मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | अकोल्यात 15 जुलै रोजी प्रशिक्षणार्थी निवड मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त **मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी निवड मेळावा** आयोजित करण्यात आला आहे. पात्र युवक-युवतींना नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार असून निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹10,000 पर्यंत विद्यावेतन मिळणार आहे.

15 जुलै रोजी होणार प्रशिक्षणार्थी निवड मेळावा

प्रशिक्षणार्थी निवड मेळावा 15 जुलै 2026 (बुधवार) रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे होणार आहे.

कोणत्या संस्थांमध्ये संधी?

मेळाव्यात खालील संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.

अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक, अकोला

पद : ट्रेनी / प्रशिक्षणार्थी

जागा : 30

पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

विद्यावेतन : ₹10,000 प्रति महिना

श्रीमती पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी, अकोला

पद : ट्रेनी / प्रशिक्षणार्थी

जागा : 5

पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

विद्यावेतन : ₹10,000 प्रति महिना

मेळाव्याला येताना काय सोबत आणावे?

इच्छुक उमेदवारांनी अद्ययावत Resume (बायोडाटा) तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती (Multiple Copies) सोबत आणणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | अकोल्यात 15 जुलै रोजी प्रशिक्षणार्थी निवड मेळावा

ऑनलाइन नोंदणी कशी करावी?

उमेदवारांनी पोस्टरवरील QR Code स्कॅन करून Job Seeker म्हणून नोंदणी करावी. त्यानंतर Username आणि Password वापरून लॉगिन करून “पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर” पर्याय निवडावा. अकोला जिल्हा निवडून संबंधित मेळावा शोधावा आणि “Apply” बटणावर क्लिक करून अर्ज पूर्ण करावा. अर्ज यशस्वी झाल्यानंतर “Successfully Applied for the Job” असा संदेश दिसेल.

संपर्कासाठी

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे संपर्क साधावा.

माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, अकोला

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा
लेखक : भूषण इंगळे
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment