आले (ginger) शेती 2024 यशस्वी शेतकरी : पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी पडसे झाले की आई आल्याचा चहा बनवून देते. 2 ते 3 वेळा हा गरमागरम चहा घेतला की सर्दी छुमंतर होते. आल्याचे औषधी गुणधर्म सांगायची काही वेगळी गरज नाही. स्वयंपाकघरातील एक अनिवार्य साहित्य म्हणून आले (ginger) खूप महत्वाचे असते. आल्याची शेती आर्थिक दृष्ट्या खूपच फायदेशीर असते.आले (ginger) लागवड करून साताऱ्यातील एका शेतकऱ्याने एकरी तब्बल 17 लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. आज आपण या यशस्वी शेतकरी बांधवांची यशोगाथा आज या लेखातून पाहणार आहोत.
8 एकर शेतीत केली आले (ginger) लागवड
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी रमेश अडसूळ यांनी त्यांच्या पाडेगाव येथे असलेल्या शेतीत आले (ginger) लागवड करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी पारंपारिक पिकांच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने घेतला होता.आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच करणे फायदेशीर ठरेल हे त्यांनी जाणले आणि त्यावर अंमलबजावणी केली.
साताऱ्यातील रमेश अडसूळ यांची फलटण तालुक्यात पाडेगाव येथे 8 एकर शेती आहे. वर्षानुवर्षे या शेतीत ते ऊस या पारंपारिक पिकाची लागवड करत आलेले होते. मात्र त्यात त्यांची आर्थिक प्रगती काही केल्या होत नव्हती. परिणामी पारंपरिक शेतीला रामराम ठोकत रमेश अडसूळ यांनी त्यांच्या दीड एकर शेतात आले (ginger) लागवड केली. मात्र यासाठी त्यांनी संपूर्ण आवश्यक ज्ञान प्राप्त केले.
आले (ginger) लागवड करण्यापूर्वी तीन महिने पुर्व मशागत करताना शेतजमिनीत शेणखत, मुर्गी खत, राख, निंबोळी इत्यादी विविध खतांच्या दीड एकरात एकूण 15 ट्रॉली टाकल्या. आले पिकावर तीन बेसल डोस तसेच वेळोवेळी आवश्यक फवारण्या केल्या. आले (ginger) लागवड करून त्यांनी पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. आले (ginger) लागवड साठी घेतलेली ही मेहनत त्यांच्या कामी आली अन् त्यांना आले (ginger) लागवड करून झालेल्या शेतमालातून 17 लाख रुपये प्रति एकर इतके भरघोस उत्पादन प्राप्त झाले आहे.
दीड एकरात तब्बल 45 टन आले उत्पादन
प्रगत शेतकरी रमेश अडसुळ यांना आले पिकातून एकरी तब्बल 45 टन इतके प्रचंड उत्पादन मिळाले आहे. घाऊक बाजारात सरासरी 42 हजार रूपये प्रती क्विंटल किंमत मिळाली. या आले (ginger) लागवड मधून एकूण 17 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न निघाले . या लागवड साठी लागणारा पूर्व मशागत ते मालाची विक्री हा संपूर्ण खर्च 6 लाख वगळता अडसूळ बंधूंना 11 लाख रुपयांचा शुध्द नफा झाला आहे.
दीड एकर शेतात तैवान पेरू लागवड करून मिळवले 24 लाखाचे उत्पन्न
दीड एकर आले (ginger) लागवड साठी आला एकूण 9 लाख रुपये खर्च
आले (ginger) लागवड साठी त्यांना एकूण एकरी 6 लाख रुपये याप्रमाणे दीड एकर लागवड साठी एकूण 9 लाख रुपये खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना दीड एकर शेतात आले (ginger) लागवड मधून दीड एकर शेतात एकूण एकरी 14 लाख रुपयांचा शुद्ध लाभ झाला आहे. आता त्यांनी काढण्यात येत असलेल्या दीड एकर आले (ginger) लागवड व्यतिरिक्त अजून सव्वादोन एकरात आल्याचे पीक घेतले आहे.
आले (ginger) लागवड साठी पोषक शेतजमीन
आले पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठी तुम्हाला लागवडीयोग्य शेतजमीन असणे अनिवार्य आहे. मध्यम दर्जाच्या कसदार अन् पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत आल्याचे पीक चांगल्याप्रकारे येते. लागवडीपूर्वी शेतजमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. नदीकाठी असलेली शेती सुद्धा या पिकाच्या लागवड साठी योग्य असते.
