बारामती हे शहर पवारांचं राजकीय क्षेत्र. शेती व्यवसाय हा खऱ्या अर्थाने सार्थक ठरविणारा हा राज्यातील महत्वाचा भाग. तर या बारामतीमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडून बहुप्रतिक्षित असे बारामती कृषी प्रदर्शन 2025 दिनांक 16 जानेवारी रोजी सुरू झाले असून हे बारामती कृषी प्रदर्शन 2025 या वर्षी 4 दिवस चालणार आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीमार्फत मागील दहा वर्षांपासून बारामती कृषी प्रदर्शन हे राज्यातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन असून दरवर्षी या बारामती कृषी प्रदर्शन चे मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्या जाते.
यंदाचे म्हणजेच बारामती कृषी प्रदर्शन 2025 हे दहावे कृषी प्रदर्शन दिनांक 16 जानेवारी रोजी सुरू झाले असून ते सलग 4 दिवस सुरू राहणार आहे. आणि 20 जानेवारी रोजी या बारामती कृषी प्रदर्शन 2025 ची सांगता होणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी सुद्धा पत्रकारांशी हितगुज केले.
बारामती कृषी प्रदर्शन 2025 चे प्रमुख पाहुणे
राज्यातील विविध भागातील शेतकरी वर्गाकडून प्रतीक्षा असलेले बारामती कृषी प्रदर्शन 2025 हे भव्य स्वरूपात होणार असून या कृषिक प्रदर्शनात विविध कृषी कार्यक्रमांचे आणि प्रात्यक्षिकांसह अनेक शेतकरी सहभागी होणार आहेत. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री तसेच क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे ही सर्व मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर दिनांक 16 जानेवारीपासून बारामती कृषी प्रदर्शन 2025 हे भव्य प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे.
तब्बल अडीच लाख शेतकरी नोंदवतात सक्रिय सहभाग
बारामती हा पुण्यातील धनाढ्य शेतकऱ्यांचा भूभाग. यामुळे या शेतकऱ्यांच्या यशाचं गुपित काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता राज्यातील आणि देशातील विविध भागातील शेतकऱ्यांना नेहमीच असते. यासाठी या बारामती कृषी प्रदर्शन 2025 ला राज्यातील तसेच देश परदेशातील सुमारे अडीच लाख शेतकरी सहभागी होणार आहेत. दरवर्षीच लाखो शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग मिळत असतो. मात्र बारामती कृषी प्रदर्शन 2025 चे आकर्षण अजून वाढले आहे. कारण यावर्षी तब्बल 4 दिवस हे कृषिक प्रदर्शन भरणार आहे.
बारामती कृषी प्रदर्शन 2025 ची वैशिष्ट्ये
यंदाचे प्रदर्शन हे अत्यंत खास असणार आहे. कारण थेट प्रात्यक्षिकावर आधारीत कृषी प्रदर्शनाचे हे दहावे वर्ष आहे. तब्बल 170 एकर क्षेत्रावर बारामती कृषी प्रदर्शन 2025 आयोजित होणार आहे.संस्थेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पवार हे 1980 च्या दशकात अमेरिकेतील मिशिगन राज्यात कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना मिनिसोटा येथील कृषी प्रदर्शनात त्यांनी विविध प्रकारचे कृषी प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन पाहिले होते. त्यांना ते प्रचंड आवडले. भारतात सुद्धा अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या हितार्थ ज्ञानवर्धक कृषी प्रदर्शन व्हावे अस मनाशी ठरवून 10 वर्षापूर्वी म्हणजेच 2014 साली बारामती कृषी प्रदर्शन पहिल्यांदा आयोजित करण्यात आले होते. ते सलग 10 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादासह वाटचाल करत आहे.
बारामती कृषी प्रदर्शन 2025 चा उद्देश
राज्यातील शेतकरी वर्गाला शेतीच्या विविध पैलूंची माहिती करून देणे आणि नवीन पिढीला शेतीविषयी आवड निर्माण करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कृषी प्रदर्शनाचे थाटामाटात आयोजन केल्या जाते. नवीन बियाणे, प्रगत तंत्रज्ञान, खते केवळ वरवर दाखविण्याऐवजी त्यांचा प्रत्यक्ष शेतीतील वापर कसा करावा तसेच या कृषीविषयक घटकांचा पिकावरील आणि शेतीवरील प्रभाव आणि त्यातून मिळणारे प्रत्यक्ष उत्पादन राज्यातील तसेच देश विदेशातील विविध शेतकरी आणि शेती अभ्यासक यांना पाहता यावे याच हेतूने दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित केल्या जाते. म्हणूनच बारामती कृषी प्रदर्शन 2025 हे शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी आहे असे म्हणायला हरकत नाही.
शेतीतील artificial intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) कशी राबवावी याचे मार्गदर्शन
प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून जी प्रेरणा मिळते ती पुस्तके वाचून नक्कीच मिळत नाही. मागील दहा वर्षापासून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न बारामती कृषी प्रदर्शन आयोजित करून केल्या जात आहे. जगभरातील प्रगत व अद्ययावत तंत्रज्ञान भारतीय शेतीत कशाप्रकारे वापरता येईल तसेच या नवनवीन प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतीचा उत्पादन खर्च कमी कशाप्रकारे करता येईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतीमधील उत्पादन कसे वाढविता येईल याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सामान्य शेतकऱ्यांना मिळावे या उदात्त हेतूने बारामती कृषी प्रदर्शन 2025 या प्रदर्शनाची संकल्पना आखण्यात आली.
सेंद्रिय शेतीतून बचत गटाच्या 2 हजार महिला शेतकरी झाल्या मालामाल, यशाचे अर्धा एकर मॉडेल जाणून घ्या
दरवर्षी अनेकानेक शेतकऱ्यांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून नवनवीन संकल्पना राबवून या कृषिक प्रदर्शनाची प्रारंभ करण्यात आला.या बारामती कृषी प्रदर्शन 2025 मध्ये शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील विकसित तंत्रज्ञान आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना शेतीत कशी रुजवावी याबद्दल या कृषी प्रदर्शनात बहुमोल असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे.
अजित पवार यांची शेती, गोठा आणि फार्महाऊस ची जवळून सैर
या नावीन्यपूर्ण पिकांचं होणार दर्शन
बारामती कृषी प्रदर्शन 2025 मध्ये शेतकऱ्यांना नवनवीन फळझाडांची लागवड, विदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके, शेवंतीच्या 29 प्रकारची फुलशेती, दर्जेदार उत्पादन देणारा टोमॅटो, काळा टोमॅटोसह 29 प्रकारचे टोमॅटोचे देशी वाण, जास्त तिखट गुणधर्म असलेली काळी मिर्ची, मिरचीचे विविध प्रात्यक्षिके, कोरडवाहू शेतीसाठी ज्वारीचे विविध वाण, 4 फूट लांबीची तुर्की बाजरी, चीया सीड्स, कापसाची नवीन तंत्रज्ञानावर आधारित लागवड पद्धती, काढणी प्रात्यक्षिके, स्वतंत्र पशुपालन, भरडधान्य, भोपळा, शेवगा, काकडी, कलिंगड, खरबुजाच्या विविध वाणांची प्रात्यक्षिके, मक्याची चिनी पद्धतीने होणारी लागवड, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अगदी कमी भांडवलात शेळी पालन, कोंबडी पालन व मत्स्यपालनाचे तंत्रज्ञान कृषी या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके बारामती कृषी प्रदर्शन 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे.
कृषी विज्ञान केंद्र बारामती विषयी थोडक्यात
कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे 1 ऑगस्ट 1992 रोजी कृषी विकास ट्रस्ट बारामती जिल्हा पुणे येथे भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने स्थापित करण्यात आले. हे एक जिल्हास्तरीय कृषी विज्ञान केंद्र आहे. KVK बारामती ही भारतातील मॉडेल, हाय-टेक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती KVK शाश्वत शेतीच्या विकासासाठी 30 वर्षांपासून शेतकरी समुदायासाठी कार्यरत आहे. या कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यातील 7 तालुक्यांपर्यंत आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट संशोधन संस्थांमधील तंत्रज्ञान निर्मितीमधील वेळ कमी करणे आणि ते कृषी आणि संबंधित क्षेत्रांमधून उत्पादन, उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात हस्तांतरित करणे हे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या रचनेत चार टप्पे आखण्यात आले आहेत.
कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील पायाभूत सुविधा
सदर केंद्र आणि यजमान संस्था फार्म बारामती शहराच्या पश्चिमेला 6 किलोमीटरवर आहे. या केंद्राकडे तंत्रज्ञानाचे मूल्यांकन आणि प्रात्यक्षिकासाठी 20 हेक्टर जमीन आवश्यक आहे तर 24 हेक्टर यजमान संस्थेची आहे. या एकूण 44 हेक्टर जमिनीतून एकूण लागवडीखालील जमीन 30.03 हेक्टर, दुग्धव्यवसाय 1.6 हेक्टर, रोपवाटिका 1.4 हेक्टर, पॉली हाऊस 0.40 हेक्टर, कृषी विज्ञान केंद्र आणि यजमान संस्था इमारतींनी 3.4 हेक्टर, विहीर आणि पाणी साठवण टाक्या 2.4 हेक्टर आणि 7 रस्ते व्यापलेले आहेत. हेक्टर जमीन. प्रात्यक्षिक शेतीचा वापर नवीन तंत्रज्ञानाच्या ऑन फार्म चाचणीसाठी केला जातो. या केंद्राचा वापर चांगल्या प्रतीचे बियाणे आणि रोपे तयार करण्यासाठी सुद्धा केल्या जातो.
बारामती कृषी केंद्राची वैशिष्ट्ये
कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्याकडे पुढील नवीन सुविधा आहेत 1. प्रशासकीय इमारत 2. कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र (ATIC). 3. कॉन्फरन्स हॉल 4. ऑडिओ व्हिज्युअल ट्रेनिंग हॉल, 5. प्रात्यक्षिक प्लॉट्स 6. हाय-टेक ग्रीन हाउस पॉली हाउस 7. वनस्पती आरोग्य दवाखाने आणि जैव-नियंत्रण प्रयोगशाळा 8. माती, पाणी, पान आणि पिटिओल चाचणी प्रयोगशाळा 9. ग्रेडिंग आणि पॅकिंग युनिट 10. मधमाश्या पाळण्याचे युनिट
11. सौर मोटरसह पाणी साठवण टाकी 12. स्वयंचलित फर्टिगेशन युनिट 13. शेतकरी वसतिगृह 14. लूज हाऊसिंग डेअरी फार्म 15. पोल्ट्री हॅचरी 16. शेळी आणि मेंढी युनिट 17. सिलेज प्रात्यक्षिक युनिट 18. एकात्मिक मासे आणि कुक्कुटपालन युनिट 19. फिश हॅचरी 20. कृषी आणि इको टुरिझम 21. इंडो-डीटीएच प्रकल्प हाय-टेक शेती 22. हायड्रो फोनिक युनिट 23. रोपवाटिका 24. वीज निर्मितीसाठी पवन सौर संकरित प्रणाली 22. शेतकरी भेटीचे नियोजन.