BSNL चा होणार कायापालट, 5G टॉवर्स उभारले जाणार

गेल्याच महिन्यात भारतातील 3 प्रमुख टेलिकॉम सर्व्हिस कंपन्यांनी आपल्या मोबाइल सर्व्हिसेसच्या प्लॅन मध्ये बदलाव करून सुमारे 20 ते 25 टक्के महाग केले आहे. देशात प्रमुख 3 टेलिकॉम सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया. या व्यतिरिक्त आपल्याला सर्वांना बहुतेक विसर पडलेली एक सरकारी टेलिकॉम सेवा पुरविणारी कंपनी आहे, ती म्हणजे BSNL (भारत संचार निगम लिमिटेड). आपल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सेवांसाठी प्रसिद्ध असलेल्या बीएसएनएल कंपनी बद्दल आता सातत्याने चर्चा होत आहे. सर्व कंपन्यांनी आता सामान्य ग्राहकाला परवडणार नाहीत इतके प्लॅन्स चे भाव वाढविले असल्यामुळे सर्वसामान्यांना आठवत आहे ती बीएसएनएल कंपनी.

भारत संचार निगम लिमिटेड देणार सर्व कंपन्यांना टक्कर

मागील महिन्यापासूनच लाखो ग्राहक इतर कंपन्यांना सोडून आपापले मोबाइल सिम पोर्ट कडून बीएसएनएल शी जुळत आहेत. मात्र 5G नेटवर्क च्या आजच्या काळात बीएसएनएल अजूनही 4G मध्येच अडकून पडली आहे. परंतु नुकतेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सरकारी बीएसएनएल ला आता अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त बनविण्यासाठी भारत सरकार तत्पर आहे अस प्रसार माध्यमांशी बोलताना सांगून पुढील एका वर्षाच्या आतच BSNL ला प्रत्येक बाबतीत अद्ययावत करायची घोषणा केली आहे. आज आपण BSNL तंत्रज्ञान बदला बाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखातून घेणार आहोत.

मुकेश अंबानी यांच्या प्रसिद्ध जीओ समवेत इतर सर्व कंपन्यांना आता सर्वसामान्य जनतेतून त्यांनी वाढविलेल्या प्लॅन्स च्या किंमती साठी जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. यावर स्पष्टीकरण देताना, या कंपन्यांनी सांगितले की, दीर्घ कालावधीनंतर अशाप्रकारची वाढ करण्यात आलेली आहे. त्यात गैर काहीच नाही. पण देशातील लोकांना हे काही पटलेलं दिसत नाही. मुकेश अंबानी यांच्या मुलाचे लग्न असताना त्याच वेळी एक्स हॅण्डल (आधीचे ट्विटर) वर बॉयकॉट जिओ trending मध्ये होत. आता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारत संचार निगम लिमिटेड चे रुप पालटण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याचं सांगून सर्वसामान्यांच्या BSNL कडून आशा वाढविल्या आहेत.

बरेच ग्राहक BSNL कडे का वळत आहेत?


टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीच्या सर्वच कंपन्यांनी आपल्या प्लॅन्स चे भाव वाढविले असले तरीही भारत संचार निगम लिमिटेड ने मात्र आपल्या प्लॅन्स च्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. अतिशय कमी किंमत असलेले BSNL चे सर्वच प्लॅन्स सामान्य गरीब जनतेच्या खिशाला परवडणारे आहेत. त्यामुळे साहजिकच या कंपन्यांच्या प्लॅन्स दरवाढीचा फायदा भारत संचार निगम लिमिटेड ला होऊन लाखो ग्राहक आधीच्या provider पासून पोर्ट सुविधे द्वारे फारकत घेऊन BSNL सोबत जोडल्या जात आहेत.

बीएसएनएल (BSNL) ला 29 लाख ग्राहकांनी स्वीकारले, इतर कंपन्यांचे धाबे दणाणले

न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार ट्रायच्या हवाल्यानं ही माहिती देण्यात आली आहे की, जुलै महिन्यात जिओचे ग्राहक 7.58 लाखांनी कमी झाले आणि व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या 14.1 लाखांनी घसरली आहे. या दोन्ही कंपन्यांपेक्षा सर्वात नुकसान एअरटेल कंपनीच होत आहे. जुलै 2024 मध्ये एअरटेल कंपनीने इतर दोन कंपन्यांच्या तुलनेत सर्वाधिक 16.9 लाख ग्राहक गमावले आहेत. बीएसएनएल (BSNL) च्या सेवेच्या वाढत्या गुणवत्तेमुळे बीएसएनएलला ग्राहक वाढीबाबत चांगलाच फायदा मिळत आहे. बीएसएनएल (BSNL) ला चक्क 29 लाख नवे ग्राहक मिळाले असून कंपनीसाठी हा आतापर्यंतचा एक अविश्वसनीय रेकॉर्ड समजण्यात येत आहे.

BSNL got 29 lakhs new customers in 2024

👉हे सुध्दा वाचा

स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार वार्षिक 51 हजाराचे अनुदान, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू

काय आहेत BSNL बद्दल ग्राहकांच्या सध्याच्या समस्या?

BSNL चे प्लॅन्स इतर कंपन्यांच्या तुलनेत अगदीच स्वस्त असले तरीही BSNL मध्ये अजूनही फक्त 4G सेवा च मिळत आहे. इतर सर्व कंपन्या 5G सेवा पुरवित आहेत. आता BSNL सद्धा संपूर्ण देशात नवीन टॉवर बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असून अजून एखाद वर्ष या प्रक्रियेला सक्रिय होण्यास लागू शकतो, त्यामुळे ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.

BSNL साठी काय आहेत सकारात्मक बाबी?

भारतातील 70 टक्के लोक खेड्यात राहतात. त्यापैकी बऱ्याच जणांकडे अजूनही साधा keypad phone असतो. त्यांना 4G, 5G च काही घेण देण नसतं. फक्त कॉल येणे जाणे सुरळीत झाले तरीही त्यांचं काम भागत असते. BSNL चे प्लॅन्स खूप कमी किंमत चे असल्यामुळे याचा फायदा BSNL ला नक्कीच मिळू शकतो. परंतु देशाच्या अनेक गावातच काय तर शहरात सुद्धा BSNL चा वापर करण्यासाठी दूल्हे राजा चित्रपटातील जॉनी लिव्हर बनून “खंबे पे चढकर बोल रहा हुं!” हा डायलॉग मारायची पाळी येते. कारण बऱ्याच ठिकाणी BSNL च नेटवर्कच मिळत नाही. एवढी समस्या जरी BSNL ने सोडविली, तरीही करोडो ग्राहक सध्याचं टेलिकॉम पुरवणाऱ्या कंपन्या सोडून BSNL ला जोडल्या जातील यात शंका नाही.

या कंपन्यांच्या साहाय्याने बदलणार BSNL च रूप

BSNL कंपनी देशात 5G टॉवर्स उभारणार


भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये ट्रायल बेसिस वर भारत संचार निगम लिमिटेड 5G नेटवर्क सह सुसज्ज असे टॉवर्स बसविणार आहे. यासाठी इतरही खासगी कंपन्या भारत संचार निगम लिमिटेड ला मदत करणार आहेत. “व्हॉईस ” च्या एका रिपोर्ट नुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,एच एफ सी एल, तेजस नेटवर्क, व्ही एन एल, United Telecom, ओरल नेटवर्क इत्यादी खासगी कंपन्यांच्या साहाय्याने BSNL कंपनी 4G/5G नेटवर्क आधी देशभरातील प्रमुख शहरांत उपलब्ध करून देणार असून नंतर संपूर्ण देशात त्याचे विस्तारीकरण केले जाणार आहे. याला भारत संचार निगम लिमिटेड च खासगीकरण म्हणा किंवा सदर खासगी कंपन्यांचा सरकारीकरण, पण सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी मोबाइल नेटवर्क सेवा अगदीच स्वस्तात मिळेल हे महत्वाचे . भारत सरकार कडून आधीच 700 मेगाहर्ट्स, 2200 मेगाहर्ट्स आणि 3300 मेगाहर्ट्स आणि 26 गिगाहर्ट्स चे स्पेक्ट्रम देण्यात BSNL कंपनीला आले आहेत. यांच्या मदतीने भारत संचार निगम लिमिटेड जनतेला 5G सेवा पुरविणार आहेत.

बीएसएनएल 4G आणि नंतर 5G युनिव्हर्सल सिम लॉन्चिंग संपन्न

BSNL ने आपल्या 4G आणि 5G विस्तार योजनेचा भाग म्हणून अनेक नवीन तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत वैशिष्ट्ये सादर केली आहेत. देशभारत बीएसएनएलचा 4G विस्तार वेगाने प्रगतीपथावर आहे. कंपनीने आतापर्यंत 15,000 हून अधिक टॉवरवर 4G सेवा सुरू केली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी 80,000 टॉवर्स 4G मध्ये अपग्रेड करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मार्च 2025 पर्यंत त्यात भर घालून अजून 21,000 टॉवर्स 4G वर अपग्रेड केले जाणार आहेत. यामुळे देशभरातील बीएसएनएलचे एक लाख टॉवर 4जी नेटवर्कने कार्यशील होणार आहेत. यानंतर, बीएसएनएल पुढील वर्षाच्या प्रारंभी 5G सेवा देखील सुरू करू शकते. ज्या शहरी भागांमध्ये 5G सेवा आधी कार्यान्वित होईल शहरांची यादी आधीच जाहीर करण्यात आली आहे. अलीकडेच भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) 5G सिम लाँच करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

BSNL चा सध्याचा सर्वात स्वस्त प्लॅन

बीएसएनएल कंपनीचे सर्वच मासिक, त्रैमासिक, तसेच सहामाही आणि वार्षिक प्लॅन्स इतर सर्वच कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त पडतात. तसेच या माफक दरातील बेस्ट प्लॅन्स सामान्य जनतेला पैशांची देखील काटकसर करता येणार आहे. 150 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये कंपनीकडून रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आले आहेत. बीएसएनएल कंपनीने 150 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये 107 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये 1GB डेटा ग्राहकांसाठी वापरण्यास मिळतो. तसेच इतरही अनेक सुविधा पुरविण्यात येतात. बीएसएनएल कंपनीकडून सर्वात कमी किंमत आणि जास्तीत जास्त दिवस चालणारा रिचार्ज प्लॅन BSNL कडून सुरू करण्यात आला आहे. 107 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन ची वैधता 84 दिवसांची असते. या प्लॅन मध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 1GB डेटा या सुविधा देण्यात आल्या आहेत. या प्लॅन चे एक दीर्घ वैधता प्लॅन आहे. सदर प्लॅन मध्ये 84 दिवसांची म्हणजेच 3 महिन्यांची वैधता मिळते. सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी हा प्लान सर्वोत्तम असून इतर सर्व कंपन्या प्लॅन्स च्या बाबतीत BSNL पेक्षा खूप मागे आहेत.

भारत संचार निगम लिमिटेड चे इतर स्वस्त मोबाइल रिचार्ज प्लॅन्स


BSNL चे सर्वच प्लॅन्स खूपच स्वस्त असून वार्षिक प्लॅन हा फक्त 1515 रुपयांचा असून त्यात 365 दिवसांसाठी दररोज 2 gb डाटा देण्यात येतो. तसेच अमर्याद व्हॉईस कॉल ची सुविधा मिळते. याशिवाय 28 दिवसांसाठी फक्त 197 रुपयात 2 gb प्रती दिवस तसेच फक्त 139 रुपयात 2 gb प्रती दिवस इतका डाटा मिळतो. रुपये 797 च्या प्लॅन मध्ये तब्बल 300 दिवसांसाठी 2 gb प्रती दिवस डाटा ग्राहकांना मिळतो. इतर सर्व कंपन्याचे अंदाजे 1 gb प्रती दिवस वैधता 28 दिवस चा प्लॅन किमान 249 रुपये आहे. 1.5 gb प्रती दिवस चा प्लॅन किमान 299 रुपयांना तर 2 gb प्रती दिवस साठी अंदाजे किमान 349 रुपये इतका 28 दिवसांसाठी असून तो सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला निश्चितच जड पडतो. त्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड चे सिम वापरणे सामान्य ग्राहकांसाठी फायद्याचे ठरते.

भारत संचार निगम लिमिटेड बद्दल थोडीशी माहिती

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ची स्थापना पूर्वीच्या दूरसंचार सेवा विभागाच्या कॉर्पोरेटायझेशनद्वारे करण्यात आली असून ही कंपनी 15 सप्टेंबर 2000 रोजी स्थापन आली. कंपनीने 01.10.2000 पासून दूरसंचार विभागाच्या दूरसंचार विभागाची पूर्वीची कार्ये ताब्यात घेतली आहेत. ही कंपनी दिल्ली आणि मुंबई वगळता देशभरात सेवा पुरविते. भारत संचार निगम लिमिटेड च्या कॉर्पोरेटायझेशनच्या वेळी, मंत्रिमंडळाच्या निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे की सरकारच्या आदेशानुसार BSNL ची व्यवहार्यता खराब होणार नाही याची खात्री करण्यासाठी सरकार उपाययोजनांचे पॅकेज देणार आहे.

BSNL ही 100% सरकारी कंपनी आहे. भारताच्या मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे अधिकृत भागभांडवल रु. 1,50,000 कोटी आणि भरलेले भांडवल रु. 38,886.44 कोटी रु. 31,386.44 कोटी equity आणि रु. 7,500 कोटी प्राधान्य शेअर्स चे भांडवल आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सदर कंपनीचे एकूण उत्पन्न रु. 20,699 कोटी (ऑडिट केलेले) होते. मात्र, बीएसएनएलचे भागभांडवल रु. वरून वाढवले जाणार आहे. 1,50,000 ते रु. 2,10,000 कोटी, स्पेक्ट्रम शुल्काच्या कारणास्तव मंजूर भांडवलाचा वापर करून कंपनीचे अद्ययावतीकरण करण्याचा मानस आहे.

कंपनीकडे स्विचेस आणि ट्रान्समिशन नेटवर्कचे नियोजन, स्थापना, नेटवर्क एकत्रीकरण आणि देखभाल करण्याचा मोठा अनुभव आहे. भारत संचार निगम लिमिटेड कडे जागतिक दर्जाची ISO 9000 प्रमाणित दूरसंचार प्रशिक्षण संस्था आहे. 

BSNL ही तंत्रज्ञानाभिमुख एकात्मिक दूरसंचार सेवा प्रदान करणारी कंपनी आहे जी खालील दूरसंचार सेवांचा संपूर्ण संच प्रदान करते.

  • वायर लाइन सेवा
  • 2G, 3G, 4G आणि मूल्यवर्धित सेवा (VAS) सह GSM मोबाइल सेवा
  • फायबर टू द होम (FTTH) सह इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा
  • वाय-फाय सेवा
  • डेटा सेंटर सेवा
  • एंटरप्राइझ डेटा सेवा जसे की लीज्ड सर्किट्स, MPLS VPN इ
  • राष्ट्रीय लांब अंतर सेवा
  • आंतरराष्ट्रीय लांब अंतर सेवा

काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंधिया?

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी याबद्दल एक महत्वपूर्ण माहिती दिली असून त्यांनी भारत संचार निगम लिमिटेड 5G ची स्वतः चाचणी करून पाहिली. बीएसएनएलची 5G सेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. कंपनीला त्यात यश मिळाले आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स मध्ये (C-DOT) ही चाचणी संपन्न झाली. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली . यावेळी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून BSNL च्या 5G सेवेची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांनी बीएसएनएल च्या 5G नेटवर्कची क्षमता तपासून पाहिली.

सौजन्य : Biz Tak YouTube channel

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबाबत सांगितले की, जरी BSNL ची ही नवीन सर्व्हिस सुरू व्हायला उशीर होत असला तरी सर्वांना या सेवांचा अभिमान वाटेल. परंतु यासाठी थोडासा संयम राखावा लागेल. त्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड पुन्हा एकदा चर्चेत आले असून सर्वसामान्यांना ही सेवा सुरू झाल्यानंतर आर्थिकदृष्टया त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. आणि कमी पैशांत भारत संचार निगम लिमिटेड ची उत्कृष्ट सेवा मिळणार आहे.

बीएसएनएल ने केली एमटीएनएल शी हातमिळवणी

BSNL Telecom ने महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) सोबतही आता हातमिळवणी केली असल्याचे वृत्त आहे. आता या दोन कंपन्या मिळून दिल्ली आणि मुंबईसारख्या ठिकाणीही आपली सेवा देणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित येण्यामुळे आता निश्चितच BSNL ची सेवा सुधरणात्यात शंका नाही. सरकारकडून MTNL सोबत 10 वर्षांचा करारही करण्यात आला आहे. या हातमिळवणी द्वारे लोकांना कमी किमतीत जलद इंटरनेट सुविधा प्राप्त होणार आहे. सध्या Vi, Airrtel आणि Jio या कंपन्यांनी आपल्या प्लॅन मध्ये 25 ते 30 टक्के वाढ केली आहे. अशा परिस्थितीत BSNL आणि MTNL एकत्र येऊन या कंपन्यांना चांगलीच टक्कर देण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणतील अस म्हणायला हरकत नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment