शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन व्यवसाय फारच आवडतात. एक म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी पशुपालन आणि कुक्कुटपालन. आज गावरान कोंबडीपालन करून लाखो रुपये कमावण्याची सुरुवात कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच शेतकऱ्यांना गावरान कोंबडीपालन करून अधिकचे उत्पन्न प्राप्त करण्यास मदत होईल. शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहण्याची गरज सुद्धा पडणार नाही. गावरान कोंबडीपालन यशस्वी करून आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी काय करावे याबद्दल आजच्या या लेखातून महत्वपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वात आधी या गावरान कोंबडीपालन करण्यासाठी लागणारी बाब म्हणजे कोंबड्यांना राहायची व्यवस्था करणे. म्हणजेच शेड उभारणे गरजेचे असते. आता शेड कशा पद्धतीने बांधावे या बद्दल जाणून घेऊया.
100 गावरान कोंबडी पालनासाठी सरासरी खर्च आणि इतर बाबी
शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला जर शंभर गावरान कोंबड्या घेऊन व्यवसाय सुरू करायचा असेल प्रत्येकी सरासरी 400 रुपयाला एक कोंबडी आणि 600 रुपयाला एक कोंबडा याप्रमाणे तर सरासरी कोंबड्यांचा एकूण खर्च 55 ते 60 हजार रुपये येईल. आणि पत्र्याचे बंदीस्त शेड बांधल्यास 40 ते 50 हजार रुपये लागतील. म्हणजेच एकूण एक लाख भांडवलात तुमचा 100 कोंबड्यांचा व्यवसाय सुरू होऊ शकतो. तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर सुरुवातीला 10 ते 20 कोंबड्या घेऊन अर्धबंदिस्त पद्धतीने गावरान कोंबडीपालन करू शकता. यामध्ये 4 महिन्याच्या कालावधीत त्यापासून अंडी अन् कोंबडी निर्मिती होऊन हळूहळू तुमचा व्यवसाय वाढेल. अर्ध बंदीस्त शेड पद्धतीत तुम्हाला खाद्य जास्त लागणार नाही. पूर्णपणे बंदिस्त शेड पद्धतीत तुमचा खाद्यावर थोडा जास्त खर्च होईल. तुमच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे किती सुरुवातीला कोंबड्या पाळायच्या आहेत हे ठरवा.
गावरान कोंबडी पालनासाठी शेड उभारणी
शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा गावरान कोंबडीपालन करण्याची इच्छा आहे तर मग तुमच्या मनातील ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी चला शिघ्रगतिने कामाला लागा. गावरान कोंबडी पालन करण्यासाठी सिमेंट किंवा पत्र्याच्या किंवा जाळीच्या शेडची उभारणी करणे शक्य असेल तर फारच उत्तम. तुम्ही तुमचा हा शेड 19×40 फूट, किंवा 20×60 फूट इतक्या आकारमानाचा तयार करू शकता. तुम्ही बांधलेले हे शेड 500 गावरान कोंबडीपालन करण्यास पुरेसे आहे. या शेडमध्ये कोंबड्यांचे नैसर्गिक मुक्तसंचार पद्धतीने संगोपन करण्यासाठी व्यवस्था तुम्हाला करावी लागणार आहे. कोंबड्यांना बसण्यासाठी लाकडे ठेवता येतील. या गावरान कोंबड्यांसाठी पाण्याची सुविधा, बसण्यासाठी सुविधा, अंडी घालण्यासाठी डब्याची व्यवस्था सुद्धा करून तुमचे शेड गावरान कोंबडीपालन करण्यासाठी सज्ज होईल.
![गावरान कोंबडीपालन व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, असे करा नियोजन, खाद्य, शेड निर्मिती, उत्पन्न, खर्च, रोग व्यवस्थापन, संपुर्ण माहिती गावरान कोंबडीपालन व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, असे करा नियोजन, खाद्य, शेड निर्मिती, उत्पन्न, खर्च, रोग व्यवस्थापन, संपुर्ण माहिती](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-19-10-42-16-66.png)
गावरान कोंबडीपालन विषयी ज्ञान अवगत करा
तुम्हाला जर तुमचा गावरान कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर बनवायचा असेल, तर त्यासाठी आधुनिक गावरान कोंबडीपालन कसे करतात याबाबत इत्यंभूत ज्ञान मिळवावे लागेल. यासाठी कुठं जायची गरज नाही. इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपण गावरान कोंबडीपालन करण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान सहज घेऊ शकता. व्यवसायाच्या सुरुवातीला कोंबडीपालनाचे शास्त्रीय प्रशिक्षण घ्या, यासाठी तालुका पशू विभागास संपर्क करा. ते तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करतील. तसेच त्याविषयी प्रशिक्षण देतील.
इंजिनियरींग सोडून सुरू केला शेळीपालन व्यवसाय, आज हा तरुण कमावतो वर्षाला तब्बल सव्वा कोटी रुपये
कोंबडीपालन यशस्वी होण्यासाठी गावरान कोंबड्यांच्या संगोपनात असलेले बारकावे, कोबड्यांचे आरोग्य, नियमित लसीकरण, त्यांचे खाद्य व्यवस्थापन या विषयी पुरेशी माहिती मिळवावी लागेल. एकदा का शेड उभारले की मग गावरान कोंबड्या खरेदी करून त्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली की अल्पावधीतच तुम्हाला प्रत्यक्षात कोंबडीपालन कसे करतात याविषयी इत्यंभूत माहिती होऊन तुम्ही तुमचा गावरान कोंबडीपालन हा व्यवसाय फायदेशीर करू शकाल.
![गावरान कोंबडीपालन व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, असे करा नियोजन, खाद्य, शेड निर्मिती, उत्पन्न, खर्च, रोग व्यवस्थापन, संपुर्ण माहिती गावरान कोंबडीपालन व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, असे करा नियोजन, खाद्य, शेड निर्मिती, उत्पन्न, खर्च, रोग व्यवस्थापन, संपुर्ण माहिती](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-19-10-43-48-38.png)
गाढवाचं दूध विकून हा शेतकरी कमावतो महिन्याला 3 लाख रुपये
चारच महिन्यात मिळू लागते उत्पन्न
शेतकरी मित्रांनो तुम्ही कोंबड्या घेऊन गावरान कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला की साधारण चार महिन्यांतच तुम्हाला या कोंबडीपालन व्यवसायातून अर्थार्जन करता येईल. तीन ते चार महिने योग्य पद्धतीने संगोपन केल्यानंतर एका कोंबडीचे वजन साधारण 1200 ते 1400 ग्रॅमपर्यंत भरते. गावरान कोंबड्यांची विक्री प्रति नगाप्रमाणे केली जाते. आणि महत्वाचे म्हणजे या गावरान कोंबडी अंडी सुद्धा खूप महाग विकल्या जातात. गावात एका अंड्याची किंमत 15 रुपये असून शहरात ती 20 ते 30 रुपये असू शकते. कारण गावरान कोंबडीपालन हे मर्यादित लोक करत असल्यामुळे या अंड्यांची प्रचंड मागणी असते. या कोंबड्यांपासून मिळणाऱ्या अंड्यांची विक्री करून रोज हजारो रुपये नफा मिळवता येतो.
या गावरान कुक्कुटपालन व्यवसायातून अशी होते कमाई
अतिशय फायदेशीर ठरणाऱ्या या गावरान कोंबडी पालन व्यवसायातून अंडी उत्पादन घेण्यास सुरुवात केल्यावर हळूहळू त्यात वाढ होत जाते. 3 ते 4 महिन्यातच दररोज जवळपास 60 ते 70 अंड्यांचे उत्पादन प्राप्त होते. उत्पादित काही अंड्यांची विक्री केली जाऊन काही अंडी उबवण करण्यासाठी राखून ठेवली जातात. तसेच तुम्ही तुमच्या शेडमध्येच आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतींनी या अंड्यापासून पिलांची निर्मिती करू शकता. आज तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की अंडी उबवण मशिन सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. याप्रमाणे अंडी, लहान पिले तसेच मोठ्या कोंबड्याच्या विक्रीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येते.
![गावरान कोंबडीपालन व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, असे करा नियोजन, खाद्य, शेड निर्मिती, उत्पन्न, खर्च, रोग व्यवस्थापन, संपुर्ण माहिती गावरान कोंबडीपालन व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, असे करा नियोजन, खाद्य, शेड निर्मिती, उत्पन्न, खर्च, रोग व्यवस्थापन, संपुर्ण माहिती](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-19-10-46-11-53.png)
गावरान कुक्कुटपालन व्यवस्थापन असे करा
तुम्हाला जर गावरान कुक्कुटपालन करून भरघोस कमाई करायची असेल तर कोंबड्यांच्या संगोपनासाठी योग्य पद्धतीने प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. फार्मच्या योग्य व्यवस्थापनावर भर दिला तर तुम्ही अधिकाधिक उत्पन्न मिळवाल ही हमी आहे. यासाठी कोंबड्यांच्या निवाऱ्यासाठी आणि मुक्त संचारासाठी शेड उभारतेवेळी वेगळी जागा सोडा. असे केल्यास कोंबड्यांना मुक्त संचार करणे शक्य होऊन त्यांची चांगल्या पद्धतीने शारीरिक वाढ होण्यास मदत होते. परिणामी अपेक्षित वजन भरून उत्पन्नात वाढ होते. कोंबड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मुक्तसंचार पद्धती अत्यंत लाभदायक आहे.
याशिवाय कोंबड्याचे शेड जर शेतात असेल तर त्यात फिरताना त्यांना सावली उपलब्ध होण्यासाठी पिकांची लागवड करता येऊ शकते. एकदा तुमचे उत्पन्न वाढू लागले मी मग लहान पिलांसाठी नवीन शेड उभारू शकता. मात्र हा व्यवसाय करत असताना कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन तसेचआरोग्य व्यवस्थापनावर यामध्ये जातीने लक्ष घाला. शेडमध्ये खाद्य, पाण्यासाठी भांडी ठेवा. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा.
गावरान कोंबडी रोग व्यवस्थापन
शेतकरी बांधवांनो गावरान कोंबड्यांना होणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, नियमितपणे शेडची स्वच्छता राखणे गरजेचे असते. याशिवाय कोंबड्यांचा योग्य लसीकरण देण्याची गरज असते. तसेच त्यांच्या जिवाच्या सुरक्षेची उपाययोजना करणे सुद्धा तितकेच महत्वाचे ठरते. कोंबड्यांना होणाऱ्या रोगांची लक्षणे वेळीच ओळखून उपाययोजना करून तुम्ही होणाऱ्या नुकसानीला टाळू शकता.
कोंबड्यांना होणाऱ्या काही रोगांची माहिती
गावरान कोंबड्यांना फॉउल पॉक्स, संसर्गजन्य ब्राँकायटिस, लिम्फॉइड ल्युकोसिस, राणीखेत रोग, मानमोडी रोग यांसारखे आजार होतात. या रोगापासून बचाव करण्यासाठी वर दिलेल्या गोष्टी आवर्जून करा. याशिवाय कोंबड्यांना होणाऱ्या रोगांचे कारणे कोणती असतात याविषयी अधिक माहिती द्यायची म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असली की त्यांना रोग होतात. आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे समतोल आहार न मिळणे, शुद्ध हवेची कमतरता इत्यादी गोष्टी. गावरान कोंबडीपालन यशस्वी करण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य आहे.
रोग निवारण उपाय कोणते आहेत?
तुम्हाला कर तुमच्या शेड मधील काही कोंबड्या असल्याचे निदर्शनास आले तर आजारी कोंबडीला इतर कोंबड्यांकासून वेगळे ठेवा. आजारी कोंबडीला वेळेवर हायड्रेशन आणि अन्नपुरवठा करा. त्यांना पाचक सहाय्यक पूरक आहार द्या. पुन्हा अधोरेखित करतो की शेडची स्वच्छता राखा. हे खूप महत्त्वाचे आहे. कोंबड्यांना योग्य वेळी लसीकरण करा. एवढं केलं की त्यांच्या जैवसुरक्षेची मोठ्या प्रमाणात हमी मिळून कोंबड्या जास्त मारणार नाहीत.
दुग्ध व्यवसायासाठी वरदान ठरलेली मुऱ्हा म्हैस देते दिवसाला 25 ते 30 लिटर दूध
गावरान कोंबडीपालन फायदेशीर करण्यासाठी खाद्य व्यवस्थापन
गावरान कोंबड्यांच्या संगोपनात त्यांच्या खाद्यावर होणारा खर्च हा तुलनेने कमी असतो. याचे कारण म्हणजे या गावरान कोंबड्या जमिनीवरील किडे, खाद्य खाऊन जगतात. त्यामुळे या गावरान कोंबड्याना विशेष खाद्य देण्याची गरज नसली तरी सुद्धा कोंबड्यांना हॉटेल वेस्ट, भाजीपाला, गिरणीतील पीठ, वाया जाणारे धान्य इत्यादी खाद्य खाऊ घातल्या जाते. याशिवाय मका, ज्वारी, गहू, तुटलेला तांदूळ, तांदळाची भुशी, गव्हाची भुशी या प्रकारचे कर्बोदके जास्त प्रमाणात असलेले खाद्य द्या. तांदूळ,मका खाद्य म्हणू दिल्यास उत्तम, कारण त्यात ऊर्जेचे प्रमाण खूप अधिक असते. तसेच कोंबड्यांना आवडणारे खाद्य आहे.
एका गावरान कोंबडीची किंमत 400 ते 1000 रुपये
गावरान कोंबडीपालन हा व्यवसाय फायदेशीर ठरण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या गावरान कोंबड्यांना आणि त्यांच्या अंड्यांना असलेली प्रचंड मागणी. सध्या गावरान कोंबडीची किंमत प्रति नग 400 ते 600 रुपये, तर कोंबडा प्रति नग 800 ते 1000 रुपये प्रमाणे विक्री केली जाते. तसेच उत्पादित अंड्याची उबवण करून पिलांची थेट वयानुसार विक्री केली जाते. महिन्याकाठी जवळपास 30 ते 50 जिवंत कोंबड्यांची विक्री होते. विविध ठिकाणच्या यात्रा आणि उत्सव असला की मागणी प्रचंड वाढते. त्या वेळी तुमची भरगच्च कमाई होईल यात शंका नाही.
ग्राहकांची गर्दी, स्वतः येऊन खरेदी करतात
शेतकरी मित्रांनो तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वाढविलेल्या गावरान कोंबड्यांची जागेवरूनच विक्री अगदी आरामात केल्या जाऊ शकते. यासाठी तुम्ही सोशल मीडियावर जाहिरात टाकू शकता. म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप यांसारख्या प्लॅटफॉर्म वरून सुद्धा तुम्ही मुबलक ग्राहक मिळतील. अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून गावरान कोंबड्यांच्या विक्रीसाठी जाहिरात केल्यापासून ग्राहक थेट फार्मवर येऊन खरेदी करू लागले आहेत. म्हणूनच या गावरान कोंबडीपालन व्यवसायात विक्रीसाठी कुठ्ल्याही अडचणी येत नाहीत. फार्मवर आल्यानंतर ग्राहक त्यांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य असणारी कोंबडी खरेदी करतात.