खमंग फोडणी कढीपत्याशिवाय अपूर्णच. कढीपत्त्याची आपल्या स्वयंपाक घरातील हजेरी म्हणजे स्वादिष्ट जेवणाची जणू हमीच. आता कढीपत्त्याची इतकी मागणी असल्यावर एका शेतकऱ्याने कढीपत्ता शेती करायचा निर्णय घेतला. हा शेतकरी कढीपत्ता शेती करून वर्षाला लाखो रुपयांचे भरघोस उत्पादन घेत याच कढीपत्त्याची पावडर तयार करून नवीन व्यवसाय सुरू केला. अन् आज रोजी त्यांची वार्षिक उलाढाल लाखो रुपयांत आहे. सदर शेतकऱ्याचे नाव आहे हणमंत कुचेकर. चला तर जाणून घेऊया प्रगतिशील शेतकरी हणमंत कूचेकर यांची प्रेरणादायी कहाणी.
सोलापूरच्या शेतकऱ्याने केली कमाल
सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे एक प्रगतशील शेतकरी आहेत हणमंत कूचेकर. या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात कढीपत्ता शेती करायचं मनात पक्क केलं. हा त्यांच्यासाठी एक नवीन प्रयोग होता. मात्र इकडून तिकडून पुरेस ज्ञान उपलब्ध केलं अन् लागले कामाला. त्यांनी सुरुवातीला त्यांच्या तीन एकरात कढीपत्ता लागवड केली.
नावीन्यपूर्ण शेती शेतकऱ्याला ठरते निश्चितच फायदेशीर
सातारा जिल्ह्यातील हा प्रगतशील शेतकरी सुद्धा एकेकाळी पारंपरिक शेती करून उदरनिर्वाह भागवायचा. मात्र ही पारंपरिक पद्धतीने केलेली शेती नेहमी तोट्यात असायची. त्यांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. शिवाय पावसाच्या लहरींमुळे कधी कधी शेतिपिकांचे नुकसान होऊन त्यांच्यावर कर्ज व्हायचं. मग त्यांनी कढीपत्ता लागवड सुरू केली. या शेतकऱ्याची सातारा जिल्ह्यात वाडे फाटा गावी शेती असून 2010 साली त्यांनी कढीपत्ता शेती सुरू केली होती. पहिल्या वर्षी त्यांना पाहिजे तस उत्पादन भेटल नाही. या कढीपत्ता शेती मधून निघालेल्या या शेतमाल हणमंत यांनी स्थानिक बाजारपेठेत विकला.
मात्र चौकस बुद्धीने पुचच्याच वर्षी म्हणजेच 2011 साली त्यांनी सुवासिनी प्रकारच्या जातीच्या वाणाची कढीपत्ता शेती त्यांच्या 50 क्षेत्रात विस्तारित केली. लागवड करून झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण एक वर्ष त्या कढीपत्ता पिकाची पोटच्या लेकराप्रमाने काळजी घेतली. बघता एक वर्ष सरले अन् कढीपत्ता छाटणी ची बेल आली. मागील वर्षी त्यांना योग्य बाजारभाव भेटला नव्हता हे त्यांच्या लक्षात होतेच. यावर्षी मात्र त्यांनी कढीपत्त्याची पहिली छाटणी करून निघालेला सर्व ओला कढीपत्ता पुणे-मुंबई येथील व्यापाऱ्यांना विकण्याचे ठरविले. यात त्यांना स्थानिक विक्री पेक्षा जास्त किंमत भेटली.
चौकसबुद्धीने सुरू केला कढीपत्ता पावडरचा व्यवसाय
अशाप्रकारे पुण्या मुंबईच्या व्यापाऱ्यांना कढीपत्ता विकूनही जास्त उत्पन्न मिळत नाही हे कुचेकर यांच्या लक्षात यायला अजिबात वेळ लागला नाही. त्यांनी त्याबाबत माहिती घेतली असता त्यांना कळून चुकले की त्यांच्या या कढीपत्ता शेती मधून निघालेल्या शेतीमालाचा व्यापारीच जास्त फायदा घेऊन प्रचंड नफा कमावत आहेत. कारण वाटेल त्या किंमतीत त्यांचा कढीपत्ता व्यापारी वर्गाव्दारे विकत घेतला जायचा. मात्र त्यावर विविध प्रक्रिया करून व्यापारी त्याची विक्री खूप महाग भावात करून लाखो रुपयांचा नफा कमावत होते.
त्यांनी आपल्या मालावर प्रक्रिया करून नवे उत्पादन करण्यासाठी खटपट सुरू केली. आपणच हा नफा का कमवू शकत नाही, असा विचार केला. हाच ध्यास मनात ठेवत कुचेकर यांनी कढीपत्त्याचीत्यांच्या शेतमालावर व्यापारीच जास्त पैसे कमवत आहेत. या सर्व गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर त्यांनी स्वतःच त्यांच्या कढीपत्ता शेतीतून निघणाऱ्या कढीपत्त्याची पावडर बनवून थेट विक्री करायचं ठरवल. त्यांच्या या मालावर विविध प्रक्रिया करून नवीन उत्पादने सुरू करण्यासाठी पाऊले उचलायला सुरूवात केली.
व्यापाऱ्यांचा फायदा केल्यापेक्षा आपण स्वतःच हा नफा का नाही घ्यायचा? असा वाजवी विचार केला. फक्त विचारच नाही केला तर मनात दृढनिश्चय केला. कोणतेही कार्य फक्त मनात असून चालत नाहीं तर त्यावर क्रिया होणे सुद्धा गरजेचे असते. ही गोष्ट यांना ठाऊक होती. मग कुचेकर कढीपत्त्याची पावडर बनवून विकण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची जमवाजमव करायला प्रारंभ केला.
प्रारंभिक अडचणींवर केली विश्वासाने मात
आता कढीपत्ता व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर त्याबद्दल आवश्यक ज्ञान घेणे क्रमप्राप्त असतेच. मेहनती स्वभावाचे कुचेकर यांनी त्यासाठी जवळील कृषी विभागाशी संपर्क साधला आणि त्यांना शासकिय अनुदानावर ‘सोलर ड्रायर’ मिळतो अशी महत्वाची माहिती मिळाली. त्यासाठी त्यांनी अर्ज सादर करून सोलर ड्रायर मिळवला. मग काय बघता, त्यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला . अन् त्यांच्या कढीपत्ता शेती मधून उत्पादित कढीपत्ता धुऊन त्या कढीपत्त्याची पाने सोलर ड्रायरच्या साहाय्याने वाळविण्यास सुरुवात झाली.
कढीपत्ता ते कढीपत्ता पावडर या प्रक्रियेअंतर्गत वाळविलेल्या कढीपत्त्याची पाने सुरुवातीला मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पावडर तयार केल्या जाते. आता त्यांनी त्यांच्या या शेतीमालाची पावडर तयार करून मैलाचा प्रवास सुरू केला होता. त्यांचा हा स्वत:चा कढीपत्ता पावडर व्यवसाय विस्तारित करण्यासाठी त्यांनी तालुकास्तरीय अन् जिल्हास्तरीय कृषी मेळावे अन् प्रदर्शने इत्यादी ठिकाणी त्यांच्या प्रॉडक्ट्सची विक्री करण्यास प्रारंभ केला.
त्यांची ही धडपड कामात आली अन् अल्पावधीतच त्यांच्या तयार केलेल्या मालाला परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मागणी प्रचंड वाढली पण त्यामानाने उत्पादन क्षमता कमी पडल्याने त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून कर्ज प्राप्त केले. याच निधीच्या भरवशावर त्यांनी पाचशे ते हजार किलोच्या क्षमतेची यंत्रणा उभारली अन् आता मात्र त्यांच्या व्यवसायाची वाढ परदेशात सुद्धा सुरू झाली.
मशरूम शेती करून हा शेतकरी कमावतो दिवसाला तब्बल दोन लाख रुपये, वाचा प्रेरणादायी यशोगाथा
सुरू केली वेबसाईट अन् सुरू झाली परदेशातून प्रचंड मागणी
कुचेकर यांना कढीपत्ता मसाल्यातील आवश्यक घटक असतो एवढीच माहीत होत. मात्र कढीपत्ता शेती करण्याचा एक वर्षाचा अनुभव त्यांना आला होता. त्यामुळे या कढीपत्ता मसाला घटकाबरोबरच कढीपत्त्याची व्यवसायातील उंची त्यांनी जाणून घेतली. माहिती गोळा करत असताना त्यांना कढीपत्त्याचे महत्त्व अन् त्यापासून साधता येऊ शकणारी आर्थिक प्रगती याबद्दल चकित करणारी माहिती मिळाली. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घ्यायची हे त्यांनी मनाशी पक्के केले आणि त्यासाठी अजून पुरेपूर ज्ञान घेण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी गुगल बाबाच्या मदतीने आपल्या व्यवसायासाठी जगाचे दार खुले केले.
लवकरच त्यांनी विदेशात सुद्धा कढीपत्त्याची निर्यात करण्यास प्रारंभ करून कढीपत्त्याची पावडर आणि संबंधित अनेक उपपदार्थांचीही निर्यात करण्यास सुरुवात केली. मध्यंतरी कुचेकर यांनी त्यांच्या या शेतीपूरक व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी एक व्यावसायिक वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटमुळे परदेशातील असंख्य ग्राहक कुचेकर यांच्यासोबत थेट जोडल्या गेले. अनेक परदेशी व्यापाऱ्यांनी स्वत: परदेशातून येऊन कुचेकर यांच्या शेतीला भेट देण्यास सुरुवात केली. अर्थातच त्यांच्या या कढीपत्ता मालाची अन् त्यापासून बनलेल्या विविध पदार्थांची खरेदी करण्याचा आशावाद जाहीर करून अनेक विदेशी व्यापाऱ्यांनी त्यांच्या मालाची थेट खरेदी आता कुचेकर यांच्या मालाच्या खरेदीसाठी परदेशातूनही प्रचंड मागणी सुरू झाली.
सेंद्रिय पद्धतीने करतात कढीपत्ता शेती
प्रयोगशील शेतकरी कुचेकर सेंद्रिय पद्धतीने कढीपत्ता शेती करून भरघोस उत्पादन घेतात. त्यांचे हे अफाट यश पाहून परिसरातील इतर शेतकरी सुद्धा आता कढीपत्ता शेती करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. त्यांना सुद्धा आता नावीन्यपूर्ण शेतीचे महत्व पटलेले दिसते. सध्या त्यांच्या भागातील अनेक शेतकरी कढीपत्ता शेती करून प्रचंड उत्पादन घेत आहेत. हणमंत कुचेकर त्यांच्या व्यवसायासाठी कच्चा माल म्हणून परिसरातील शेतकऱ्यांकडून आवश्यक कढीपत्ता विकत घेतात.
फक्त कढीपत्ता शेती करून उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याची पावडर बनवून विक्री केल्यास उत्पन्नात पाच ते सात पटीने वाढ होते. साताऱ्यातील महत्वाकांक्षी शेतकरी हणमंत कुचेकर मागील 14 वर्षापासून म्हणजेच 2010 सालापासून कढीपत्ता उत्पादन घेऊन आर्थिक भरभराट साधत आहेत. मागील काही वर्षांपासून त्यांनी त्यांचे कढीपत्ता लागवडीखालील क्षेत्रात वाढ केली आहे. कढीपत्ता लागवड साठी निरोगी रोपे मिळावी यासाठी त्यांनी त्यांच्या शेतातील काही झाडे राखून ठेवली आहेत. कढीपत्ता लागवड क्षेत्रात आंतरपीक म्हणून ते सोयाबीन पिकाचे सुद्धा उत्पादन घेत असतात.
कढीपत्ता शेती कमाईचा प्रमुख स्त्रोत बनवा
आजकाल अनेक शेतकरी त्यांच्या शेताच्या बांधावर किंवा रिकाम्या जागेत कढीपत्त्याची झाडे लावून त्याची पाने विकताना आपण पाहतो. मात्र संपूर्ण शेतात कढीपत्ता लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तशी विरळच. मात्र साताऱ्यातील शेतकरी हणमंत कुचेकर यांनी कढीपत्ता शेती मधील संधी जाणून त्यांच्या संपूर्ण शेतजमिनीत आधी कढीपत्ता लागवड अन् नंतर त्याच शेतमालाचे व्यवसायात रूपांतर करून इतर शेतकऱ्यांसाठी यशाचा एक पायंडा निर्माण केला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याच्या जुनाट विचारांना तिलांजली देऊन आधुनिक शेतीची कास धरल्यास आर्थिक संपन्नता येऊन बळीराजा सुखी समृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही.
कढीपत्ता लागवड साठी योग्य शेतजमीन
मित्रांनो तुम्हाला जर वरील प्रेरणादायी शेतकऱ्याची यशोगाथा वाचून कढीपत्ता शेती करायची असेल तर त्यासाठी शेतजमीन हलक्या दर्जाची, वाळूमिश्रित, लाल, काळी कसदार इत्यादी प्रकारच्या शेतजमिनीत लागवड करता येऊ शकते. मात्र ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही अशा शेतजमिनीत कढीपत्ता लागवड केल्यास नुकसानकारक ठरते ही बाब लक्षात घ्यावी. मुरमाड, खडकाळ जमिनीत सुद्धा बऱ्यापैकी हे पीक बऱ्यापैकी वाढते.
कढीपत्ता लागवड साठी पोषक हवामान
कढीपत्ता शेती करण्यासाठी हवामान समशीतोष्ण ते उष्ण असणे गरजेचे असते. अशा हवामानात कढीपत्ता पिकाचे योग्य पोषण होऊन भरघोस उत्पादन घेणे शक्य होते. कढीपत्ता रोपांच्या उत्तम वाढीसाठी तापमान 26 ते 37 अंश सेल्सिअस असणे महत्त्वाचे ठरते.
कढीपत्ता बियाण्याच्या प्रचलित जाती
कढीपत्ता लागवड करताना मोठ्या पानांचा/लहान पानांचा कढीपत्ता सेन कांपा व डीडब्ल्यूडी-1, डीडब्ल्यू-2, या धारवाड येथील कृषी महाविद्यालयाने अधिक स्वादाच्या जाती विकसित केल्या असून मोठ्या पानांच्या कढीपत्त्याचा सुवास लहान पानांच्या तुलनेत कमी असतो. या प्रकारात पौष्टिक तेलाचे (इसेन्शिअल ऑईल) प्रमाण 4 ते 5 टक्के इतके असते.
कढीपत्ता शेती करण्यासाठी लागवड करण्याचे प्रकार
मित्रांनो तुमच्या शेतजमिनीत कढिपत्ता लागवड तुम्ही एकूण 2 प्रकारे करू शकता. त्या दोन पद्धतींची माहिती खालीलप्रमाणे आहे.
1) बी टोकुन लागवड पध्दत
कढीपत्ता शेती करण्यासाठी बी टोकून लागवड करण्याची पद्धत अवलंबली तर साधारणपणे 3 आठवड्यांनी रोपांची उगवण होते. लागवड करण्यासाठी कढिपत्ता बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास रोप उगवण कालावधी कमी होऊ शकतो. म्हणजेच रोपांची उगवण थोड्या कमी कालावधीत होऊ शकते. एका बी पासून सुमारे दोन ते तीन रोपे उगवू शकतात.
2) रोप लागवड करून कढीपत्ता शेती केल्यास
कढीपत्ता शेती करताना शेतजमिनीत एका वर्षाच्या रोपांची सुद्धा लागवड करता येते. यासाठी दोन ते तीन फूट उंचीची रोपे शेतजमिनीत लावता येऊ शकतात.
कढीपत्ता शेती लागवड पद्धती
तुम्हाला तुमच्या शेतीत कढीपत्ता पिकाची लागवड करायची असल्यास या लागवडीच्या एकूण 2 पद्धिती आहेत. एक म्हणजे स्वतंत्र लागवड पद्धत आणि दुसरी म्हणजे दुहेरी लागवड पद्धत. चला तर जाणून घेऊयात या दोन्ही पद्धतींबद्दल माहिती.
1) स्वतंत्र पद्धतीने लागवड
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर स्वतंत्र पद्धतीने लागवड असल्यास त्यासाठी शेतजमीनीची पूर्वमशागत करून घ्यावी लागेल त्यानंतर लागवड करण्यासाठी शेतजमिनीत 1.2 ते 1.5 मीटर बाय 1.2 मीटर अंतरावर 30×30×30 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खणून घ्यावेत. हे खड्डे अंदाजे 25 ते 30 दिवस हे तीव्र उन्हात तापू देणे गरजेचे असते. त्याच कालावधीत शेतजमिनीत चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फास्फेट अर्धा किलो मातीत चांगल्याप्रकारे मिसळून घ्यावे. रोपांची लागवड करत असताना शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात करावी. कारण त्यामुळे ही कढीपत्त्याची रोपे जमिनीत चांगल्या प्रकारे रुजतात.
2) लागवडीची दुहेरी पद्धत वापरताना
दुहेरी पद्धतीने लागवड करताना दोन रोपांमध्ये 30 सेंटीमीटर दोन रांगांमध्ये 1 मीटर अंतर ठेवावे.
झाडाच्या मुळाजवळ येणाऱ्या फुटव्यांपासून सुद्धा लागवड करता येऊ शकते. त्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला ही फुटवे खणून काढावीत म्हणजे ते लागवडयोग्य असतात.
कढीपत्ता बियांची योग्य उगवण होण्यासाठी
बियांना रात्रभर जर्मीनेटरच्या द्रावणात बुडवून ठेवावे. असे केल्यास 2…3 दिवसांतच बियांतून रोपे बाहेर येतात. स्वतंत्र प्लास्टिक पिशवीत लागवड करावी. म्हणजे रोपांची ही वाढ स्पष्टपणे बघता येते.
कढीपत्ता लागवडीचा हंगाम
हिवाळ्याच्या दिवसांत कडाक्याच्या थंडीत कढीपत्त्याची रोपे योग्यरीत्या वाढतात. त्यांना नवीन पालवी फुटते. तसेच शेंड्यातून कोवळी जांभूळसर, लालसर पालवी स्पष्ट जाणवते. पाण्याची सोय असल्यास मृगामध्ये ही लागवड चांगल्या योग्यरीत्या होऊन नोव्हेंबर महिन्याचे शेवटी या रोपांत
चांगल्याप्रकारे वाढ होते. जून ते सप्टेंबरअखेर पर्यंत ही लागवड केल्यास रोप मूळ धरते. या कालावधीत नैसर्गिक वातावरण अनुकूल असते त्यामुळे रोपांची मर होत नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे कढीपत्त्याचे झाड संपूर्ण वाळले तरी ते मरत नाही. त्याला या हंगामात हमखास पालवी फुटते.
कढीपत्ता लागवड खत व्यवस्थापन
सुगंधा जातीच्या कढीपत्त्याला सुमारे एक महिन्याने थोडेसे (25 ते 50 ग्रॅम) मिश्रखत आळे करून देण्यात यावे. फोकून पेरलेल्या कढीपत्त्यास सामान्यतः खुरपणी पूर्ण झाल्यानंतर पालची वाढावी यासाठी कल्पतरू सेंद्रिय खत देण्यात येते. हे खत झाडाभोवती गोलाकार गाडून पाणीपुरवठा केल्यास शेत चांगली भुसभुशीत होऊन भरदार व हिरवीगार पालवी फुटेल. पाण्याची पाळी
महिन्यातून एकदा दिली तरी पुरेसे असते. शेतजमीन हलक्या प्रतीची असल्यास मात्र महिन्यातून 2 वेळा पाणी देणे गरजेचे असते. एक महत्वाची बाब म्हणजे शक्य असल्यास सरीतील गवत कापून त्याचे अंथरूण (मल्चिंग) करून घ्यावे अन् सप्तामृताची फवारणी वर्षातून 3 ते 4 वेळा करण्यात यावी. यामुळे कढीपत्ता पिकाची वाढ अतिशय उत्तम प्रकारे होते.
दीड एकर शेतात तैवान पेरू लागवड करून शेतकऱ्याने कमावले तब्बल 24 लाख रुपये, प्रेरणादायी संघर्षकथा
कढीपत्त्याच्या चांगल्या वाढीसाठी एकूण 4 फवारणी
( टीप : येथे फक्त उदाहरणादाखल सप्तामृता फवारणीची माहिती देत आहे. आपण तज्ञांच्या सल्ल्यानेच कोणत्याही कंपनीची फवारणी साठी वापर करू शकता.)
1) पहिली फवारणी : (लागवडीनंतर 15 ते 30 दिवसांनी) :
जर्मिनेटर 250 मिली.+ थ्राईवर 250 मिली. + क्रॉपशाईनर 250 मिली. + प्रोटेक्टंट 150 ग्रॅम + प्रिझम 250 मिली. + हार्मोनी 100 मिली. + 100 लिटर पाणी.
2) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर 2 महिन्यांनी ) :
जर्मिनेटर 500 मिली.+ थ्राईवर 500 मिली. + क्रॉपशाईनर 500 मिली. + प्रोटेक्टंट 250 ग्रॅम + प्रिझम 250 मिली. + हार्मोनी 150 मिली. + 150 लिटर पाणी.
3) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर 3 महिन्यांनी) :
जर्मिनेटर 750 मिली. + थ्राईवर 750 मिली. + क्रॉंपशाईनर 750 मिली. ते 1 लि. + प्रोटेक्टंट 500 ग्रॅम + प्रिझम 750 मिली. + हार्मोनी 250 मिली. + 200 लिटर पाणी.
4) चौथी फवारणी : (वरील फवारणीनंतर प्रत्येक महिन्याला) : जर्मिनेटर 1 लि. + थ्राईवर 1 लि. + क्रॉपशाईनर 1 लि. ते 1.5 लि. + राईपनर 250 मिली. + प्रोटेक्टंट 750 ग्रॅम + न्युट्राटोन 500 मिली. + प्रिझम ७५० मिली. + हार्मोनी 400 मिली. + 250 लिटर पाणी.
कढीपत्ता लागवड मधून सरासरी किती उत्पादन मिळते?
फोकून केलेल्या कढीपत्त्याचे उत्पन्न पहिल्या वेळेस एकरी 5 ते 10 टन मिळते. दुसऱ्या वर्षी 4
कापण्यांपासून 5 ते 7 टन पर्यंत उत्पादन मिळते अन् हेच उत्पादन साधारणपणे 5 ते 7 वर्षे सतत मिळत राहते. कढीपत्ता रोपांची झाडे 15 ते 20 वर्षे टिकून राहून या झाडांचा पाला जाड, हिरवागार राहून मसाला उत्पादनास योग्य व निर्यातक्षम असतो. म्हणून वरील यशोगाथेतील हणमंत कुचेकर या प्रगत शेतकऱ्याप्रमाणे निर्यात करू इच्छिणाऱ्यांनी रोपाची लागवड ही पद्धत वापरणे फायदेशीर ठरते. या पद्धतीत पहिल्या वर्षी रोपांपासून कढीपत्ता मिळत नाही किंवा कमी प्रमाणात मिळते. पण नंतर दुसऱ्या वर्षापासून (10 ते 15 वर्षाचे झाडास 4 कापण्यातून) सुमारे 25 किलो कढीपत्ता सहज काढता येतो.
कढीपत्त्याचे आरोग्यास होणारे फायदे
कढीपत्ता आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक असून याचा आहारातील समावेश केल्यास 11 पेक्षा जास्त आजारांवर उत्तम रामबाण ठरतो. कढीपत्ता पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो त्यामुळे हृदयाचे विकार, मधुमेह, मूत्रपिंडतसेच डोळ्यांचे विविध विकार यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोप्पे होऊ शकते. याशिवाय पचनसंस्था सुदृढ होण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोजच्या आहारात विविध पदार्थ बनविण्यासाठी कढीपत्ता वापरल्यास निश्चितच परिणामकारक ठरतो. केसगळती अशक्तपणा, त्वचारोग, पोटाचे विकार आणि जिवाणूंचे संक्रमण इत्यादी बाबतीत सुद्धा कढीपत्ता खूपच उपयुक्त असतो.
असे करा कढीपत्त्याचे सेवन
कढीपत्त्याची शीतलता मानवी शरीराला टवटवीत करण्यास सक्षम आहे. याचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. दिवसातून 5-6 कढीपत्त्याची पाने खाल्ल्यास आरोग्याच्या अनेक समस्या नाहीशा होतात. पहाटे उठल्यानंतर कढीपत्त्याची पाने खाल्ल्यास अधिक परिणामकारक असते असा समज आहे. कढीपत्त्यात अँटीऑक्सिडंट्स तसेच जीवनसत्व अ, ब आणि क याशिवाय मुबलक प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांसारखे शरीरास पोषक घटक असतात.
कढीपत्ता सेवन कोणी करू नये?
ज्या लोकांना कढीपत्त्याची अॅलर्जी असते अशा लोकांनी कढीपत्त्याचे कुठ्ल्याही स्वरुपात सेवन करणे टाळावे. तसेच ज्यांना वनस्पती परागकणांपासून अॅलर्जी आहे किंवा श्वसनाचे/ दम्याचा आजार आहे अशा रोग्यांनी कढीपत्त्याचे अजिबात सेवन करू नये. कुठलीही गोष्ट अती प्रमाणात वापरणे घातक असते. हाच नियम कढीपत्त्याला सुद्धा लागू होतो. त्यामुळे याचा अतिवापर न करता योग्य प्रमाणातच वापर करावा.
कढीपत्ता पावडर आणि संबंधित व्यवसाय
कढीपत्त्याची पाने विविध पदार्थांमध्ये वापरली जात असल्यामुळे या पिकास भाव कमी असेल तेव्हा किंवा कायमस्वरूपी व्यवसाय म्हणून या शेतीमालापासून दर्जेदार उत्पादने तयार करता येऊ शकतात आणि त्याची विक्री करता येऊ शकते. कढीपत्त्याची पावडर तयार करून देशभरातील विविध बाजारांत विकता येऊ शकते. नैसर्गिक पद्धतीने केलेल्या कढीपत्त्यास एक हजार रुपयांपासून बाराशे रूपये किलोपर्यंत बाजारभाव सहज मिळू शकतो. कढीपत्ता प्रॉडक्ट्सचा दर्जा उत्कृष्ट असल्यास अतिशय चांगली किंमत भारतातच नाही तर जगभरात मिळेल यासंबधी निश्चिंत. मात्र कढीपत्ता प्रॉडक्ट्स च्या व्यवसायात जिद्द आणि सातत्याने केलेली मेहनत तसेच अभ्यासुवृत्ती यांची सांगड घालावी लागेल. कढीपत्ता प्रॉडक्ट्स मध्ये विविधता आणण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी स्वतःला या क्षेत्रात झोकून द्यावे लागेल हे मात्र नक्की.
कढीपत्ता पावडर बद्दल माहिती
कढीपत्ता पावडर तयार करून विकल्याने उत्पन्न दहापट वाढू शकते. कारण ही पावडर खराब न होता बरीच वर्षे उत्तम स्वरूपात वापरण्यायोग्य राहत असते. सामान्यतः एक किलो ओला कढीपत्यापासून सुमारे 30 ते 40 ग्रॅम म्हणजे 100 किलोपासून 3 ते 4 किलो पावडर तयार होते. नैसर्गिक पद्धतीने किंवा कृत्रिम भट्ट्या करून 40 ते 50 अंश सेल्सिअस तापमानात कढीपत्ता वाळवता येतो. पण हा खर्च वाचविण्यासाठी सौरऊर्जेचा (सोलर एनर्जी) वापर करून अशा भट्ट्या नैसर्गिक उत्पादनासाठी तयार केल्या जाऊ शकतात. यासाठी सरकारकडून कर्ज विवीध योजना सुद्धा उपलब्ध आहेत.