राज्यात काही दिवसांपासून पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यू या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी आहे. हजारो कोंबड्या नष्ट करण्याचा सरकारकडून आदेश देण्यात आला आहे. मात्र या कोंबड्या कोणत्या ठिकाणी नष्ट केल्या जात आहेत तसेच बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव कुठे कुठे होत आहे हे जाणून घेणे कुक्कुटपालन करणाऱ्या लोकांसाठी आवश्यक आहे. बर्ड फ्ल्यू रोगाच्या वाढत्या प्रभावामुळे कोंबडीपालन व्यावसायिकांना प्रचंड नुकसान होणार आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे. चला तर जाणून घेऊया बर्ड फ्ल्यू रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी का आहे याची सविस्तर माहिती.
कुठे वाढला बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव ?
रायगड जिल्ह्यातील उरणच्या चिरनेर गावात कोंबडीपालन व्यावसायिकांच्या कोंबड्याचा मागील काही दिवसांपासून अचानक मृत्यू झाल्याचे दिसून येत होते. परिणामी कोंबडीपालन करणारे सर्वच व्यावसायिक चिंताग्रस्त झाले होते. अकस्मात मोठ्या संख्येने त्यांच्या कोंबड्या मरत असल्यामुळे कोंबडीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच व्यावसायिकांनी पशू पालन अधिकाऱ्यांना याबद्दल कळवले. त्यानंतर पशू संवर्धन विभागाचे अधिकारी घटना स्थळावर जाऊन या अधिकाऱ्यांनी सर्व कोंबड्यांची काळजीपूर्वक पाहणी करून त्या मृत कोंबड्यांचे सँपल भोपाळ आणि पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.
![कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी, हजारो कोंबड्या नष्ट करण्याचा सरकारचा आदेश, बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी, हजारो कोंबड्या नष्ट करण्याचा सरकारचा आदेश, बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-22-22-56-07-10.png)
कोंबड्यांचा बर्ड फ्ल्यू अहवाल पॉझीटीव्ह
रायगडमधील अनेक कोंबडीपालन करणारे शेतकरी तसेच व्यावसायिक अहवाल कत येतो याकडे लक्ष देऊन होते. मात्र या अहवालाने जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी आणली. या अहवालात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं निष्पन्न झाल होत. आता मात्र कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी संपूर्ण जिल्ह्यात पसरली आणि सर्व कोंबडीपालन करणारे लोक चिंताग्रस्त झाले.
हजारो कोंबड्या नष्ट करण्याचे प्रशासनाचे आदेश
या अहवाल प्राप्तीनंतर जिल्ह्याचे प्रशासन सक्रिय झाले आणि प्रशासनाकडून चिरनेर परिसरातील हजारो कोंबड्या तसेच त्यांची अंडी नष्ट करण्यात आली. फक्त चिरनेर गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील सर्वच गावांना त्यांच्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी यांनी दिले.
![बर्ड फ्ल्यू बाधित कोंबड्या नष्ट करताना घेतलेला फोटो बर्ड फ्ल्यू बाधित कोंबड्या नष्ट करताना घेतलेला फोटो](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-22-23-51-14-27.png)
शेणाच्या गोवऱ्या ऑनलाईन विकून घरबसल्या कमवा महिन्याला 30 हजार रुपये
प्रशासनाकडून खबरदारी म्हणून उपाययोजना
बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव फैलू नये यासाठी सरकारने 10 टीमची तैनाती केली. स्थानिक प्रशासनाकडून चिरनेर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केल्या गेली. त्याशिवाय इतर सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. या परिसरात एकूण दोन टीम हजर असून त्यांचे परिस्थिरवर लक्ष आहे. चिरनेर तसेच आसपासच्या परिसरावर पुढील तीन महिने कसून लक्ष ठेवण्यात येणार आहे. या भागात तीन महिने पथक तैनात राहणार असून रोगाच्या नियंत्रणासाठी तसेच रोग पसरू नये यासाठी तत्पर असतील, अशी माहिती पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने यांनी दिली. बर्ड फ्ल्यू रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचं वातावरण तर आहेच, शिवाय ही कुक्कुटपान व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी ठरली आहे.
![कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी, हजारो कोंबड्या नष्ट करण्याचा सरकारचा आदेश, बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी, हजारो कोंबड्या नष्ट करण्याचा सरकारचा आदेश, बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-22-22-55-35-32.png)
जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय कोलमडला
पशूपालन अधिकाऱ्यांनी गावात जाऊन हजारो कोंबड्या नष्ट केल्यामुळे तसेच हजारो अंडी सुद्धा नष्ट करण्यात आल्यामुळं ग्राहकांनी कोंबडी आणि अंडी खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. स्थानिक चिकन विक्रेते आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र प्रशासनाची प्रादुर्भाव झालेल्या कोंबड्यांना नष्ट करण्याची मोहीम अजूनही सुरू आहे. बर्ड फ्ल्यू रोगाचा वाढता प्रादुर्भाव ही कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी ठरली आहे.
नुकसान झालेल्या कोंबडीपालन व्यावसायिकांची भरपाईची मागणी
स्थानिक व्यावसायिकांचा कोंबडीपालन व्यवसाय पुरता कोलमडला आहे. त्यामुळे असंख्य कोंबडीपालन करणाऱ्या लोकांना प्रचंड आर्थिक नुकसानीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासनाकडून नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्यांची भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसान झालेले कोंबडीपालन करणाऱ्या शेतकरी तसेच व्यावसायिक करताना दिसून येत आहेत. कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी म्हणजे कोंबड्या नष्ट केल्यानंतर सरकारकडून जी रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळते त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते.
![कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी, हजारो कोंबड्या नष्ट करण्याचा सरकारचा आदेश, बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी, हजारो कोंबड्या नष्ट करण्याचा सरकारचा आदेश, बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2025/01/Screenshot_2025-01-22-22-54-46-89.png)
फक्त 137 रुपये प्रति कोंबडी नुकसानभरपाई
चिरनेर गावात बर्ड फ्ल्यू रोगाची साथ आल्याने एका स्थानिक कुक्कुटपालन व्यावसायिकाच्या कोंबड्या मेल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गावातल्या सगळ्याच कोंबड्या नष्ट करण्याची कारवाई केली. आणि सरकारने एका मृत पावलेल्या कोंबडीसाठी 137 रुपये इतकी नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली. मात्र ज्या कोंबड्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे पाचशे ते हजार रुपयांपर्यंत आहे, त्या कोंबड्यांना अगदी नाममात्र भाव मिळाल्यामुळे कोंबडीपालन शेतकरी तसेच व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.
कोंबडी पालन व्यावसायिकांत नाराजीचा सूर
या अपुऱ्या नुकसानभरपाईमुळे मुद्दल सुद्धा निघत नसल्याचे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. येणाऱ्या काही दिवसांत जर बर्ड फ्ल्यू रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर इतर जिल्ह्यातील सुद्धा असंख्य कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी असणार आहे.
लातूर जिल्ह्यात 150 कावळे बर्ड फ्लू मुळे मृत्युमुखी
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सुमारे 150 कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू रोगाच्या विषाणूजन्य आजाराने झाल्याचे निष्पन्न झाले असून परिणामी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लातूर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले सक्रियता दाखवून आवश्यक कार्यवाही केली आहेत. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय तसेच पाण्याची टाकी या 10 किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे.
लातूर जिल्ह्यात 150 कावळे बर्ड फ्लू मुळे मृत्युमुखी
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सुमारे 150 कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू रोगाच्या विषाणूजन्य आजाराने झाल्याचे निष्पन्न झाले असून परिणामी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लातूर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले सक्रियता दाखवून आवश्यक कार्यवाही केली आहेत. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय तसेच पाण्याची टाकी या 10 किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला आहे. बर्ड फ्ल्यू रोगाचा वाढता प्रादुर्भाव ही कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी चिंतेची बातमी तर आहेच शिवाय असंख्य छोट्या छोट्या कोंबडी पालन व्यवसाय करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आर्थिक धक्का म्हणून समोर येणारी बातमी आहे.