आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त संधीची. मात्र असे सुद्धा बरेच लोक आहेत जे विपरीत परिस्थितीत सुद्धा संधी शोधतात पण स्वस्थ न बसता आपल्यासाठी नवनवीन संधी निर्माण करून त्या संधीचे सोने करतात आणि यशस्वी जीवन जगतात. याच गोष्टीची प्रचिती तुम्हाला आजच्या या रोचक लेखातून येईल. शेतकऱ्याच्या आठवीतील मुलाने फक्त 100 रुपयांत हरभरा खुडणी यंत्र तयार करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बिकट परिस्थितीचा बहाणा करून गुपचूप बसणारे बरेच लोक असतात मात्र या मुलाने आपल्या वडिलांना मदत व्हावी म्हणून टाकावू पासून टिकावू या संकल्पनेतून फक्त 100 रुपयांत हर हरभरा खुडणी यंत्र तयार केले आहे. या हुशार मुलाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. चला तर जणू घेऊया कुठला आहे हा मुलगा आणि त्याने फक्त 100 रुपयांत हर हरभरा खुडणी यंत्र कसे तयार केले याबदल सविस्तर माहिती.
कुठला आहे हा होतकरू शेतकरीपुत्र?
आपल्याला सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली असेल की हा मुलगा कोणत्या गावचा आहे. तर मित्रांनो हा मुलगा भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरी येथील असून तो इयत्ता आठवीत शिकतो. या मुलाचे नाव गोरख संजय ठोंबरे असून या मुलाने टाकाऊ वस्तूंपासून फक्त 100 रुपयांत हरभरा खुडणी यंत्र तयार केले आहे. अवघ्या शंभर रुपये खर्चात तयार झालेल्या या यंत्राद्वारे या हुशार मुलाने दहा ते पंधरा एकर हरभऱ्याची खुडणी सुद्धा केली आहे.
आठवीतील मुलाला कशी सुचली कल्पना?
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटल्या जाते. माणसाला एखाद्या गोष्टीची गरज भासली की तो त्या गोष्टीला कसे प्राप्त करता येईल याच्या विचारात गढून जातो. अशातच ती वस्तू निर्माण होऊन उपलब्ध होते. माणसाच्या मनातील कल्पना सत्यात उतरते.अशीच गोष्ट गोरख ठोंबरे या मुलाने शक्य करून दाखवली.
शोधक बुद्धी असलेला तसेच जिज्ञासू गोरख ठोंबरे हा मुलगा भोकरदन येथील न्यू हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असून घरी हरभरा खुडनी यंत्र नाही हे पाहून त्याने सुटीच्या दिवशी नादुरुस्त झालेल्या पिचकरीमधील मोटार काढली. त्यात त्याने पाच फूट वायर घेऊन चालू असलेल्या पिचकरीवर टेस्टिंग केली. सदरील मोटार चालू असल्याने त्याला हरभरा खुडणीची कल्पना सत्यात उतरविण्याचा निश्चय केला. या मुलाने टाकावू वस्तूंपासून फक्त 100 रुपयांत हरभरा खुडणी यंत्र निर्मिती केली.
काळ्या हळदीची शेती शेतकऱ्यांसाठी नफ्याची का आहे? जाणून घ्या
खुडणी यंत्राची निर्मिती आणि शेतात वापर
गोरख ठोंबरे याने हेरले की ही बिघाड झालेली पिचकारी भंगारमध्ये जाणार आहे. यापासून काहीतरी बनविता येऊ शकेल का हा विचार त्याने केला. त्यासाठी या मुलाने त्या पिचकारी मधील मोटार काढून तिची टेस्ट केली. ती मोटार कार्य करत आहे हे कळल्यावर त्याने हरभरा खुडणी यंत्र तयार करण्याचे ठरवून ते काम पूर्णत्वास नेले. हे हरभरा खुडणी यंत्र बनविण्यासाठी त्याला आठ ते दहा दिवस लागले. मात्र आज सुद्धा हे फक्त 100 रुपयांत बनलेले बर हरभरा खुडणी यंत्र यशस्वीरित्या कार्य करत असून या यंत्राच्या साहाय्याने या मुलाने आतापर्यंत 10 ते 15 एकर शेतात हरभरा खुडणीचे काम पूर्ण केले आहे. बाजारात विकत घ्यायला गेलो तर नवीन हरभरा खुडणी यंत्र हजार ते पंधराशे रुपयांना मिळते. मात्र गोरखने टाकाऊपासून टिकाऊ यंत्र निर्माण करून त्याच्या वडिलांचे पैसे वाचवले.
बापरे…. सेंद्रिय शेतीचे इतके सगळे फायदे
फक्त 100 रुपयांत हरभरा खुडणी यंत्र झाले तयार
या हरभरा खुडणी यंत्रास आलेला खर्च पुढीलप्रमाणे
तीन फूट पीव्हीसी नळी : 20 रुपये
वायर चार फूट : 20 रुपये
वायर पीन- बिघाड झालेल्या चार्जरची
वायसर : 10 रुपये
लोखंडी पत्रा : 20 रुपये
इतर सहित्य : 30 रुपये
हरभरा खुडणी का असते आवश्यक?
शेतकरी मित्रांनो हरभरा तसेच तूर पिकांचे शेंडे खुडणी केल्यामुळे झाडांची कायिक (अतिरिक्त) वाढ थांबवली जाऊन झाडांची फुटव्याची क्षमता वाढते उत्पादनात भर पडते. महिला मजूर सुद्धा हरभऱ्याची खुडणी करतात पण रोजंदारीत वाढ झाल्यामुळे अशी खुडणी शेतकऱ्यांना परवडत नाही. काही काळापासून तंत्रज्ञात विकसित झाल्याने बाजारात हजार ते पंधराशे रुपयांत खुडणी यंत्र मिळते. बरेच शेतकरी आता या यंत्राच्या साहाय्यानेच हरभरा खुडणी करतात.
तर शेतकरी मित्रांनो या आठव्या वर्गात शिकणाऱ्या गोरख ठोंबरेच्या या प्रेरणादायी उदाहरणातून तुम्ही काय बोध घेतला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच शेतीविषयी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, लागवड माहिती आणि नवनवीन सरकारी कृषी योजना जाणून घेण्यासाठी आमच्या कामाची बातमी या शेतीविषयक ब्लॉगला नेहमी भेट देत रहा.