शेतकरी मित्रांनो काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे? या महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत. शेतकऱ्यांनी काळ्या हळदीची शेती करावी की नाही याचा निर्णय घ्यायला शेतकऱ्यांना या लेखामुळे निश्चितच फायदा होईल हा आमचा विश्वास आहे.
नावीन्यपूर्ण शेती करून नक्कीच आर्थिक प्रगती साधता येते हे असंख्य शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. मागे आपण काळ्या टोमॅटोची शेती कशी करतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आज या लेखातून आपण काळ्या हळदीची लगवड शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजपर्यंत बऱ्याच जणांना हळद काळी सुद्धा असते असे माहीत नसेल. मात्र काळ्या हळदीची शेती करणारे बरेच शेतकरी भरघोस उत्पन्न घेताना दिसून येतात. काळ्या हळदीचा वापर औषधी म्हणून होतो. तर या काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे याबद्दल काही महत्वाचे मुद्दे आपल्याला माहीत होणार आहेत. काळी हळद आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर कशी आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. चला तर काळ्या हळदी विषयी रोचक माहिती जाणून घ्यायला सुरुवात करुया.
काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे?
बरेच शेतकरी बांधव हे आर्थिक दृष्ट्या पाहिजे तेवढे सक्षम नसतात. त्यामुळे काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे याची माहिती घेतल्यास अगदी सामान्य शेतकरी सुद्धा या शेतीचा खर्च उचलू शकतात. तर मित्रांनो काळ्या हळदीची लागवड कमी खर्चिक कशी आहे याची माहिती पाहूया.
रासायनिक खतांची गरज नाही
शेतकरी मित्रांनो काळ्या हळदीची शेती करण्यासाठी महागड्या रासायनिक खतांचा पुरवठा करण्याची काहीच गरज नसते. शेत तयार करताना जुने शेणखत मातीत मिसळून झाडांना द्यावे लागत असते. एकरी 10 ते 12 टन कुजलेले शेण शेतात टाकले की झालं. घरी तयार केलेले जीवामृत झाडांना सिंचनासोबत द्यायला काही खर्च सुद्धा लागणार नाही.
तणनाशकाचा/ कीटकनाशकाचा खर्च नाही
आणि शेतकरी बांधवांनो काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे तर या शेतीत तण फक्त सुरुवातीस 50 दिवसच काढावे लागते. शेतातील तण काढायची गरज सुद्धा पडत नाही. तणनियंत्रण तणनाशकाद्वारे केले जाते. रोपे लावल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी हलकी खुरपणी करावी लागेल. तण नियंत्रणासाठी 3 कुंडी पुरेशी आहे. प्रत्येक खुरपणी 20 दिवसांच्या अंतराने करायची आहे. लावणीनंतर 50 दिवसांनी तण काढणे बंद करावे लागेल, नाहीतर कंद खराब होतील. त्यामुळे तणनशकावर होणार अधिकचा खर्च सुद्धा काळ्या हळदीची शेती करण्यास लागत नाही. काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे हे सिध्द होण्यासाठी आपण अनेक बाबींचे अवलोकन करत आहोत.
हेक्टरी 12 ते 15 टन उत्पादन
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण 8 ते 9 महिन्यात काळ्या हळदीचे पिक काढणीस येते. पीक लावणीनंतर सुमारे 250 दिवसांनी काढणीसाठी तयार होते. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंद खोदले जातात. त्याचे उत्पादन प्रति रोप 2 ते 2.5 किलो असा अंदाज आहे. एका हेक्टरमध्ये 1100 रोपे लावता येत असून, त्यातून हेक्टरी 48 टन पर्यंत उत्पादन प्राप्त होते. प्रति एकर उत्पादन सुमारे 12 ते 15 टन आहे, जे सुकल्यानंतर एक ते दीड टन वजनाचे होते. आणि या उत्पादनास जास्त खर्च येत नसून भाव मात्र अगदी प्रचंड भेटतो. परिणामी काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का ठरते या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळते.
जास्त सिंचनाची गरज नाही
काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का ठरते हे जाणून घण्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट जाणून घ्या. काळ्या हळदीच्या झाडांना जास्त सिंचनाची गरज नसते. त्याचे कंद ओलसर जमिनीत लावले जातात. त्याचे कंद किंवा रोपे लावल्यानंतर लगेचच पाणी द्यावे लागेल. सौम्य उष्ण हवामानात त्याच्या झाडांना 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागेल. हिवाळ्याच्या हंगामात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागेल. गहू, उसाच्या पिकासरखे जास्त सिंचन सुद्धा काळ्या हळदीची शेती करण्यास लागत नाही. अगदी कमी पाण्याची उपलब्धता असणारे शेतकरी सुद्धा ही शेती आरामात करू शकतात.
पैसा कमी लागतो मात्र सुपीक जमीन असावी
शेतकरी मित्रांनो काळ्या पाषाणात हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का ठरते तर काळी हळद लागवड ही वालुकामय, चिकणमाती, मटियार, मध्यम पाणी धरणारी अशी जमीन या लागवडीसाठी उत्तम ठरते. काळ्या हळदीचे कंद गुळगुळीत काळ्या मिश्रित जमिनीत विकसित होत नाहीत हे लक्षात असू द्या. तुमच्या जमिनीत भरपूर जीवाश्म असले पाहिजेत. पाणी साचलेल्या किंवा कमी सुपीक जमिनीत त्याची लागवड करता येत नाही. लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य 5 ते 7 दरम्यान असावे लागते.
पुन्हा लागवड करण्याची गरज नाही
काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे हे आपल्याला समजण्यासाठी या लागवडीची सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे ते बघुया.
काळी हळद ही 7 ते 9 महिन्यातच येणार पीक असून पीक काढताना जमिनीत एक कंद तसाच ठेवला तर त्या कांदला पुन्हा हळद येत असल्यामुळे पुन्हा पुढील वर्षी काळ्या हळदीच्या लागवडीवर खर्च करावा लागत नाही. मात्र मिळणारे उत्पादन प्रचंड असेल. असेच दरवर्षी करता येईल. या कारणामुळे काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे या महत्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेलच याची खात्री आहे.
किमान भाव मिळाला तरी व्हाल मालामाल
शेतकरी मित्रांनो काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला या हळदीला काय भाव मिळतो याबद्दल माहिती घेणे क्रमप्राप्त ठरते. आंतरराष्ट्रीय मानकानुसार दर्जा असलेल्या काळ्या हळदीला 4 हजाराचा दर आरामात मिळतो. अनेक ऑनलाईन वेबसाईट्सवर काळी हळद पाचशे रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंत विकली जाते. तुम्ही अगदी 500 रुपयांच्या किमान किंमतीत जरी तुम्ही हळद विकली तरी तुम्हाला 15 क्विंटलमधून 7 ते 8 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. आणि जर तुमची हळद उच्च दर्जाची असेल तर 3 ते 4 हजार रुपये किलो भावाने विकल्या गेली तर मात्र तुम्ही अगदी घरबसल्या मालामाल होऊ शकता यात शंका नाही.
शेवग्याची शेती आणि शेंगीचे प्रॉडक्ट्स बनवून ही मुलगी कमवते वर्षाला तब्बल 1.75 कोटी रुपये
काळी हळद इतकी महाग का विकल्या जाते?
शेतकरी मित्रांनो काळ्या हळदीला औषधी म्हणून जास्त वापरतात. अनेक सौंदर्य प्रसाधनांपासून ते महागड्या औषधांत काळ्या हळदीचा वापर केल्या जातो. कारण हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार या सर्व रोगांच्या औषधी बनविण्यासाठी काळी हळद एक महत्वाचा घटक म्हणून प्रभावी ठरतो. याच कारणामुळे काळी हळद तिच्या दर्जानुसार अत्यंत महाग विकल्या जाते. आता तुम्हाला पटले ना काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे ते.
काळ्या हळदीच्या लागवडीबद्दल सविस्तर माहिती लवकरच पुढील एखाद्या लेखातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल त्यामुळे कामाची बातमी या शेतीविषयक ब्लॉग ला सबस्क्राइब अवश्य करा आणि नेहमी भेट देत रहा.