मुंबईत आजही शेती केल्या जाते का? जाणून घ्या रोचक माहिती

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गगनचुंबी इमारती पाहून आपण चकित झाल्याशिवाय राहत नाही. मुंबईत स्वतःचे घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडची एक दुष्कर गोष्ट ठरते. इतका भाव मुंबईतील जमिनीस आहे. तर अशा या स्वप्ननगरी मुंबईत आजही शेती केल्या जाते का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नाही असेच वाटत असेल. कारण अगदी बाथरूम एवढ्या छोट्या खोल्यांची किंमत सुद्धा लाखोंत असल्यामुळे या इतक्या महाग जमिनीवर शेती करण्यापेक्षा ती जमीन वसाहती बनवून विकणे हे खूप जास्त फायदेशीर ठरते.

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ऐकून अचंभा वाटेल की मुंबई शेती केल्या जाते. मात्र ती शेती सामान्य शेतकरी करतो त्यापेक्षा थोडी वेगळी ठरते. मुंबईत आजही शेती केल्या जाते का हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात येतो. तर त्या प्रश्नांचे उत्तर आंशिक रित्या हो असेच आहे. आजही मुंबईत अनेक पालेभाज्या पिकवल्या जातात. चला तर जाणून घेऊया मुंबईत केल्या जाणारी शेती नेमकी काय आहे अन् कशाची कशाची लागवड अन् कशा पद्धतीने केल्या जाते याची माहीती.

मुंबईत आजही शेती केल्या जाते का? जाणून घ्या रोचक माहिती

खारघर परिसरातील या भागांत होते आंशिक शेती

खारघर हा मुंबईतील एक उच्चभ्रू वस्तीचे शहर. या शहराचा विकास डोळ्यांत भरण्यासारखा. येथील जमिनीची किंवा फ्लॅटच्या किंमती येथील इमारतींप्रमाणेच गगनाला भिडलेल्या आहेत. असे असताना सुद्धा आजही काही मोकळ्या आणि पडीक जागांवर शेती हा वडिलोपार्जित व्यवसाय असलेला वारसा टिकवून ठेवून ठेवणारे काही शेतकरी कुटुंब खारघमधील विविध गावांमध्ये आपल्याला दिसून येतात. खारघर परिसरातील कोपरा, बेलपाडा, मुर्बी, पेठ पाडा, ओवे गाव, ओवापेठ, रांजणपाडा, खुटूकबांधण ही गावे अशी आहेत ज्यामध्ये मागील काही दशकांत जेव्हा मुंबई पूर्णपणे विकसित झालेली नव्हती तेव्हा येथील जमिनींमध्ये राज्याच्या इतर भागांप्रमाणेच पावसाळ्यात धानाची शेती केल्या जात असे. मुंबईत आजही शेती केल्या जाते का या प्रश्नाचे उत्तर आता आपण पाहणार आहोत.

खारघर परिसरातील रांजणपाडा गावासमोरील सेंट्रल पार्कच्या मोकळ्या जागेत सुद्धा वेलवर्गीय भाज्या आजही पेरल्या जातात. इतकेच काय तर खारघर सेक्टर 36 येथे इनामपुरी गावाच्या परिसरात मोकळ्या असलेल्या आलो जागेत सुद्धा धानाची शेती, भेंडी, पालक, माठ इत्यादी पालेभाज्या येथील स्थानिक शेतकरी पेरतात. आणि स्थानिक दर गुरुवारच्या आठवडी बाजारात त्यांचा हा भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात.

जाणून घ्या शेती विषयक ड्रोनचे विवीध प्रकार

डोंगराळ भागात होणारी शेती

मुंबईतील टेकड्यांवर औषधी वनस्पतीची उगवण

मुंबईतील अनेक टेकड्यांवर तसेच डोंगराळ भागांत अनेक औषधी वनस्पतींची उगवण होते. याशिवाय करटोली सारख्या अत्यंत औषधी गुणधर्मयुक्त रानभाज्या सुद्धा नैसर्गिक रित्या उगवण झालेल्या दिसून येतात. मुंबईत आजही शेती केल्या जाते का या प्रश्नाचे उत्तर बघितले तर असे सांगता येईल की येथील स्थानिक आदिवासी लोकांना या भाज्यांची ओळख तसेच गुणधर्म माहीत असल्यामुळे हे लोक या भाज्या विक्रीसाठी बाजारात आणत असतात. आणि जाणकार लोक चटकन या रानभाज्या खरेदी करत असतात.

याशिवाय माळरानावर काकडी, शिराळी, दुधी यांसारख्या भाज्यांची मिळेल त्या जागेत लागवड करण्यात येते. आणि हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भाजी मात्र सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाज्यांच्ये महत्व कळणाऱ्या लोकांना इतकी आवडते की या लोकांची भाजी अवघ्या काही तासांत पूर्णपणे विकल्या जाते. म्हणजेच तुम्हाला पडलेला मुंबईत आजही शेती केल्या जाते का हा प्रश्न अगदी रास्त आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर हो असेच देता येईल.

रेल्वे रुळांच्या शेजारी भाजीपाला लागवड

आजही आपण लोकलने प्रवास केला तर मध्ये मध्ये अगदी रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या छोट्या छोट्या जगांत अनेक पालेभाज्या पेरल्या असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. ओढ्याच्या पाण्यातून किंवा पावसाच्या पाण्यातून पिकविलेल्या या भाजीपाल्याला मुंबईच्या विविध ठिकाणी विविध बाजारांत विक्री केल्या जाते. कधी कधी काही लोक अगदी खराब प्रतीच्या पाण्यांत सुद्धा भाजीपाला पिकवून विकल्या जातो तो भाग वेगळा. मात्र मुंबईत आजही शेती केल्या जाते का या प्रश्नाचे उत्तर या लेखातून तुम्हाला नक्कीच मिळाले असेल.

हौशीने घराच्या छतावर भाजीपाला लागवड

मुंबईसारख्या स्वप्न नगरीत सुद्धा अनेक लोक शेती करतात हे आपण पाहिलं. बरेच गर्भ श्रीमंत लोक हौशीने त्यांच्या बाल्कनीत किंवा छतावर विविध प्रकारचा भाजीपाला लावताना सुद्धा वर्तमानपत्रातील विविध बातम्यांतून दिसून येते. शेती हे एक अशा लोकांसाठी त्यांना मातीशी जोडण्याचे एक प्रमुख माध्यम असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला तुमच्या मुंबईत आजही शेती केल्या जाते का या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास हा लेख उपयुक्त ठरला असेल. गाव असो की शहर, मात्र शेतीत स्वतःचा घाम गाळून सर्वांना खावू घालणारा बळीराजा मात्र प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. अन् शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ही वस्तुस्थिती सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या गर्भ श्रीमंत लोकांपर्यंत कोणीही नाकारू शकत नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment