मशरूम लागवड करून हा शेतकरी करतोय दिवसाला 2 लाखांची कमाई

कोरोना काळात संपूर्ण भारतात सर्वच व्यवसाय डबघाईस आल्यामुळे गावी येण्याचा निर्णय घेऊन मशरूम लागवड करून भरघोस उत्पादन घेत लाखो रुपयांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखातून पाहणार आहोत. प्रतिकूल परिस्थितीतही योग्य निर्णय घेऊन धाडस अंगी ठेवून प्रगती करता येते याचा प्रत्यय आपल्याला या यशस्वी शेतकऱ्याच्या प्रेरणादायी कथेतून पाहायला मिळेल.

गावी येऊन शेती करण्याचा धाडसी निर्णय

ही प्रेरणादायी यशोगाथा आहे बिहार राज्यातील मुजफ्फरपूर गावच्या शशी भूषण सिंह यांची. कोरोना आधीच्या कालावधीमध्ये शशी भूषण हे पूर्वी दिल्लीमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय करायचे. कोरोना काळामध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक लोकांप्रमाणे त्यांना देखील कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच या काळात त्यांची नोकरी सुद्धा गेली. परंतु शशी भूषण सिंह यांनी हार न मानता गावी शेती करण्याचा ठाम निर्णय घेतला. अन् ते आपल्या कुटुंबासोबत बिहारमधील मुजफ्फरपुर या मूळ गावी परतले.

गावी येऊन मशरूम शेती करण्यास सुरुवात

शशी भूषण सिंह यांनी मशरूम शेती करण्याचा दृढ निश्चय केल्यानंतर त्यांनी सुरुवात करताना तयारी म्हणून PUF पॅनल्स आणि एअर कंडिशनर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून एका छोट्याशा खोलीतून त्यांच्या व्यवसायाला सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून मशरूम लागवड सुरू केली. यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून घेतले.

20 खोल्या मधून रोज दीड ते दोन क्विंटल मशरूम उत्पादन

मशरूम लागवडीसाठी घेतलेले आवश्यक ज्ञान आणि मेहनत करण्याची जिद्द या कारणांमुळे त्यांना सुरुवातीलाच चांगले यश मिळायला सुरूवात झाली. आणि मशरूम शेती मधून प्रागती होत असल्याचे पाहून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला. पहिल्या वर्षानंतर त्यांनी या मशरूम शेती व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरवून त्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये शिकून घेत भांडवल उभे करत करत आज त्यांच्याकडे मशरूम उत्पादनासाठी तब्बल 20 खोल्या आहेत. या 20 खोल्यांत मशरूम शेती करून ते दीड ते सध्याच्या घडीला दररोज दीड ते दोन टन मशरूमचे उत्पादन घेत आहेत.

दिवसाला होते 2 लाखाची भरघोस कमाई

एकेकाळी कुटुंबाचे पालनपोषण करायला समर्थ नसलेल्या शशी भूषण सिंह यांनी त्यांच्या मेहनत अन् हुषारीच्या जोरावर खूपच कमी अवधीत चांगलीच आर्थिक प्रगती केली आहे. सध्या त्यांना त्यांच्या मशरूम लागवड मधून निघणाऱ्या उत्पादनातून प्रती दिवस सुमारे दोन लाख रुपयांची भरगच्च कमाई होते. मशरूम लागवडीचा सर्व खर्च व असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार वगळून त्यांना महिन्याला 10 लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ नफा होतो. राज्यातील शेतकऱ्यांनी या यशस्वी शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन अशीच काही किमया त्यांच्या शेतीत करायची इच्छा अंगी बाणवली पाहिजे. आधुनिक शेती करण्याकडे लक्ष केंद्रीत करून स्वतःची आर्थिक भरभराट केली पाहिजे.

मशरूम शेतीच्या माध्यमातून शंभरावर जणांना दिला रोजगार

शशी भूषण सिंह यांनी मशरूम शेती करून फक्त स्वतःचीच प्रगती करून घेतली नाही. तर त्यांच्या या उपक्रमासाठी शंभर महिला व पुरुषांना देखील त्यांनी रोजगार निर्माण करून दिला आणि त्यांच्या देखील रोजगाराचा प्रश्न दूर केला. शशी भूषण यांच्या मशरूम उत्पादनाचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे खर्च कमी व्हावा या उद्देशाने ते स्वतःच मशरूम स्पॉन म्हणजेच मशरूमची बियाणे तयार करतात यासाठी त्यांनी स्वतःचा मशरूमचा कॅनिंग प्लांटची उभारणी सुद्धा केली आहे.

मशरूम शेती एक अत्यंत फायद्याचा व्यवसाय

मशरूम लागवड व्यवसाय म्हणून स्वीकारणे अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे शशी भूषण सिंह यांनी बोलून दाखवले. ते म्हणतात, मशरूम शेती हा उत्पन्न वाढवण्याचा एक चांगला पर्याय असून कॉलेज विद्यार्थी तसेच गृहिणी सुद्धा आरामात हा व्यवसाय करू शकतात. शशी भूषण यांनी त्यांच्या मुलाला देखील मशरूम विक्रीसाठी तयार केले असून त्यांचा मुलगा कॅन केलेला मशरूम ऑनलाइन विकण्याचे काम करतो. त्यांच्या मुलामुळे सुद्धा त्यांना खूप मदत होते. येत्या काही वर्षातच देशातील असंख्य शेतकरी मशरूम शेतीकडे वळून आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल असा आशावाद सुद्धा त्यांनी बोलून दाखवला.

मशरूम लागवड करून कमी वेळेत भरपूर उत्पन्न घेता येते त्यामुळे आजकाल मशरूम लागवड करण्यासाठी अनेक शेतकरी आशावादी असतात. त्यापैकी बरेच जन मशरूम शेती करून त्यातून भरघोस उत्पादन घेतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना मशरूम लागवड कशी करावी याबद्दल पुरेसे ज्ञान नसते. परिणामी त्यांच्या मनात मशरूम लागवड विषयी एकप्रकारची साशंकता असते. आज आपण या लेखातून मशरूम लागवड संबंधी संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

मशरूम शेतीसाठी योग्य ज्ञान आवश्यक

मशरूम ही एक प्रकारची वनस्पती आहे जी लोक भाजी म्हणून वापरतात. ते शाकाहारी अन्न आहे. यामध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डी सारख्या इतर पोषक तत्वांचा समावेश आहे. मशरूम शेती हा मुळात बुरशी पिकवण्याचा व्यवसाय आहे. आज मशरूमची लागवड हा देशातील सर्वात जास्त उत्पादन देणारा एक फायदेशीर व्यवसाय म्हणून प्रचालिथोट आहे. मात्र मशरूम शेती यशस्वी करण्यासाठी, नियोजन, अभ्यास आणि ज्ञान सुद्धा आवश्यक असते. आजकाल गुगल बाबाच्या माध्यमातून आपण एका क्लिक वर कुठ्ल्याही क्षेत्रातील ज्ञान संपादन करू शकता. किंवा एखाद्या कृषी विभागाच्या ठिकाणी जाऊन मशरूम शेतीविषयी प्रशिक्षण प्राप्त करू शकता.

पुण्यातील कृषी महाविद्यालयात मिळते प्रशिक्षण

मशरूम शेतीत भवितव्य उज्ज्वल आहे. मात्र या लागवडी विषयी ज्ञान संपादन करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. तसेच वेळ द्यावा लागेल. सरकारच्या वतीने सुद्धा मशरूम शेती जागरूकता करण्यात येते. पुणे कृषी महाविद्यालयातर्फे मशरूम संशोधन करण्याबरोबरच शेतकऱ्यांना मशरूम लागवड प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय प्रदर्शन, मेळावे प्रकल्प भेट यामार्फत मशरूम लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कल्याणकारी करू केल्या जाते.

प्रत्येक बुधवारी असते प्रशिक्षण शिबिर, फी फक्त 1 हजार रुपये

राज्यातील इच्छुक शेतकऱ्यांना या कृषी विद्यापिठाव्दारे मशरुमचे वेगवेगळे प्रकार, त्यांची वेगवेगळे लागवड तंत्रज्ञान, कमी जागेत कमी खर्चात ही शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाते.
पुणे कृषी महाविद्यालय अंतर्गत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी हे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी प्रशिक्षण शुल्क फक्त एक हजार रुपये असून प्रशिक्षण वेक सकाळी 10 ते 5 ठरविण्यात आली आहे.

आधुनिक शेतीला युवावर्गाची पसंती

तंत्रज्ञानाच्या या युगात आधुनिक शेतीचा अवलंब करून शेती व्यवसायाला रोजगार म्हणून राज्यातील असंख्य तरुण तरुणी स्वीकारत आहेत. शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन भरघोस उत्पादन घेता येते हे कोणीही नाकारू शकत नाही. परिणामी असंख्य शेतकरी मशरूम लागवड सारख्या आधुनिक शेतीची कास धरून आपली आर्थिक प्रगती साधत असल्याच्या बातम्या आपण प्रसारमाध्यमांतून पाहत असतो.

मशरूम लागवड विषयी संपूर्ण माहिती

मशरूम लागवडीसाठी योग्य जागा

मशरूम लागवड करण्यासाठी जागा ही बंदिस्त स्वरुपाची असावी लागते. बंदिस्त वातावरण मशरूम लागवड साठी अत्यंत पोषक असते. त्यामुळे झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर इत्यादी बंदिस्त जागेत मशरूम लागवड करून भरघोस उत्पादन घेता येते.

मशरूम लागवडीसाठी योग्य हंगाम

ऑयस्टर मशरूमची लागवड सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत करता येते तसेच बटण मशरूमची लागवड फेब्रुवारी ते मार्चपर्यंत करता येते आणि जून ते जुलै पर्यंत भात पेंढा मशरूमची लागवड करता येते, अशा प्रकारे मशरूम लागवड संपूर्ण वर्षभर केल्या जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे मशरूम लागवड शेतकरी त्यांच्या पारंपारिक शेतीसोबत करून भरघोस उत्पादन घेऊ शकतात.

मशरूमचे प्रकार

1 बटण मशरूम
2 ऑयस्टर मशरूम
3 भात पेंढा मशरूम
हे मशरूमचे एकूण तीन प्रकार असतात.

मशरूम बियाण्याची पेरणी

पेरणी करण्याआधी ज्या बंदीस्त खोलीत मशरूमची पिशवी ठेवायची आहे त्या खोलीवर 2% फॉर्मेलिनचा वापर करून घ्या. 50 किलो कोरड्या भुश्यासाठी सुमारे 5 किलो बियाणे लागते. मात्र हे बियाणे 20 दिवसांपेक्षा अधिक जुने नसले पाहिजे. हिवाळा आणि उन्हाळा हा ऋतु अनुसार मशरूमच्या योग्य प्रजातीची निवड करा. पेरणीसाठी 4 किलो ओला पेंढा 4 किलो क्षमतेच्या पॉलिथीन बॅगमध्ये भरून घ्या. तसेच यामध्ये सुमारे 100 ग्रॅम बियाणे चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. या बॅगमध्ये हवा जाणार नाही याबद्दल खबरदारी घेणे सुद्धा गरजेचे असते. त्यानंतर पॉलिथीन फोल्ड करून रबर बँडने बंद करा. तसेच या पॉलिथीन भोवती सुमारे 5 मिलिमीटर 10-15 हॉल तयार करून घ्या.

मशरूम लागवडीसाठी पाण्याचा वापर

कुठ्ल्याही पिकाच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा योग्य वापर महत्वाचा असतो. त्यामुळे पिकाच्या पाणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. मशरूम लागवड साठी सुद्धा पाण्याची काळजी घेणे आवश्यक असते. मशरूम शेती करण्यासाठी पाणी ही अत्यंत महत्वाची बाब असून उत्तम मशरूम उत्पादना घेण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाण्याचे वापर आवश्यक असतो.

मशरूम शेतीसाठी पोषक वातावरण

मशरूम लागवड साठी अंधारमय वातावरणाची आवश्यकता असते. वातावरणात आद्रतेचे प्रमाण 70 ते 80% असावे लागते . तसेच मशरूम वाढीसाठी तापमान 18 ते 28 अंश सेल्सियस असणे गरजेचे असते. मशरूम शेती करून भरघोस उत्पादन घेण्यासाठी मशरूम लावलेल्या बंदिस्त खोलीत हवा खेळती असणे खूपच फायदेशीर ठरते.

मशरूम शेतीसाठी कच्चा माल

मशरूम शेती उत्पादन हे मुख्यत्वेकरून कच्च्या मालावर अवलंबून असते. कच्च्या मालातील सेल्युलोज घटक मशरूम साठी महत्वाचे अन्न आहे. सेल्युलोजचे प्रमाण ज्या घटकात जास्त असते, अशाप्रकारचे अन्न पुरविल्यास मशरूमचे उत्पादन वाढते. मशरूम लागवड साठी कच्चा माल म्हणजे शेतीतून निघणारे टाकाऊ घटक. उदा. गव्हाचा भुसा, कपाशीच्या काड्या, भाताचा पेंढा, गवत, सोयाबीनचा भुसा,कडबा यांचा वापर करावा.

हे घटक निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात त्या म्हणजे घटक पदार्थ निवडताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे घटक ( कच्चा माल) कोरडा असला पाहिजे. याशिवाय हा कच्चा माल नवीन काढणीचा असला पाहिजे.पावसात भिजलेला कच्चा माल वापरण्यात येऊ नये. आणि या कच्च्या मालाची साठवणूक करताना बंदिस्त जागेचा वापर करावा.

मशरूम लागवडीसाठी बियाणे

मशरूम लागवड करण्यासाठी बियाण्याबद्दल माहिती जाणून घेणे महत्वाचे असते. मशरूम बियाणांस स्पॉन असे म्हणतात. गव्हाच्या दाण्यावर मशरूमच्या बिजाणूंची वाढ होत असते. प्लॅस्टिकच्या पिशवीत ५०० ग्रॅम, १ कि.ग्रॅ. या मापात हे बियाणे बाजारात सहज उपलब्ध असते.

मशरूम लागवडीची रासायनिक पद्धत

मशरूम लागवड रासायनिक पद्धतीने केल्यास या पद्धतीत पेंढ्यावर कार्बेन्डाझिम आणि फॉर्मेलिनचा वापर केला जातो. सर्वात आधी 200 लिटर ड्रममध्ये 90 लिटर पाणी टाकले जाते आणि या ड्रममध्ये 7.5 ग्रॅम कार्बेडाझिम आणि 125 मिली फॉर्मेलिन मिसळल्या जाते. यानंतर ड्रममध्ये सुमारे 10-12 किलो कोरडे पेंढा देखील टाकावा लागतो. ड्रमला प्लास्टिकमध्ये फॉइलने 14-16 तास झाकून ठेवावे लागते. 14 ते 16 तासांनंतर पेंढा प्लास्टिक किंवा लोखंडी जाळीवर 2-4 तास ठेवावा लागतो. यामुळे अतिरिक्त पाणी बाहेर येते.

पिकाची निगा कशी राखावी?

मशरूम प्लॅस्टीक पिशवी काढलेली बेड मांडणीवर योग्य अंतरावर ठेवावे. बेडवर हवामानानुसार दिवसातून दोन-तीन वेळा पाण्याची हलकी फवारणी करून घ्यावी. जमिनीवर, भिंतीवर पाणी फवारुन पिकाच्या खोलीतील तापमान (25-30 अंश सेल्सिअस) आणि हवेतील आर्द्रता (85-90 %) नियंत्रित ठेवता येते. भरघोस उत्पादन मिळण्यासाठी खेळती हवा व प्रकाश यांची गरज असते. 3-4 दिवसात बेडच्या भोवती अंकूर (पीनहेड) पाहायला मिळतात. पुढील 3-4 दिवसांमध्ये त्याची झपाट्याने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. अन् मशरूम काढण्यासाठी पूर्णपणे तयार होते.

आले (अद्रक) लागवड करून एकरी 14 लाखाचे भरघोस उत्पादन घेणारा शेतकरी

मशरूम लागवडीसाठी प्लास्टिकचा वापर

मित्रांनो जर तुम्हाला मशरूम लागवड करून भरघोस उत्पादन घ्यायचे आहे तर त्यासाठी प्लॅस्टिक पॉलीप्रॅपिलीनचा वापर केलाच पाहिजे. तसेच जाडी (गेज) 80-100 वापरावा. यासाठी 18 बाय 22 इंच किंवा 22 बाय 27 इंच आकाराच्या प्लास्टिकचा वापर करावा.

मशरूम शेतीसाठी यंत्रसामुग्री

मशरूम शेतीसाठी महागडी यंत्रसामुग्री लागत नाही. अत्यंत कमी पैशांत ही यंत्र सामुग्री उपलब्ध होते. मशरूम शेतीसाठी खालील यंत्र सामुग्री लागते.

मशरूम शेती मध्ये कच्चा माल भिजविण्यासाठी ड्रम आवश्यक असतो. तसेच मशरूम वाळविण्यासाठी द्रायारची गरज पडते. पाणी गरम करण्याकरिता हिटर यंत्र आणावे लागते. याशिवाय तापमानाची नोंद ठेवण्यासाठी थर्मामीटर, वातावरण नियंत्रणासाठी ह्युमिडीफायर /फॉगर्स, आणि आद्रता दर्शविण्यासाठी हेअर हायग्रोमीटर इत्यादी साहित्याची गरज असते.

मशरूम काढणी कशी करावी?

सुमारे 15 ते 25 दिवसांनी किंवा मशरूमच्या बाहेरील कडा वर येऊ लागतात अशावेळी मशरूमची कापणी करून घ्यावी. मशरूम तळापासून किंचित वळवून मशरूम तोडला गेला पाहिजे. पहिली काढणी झाली की अंदाजे 8-10 दिवसांनी दुसरी काढणी करता येते. या पद्धतीने मशरूम उत्पादन तीन वेळा घेतले जाऊ शकते. एक किलो कोरडी पेंढा सुमारे 600 ते 650 ग्रॅम उत्पादन मिळवून देतो

मशरूमची साठवणूक कशी करावी?

मशरूम पिकाची कापणी झाल्यानंतर ते ताबडतोब पिशव्यांमध्ये साठवले जाऊ नयेत, ते सुमारे 3 तासांनंतर पॅक करण्यात यावे. फ्रेश मशरूम छिंद्रे पाडलेल्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये एक दिवस राहू शकते. मात्र शित कपाटात ते तीन ते चार दिवस टिकते. ताज्या मशरूमच्या विक्रीस बाजारपेठ उपलब्ध नसल्यास किंवा भाव कमी असल्यास मशरूम उन्हामध्ये वाळवून घ्यावे. मशरूम उन्हात दोन-तीन दिवसात पूर्णपणे वाळून जाते. वाळलेले मशरूम प्लॅस्टीक पिशवीत पॅक करुन (हवाबंद) ठेवल्यास ते सहा महिन्यापेक्षा अधिक काळ टिकून सुस्थितीत राहते. मात्र वाळलेल्या अळिंबीचे वजन ओल्या अळिंबीच्या वजनाच्या तुलनेत दहापट कमी होते.

मशरूमची विक्री आणि किंमत

मशरूम लागवड करून उत्पादित केलेले स्पॉन विविध सरकारी संस्था किंवा कृषी संस्था यांच्याकडून खरेदी केल्या जातात. त्यांची किंमत सुमारे 30 ते 50 रुपये प्रति किलो असते.

मशरूम लागवड का करावी?

1) मशरूम लागवड हा कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्यवसायांपैकी एक फायदेशीर व्यवसाय आहे.

2) आजच्या घडीला मशरूम शेतीतून लाखो लोकांनी करोडो रुपये कमावले असल्याची उदाहरणे आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता.

3) मशरूम शेती हा पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक पूरक व्यवसाय आहे.

4) मशरूम लागवड अत्यंत कमी जागेत तसेच अत्यल्प खर्चात करण्यात येत असल्यामुळे
तसेच या पिकाचे उत्पादन
वर्षभर घेता येत असल्यामुळे
चांगला आर्थिक लाभ होतो.

5) मशरूम शेतीसाठी तुम्ही करत असलेला व्यवसाय सोडायची गरज भासत नाही. सोबतच यातून सुद्धा अधिकची कमाई करता येते.

फक्त 25 गुंठ्यांत हळद लागवड करून 5 लाखाचे उत्पन्न, वाचा प्रेरणादायी यशोगाथा

मशरूम आहे पौष्टिक मुल्यांनी समृद्ध

मशरूम हे अँटिऑक्सिडंट्स, तांबे, प्रथिने आणि जीवनसत्व ड चा उत्तम स्त्रोत आहेत. सर्व मशरूमसाठी पौष्टिक मूल्य जवळजवळ एकसमान असते. एका कप कच्च्या बटन मशरूममध्ये असलेल्या पौष्टिक मूल्यांची माहिती पुढीलप्रमाणे

कॅलरी: 15
प्रथिने: 3 ग्रॅम
फायबर: 2.2 ग्रॅम
कर्बोदके: 1.4 ग्रॅम
चरबी: 0.3 ग्रॅम
सोडियम: 3.5 मिलीग्रॅम

मशरूममध्ये विविध जीवनसत्त्वे तसेच फायबर आणि खनिजे असतात. मशरूमच्या कॅलरीज कमी असतात आणि त्यात ड जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. मशरूमचे नुसते आरोग्यकारी फायदे नसून पौष्टिक आणि औषधी गुणधर्म सुद्धा यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करणे फायदेशीर असते. मशरूम मध्ये अमीनो ऍसिडचे संपूर्ण प्रोफाइल असते जे प्रथिनांचा प्रमुख घटक म्हणून ओळखले जात असल्यामुळे शरीराला प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी मशरूमचे सेवन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

याशिवाय मशरूममध्ये अमीनो ऍसिड, व्हिटॅमिन बी 6 आणि सेरोटोनिन यांसारख्या पौष्टिक मूल्य सामाविष्ट असतात. यांचे औषधी गुणधर्म सुद्धा पाहायला मिळतात. जे मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन देतात आणि मूड, झोप आणि भूक नियंत्रित करण्यावर रामबाण ठरतात. याशिवाय आतड्यांच्या आरोग्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा मशरूमचा वापर केल्या जातो. तसेच त्वचेवर तेज येते आणि केसांची तूट थांबते.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment