सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या, सेंद्रिय शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल

राज्यातील बरेच शेतकरी आज सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसून येतात. सेंद्रिय शेती कमी खर्चिक तर आहेच शिवाय पर्यावरणपूरक सुद्धा आहे. आज सेंद्रिय शेतीची कास धरून राज्यातील अनेक शेतकरी त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत आहेत. मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे योग्यरीत्या कळलेले नाहीत. सेंद्रिय शेती काय असते तसेच या सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहेत याबद्दल जर शेतकऱ्यांच्या सगळ्या शंकांचे निरसन झाले तर अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून प्रचंड उत्पादन मिळविल्या शिवाय राहणार नाहीत.

आजच्या या युगात अत्यंत नुकसानकारक अशा रासायनिक उत्पादनांच्या वापरामुळे शेतातील जमिनीची सुपीकता झपाट्याने कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून बळीराजाच्या उत्पादनात कमालीची घसरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांना या रासायनिक खतांच्या अती वापरामुळे होणारे शेतीतील नुकसानीपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी सेंद्रिय शेतीचे फायदे माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. आज राज्यातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करत असल्याने अशा शेतकऱ्यांना भरपूर शेतीमालाचे उत्पादन मिळत आहे.

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या, सेंद्रिय शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल

शेती करताना कुठ्ल्याही रासायनिक उत्पादनांचा वापर न करता नैसर्गिक उत्पादनांचा वापर करणे यालाच सेंद्रिय शेती असे म्हणतात. या सेंद्रिय शेतीचे फायदे जर शेतकऱ्यांना सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शेतकऱ्यांनी निसर्गाशी सुसंगत आणि घातक रसायनांपासून मुक्त अशी शेती करावी आणि या शेतीतून मिळणारे लाभ घ्यावे. चला तर शेतकऱ्यांनो आपण आता सेंद्रिय शेतीचे फायदे काय काय आहेत हे जाणून घेऊया.

उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेतीचे फायदे सांगताना एक महत्वाचा फायदा म्हणजे या शेतीतून उत्पादित केलेल्या अन्नधान्याचा तसेच पालेभाज्यांचा वापर केल्यास मानवी आरोग्य अतिशय आरोग्यदायी राहते. सेंद्रिय शेतीमध्ये कृत्रिम रसायनांचा अजिबात वापर केला जात नाही, त्यामुळे या सेंद्रिय शेतीतून उत्पादित अन्नधान्य तसेच फळे आणि पालेभाज्या खाल्ल्याने अनेक प्रकारचे आरोग्यदायक लाभ होऊन माणूस हा अनेक शारीरिक व्याधींपासून दूर राहतो. कारण सेंद्रिय शेतीचा वापर कारण पिकविलेल्या अन्नामध्ये भरपूर मातीत पोषणमूल्य आढळून येते. ही पोषणमूल्ये मानवी आरोग्य सुदृढ आणि निरोगी राखण्याचं काम करतात. सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घेऊन आजकाल अनेक श्रीमंत लोक सुद्धा त्यांच्या घराच्या छतावर किंवा पटांगणात त्यांना लागणारे अन्नधान्य किंवा पालेभाज्या पिकवतात.

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या, सेंद्रिय शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल

नैसर्गिक शेतीद्वारे उत्पन्नात होते बक्कळ वाढ

शेतकरी मित्रांनो आपल्यापैकी बरेच शेतकरी आजही आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. रासायनिक पद्धतीने शेती करताना खूप खर्च होतो. मात्र सेंद्रिय शेती करून शेतकऱ्यांचा शेती करण्यासाठी लागणारा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी होतो. म्हणूनच सेंद्रिय शेतीला फायदेशीर शेती म्हटल्या जाते. सेंद्रिय शेतीचे फायदे आरोग्यास उपयुक्त आहेतच, शिवाय कमी खर्चिक अशी ही शेती आहे. सामान्य शेतीतून मिळणारे उत्पादन सेंद्रिय शेतीच्या तुलनेत थोडे जास्त आहे हे जरी खरे आहे, तरी क्वालिटी विरुद्ध क्वांटीटी यानुसार विचार केला तर क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता हेच श्रेष्ठ ठरते.

सेंद्रिय शेतीच्या शेतीमालाला सामान्य शेतीतील शेतीमाल पेक्षा मिळणारा बाजारभाव हा कितीतरी पटीने जास्त असतो. सेंद्रिय शेतीचे फायदे अनेक आहेत. जे आपण आजच्या लेखातून सविस्तरपणे जाणून घेत आहोत. सेंद्रिय शेतीतून मिळणारे अल्प उत्पादन हा अल्पकालीन चिंतेचा विषय आहे. सध्या नैसर्गिक शेतीतून उत्पादनात घट नोंदवली गेली असली तरी हे केवळ सुरुवातीच्या काही वर्षांसाठी आहे. जसजशी शेतकऱ्यांत सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून जागरूकता येईल तसतसे पुढील तीन ते चार वर्षात नैसर्गिक शेतीतून असंख्य शेतकरी सामान्य शेतीप्रमाणे अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतील यात शंका नाही.

सेंद्रिय शेतीचे फायदे जाणून घ्या, सेंद्रिय शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल

सेंद्रीय शेती करून बचत गटाच्या 2 हजार महिलांचे बदलले जीवन

जमिनीचा पोत सुधारून जमीन उपजाऊ होते

सेंद्रिय शेतीचे फायदे पाहत असताना जी शेती बळीराजाच्या जगण्याचे मुख्य माध्यम आहे त्या शेतीची काळजी घेल्या जाते. सेंद्रिय शेतीचे फायदे शेतकऱ्याची शेती अधिकाधिक सुपीक बनवते. सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कृत्रिम खतांचा, विशेषतः युरिया, कीटकनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर टाळला तर त्यांची शेतजमीन सुपीक होऊन अधिकाधिक उत्पादन मिळवून देऊ शकते. या सेंद्रिय शेतीचे फायदे खूप आहेत त्यापैकी एक फायदा म्हणजे या शेतीमुळे जमिनीत राहणाऱ्या सूक्ष्म जीवांचे रक्षण होते आणि त्यामुळे जमिनीची पोत सुधारतो आणि सुपीकता वाढते.

अत्यल्प खर्चात भरघोस उत्पन्न मिळते

सेंद्रिय शेतीला कमी समजण्याची चूक करू नका. शेतकऱ्याला अल्पावधीतच आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या सेंद्रिय शेतीत आहे. सेंद्रिय शेतीचे फायदे बघून तुम्ही सुद्धा सेंद्रिय शेतीकडे एक सुवर्णसंधी म्हणून पाहाल यात दुमत नाही. सेंद्रिय शेतीतून उत्पन्नात भरघोस वाढ करणारे अनेक शेतकरी तुम्हाला इंटरनेटवर शोधल्यास दिसतील. या सेंद्रिय शेतीचे फायदे सांगण्याचा आमचा उद्देश इतकाच आहे की शेतकऱ्यांनी या शेतीचा अवलंब करून त्यांच्या शेतीत होणाऱ्या खर्चात कपात व्हावी, त्यांची जोखीम कमी व्हावी, त्यांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ व्हावी तसेच आंतरपीकातून अधिकाधिक उत्पादन घेऊन या शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि नफा मोठ्या प्रमाणावर वाढवणे हा आहे. एका आकडेवारीनुसार नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च तिप्पट कमी झाला असून त्यामुळे या शेतकऱ्यांची कमाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत.

सेंद्रिय शेतीमाल उत्पादनांना जागतिक पातळीवर प्रचंड मागणी

शेतकरी मित्रांनो प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांसाठी 2019 ची जागतिक बाजारपेठ सुमारे $140 अब्ज आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे $2.6 अब्ज इतकी वाढली आहे. त्यामुळे या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळाली आहे. तुम्ही सुद्धा सेंद्रिय शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेऊन ते आंतरराष्ट्रीय पातळीवर विकू शकता. आज जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. सरकार सुद्धा शेतीमालाच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देत आहे. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेतीचा अवलंब करून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती आहे.

खते तयार करणे सोपे आणि अत्यल्प खर्च

शेतकरी मित्रांनो सेंद्रिय शेतीसाठी लागणारी खते ही पूणपणे शेतीसाठी सुरक्षित तसेच नैसर्गिक पद्धतीने तयार केल्या जातात. या खतांसाठी जास्तीचा खर्च सुद्धा येत नाही. सामान्य शेतकरी अगदी सहज आहे त्या साधनांचा वापर करून सेंद्रिय खते तयार करू शकतात.
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिक खाण्याचे खत, हाडांछे खत, तेलबियांची पेंड इत्यादी खतांचा समावेश होतो. ही सर्व खते पर्यावरणपूरक असून यांना बनविण्यासाठी खर्च सुद्धा कमी येतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!