मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन योजना

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024 : शेतीतील उत्पादन हे निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असते. कधी कधी पाऊस अचानक महिना महिना गायब होऊन जातो तर कधी कधी तो आठवडाभर संततधार सुरू असतो. त्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ महाराष्ट्रातील विविध भागांसाठी काही नवीन नाही. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सिंचन व शेततळे यासारख्या योजना शेतकऱ्यांच्या साहाय्यासाठी अंमलात आणण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक हे ध्येय घेऊन या योजना कार्यशील करण्यात आल्या आहेत. या योजनांची सविस्तर माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करत आहोत. एकूण 2 प्रमुख योजनांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

कोणते शेतकरी असतील या योजनेसाठी पात्र?

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन या दोन्ही योजनांचे उद्दीष्ट सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढविणे, उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढविणे, पिकांच्या उत्पादनात व शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ करणे, हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व खातेदार शेतकरी पात्र लाभार्थी आहेत. मात्र, त्यांनी यापूर्वी त्याच क्षेत्रावर मागील ७ वर्षांत लाभ घेतलेला नसावा. यासाठी पाण्याचा स्त्रोत आवश्यक असून, ७/१२, ८ अ चा उतारा, संवर्ग प्रमाणपत्र (एससी, एसटीसाठी) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

दोन्ही योजनांसाठी किती अनुदान देण्यात येते?

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ८० % व इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादाच्या ७५% अनुदान मिळते. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून ५५% / ४५% व उर्वरित पूरक सबसिडी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना २५% / ३०% देय आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे लाभासाठी संपूर्ण माहिती

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर सातबारा उताऱ्यावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक असून, ती जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटका करिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसला पाहिजे. या योजनेसाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडत (ड्रॉ) नुसार लाभ देण्यात येतो.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना  खर्च मर्यादा तक्ता

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन

शेततळ्यासाठी आकारमान अनुसार मिळेल मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत अनुदान स्वरूपात रक्कम

शेततळ्याच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. अनुदानाची कमाल रक्कम रुपये 75000 इतकी राहील. त्यापेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरीक्त खर्च संबंधित लाभार्थीने स्वतः करणे अनिवार्य आहे.

👉 हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कार्यान्वित, या शेतकऱ्यांना मिळणार 5 वर्ष मोफत वीज

शेत तळ्याचे आकारमान आणि अनुदानाचा माहिती तक्ता

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ठिबक सिंचन व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तुषार सिंचन

अर्ज सादर करण्याची पद्धत आणि अधिकृत वेबसाईट

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून महाडीबीटी पोर्टलचे खालील प्रमाणे आहे.
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल, शेतकरी स्वतःचा मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण बद्दल माहिती

फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे, दुष्काळी भागांमध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी मनरेगा, आरकेव्हीव्हाय, मागेल त्याला शेततळे, इतर योजना व स्वखर्चाने खोदकाम केलेल्या तळ्यांना प्लास्टीक अस्तरीकरण करणारे शेतकरी हे पात्र लाभार्थी आहेत. तर ७/१२, ८ अ, आधार कार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती व अनु.जमाती प्रवर्गाकरिता) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (सामूहिक शेततळे) –
फलोत्पादन व (फळे, फुले, भाजीपाला, मसाला पिके ई.) पिके असणारे संबंधित शेतकरी समूह या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

या योजनेसाठी साठी ७/१२, ८ अ चा नमुना, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खाते पास बुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, हमीपत्र, संवर्ग प्रमाणपत्र ( अनु. जाती व अनु. जमाती करिता ) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

३४ x ३४ x ४.७० मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी रक्कम रूपये ३.३९ लाख असे १०० टक्के अनुदान आहे. २४ × २४ × ४ मीटर आकारमानाच्या सामूहिक शेततळ्यासाठी रक्कम रूपये १.७५ लाख असे १०० टक्के अनुदान आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क कोठे करावा?

या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी काँटॅक्ट करावा.

ठिबक सिंचन योजना संदर्भात निधी वाटपास मंजुरी

या जीआर मध्ये म्हटले आहे की,राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास दि.१९ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दि. १८ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.

सन २०२४-२५ मधील वित्त विभागामार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत रू. ४०० कोटीच्या (सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी रु. ३०० कोटी + वैयक्तिक शेततळे या घटकासाठी रू १०० कोटी) कार्यक्रमास दि. १६ मे, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कृषि आयुक्तालयाकडून सूक्ष्म
सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी प्राप्त निधी मागणी व सद्य:स्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी रु.१२३९२.०० लक्ष निधी वितरीत करण्यात मंजुरी देण्यात आली आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment