जाणून घ्या तव्याचा नांगर (Disc Plough)कसा आणि का वापरतात

शेतकरी मित्रांनो, शेतीची पूर्वमशागत करण्यासाठी आपल्याला नांगरट करावी लागते. पूर्वी बैलाच्या साहाय्याने अन् आताच्या काळात यांत्रिकीकरण प्रगत झाल्यामुळे विविध स्वयंचलित यंत्रांचा शोध लागल्यामुळे नांगरणी करणे अगदी सोप्पे झाले आहे. आज आपण तव्याचा नांगर का आणि कसा तसेच कोणत्या जमिनीसाठी वापरल्या जातो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नांगराचे विविध प्रकार असतात. आपण प्रत्येक लेखात एक एक प्रकार सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया तव्याचा नांगर का आणि कसा वापरायचा तसेच या तवा नांगराची काय आहेत वैशिष्ट्ये आणि कोणत्या जमिनीसाठी तव्याचा नांगर वापरला जातो या सर्व बाबींची सविस्तर माहिती.

तव्याचा नांगर (Disc Plough) का वापरला जातो?

शेतकरी बांधवांनो शेतीविषयक अवजारांची सखोल माहिती असली तर शेतीची योग्य वेळी अचूक मशागत करता येणे सहज शक्य होते. परिणामी पिकाच्या उत्पादनवाढीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. फाळाचा नांगर आपल्याला प्रचलित आहेच. आज जाणून घेऊया तव्याचा नांगर शोधण्याची गरज का पडली याबद्दल माहिती. तर मित्रांनो जमिनीच्या बाजूकडील ओढ व घर्षण कमी करण्यासाठी तव्याचा नांगर शोधल्या गेला आणि या नांगराचा विकास केल्या गेला.

इथे एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हा नांगर ओढण्यासाठी फाळाच्या नांगरापेक्षा कमी ताकत लागते. अत्यंत कडक जमिनी अशा असतात जिथे फाळाचा नांगर प्रभावी ठरत नाही. अशावेळी कठीण व दगडगोट्यांचा जमिनी नांगरण्यासाठी तव्याचा नांगर अत्यंत फायदेशीर ठरतो. यामध्ये नांगराच्या तव्याचा व्यास 60 ते 90 सेंमी. इतका असतो. तसेच तव्याच्या कडा धारदार असतात. नांगरणीची खोली कमी-जास्त करण्यासाठी तव्यांचा कोन कमी-जास्त करण्याची सुविधा या यंत्रात असते.

लक्षात घ्या नांगराचा जमिनीशी होणार कोन हा 47 अंश पेक्षा कमी नसावा. असे झाल्यास तव्यांची गती वाढून कार्यक्षमता कमी होते. शेतीची नांगरणी करताना नांगरावर वजन ठेवूनसुद्धा खोली काही प्रमाणात वाढविता येऊ शकते. तव्यांची संख्या ही यंत्राच्या एच. पी. (अश्र्वशक्ती ) वर ठरत असते. खडकाळ जमिनीसाठी तव्याचा नांगर अत्यंत प्रभावीपणे नांगरटी करण्यास कामी येतो.

तव्याचा नांगर

असा असतो तव्याचा नांगर

शेतकरी मित्रांनो तव्याचा नांगर हा मुख्यकरून 2 ते 4 तव्यांचा असतो. मात्र गरजेनुसार त्यांची संख्या कमी जास्त करता येते. या नांगर मध्ये सण्यांची संख्या 2 ते 4 एवढी असते. तसेच तव्याचा आकार 600mm ते 600 mm एवढा असतो. यांची लांबी 1180 mm ते 2362 mm असून रुंदी 889mm ते 1194 mm असते. उंचीचा विचार केला तर याची उंची 1092mm ते 1118 mm असते. यात प्रति तव्याची कापण्याची रुंदी 200 mm ते 300 mm एवढी असते. adjustable वर्किंग विडथ 600mm ते 1200 mm असते. या तव्यांच्या खोली बाबत बोलायचे झाल्यास 300 mm पर्यंत याची खोली असते. तव्याचे नांगर चालविण्यासाठी ट्रॅक्टर हे 25 ते 50 एच.पी. शक्तीचे असावे लागते.

हे आहे करोडपती शेतकऱ्यांचं गाव, कमाई ऐकून व्हाल थक्क

तव्याचा नांगर (Disc Plough) या जमिनीसाठी वापरतात

आज कृषी क्षेत्रात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे नवनवीन यंत्रांचा शोध लागल्यामुळे शेती करणे आधी पेक्षा खूपच सोईस्कर झाले आहे. त्यापैकी एक असलेला विकसित हा नांगर हा प्राथमिक मशागतीसाठी वापरल्या जातो. जी जमीन कठीण, कोरडी असते तसेच गवताळ, दगडी असते अशा जमिनीत फाळांचा नांगर कुचकामी ठरतो. अशा शेजमीनीची पूर्व मशागत करण्यासाठी म्हणजेच नांगरणी करण्यासाठी तव्याचा नांगर अत्यंत कार्यक्षम ठरतो. आणि अशा जमिनीत भरपूर उत्पादन घेण्यासाठी शेतीची योग्य मशागत करता येणे सहजशक्य होते.

हा नांगर इतक्या रुपयांना मिळतो

मित्रांनो तव्याचे नांगर का आणि कसे वापरतात याची आपण माहिती जाणून घेतली. आता आपण जाणून घेऊया या तव्याच्या नांगराची किंमत किती असते याची माहिती. तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला 30 हजार ते 50 हजार या दरम्यान तव्याचा नांगर विकत घेता येईल. या नांगराचे वजन सरासरी 236 ते 336 किलो एवढे असते.

शोध कोणी आणि कधी लावला?

मित्रांनो तव्याच्या नांगराचा शोध ओले रिंगनेस नावाच्या टेक्सासमध्ये एक नॉर्वेजियन स्थलांतरित व्यक्तीने लावला होता. रिंगनेसला त्याच्या वॅगन व्हील कपचे एक्सलवर निरीक्षण केल्यावर डिस्क नांगराचा शोध लावण्याची कल्पना सुचली होती. त्यांच्या वडिलांचे एक दुकान होते आणि व्यवसायाने ते एक लोहार होते. याच दुकानात त्यांनी तव्याच्या नांगराचे मॉडेल तयार केले होते. 1872 साली त्यांना तव्याच्या नांगराचे पेटंट मिळाले.

जसा आपण वर उल्लेख केला तव्याचा नांगर हे एक असे यंत्र आहे ज्यामध्ये नांगराला फाळाच्या ऐवजी चकत्या तव्याप्रमाने चकत्या जोडलेल्या असतात ज्या जमिनीतील माती वेगवेगळ्या दिशेने वळविण्याचे कार्य करतात. याचा वापर तण नियंत्रणासाठी, 150 मिमी पर्यंत खोल खोदण्यासाठी, बियाणे तयार करण्यासाठी तसेच पॅडॉक सपाट करण्यासाठी केला जाऊ शकतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment