा महिला चालवणार आहेत. बेरोजगार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी सरकार 20 टक्के अनुदान देण्यात येईल; अर्जदारांना 10 टक्के खर्चाचा भार उचलावा लागेल, तर उर्वरित 70 टक्के रक्कम बँक कर्जाद्वारे घेतली जाईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत .

अर्जदार महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड,

बँक पासबुक

अधिवास प्रमाणपत्र,

पासपोर्ट साईज फोटो,

उत्पन्नाचा दाखला,

मतदान कार्ड,

चालक परवाना,

रेशन कार्ड

पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत लाभासाठी शासनाने ठरवून दिलेल्या तांत्रिक बाबी काय आहेत?

ही पिंक ई रिक्षा (४+१) अशा आसन क्षमतेची असणार आहे. तसेच या पिंक ई रिक्षा ची मोटर क्षमता कमाल 2000 watt इतकी असणार आहे. सामान वाहून नेण्याची क्षमता कमाल 40 किलोग्रॅम इतकी असणे आवश्यक आहे. वेगाच्या बाबतीत या पिंक ई रिक्षा ताशी २५ किलोमीटर क्षमतेच्या असाव्यात असे निर्देश प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णय मध्ये आढळून येतात.

राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे,त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे हे उद्देश समोर ठेवून ही योजना लागू करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. तसेच महिला व मुलींच्या सशक्तीकरण साठी, आणि महिला आणि मुलींच्या सुरक्षित प्रवासासाठी शासनाकडून पिंक ई रिक्षा ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड विभागासाठी 600 पिंक ई रिक्षा मंजूर

पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत राज्यभरातील निवडक 17 शहरांमध्ये वितरित केल्या जाणार्‍या शहरांमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश करण्यात आला असून राज्यात सर्वप्रथम सुरू केलेल्या पिंक ई रिक्षाचा उपक्रमाला एकूण वितरित केल्या जाणार्‍या 10 हजार ई पिंक रिक्षांपैकी पिंपरी चिंचवडच्या वाट्याला अवघ्या 600 ई पिंक रिक्षा आल्या आहेत. ही संख्या पुणे, मुंबई व नागपूर या शहरांच्या मानाने कमी असल्याचे बोलल्या जात आहे.कारण या तीनही शहरांमध्ये प्रत्येकी 1400 ई पिंक रिक्षा वितरित केल्या जाणार आहेत.

पिंपरी चिंचवड मधील 100 स्त्रियांना प्रशिक्षण आणि वाहन चालक परवाना

पिंपरी चिंचवड शहरातील कागद, काच, पत्रा, वेचक, धुणी -भांडी साफसफाई आदी कष्टाची कामे करणार्‍या शंभर महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा वाहन चालक परवाना काढण्यात आला आहे.. बॅच बिल्ला काढून अशा गरजू महिलांना परवाना मिळवून देण्याचा उपक्रम कष्टकरी कामगार पंचायत व घरकाम महिला सभा संघटनेच्या वतीने राबविण्यात आला होता.

राज्यातील विविध शहरांसाठी पिंक ई रिक्षा लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे

मुंबई उपनगर 1400
ठाणे 1000
नवी मुंबई 500
पुणे 1400
पनवेल 300
नागपूर 1400
छत्रपती संभाजीनगर 400
पिंपरी 300
चिंचवड 300
नाशिक 700
कल्याण 400
अहमदनगर 400
अमरावती 300
डोंबिवली 400
वसई- विरार 400
कोल्हापूर 200
सोलापूर 200
एकूण 10,000

वसई विरार शहरातील 400 महिलांना पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत लाभ

या योजनेंतर्गत वसई, विरार शहरातील ४०० गरजू महिलांना रोजगारासाठी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत लाभासाठी इच्छुक महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत-अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोळगाव रोड, पालघर ४०१ ४०४ या पत्त्यावर अर्ज करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या वाट्याला येणार 500 पिंक ई रिक्षा

पुण्यासह १७ शहरात पहिल्या टप्प्यात महिलांना १0 हजार ई- पिंक रिक्षा देण्यात येणार असून एकट्या पुणे शहरात १ हजार ई- पिंक रिक्षा देण्यात येणार आहेत. पुढील काळात उबेर, ओलासारख्या व्यासपीठाशी या रिक्षांची जोडणीसाठी प्रयत्न करण्यात येणार असून महिलांनी प्रवासासाठी नोंदणी केल्यास त्यांना महिला चालक असलेल्या ई- पिंक रिक्षातून प्रवास करता येणार आहे.

याबरोबरच आता अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी एकूण 10 हजार पिंक ई-रिक्षा योजना राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आता पिंक ई रिक्षा योजना विस्तारित केल्या जाणार असून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव 3 टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत या कल्याणकारी योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकूण 500 पिंक ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत लाभासाठी अर्ज प्रक्रिया

पिंक ई-रिक्षा योजना लाभासाठी अर्ज प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येतील.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा स्तरावरील कार्यालयात भेट देऊन योजनेचा अर्ज आणावा लागेल. हा अर्ज व्यवस्थितरीत्या भरून अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागतील. तसेच अर्जात दिलेल्या अटी आणि शर्ती पूर्ण केल्याची खात्री करून आपण जिल्हा स्तरावरील कार्यालयात या योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करू शकता. तुमचा अर्ज सादर झाल्यानंतर तो संबंधीत अधिकाऱ्यांकडून पडताळणी केल्या जाऊन तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांच्या साहाय्याने तसेच पात्रता निकष अवलोकन केल्यानंतर मंजूर करण्यात येऊन तुम्हाला पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत लाभ देण्यात येईल

अर्ज सादर करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

अद्यापपर्यंत पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत लाभासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. भविष्यात जर या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट तयार करण्यात आली तर त्याबद्दल तुम्हाला या पोर्टलवरून कळविण्यात येईल.

वारंवार विचारल्या जाणारे प्रश्न

प्रश्न: सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे पिंक ई-रिक्षा योजना Pink E-Rickshaw Yojana म्हणजे काय?

उत्तर : राज्यातील महिलांना आर्थिक संधी उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणार आहे.

प्रश्न: पिंक ई-रिक्षा योजना Pink E-Rickshaw Yojana कधी सुरू झाली / कधी होणार?
उत्तर: महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना ही 27 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा सरकार द्वारा करण्यात आली आहे.

प्रश्न : महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना अंतर्गत लाभासाठी कोण पात्र असणार आहे?

उत्तर : पिंक ई-रिक्षा योजना अंतर्गत लाभासाठी केवळ राज्यातील व्यवसाय करू इच्छित असणाऱ्या गरजू महिलाच अर्ज करू शकणार आहेत. राज्यातील 21 वर्ष ते 60 वर्ष वयोगटाच्या गरजू महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

प्रश्न : या योजनेसाठी सरकार किती अनुदान देणार आहे?

उत्तर : या योजनेसाठी सरकार कडून एकूण 10 ते 30 टक्के अनुदान देण्यात येऊन बाकीची रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रश्न : या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

उत्तर: या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही. यासंबंधी काही अपडेट आल्यास सदर वेबसाईट वरून तुम्हाला कळविण्यात येईल.

प्रश्न : पिंक ई रिक्षा योजना अंतर्गत किती शहरांची निवड करण्यात आली आहे?

उत्तर: राज्य सरकारने पिंक ई रिक्षा योजना लाभासाठी प्राथमिक स्तरावर राज्यातील एकूण दहा शहरांची निवड केली आहे. या शहरांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पनवेल, नागपूर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवड, छत्रपती संभाजी नगर, नाशिक यांचा समावेश आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment