काही वर्षांपूर्वी भारताचाच एक अविभाज्य घटक असलेला पाकिस्तान देश आज आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला आपण रोज वर्तमानपत्रांतून वाचत असतो. आज आपण पाकिस्तानी शेती बद्दल विशेष माहिती जाणून घेणार आहोत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख पाया म्हणून पाकिस्तानी शेती महत्वाची आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची भौगोलिक परिस्थिती बऱ्याच बाबतीत समान आहे. पाकिस्तानी शेती गेल्या काही दशकांत निश्चितच प्रगती करत आहे हे सुद्धा वास्तव आहे. मात्र राजकीय अस्थिरता या मुख्य कारणामुळे सध्या सरकारचे शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे हे सुद्धा एक वास्तव आहे.
भारताच्या तुलनेत पाकिस्तान अनेक बाबतीत मागासलेला असेल मात्र शेती या क्षेत्रात दोन्ही देशांची परिस्थिती सारखीच आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारण म्हणजे आज पाश्चात्य देशांत ज्याप्रमाणे शेतीचे आधुनिकीकरण होत आहे, त्यामानाने दोन्ही देशात अजूनही पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याच जास्त आहे हे विसरून चालणार नाही. पाकिस्तानी शेती आणि भारतीय शेतीत हळूहळू का होईना मात्र अमुलाग्र बदल घडून येत आहेत हे महत्वाचे.
या पिकांसाठी पाकिस्तानी शेती आहे प्रसिद्ध
देशाचे सरकार आता पाकिस्तानी शेती क्षेत्राला महत्व देताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परिचित केल्या जात असून आधुनिक यंत्रांचा वापर काही प्रमाणात का होईना, बऱ्याच भागातील शकाती करत आहेत. याशिवाय आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानी शेती आज देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका निभावत आहे.
आज पाकिस्तान देशात तांदूळ, कापूस, मासे, फळे (विशेषत: संत्री आणि आंबा) तसेच इतर भाज्यांची निर्यात करतो आणि वनस्पती तेल, गहू, कडधान्ये आणि ग्राहक खाद्यपदार्थ आयात करतो. पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा कच्च्या कापसाचा बाजार असून दुसरा-सर्वात मोठा जर्दाळू आणि तुपाचा बाजार आणि तिसरा सर्वात मोठा कापूस, कांदा आणि दुधाचा बाजार आहे. ही जागतिक क्रमवारी आहे. यावरून देशाच्या एकूण मागणीत पाकिस्तानी शेती खरंच जगासाठी महत्वाची आहे याबद्दल तुमचे एकमत होईल.
पाकिस्तानच्या जिडीपी मध्ये शेतीचे योगदान
पाकिस्तानच्या कृषी क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमध्ये अंदाजे 23 टक्के इतका वाटा असून राष्ट्रीय श्रमशक्तीच्या 37.4 टक्के रोजगार आहे. पाकिस्तानच्या निर्यातीपैकी सुमारे 70 टक्के प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीतून निघालेले उत्पादने तसेच त्यापासून बनवलेल्या वस्तू यांचा समावेश आहे.
पाकिस्तानी शेती ही सुमारे 30.5 दशलक्ष हेक्टर क्षेत्र व्यापत असून देशाच्या एकूण जमिनीपैकी सुमारे 47 टक्के जमीन ही शेतजमीन आहे, जागतिक सरासरी 38 टक्केपेक्षा शेतजमिनीचे प्रमाण जास्त आहे. पाकिस्तान देशाच्या एकूण कृषी क्षेत्रात पशुधनाचे 62 टक्के योगदान आहे, त्यानंतर महत्त्वाची पिके (4.1 टक्के), इतर पिके (3.3 टक्के), वनीकरण (0.5 टक्के) आणि मत्स्यपालन (0.3 टक्के) आहेत. पाकिस्तानमध्ये दोन प्रमुख पीक हंगाम आहेत. म्हणजे खरीप आणि रब्बी हंगाम. देशात एकूण पाण्याची उपलब्धता 72.7 MAF आहे. विशेष म्हणजे 82 टक्क्यांहून अधिक लागवडीखालील जमीन सिंचनाखाली आहे आणि फक्त 18 टक्के पावसावर आधारित आहे.
पाकिस्तानी शेती : प्रमुख पिकांची ओळख
पाकिस्तानी शेती ही गेल्या 2 दशकांत हळूहळू प्रगती करत असून या देशात शेतीत गहू, बार्ली, हरभरा, मसूर, रेपसीड आणि कॅनोला मोहरी यांसारख्या हिवाळी-हंगामी पिकांसाठी सुमारे 60 टक्के पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांचा वापर केला जातो. पाकिस्तानी शेती मध्ये दोन प्रमुख पिके गहू आणि तांदूळ हे मोठ्या प्रमाणावर घेतल्या जातात. ही दोन प्रमुख पिके एकूण पीक क्षेत्राच्या अनुक्रमे 37 आणि 11 टक्के आहेत.
याशिवाय पाकिस्तानी शेती मधून उत्पादन घेतल्या जाणारी ऊस आणि कापूस ही दोन प्रमुख नगदी पिके असून जीडीपीमध्ये अनुक्रमे 0.9 आणि 0.3 टक्के योगदान देतात. 2023 मध्ये PKR 5.5 ट्रिलियनच्या मूल्यवर्धनासह पाकिस्तानची अंदाजे पशुधन लोकसंख्या 225 दशलक्ष आहे. एकूण वार्षिक 67 दशलक्ष टन उत्पादनासह पाकिस्तान पाचवा सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. पाकिस्तानात आलेल्या मोठ्या पशुधनाच्या लोकसंख्येमुळे पाकिस्तानला चामड्याच्या निर्यातीत 950 दशलक्ष डॉलरची कमाई होते. म्हणूनच चामड्याच्या निर्यातीत पाकिस्तान हा जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे.
गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे जगातील अव्वल 5 देश
पाकिस्तानी शेती: विकासाचा इतिहास – एक दृष्टिक्षेप
पाकिस्तानी शेती बद्दल बोलायचे झाल्यास देशाच्या सरकारने विकास योजनांमध्ये कृषी क्षेत्राकडे मागील 50 वर्षात विशेष लक्ष पुरवल्याने शतकानुशतके चालत आलेल्या जुन्या अन् पारंपारिक शेतीला आता आधुनिकतेची जोड मिळत असल्यामुळे त्यांच्या शेती तंत्रात काही आमूलाग्र बदल घडून आले आहेत. सिंचन आणि क्षारता नियंत्रणासाठी कूपनलिका बांधणे, रासायनिक खते आणि शास्त्रोक्त पद्धतीने निवडलेल्या बियाण्यांचा वापर करणे आणि शेतीतील यंत्रसामुग्रीचा वापर करण्यास सुरुवात झाली. या सर्व बाबींमुळे शेतीच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी पाकिस्तानने 1960 च्या उत्तरार्धात हरित क्रांती काय असते आणि तिची क्षमता नेमकी कशी असते याचा अनुभव घेतला.
पाकिस्तानचे मुख्य अन्न पैकी एक महत्वाचे धान्य म्हणजे गहू हे असून गव्हाच्या उत्पादन बाबत स्वयंपूर्णता ही पाकिस्तान देशाला सुमारे 1970 पर्यंत प्राप्त झाली. या हरित क्रांतीमूळे देशात कापसाचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढले. या सर्व कारणांमुळे कापड आणि खाद्य कापूस बियाणे तेलांच्या देशांतर्गत उत्पादनात प्रचंड भर पडली. पाकिस्तानी शेती देशाच्या अर्थव्यवस्थेला सांभाळण्यासाठी अधिक प्रभावी ठरली.
चीन देशाने शेतीत इतकी प्रगती कशी केली? अचंभित करणारी कारणे
पाकिस्तानी शेती : सध्याची शेतकऱ्यांसमोरील आव्हाने
पाकिस्तानातील कापूस तसेच इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना जागतिक हवामान बदलाचे परिणाम जाणवत आहेत कारण अप्रत्याशित हवामान पद्धती याचा अनिष्ट परिणाम होऊन अति उष्णतेमुळे वाढणारा हंगाम कमी होत आहे. पावसाची अनियमितता यामुळे बऱ्याच वेळा शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होत असते.
शेतीत भरघोस उत्पादनासाठी मेहनत घेत असताना अशा नैसर्गिक विपत्त्या जणू पाकिस्तानी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत असतात. शेतीला लागणारा खर्च वाढत असून त्या प्रमाणात शेतीमालाला कमी बाजारभाव असल्यामुळे पाकिस्तानातील अनेक अल्पभूधारक कापूस तसेच इतर पिके घेणारे शेतकरी स्वत:ला आणि त्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारी कमाई करण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत आहे.
नैसर्गिक संकटे आणि पाकिस्तानी शेती
पाकिस्तान हा देश हवामान बदलासाठी अत्यंत असुरक्षित आहे. अलिकडच्या काही वर्षांत देशाने अनेक नैसर्गिक संकटे जसे : पूर, दुष्काळ, चक्रीवादळ आणि उष्णतेच्या लाटा यांचा सामना केला आहे. या निसर्गाच्या तडाख्यामुळे पाकिस्तानी शेती प्रचंड नुकसानकारक ठरली होती. तसेच देशातील अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या काकुवत झाले होते. परिणामी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. याशिवाय सत्तेत सतत होणारे बदल अन् त्यामुळे आलेली राजकीय अस्थिरता याचा पाकिस्तानी शेती तसेच देशाचा पाया खिळखिळा करण्यास कारणीभूत ठरत आहे असे म्हणायला हरकत नाही.