आले लागवड पूर्व मशागत
तुमच्या शेतात आले (ginger) लागवड करण्यापूर्वी पूर्व मशागत करताना एक फुटापर्यंत खोल उभी आडवी नांगरणी करून घ्यावी. एक ते दोन कुळवाच्या पाळ्या देऊन शेत चांगली भुसभुशीत करावी. आल्याचे पीक शेतजमिनीत 18 महिन्यांपर्यंत राहत असल्यामुळे पुर्वमशागत केलेली असणे चांगली करणे गरजेचे असते हे लक्षात घ्या. शेतातील कचरा वेचून शेती लागवडीस योग्य करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी आधी 35 ते 40 टन प्रति हेक्टर प्रमाणे चांगलं कुजलेलं शेणखत शेतजमिनीत मिसळावे. स्फुरद व पालाश या खतांचा योग्य वापर आपल्याला करायचा आहे.
केशर शेती करून 64 वर्षीय महिला झाली लखपती,उभारला मोठा व्यवसाय
आले (ginger) लागवड साठी योग्य हवामान
तुम्हाला जर तुमच्या शेतात आल्याची लागवड करायची असेल तर तुमहाला या शेतीसाठी लागणाऱ्या पोषक हवामानबदल माहिती असणे आवश्यक असते. उष्ण तसेच दमट हवामानात हे पीक चांगल्या प्रमाणात येते. मात्र शेत हे बागायती असावे. याशिवाय कोरडे हवामान सुद्धा या पिकाच्या लागवड साठी योग्य असते.
लागवडीचा कालावधी
आले (ginger) लागवड करण्याचा सर्वोत्तम कालावधी एप्रिल ते मे हा असतो. या काळात तापमान उष्ण असल्यामुळे फुटवे फुटण्यास मदत होते. या लागवड मध्ये साठी सरासरी 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक असते.
आल्याच्या प्रमुख जाती
वरदा, महिमा, जाथा, माहीम या आल्याच्या काही प्रमुख जाती आहेत.
१) वरदा
वरदा जातीचा कालावधी हा 200 दिवसांचा असून तंतूचे प्रमाण 3.29 ते 4.50 टक्के इतके असते. या जातीच्या पिकाला सरासरी 9 ते 10 फुटवे असतात. तसेच आल्याची ही जात रोग व किडीस प्रतिकारक असते. या जातीत सुंठेचे प्रमाण 20.07 टक्के असते. या जातीची लागवड केल्यास सरासरी 22.3 टन प्रति हेक्टर उत्पादन घेता येऊ शकते.
२) महिमा
आल्याच्या महिमा जातीचा कालावधी 200 दिवस असून यात तंतूचे प्रमाण 3.26 टक्के इतके असते. या जातीच्या पिकाला सरासरी 12 ते 13 फुटवे असतात. याशिवाय महिमा जात ही सूत्रकृमीस प्रतिकारक असते. यामध्ये सुंठेचे प्रमाण 19 टक्के इतके असते. महिमा जातीच्या पिकाचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी 23.2 टन इतके मिळू शकते.
३) जाथा
आल्याच्या या जातीचा कालावधी 200 दिवसांचा असतो.यात तंतूचे प्रमाण 4 टक्के इतके असते. तसेच सुगंधी द्रव्याचे प्रमाण २.३६ टक्के असून या जातीच्या पिकाला सरासरी 8 ते 9 फुटवे असतात.
जाथा जातीच्या आल्याचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टर 22.4 टन इतके होते. तसेच या पिकात सुंठेचे प्रमाण 18.7 टक्के असते.
४) माहीम
आल्याची ही जात आपल्या राज्यात सर्वात जास्त प्रचलित जातींपैकी एक आहे. या जातीची कालावधी 210 दिवस असून ही मध्यम उंचीची आणि सरळ वाढणारी जात आहे. या जातीच्या पिकास 6 ते 12 फुटवे असतात.यामध्ये सुंठेचे प्रमाण 18.7 टक्के असते. तसेच या जातीच्या आल्याचे सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 20 टन इतके असते.
बियाण्याविषयी माहिती
आले लागवडीस प्रती एकर सुमारे 10 क्विंटल बियाणे लागते. बियाण्याची निवड करताना कांदाचे वजन 25 ते 55 ग्रॅम असले पाहिजे. तसेच त्या कंदाची लांबी अडीच ते पाच सेंटिमीटर असावी. लागवडीसाठी निरोगी बियाणे निवडून मातृ कंदापासून बियाण्यांचे तुकडे करून घ्यावेत.
