नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 कार्यान्वित, असा करा ऑनलाईन अर्ज

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी आणि बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

योजनेच्या अंमलबजावणी साठी विविध स्थरावर समित्या गठीत करणार

महाराष्ट्र राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा परिणामकारक तसेच शिगघ्रगतीने शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सोयीस्कर करण्यासाठी केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या कल्याणकारी योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भुसंपदित भूभाग असणारे गाव नकाशे माहिती संच महसूल विभाग तयार करेल.

यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना करण्याची जबाबदारी कृषि विभाग सांभाळणार असून यासाठी सुकाणू समिती, अंमलबजावणी समिती, क्षेत्रिय स्तरावर विभागस्तरीय, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती इत्यादी आवश्यक समित्या गठित करण्यात येणार आहेत. पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून दरवर्षी अंदाजे 81 कोटी 83 लाख रुपये खर्च वर्तविण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0, पोक्रा योजना 2.0

21 जिल्ह्यातील 6959 गावांचा होणार समावेश

राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामानात होणाऱ्या अस्थिर बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास बळकट करणे आणि शेती व्यवसाय कमी खर्चाचा करण्यास मदत करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या महत्वाकांक्षी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता.

मात्र दुसऱ्या टप्प्यात या कल्याणकारी योजनेच्या कक्षा उंचावण्यात आल्या असून त्यानुसार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत गावांची वाढ करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात सध्या समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उरलेले नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादी 21 जिल्ह्यातील 6959 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च सुमारे 6 हजार कोटींचा असून त्यासाठी जागतिक बँकेकडून आर्थिक मदत घेण्यात येणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेले जिल्हे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या प्रकल्पामध्ये पाहिल्या टप्प्यात सध्या अंतर्भूत असलेल्या जिल्ह्याची नावे पुढीप्रमाणे आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव व नाशिक. या एकूण 16 जिल्ह्यातील विविध गावांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत लाभ देण्यात येत असतो.

मात्र आता इतर जिल्हे सुद्धा या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा निश्चितच लाभ होणार आहे. या जिल्ह्यांसह विदर्भातील उरलेले नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना भाग 2 राबविण्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 काय आहे?

या कल्याणकारी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या विभागातील 16 जिल्ह्यांतील 5220 गावांत हवामानात दिसून येत असलेल्या बदलांमुळे या हवामानाच्या बाबतीत अस्थिर अशा गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोक्रा योजना हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात राबविण्यात आला होता. यासाठी तब्बल चार हजार कोटी रुपये इतका भरघोस निधी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्य मधून उपलब्ध करून देण्यात आला होता. बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी या गावांतील शेतकऱ्यांना सक्षम बनविणे तसेच अशाप्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांची शेती किफायतशीर करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे कल्याणकारी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत पहिला टप्पा राबविण्यात आला होता.

पोक्रा 2.0 मध्ये हे घटक आहेत समाविष्ट

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या प्रकल्पाद्वारे राज्यात मागील सहा वर्षांत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, पाण्याची कार्यक्षम उपयोगिता, मातीचे आरोग्य संवर्धन, संरक्षित शेती, काटेकोर शेती, शीत तसेच मूल्यसाखळी विकास याशिवाय काटकसरी म्हणजेच कमी खर्च लागणारा शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेतील असंख्य पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन पुरविणे तसेच विविध योजना अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळवून देणे ही सुद्धा कल्याणकारी कामे या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना मागील सहा वर्षात अंतर्गत केल्या गेली आहेत. याशिवाय शाश्वत शेतीसाठी शून्य मशागत तंत्र विस्तार बाबतीत उल्लेखनीय कामगिरी पोक्रा या योजनेच्या माध्यमातून केल्या गेली आहे. या तंत्राशी निगडित असे बीबीएफ अर्थात रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान राबविल्यामूळे याचा मोठ्या प्रमाणावर फायदा सोयाबीन आणि कापूस यांसारख्या इतर पिकाच्या उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे.

या योजनेतून नविन विहीर बांधकाम साठी मिळवा 4 लाख रुपये

पोक्रा 2.0 योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अनियमितता

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अनुदानाबाबत सुरुवातीची सुमारे 2 वर्षे राज्यातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे असे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते. कृषी खात्याची यंत्रणा असताना पोकराचा डीपीआर बाहेरच्या एजन्सीकडून तयार करून घेतल्यामूळे या यंत्रणेत अनेक अडचणी आढळून आल्याने सदर योजना राबविण्यावर याचा अनिष्ट परिणाम दिसून आला. सामुदायिक शेततळ्यांना बऱ्याच जिल्ह्यांत फारसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून या घटकाला थेट स्थगिती देण्यात आली होती.

संरक्षित शेतीसाठी आवश्यक अशा असंख्य घटकांना योजनेतून वगळल्यामुळे संरक्षित शेती घटकांचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत वाटप झालेल्या शेळ्या आणि विविध कृषी यंत्रे अनेक गावांतील शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात दिसून आले नाही. मध्यस्थ व काही ठिकाणी यंत्रणेतील घटकांनी हातमिळवणी करून या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या कल्याणकारी पोक्रा प्रकल्पाला पोखरले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

पोक्रा 2.0 योजनाच्या दुसऱ्या टप्प्यात कडक अंमलबजावणी हवी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचे सुरुवात होत असली तरी प्रत्यक्षात मात्र या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी यंत्रणा सज्ज होऊन अगदी काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प राबविताना हवामान बदलास पूरक अशी काही प्रारूपे तयार करून अशा प्रारूपांचा प्रसार आणि प्रचार राज्याच्या उर्वरित भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केल्या गेला पाहिजे. अशाप्रकारे योग्य आणि सजगयंत्रणा पोक्रा 2.0 प्रकल्प संपुर्ण राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल हे मात्र नक्की.

पोक्रा 2.0 योजनेच्या पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यात 230 कोटींचे अनुदानाद्वारे अनेक शेतकऱ्यांना लाभ

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प जून 2018 पासून राज्यातील एकूण 16 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला असून त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातील 410 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या कल्याणकारी प्रकल्पाच्या सहा वर्षे कालावधीत जिल्ह्यातील 49925 वैयक्तिक शेतकऱ्यांना विविध घटकासाठी 217 कोटी 41 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 1.0 बुलढाणा जिल्ह्यातील कामे

तसेच 104 शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी बचत गटांना सुद्धा 12 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान वितरण पूर्ण करण्यात आले होते. या पोक्रा योजनेच्या माध्यमातून प्रमुख सिंचनाच्या घटकामुळे जिल्ह्यातील प्रकल्प गावांमध्ये 21 हजार 882.40 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा असून 19352 शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण करून देण्यात आल्या. कृषी यंत्रे वाटप मुळे 3 लाख 9800 हेक्टर क्षेत्र कृषी यांत्रिकीकरणाखाली आले आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 104 शेतकरी बचत गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध कृषी व्यवसायासाठी प्रामुख्याने कृषी औजारे बँक, गोदाम, स्वच्छता व प्रतवारी केंद्र, प्रक्रिया युनिट, लाकडी तेल घाणे इत्यादी कृषी व्यवसायांसाठी अनुदान पुरविण्यात आले होते. परिणामी कृषी व्यवसायास चालना मिळाल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात 6710 टन क्षमतेची साठवणूक सुविधा निर्माण होऊन विविध प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती शक्य झाली आहे.

पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

बुलढाणा जिल्ह्यातील 470 मृद आणि जलसंधारण कामे पूर्णत्वास नेण्यात आली त्यामध्ये मुख्यकरून ढाळीचे बांध, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, खोल सलग समतल चर, गेबियन बंधारे, शेततळे इत्यादी कार्यांचा समावेश असून या कल्याणकारी योजनेंतर्गत एकूण 736 हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले होते. विविध हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार यशस्वीरीत्या करून घेण्यात यंत्रणा खरी उतरली. परिणामी या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना सध्याच्या बदलत्या हवामानात अनुकूल शेती करण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे हे मात्र नक्की.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना पुढीलप्रमाणे आहेत.

1) वृक्ष लागवड ( बांधावर / गटामध्ये लागवड ).

2) फळबाग लागवड- आंबा / मोसंबी / संत्रा / सिताफळ / पेरु / डाळींब / लिंबू / आवळा.

3) हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेती शाळा.

4) शेडनेट हाऊस ( GI पाईप ).

5) पॉली हाऊस.

6) पॉली टनेल ( १००० चौ मी ).

7) पॉली हाऊस / शेडनेट हाऊसमध्ये भाजीपाला / फुलपिकांचे उच्चमुल्यांकित लागवड साहित्य.

8) परसातील कुक्कुटपालन.

9) रेशीम उद्योग

11) मधुमक्षिका पालन

11) गोड्या पाण्यातील मत्स्यपालन

12) गांडूळ खत उत्पादन युनिट , नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट

13) शेततळे ( इनलेट व आऊटलेट असलेली )

14) शेततळे ( इनलेट व आऊटलेट शिवाय )

15) शेततळे अस्तरीकरण

16) ठिबक सिंचन

17) तुषार सिंचन

18) विहीर

19) विहिर पुनर्भरण

20) हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे

21) रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन

22) शून्य मशागत तंत्रज्ञान

23) हवामान अनुकुल तंत्रज्ञान शेती शाळा

पोक्रामध्ये समाविष्ट अशा मृद व जलसंधारणाचे विविध उपचार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

1) सलग समतल चर माडेल 5 ते 8 ( 0.30 मीटर )

2) सलग समतल चर माडेल 5 ते 8 ( 0.45 मीटर )

3) खोल सलग समपातळी चर

4) गुरे प्रतिबंधक चर

5) अनघड दगडाचे बांध

6) गॅबियन स्ट्रक्चर

7) संयुक्त गॅबियन बंधारा : संधानकीय पडदी / जिओ मेंबरन पॉलिथिन फिल्म

8) माती नाला बांध

9) लहान मातीचा बांध ( अर्दन स्ट्रक्चर )

10) सिमेंट नाला बांध

11) जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन ( गाळ काढणे / खोलीकरण / दुरुस्ती )

12) मुलस्थानी जलसंधारण ( शेत बांध बंदिस्ती / ढाळीचे बांधबंदिस्ती योजना

13) पुनर्भरण शाफ्ट योजना

14) पुनर्भरण चरासह पुनर्भरण शाफ्ट योजना

15) सार्वजनिक क्षेत्रावर इनलेट आणि आऊटलेटसह शेततळे योजना

16) वैयक्तिक शेततळे -बीजेएस

17) सार्वजनिक क्षेत्रावर ( ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर ) वानिकी आधारित बांबू लागवड

18) सार्वजनिक क्षेत्रावर (ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर) वानिकी आधारित वृक्ष लागवड

पोक्रा 2.0 अंतर्गत काढणी पश्चात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी योजना मध्ये समाविष्ट बाबी

1)भाडे तत्वावर कृषि अवजारे केंद्र – सुविधा निर्मिती

2) शेतकरी गट / शेतकरी उत्पादक संघ/ शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषि उत्पादनांचे संकलन, प्राथमिक प्रक्रिया, दर्जानुसार वर्गीकरण, स्वच्छता व साठवणूक इत्यादी पायाभूत सुविधांचे बळकटीकरणासाठी सहाय्य.

3) बियाणे प्रक्रिया उपकरणे

4) बियाणे सुकवणी यार्ड

5) बियाण्याची साठवण / गोदाम

पोकरा 2.0 अंतर्गत योजनांच्या लाभासाठी सामान्य आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचा 7/12 आणि 8A उतारा

2)अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्यास पुरावा

3) अर्जदार अक्षम असल्यास प्रमाणपत्र

4) माती आरोग्य पत्रिका

5) संयुक्त खातेदारांच्या बाबतीत सर्व खातेदारांचे संमती पत्र (बाग लागवडीसाठी लागू)

6) जमीन कुळ कायद्यांतर्गत येत असल्यास कुळाचे संमतीपत्र (बागांच्या लागवडीसाठी लागू)

7) अर्जदाराचे आधार कार्ड

8) अर्जदाराचे बँक पासबुक

9) अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो

10) अर्जदाराचे हमीपत्र

11) खरेदी बिल

पोक्रा 2.0 योजनेची उद्दिष्ट्ये

वातावरणातील प्रदूषणाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी वृक्षाच्छादन वाढवणे,
कृषी निविष्ठांच्या वापराद्वारे पिके आणि पीक पद्धतीची उत्पादकता वाढवणे.
शेती पिकांना पूरक म्हणून वृक्षारोपणाच्या झाडाखालील क्षेत्र वाढवणे हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोक्रा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असून
कृषी पद्धतींवर आधारित वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढवणे आणि मोनोकल्चर पद्धतींनी पिकांची संख्या वाढवणे. आणि पशुधन, रोजगाराच्या संधी, उत्पन्नाच्या संधी आणि लहान आणि सीमांत ग्रामीण भागातील उत्पादकता वाढवणे याबाबत नानाजी देशमुख कृषी योजना या कल्याणकारी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

पोक्रा 2.0 लाभार्थी पात्रता काय आहे?

मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत लाभासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे स्वतःचे नाव 7/12 असणे आवश्यक आहे.

अर्ज करणारा लाभार्थी 7/12 उतारातील संयुक्त खातेदार असेल तर फळबागेच्या लागवडीसाठी सर्व खातेदारांचे संमतीपत्र सुद्धा अनिवार्य असणार आहे.

अर्जदार शेतकऱ्याचच्या 7/12 उतार्‍यावर कुळाचे नाव असल्यास कुळाचे संमतीपत्र सादर करावे लागणार आहे.

ज्या शेतकऱ्यांची कौटुंबिक उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल आणि त्यानंतर इतर शेतकरी विचारात घेतल्या जातील. योजनेअंतर्गत कुटुंबाची व्याख्या पती पत्नी आणि अज्ञानी मुले अशी असेल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोक्रा 2.0 योजना अंतर्गत लाभासाठी किमान 0.20 हे जमीन असणे बंधनकारक आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोक्रा 2.0 योजने अंतर्गत विविध घटकांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 म्हणजेच पोक्रा अंतर्गत विविध घटकांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या https://dbt.mahapocra.gov.in/या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर तुमची नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे. यशस्वीरीत्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुख्य मेनुवर क्लिक करायचे आहे.

मुख्य मेनू वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 अंतर्गत लाभ दिल्या जाणाऱ्या विविध घटकांसाठी अर्ज करायचा पर्याय दिसेल. या पर्यायांपैकी तुम्हाला ज्या घटकासाठी अर्ज सादर करायचा आहे त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर त्या घटकाचा अर्ज येईल जो अर्ज पूर्णपणे व्यवस्थित भरायचा आहे. या अर्जात दिलेली माहिती भरून झाली की तुम्हाला तुमची संबंधित कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

लक्षात घ्या कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्ही ते पीडीएफ किंवा jpeg स्वरूपात तयार करून ठेवा. तसेच कागदपत्रांचा आकार 5 mb पेक्षा जास्त नसावा. एकदा तुमचे कागदपत्रे अपलोड करून झाली की सबमिट या पर्यायावर क्लिक करा. असे केल्यावर तुमचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 अंतर्गत इच्छित घटकासाठी ऑनलाईन यशस्वीरीत्या सादर केल्याचा संदेश तुमच्या मोबाइल क्रमांकावर येईल तसेच सदर वेबसाईट वर सुद्धा तशा प्रकारचा पॉप अप येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा पोक्रा 2.0 योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज चेक करून अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता. जर तूम्ही केलेला अर्ज मंजुर झाला अर तुम्हाला तुमच्या जवळील कृषी विभागाशी संपर्क साधावा लागेल. आणि पुढील प्रक्रियेबद्द्ल संपुर्ण माहिती आणि मार्गदर्शन घ्यावे लागेल. अशाप्रकारे तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 म्हणजेच पोक्रा 2 0 योजने अंतर्गत लाभ देण्यात येईल.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment