10 गुंठे शेतीत उगवलेला दुधी भोपळा देत आहे महिन्याला 70 हजाराचा नफा

आधी उसाची लागवड करत असलेला एक शेतकरी काहीतरी वेगळं करायचं म्हणून शेतात दुधी भोपळा पेरून मालामाल झाला आहे. या दुधी भोपळ्याच्या शेतीमधून महिन्याला तब्बल सत्तर हजाराचा निव्वळ नफा कमावत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेऊन त्यापासून इतर शेतकरी बांधवांना सुद्द्धा प्रेरणा मिळावी यासाठी हा प्रेरणादायी लेख आहे.

दुधी भोपळा शेती

सदर शेतकऱ्याचे नाव आहे कुमार शिंदे. अगदीच अल्पभूधारक . आष्टी तालुक्यातील हा बांधव आधी उसाची शेती करून त्याचा उदरनिर्वाह भागवत असे. पण त्यावर त्याची प्रगती मात्र काही केल्या होत नव्हती. घरी मुले मोठी होत असल्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी थोडाफार पैसा जमा करून ठेवणे आवश्यक होते. त्यासाठी केदार भाऊंना एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुचला. सगळेच उसाची शेती, सोयाबीन कापसाची पारंपरिक शेती करतात. पण या शेतीतून आजूबाजूचे कुणीही त्याला प्रगत झालेले दिसत नव्हते. तेव्हा त्याने काहीतरी नवीन करायचे ठरवून आपल्या फक्त दहा गुंठे शेतात दुधी भोपळ्याची लागवड करायचं निर्णय घेतला. हा निर्णय त्याच आणि त्याच्या कुटुंबच भविष्य सुरक्षित करणारा ठरला.

विक्रमी उत्पादन घेऊन केली कमाल

केदारभाऊ शिंदे यांनी यावर्षी भोपळ्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. वेळ, उत्पादन आणि खर्चाचा बघता उसाची शेती परवडण्यासारखी नाही. म्हणूनच त्यांनी ऊसशेतीला रामराम ठोकत आधी शेतात फुलकोबीचे पीक घेतले. या पिकातून त्यांना सुमारे एक लाखाचे भरघोस उत्पादन प्राप्त झाले. सध्या ते शेतात पेरलेला दुधी भोपळा विकून भक्कम कमाई करत आहेत. त्यांना रोज १०० किलो दुधी भोपळा मिळत असून सरासरी २० रुपये किलो येत्या चार महिन्यांत सुमारे दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न होईल, असा शिंदे भाऊंना ठाम विश्वास आहे.

केदार भाऊने भोपळ्याची शेती कशी केली?


भाजीपाला पिकाबरोबरच तीन एकर क्षेत्रात l केदार शिंदेंनी गोल भोपळा पेरला होता. या गोल भोपळ्याचे सुद्धा भरघोस उत्पादन होऊन त्यांनाअडीच लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. यावर्षी मात्र त्यांनी मे महिन्यामध्ये आपल्या शेताची उभी आडवी नांगरट करून घेऊन शेणखत देऊन जमीन लागवडीयोग्य करून घेतली. कारण आता त्यांना दुधी भोपळ्याची लागवड करायची होती.

केदार शिंदे यांनी पाच फुटावर सरी पाडून चार फुटावर ‘वरूण’ जातीच्या दुधी भोपळ्याची २० जून रोजी त्यांच्या शेतात लागवड केली होती. प्रारंभीच्या काळात बेसल डोस दिल्यानंतर तणापासून बचावासाठी मल्चिंग पेपर अंथरून घेतला. सुमारे २५ हजार रुपये खर्च करून दुधी भोपळ्याच्या वेलासाठी मांडव तयार केला. अन् मग काय बघता भोपळा शेतात जो उगवला तो रोज त्यांना 100 किलो उत्पन्न मागील एक महिन्यापासून देत

केदार शिंदे यांनी ठिबकच्या साह्याने नियमित विहिरीचे पाणी सोडले तसेच ठिबकमधूनच रासायनिक खते सुद्धा वेळोवेळी दिली. आता सुद्धा वेळोवेळी बुरशीनाशक, कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया अजून पुढील 2 महिने सुरू राहणार आहे.

कशी करतात दुधी भोपळ्याची विक्री?

शेतीच्या कामामध्ये शिंदे भाऊंना त्यांची आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांची सर्वांची मदत मिळते. कुमार शिंदे आपल्या शेतातून दररोज १०० किलो दुधी भोपळा काढून हा भोपळा आष्टा बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. सध्या भोपळ्याला चांगली किंमत असल्यामुळे आणि भोपळा आरोग्यदायी असल्यामुळे त्यांचा हा माल अगदी पटापट विकल्या जातो. आणखी पुढील तीन चार महिने दुधी भोपळ्याचा तोडा चालणार असून या सीझन मध्ये त्यांना दोन ते अडीच लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळणार असल्याचे ते सांगतात.

महिन्याला घेतात सत्तर हजाराचे उत्पन्न

शिंदे भाऊ सांगतात, “दुधी भोपळ्याची काढणी रोज होणे आवश्यक असते. आतापर्यंत त्यांच्या शेतात एकूण दहा तोडे झालेले सर्व मिळून एक टन उत्पादन झाले आहे. खर्च वजा जाता महिन्यात ७० हजार रुपये शुद्ध नफा झाला आहे. तसेच पुढील तीन चार महिन्यांत सरासरी दोन ते अडीच लाखांचे उत्पादन त्यांना होईल यात शंका नाही. दुधी भोपळा लागवडी संबंधी त्यांनी विविध जाणकार शेतकरी तसेच सोशल मीडियावरून माहिती प्राप्त केली. पूर्ण अभ्यास करूनच शिंदे भाऊंनी दुधी भोपळा लागवडीचा निर्णय घेतला होता. आज त्यांच्या या इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या विचाराने त्यांना भरघोस उत्पन्न मिळवून दिलं हे मात्र नाकारता येणार नाही.

तर शेतकरी मित्रांनो आपण सुद्धा आपल्या शेतात नवीन प्रयोग करून भरघोस उत्पन्न घ्यायला प्रवृत्त व्हायला पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवूनच हा लेख लिहिण्यात आला आहे. चला तर मग आपल्याला ज्या नवीन पिकाची लागवड करायची आहे त्याची संकीर्ण माहिती गोळा करायच्या कामाला लागा. अन् संपूर्ण तयारीनिशी नावीन्यपूर्ण शेती करून आपल्या जीवनात प्रगतीचा उजेड आणा, इतकेच या लेखाच्या माध्यमातून आपणास सांगायचे आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment