गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश

भारतात गहू हे अन्नधान्य जवळपास देशाच्या सर्वच भागात लोकांच्या खाद्य पदार्थांत वापरल्या जाते. देशातील अनेक राज्यांत प्रमुख अन्न म्हणून गव्हाच्या चपातीचा वापर केल्या जातो. आज आपण या लेखातून गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश कोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गहू म्हटल की या धान्याशिवाय आज आपल जेवण आणि परिणामी जीवन अपूर्ण असल्यासारखे वाटते. आज संपूर्ण जगात गव्हाची मागणी प्रचंड वाढत आहे.

आता ही मागणी पूर्ण करायची म्हटल्यावर गव्हाचे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणावर होणे हे आलेच. तुमच्या मनात नक्कीच कधीतरी हा प्रश्न आलाच असेल की गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश कोणते आहेत? तर मित्रांनो जगातील 5 असे देश आहेत जे मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन घेतात. आणि विशेष म्हणजे त्यात आपला देश सुद्धा समाविष्ट आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (FAO) च्या मते, जगात होणाऱ्या गव्हाच्या एकूण उत्पादनापैकी बहुतांश गव्हाचे उत्पादन हे फार कमी देशांमध्ये घेतल्या जाते. आणि महत्वाची बाब म्हणजे जेवढे देश गव्हाचे उत्पादन घेतात त्याहूनही कमी देश प्रमुख निर्यातदार आहेत. 2000-2020 मधील 2022-23 उत्पादन आणि वापराच्या अंदाजांसह 2000-2020 पर्यंत एकूण टन उत्पादनावर आधारित माहितीनुसार गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे 5 देश यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. मात्र हे सुद्धा जाणून घ्या की 2022-23 मध्ये, आंतरराष्ट्रीय ग्रेन्स कौन्सिलच्या जुलैच्या अहवालानुसार जगभरातील गव्हाचे उत्पादन 770 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, 2021-22 मध्ये 781 दशलक्ष टन, व्यापारासाठी 195 दशलक्ष टन उपलब्ध आहे.

1) चीन

आपला शेजारी देश चीन शेती क्षेत्रात इतका प्रगत का आहे याची कारणे आपण मागील लेखात पाहिलीच आहेत. मात्र या या देशाने गहू उत्पादनात आपला डंका कायम ठेवला असून गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश जे आहेत त्यापैकी शीर्षस्थानी आहे. चीन देशाने इसवी सन 2000 पासून ते आज पर्यंत तब्बल 2.4 दशलक्ष टन गव्हाचे प्रचंड उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन जागतिक गहू उत्पादनाच्या एकूण तब्बल 17 टक्के आहे. जगातील सर्वात जास्त उत्पादन घेणारा हा आपला शेजारी देश फक्त गव्हाचा मोठा उत्पादकच नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठा गव्हाचा ग्राहक सुद्धा आहे. IGC च्या एका रिपोर्ट अनुसार चीन देशाने 2022-23 या वर्षात 135 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन केले आहे.

मात्र एक गोष्ट लक्षात घ्या चीन देशाची लोकसंख्या लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्हाचे उत्पादन घेऊन सुद्धा या देशाला गव्हाची आयात करावी लागते. चीन देशाने आज प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यात शेती क्षेत्रात केलेली अत्युच्च कामगिरी वाखाणण्याजोगी आहे असे म्हटल्यास खोटे ठरणार नाही.

गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश

2) भारत

तर मित्रांनो आपल्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आपला देश हा गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश जे आहेत त्यापैकी दुसऱ्या क्रमांकावर येतो. आपल्या देशात मागील 25 वर्षात 1.8 अब्ज टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. 2022-23 मध्ये भारताने सुमारे 105 दशलक्ष टन एवढे विक्रमी उतोडण घेतले आहे. मात्र आपण जेवढा गहू पिकवतो तेवढा गहू आपल्याला अपुरा पडत असल्यामुळे आपल्या देशाला सुद्धा बाहेरील देशातून गव्हाची मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जाते. कदाचित याच कारणामुळे गव्हाचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत.

मात्र इतके असूनही भारतात गव्हाच्या मागणीचे प्रमाण तुसभरही कमी झालेले नाही. भारतात आजही बरेच शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे गहू उत्पादन आपल्या क्षमतेपेक्षा कमी होते. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास आपण गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश जे आहेत त्यात पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.

3) रशिया

रशिया हा देश भौगोलिक दृष्टीकोनातून जगातील सर्वात मोठा देश आहे हे आपल्याला माहीत आहे. गेल्या काही दशकांत रशिया देशाने शेती क्षेत्रात विशेष लक्ष घातले आहे. त्याचा परिणाम म्हणून गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे 5 देश जे आहेत त्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. रशियाने 2023 पर्यंत जगातील एकूण गहू उत्पादनाच्या 8.4 टक्के गहू पी यश मिळवले आहे. गेल्या वीस बावीस वर्षात रशियाने 1.2 अब्ज टन गव्हाचे भरघोस उत्पादन प्राप्त करून गहू उत्पादनात आपला ठसा उमटविला आहे.

आधुनिक शेती म्हणजे नेमके काय? ग्रामीण शेतकऱ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन

इथे नमूद करण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे रशिया हा एकमेव असा देश आहे जो गव्हाची निर्यात करण्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. 2022-23 सालात रशिया देशाने सुमारे 85 दशलक्ष टन गव्हाचे भरघोस उत्पादन घेऊन सुमारे 37 दशलक्ष टन गव्हाची इतर देशांना निर्यात केली. रशिया देशाची शेतीविषयक प्रगती काय आहे याबद्दल लवकरच एक लेख आपण प्रकाशित करणार आहोत. जेणेकरून वाचकांना रशियाची शेती पद्धती अन् त्यातील बारकावे यांची ओळख होईल. गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश जे आहेत त्यात एक रशिया आहे हे ऐकून आपल्याला नवल वाटलं असेल.

गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश

4) अमेरिका

जगातील प्रगत देशांत अव्वलस्थानी असलेला अमेरिका हा देश शेती क्षेत्रात सुद्धा कमी नाही बरं का मित्रांनो. गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश जे आहेत त्यात चौथ्या क्रमांकावर अमेरिका आहे. मागील सुमारे दोन दशकांत अमेरिकेने तब्बल 1.2 अब्ज टन गव्हाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे जे एकूण जागतिक उत्पादनापैकी 8.4 टक्के एवढे आहे.

विशेष म्हणजे रशिया खालोखाल गव्हाची निर्यात करणाऱ्या देशांपैकी अमेरिका हा एक प्रमुख तसेच गव्हाचा दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. 2022-23 या वर्षात अमेरिकेने 48 दशलक्ष टन एवढे गव्हाचे उत्पादन घेतले असून त्यापैकी सुमारे 22 दशलक्ष टन इतका गहू इतर देशांना निर्यात केला आहे.

5) फ्रान्स

गव्हाची पोळी ही आज आपल्या दैनंदिन जेवणातील प्रमुख गरज म्हणून आपण पाहतो. याचबरोबर या गव्हापासून इतर अनेक पदार्थ सुद्धा बनतात. गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश जे आहेत त्यात पाचव्या क्रमांकावर फ्रान्स हा देश येतो. फ्रान्स देशात सुद्धा गव्हाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाते. मागील दोन दशकांत सुमारे 767 दशलक्ष टन गव्हाचे भरघोस उत्पादन या देशाने घेतले आहे. जे जगातील एकूण गहू उत्पादनाच्या 5.4 टक्के आहे.

फ्रान्स हा देश युरोप युनियन मधील सर्वात मोठा गहू उत्पादक देश बनला आहे. या देशाने 2022-23 या वर्षात सुमारे 32 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन घेतले आणि त्यापैकी सुमारे 17 दशलक्ष टन गव्हाची निर्यात केली आहे. फ्रान्स देशाचे राफेल तसेच इतर अवजारे आपल्याला प्रचलित आहेत. मात्र फ्रान्स देश हा शेती क्षेत्रात सुद्धा अत्यंत अग्रेसर आहे हे मात्र नक्की. तर मित्रांनो हे होते गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे जगातील 5 देश. हा लेख वाचल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment