धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
परभणी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सन 2021-22 पासून राज्य शासनाकडून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. … Read more