शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी : प्रेरणादायी यशोगाथा
वावर आहे तर पॉवर आहे या वर्हाडी भाषेतील म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. अलीकडच्या काळात तरुण तरुणींमध्ये सुद्धा शेतीचे क्रेझ प्रचंड वाढले आहे. मोठमोठ्या बक्कळ पगाराच्या नोकऱ्या सोडून शेती करून त्यात अविश्वसनीय यश प्राप्त केलेल्या उचहशिक्षित तरुण तरुणींनी अनेक उदाहरणे आज आपल्याला पाहायला मिळतात. आजची यशोगाथा आहे ती एका डॉक्टर पदवी मिळविलेल्या उच्चशिक्षित तरुणीची.
या जिद्दी मुलीने तिची शेतीची आवड जपण्यासाठी शास्त्रज्ञ पदाची बक्कळ पगाराची नोकरी सोडून शेती सुरू केली. आज या मुलीने शेती आणि शेतीशी निगडित व्यवसाय करून एक मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी कोण आहे आणि तिने हे सगळं कसं शक्य केलं याबद्दल सविस्तर माहिती.
भरगच्च पगाराची नोकरी सोडून सुरू केली शेती
शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांना शेतीची प्रचंड आवड असते. त्यांना काँक्रीटीकरणाच्या जंगलात करमत नाही. शहरी विलासी जिवनात त्यांचे मन रमत नाही. शेती करून निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगावे असे अनेकांच्या मनात असते. मात्र बरेच लोक हे धाडस करत नाही. मात्र याला अपवाद ठरली आहे ती लखनऊ येथील कामिनी सिंह नावाची मुलगी. या मुलीने बक्कळ पगाराची शास्त्रज्ञ म्हणून असलेली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि आज या निर्णयामुळे ती वर्षाला सुमारे पाऊणे दोन कोटी रुपये तिच्या शेतीतून आणि शेती निगडित व्यवसायातून कमावत आहे. शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी यशस्वी कशी बनली हे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल.
शेणाच्या गोवऱ्या ऑनलाईन विकून घरबसल्या कमवा महिन्याला तब्बल 30 हजार रुपये
शेवग्याची शेती आणि शेवग्यावर संशोधन
शेतीला जर नाविन्याची आणि आधुनिकतेची जोड दिली तर शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्या अनेक लेखांतून स्पष्ट करत आलेलो आहोत. कामिनी सिंह 2017 सालापासून शेती व्यवसाय करतात. त्यांनी लखनऊ येथे शास्त्रज्ञ म्हणून काम सुद्धा केले होते. नोकरी करतानाच या मुलीचा शेतीकडे कल वाढून शेतीच्या नैसर्गिक सानिध्यात राहण्यासाठी 7 वर्षापासून सुरू असलेल्या सरकारी नोकरीचा कामिनीने राजीनामा दिला.
आता त्यांनी आपले पूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केलं. शेतात शेवग्याची लागवड केली. मात्र त्या मुळातच शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी शेवग्याच्या शेतीवर संशोधन सुद्धा सुरू केले. याच काळात त्यांना एका कृषी विषयक खासगी कंपनीत संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी त्यांच्या शेतीच्या आवडीला पूरक अशी ही नोकरी स्विकारली. या कृषी विषयक कंपनीत काम करत असताना कामिनी सिंह यांचा परिसरातील असंख्य शेतकऱ्यांशी संपर्क वाढू लागला.
दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळ्या टोमॅटोची लागवड कशी करावी याचे संपूर्ण मार्गदर्शन
शेवग्याची शेती आहे सोप्पी आणि भरीव उत्पन्न देणारी
शेतकरी मित्रांनो शेवग्याची शेती कशी फायदेशीर आहे हे आपण शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी कामिनी सिंह यांच्या यशोगाथा मधून जाणून घेत आहोत. शेवग्याची शेती ही कमी खर्चिक असते. पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने ही शेवग्याची शेती करण्यात येते. शेवग्याची शेती करण्यासाठी कोणत्याही रसायनाची गरज पडत नाही. विशेष म्हणजे कोणत्याही हंगामात ही शेती केली जात असल्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेणे सुद्धा शक्य होते. या सर्व गोष्टींचा विचार करून कामिनी सिंह यांनी शेवगा लागवड सुरू केली होती. त्यात त्यांना हळूहळू प्रचंड उत्पन्न मिळायला लागले.
शेवग्याच्या शेंगांपासून विविध प्रॉडक्ट्स बनवून सुरू केला व्यवसाय
शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी कामिनी सिंह ही मुलगी जिज्ञासू वृत्तीची असून तिने शेवग्याच्या शेंगांचे संशोधन सुरू केले होते. याच संशोधनातून त्यांना शेवग्याच्या शेंगांपासून जर विविध प्रॉडक्ट्स बनविले आणि त्याचा व्यवसाय सुरू केला तर बक्कळ कमाई होईल याची त्यांना खात्री पटली. व्यवसाय सुरू करण्यासाठी 2019 मध्ये कामिनी यांनी स्वतःची एक शेवग्याच्या मार्केटिंग आणि प्रोसेसिंग साठी एक कंपनी सुरु केली. मात्र स्वतःच्या शेतात उत्पादित होणाऱ्या शेवग्याच्या शेंगा यासाठी पुरेशा नसतील हे जाणून त्यांनी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांना शेवग्याच्या शेंगांची लागवड करायला प्रवृत्त केले होते.
या सर्व शेतकऱ्यांसोबत मिळून कामिनी यांनी शेवग्याच्या शेंगापासून मोरिंगा पावडर, साबण, तेल, कॅप्सूल इत्यादी उत्पादने तयार करायला सुरुवात केली. सुरुवातीला एक दोन वर्ष त्यांनी छोट्या छोट्या पॅकेटमध्ये शेवग्याची पावडर विकली. आता त्यांचा हा शेवग्याच्या शेंगापासून सुरू झालेल्या शेती निगडित व्यवसाय फायदेशीर ठरू लागला. शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी कामिनी सिंह यांना सरकारकडून त्यांच्या कंपनीसाठी 25 लाखांचे अनुदान सुद्धा मिळाले.
त्यातून त्यांनी त्यांचा शेवग्याच्या शेंगा पासून निर्मित प्रॉडक्ट्सचा व्यवसाय यशस्वी करून त्याचे विस्तारीकरण केले. त्यांनी तेल आणि कॅप्सूल भरण्यासाठी आधुनिक मशीन विकत घेतले. दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत गेली. सोबतच परिसरातील शेतकऱ्यांची सुद्धा आर्थिक उन्नती या शेवग्याच्या शेंगांची लागवड करून होत गेली. आणि बघता बघता त्या करोडपती व्यावसायिक झाल्या. आज रोजी त्यांना वार्षिक करोडो रुपयांचा नफा होतो. याच शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी आज एक प्रसिद्ध उद्योगपती होऊ शकली.
तुती लागवडीसाठी सरकार देत आहे लाखोंचे अनुदान, असा करा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
परिसरातील पाचशे ते हजार शेतकऱ्यांसोबत काम
शेवग्याची लागवड कशी आणि किती फायदेशीर ठरू शकते हे आपण आजच्या या कामिनी सिंह यांच्या यशोगाथेतून पाहत आहोत. शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी आज आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जाईल असे म्हणायला हरकत नाही. शेतीत यशाच्या किती वाटा लपलेल्या आहेत याची कल्पना ही मुलगी आपल्याला नक्कीच करून देते.
शेतीशी संबंधित व्यवसायाकडे सुद्धा लक्ष पुरविण्यात आले तर शेतकऱ्यांइतका श्रीमंत दुसरा कोणत्याच माणूस नसेल अशी पक्की खात्री होते. कामिनी सिंह यांनी हे अभूतपूर्व यश काही एकटीने मिळवले नाही. यासाठी त्यांनी परिसरातील 500 ते 1000 शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम केले. यातून शेतकऱ्यांची संघटना किती उपयुक्त ठरू शकते याची प्रचिती येते. तुम्हाला आजची ही प्रेरणादायी यशोगाथा “शेवग्याच्या शेंगांपासून वर्षाला तब्बल पाऊणेदोन कोटी कमावणारी मुलगी” कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.