आले (ginger) लागवड बीजप्रक्रिया
आल्याची बीजप्रक्रिया करत असताना सर्वात आधी रासायनिक कीडनाशकाची
बीजप्रक्रिया करावी. यासाठी क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) 20 मिलीलिट रकिंवा डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 10 मिलिलीटर या कीटकनाशकांपैकी कोणतेही एक कीटकनाशक आणि कार्बेन्डाझिम (50 टक्के) 15 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून घ्यावे आणि त्यात कंद 15 ते 20 मिनिटे चांगले बुडवून ठेवावे. त्यानंतर सुमारे 20 मिनिटीनंतर बियाणे सावलीत सुकू द्यावेत. नंतर त्यावर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम 25 ग्रॅम, तसेच पी. एस. बी. 25 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून 10 ते 15 मिनिटे बियाणे बुडवून ठेवणे आवश्यक आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बियाणे लागवडीस योग्य होते. आता आपण या बियाण्याची
लागवड करू शकता. बियाणे प्रक्रियेसाठी 100 ते 120 किलो बियाण्यासाठी 10 लिटरचे द्रावण वापरण्यात यावे.
तणनाशकाचा योग्य वापर
आले (ginger) लागवड नंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना 4 ते 5 ग्रॅम अँट्राझीन प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी. आले लागवडीनंतर सुमारे 12 ते 15 दिवसांनी 4 ते 5 मिली लिटर ग्लायफोसेट
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी.
रोपांची उगवण सुरू झाल्यानंतर तणनाशकाचा वापर करणे शक्यतो टाळावे.
आले (ginger) लागवड खत व्यवस्थापन
आले पिकासाठी एकूण 16 अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात गरज असल्यामुळे संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खतांचा वापर करणे फायदेशीर ठरते. यासाठी 120 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश प्रति हेक्टरी खत लागवड करताना देणे आवश्यक असते. शेतजमीन तयार करताना मात्र संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा द्यावी.
नत्र खताचा अर्धा हप्ता आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर सुमारे एक महिन्याने देणे उपयुक्त ठरते. उर्वरित अर्धा नत्र उटाळणीच्या वेळी अडीच ते तीन महिन्यांनी द्यायला हवा. त्याचबरोबर करंज पेंड किंवा निंबोळी पेंड दीड ते 2 टन प्रति हेक्टर द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने प्रती हेक्टर 37.5 किलो पालाश दोन वेळा मिसळून द्यावे.
पाणी व्यवस्थापन कसे असावे?
आल्याची लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती पद्धतीने केली जाते. तसेच कमी
पावसाच्या प्रदेशात मात्र देऊन आल्याची शेती केल्या जाते. आले पिकाला प्रारंभीच्या काळात पाणी देणे फार आवश्यक असते. याचे मुख्य कारण म्हणजे रोपांच्या मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी प्रारंभीचा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. आले लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या-चौथ्या दिवशी लगेच देणे आवश्यक असते. पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. 10 ते 12 दिवस पावसाने दांडी मारल्यास आले पिकाला पाणी द्यावे लागते.
हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी देणे योग्य असते. आले पिकाला पाणी देण्यासाठी साधारणपणे तुषार किंवा ठिबक सिंचन या पद्धतींचा वापर केल्या जातो. आले पिकाची लागवड बहुतांश भागात गादीवाफा पद्धतीने केल्या जाते. आले पिकास पाणी देण्यासाठी प्रत्येक गादीवाफ्यावर एक ठिबक सिंचनाची नळी टाकून दोन लिटर तास पाणी देणाऱ्या तोट्या बसवून घ्याव्यात. शेतजमिनीच्या मगदुर अनुसार ठिबक सिंचन संच प्रारंभीच्या काळात 30 ते 45 मिनिटे दिवसातून दोन वेळा आणि नंतरच्या कालावधीत सुमारे एक ते दीड तास ठिबक सिंचन द्वारे पाणी द्यावे.
आले पिकाविषयी महत्वाची माहिती
संस्कृत मध्ये आले पिकाला आद्रक म्हणतात. जगातील
प्रत्येक देशात आल्याचा उपयोग वेगवेगळ्या पध्दतीने तसेच वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात होत असतो. आले पिकाची लागवड संपूर्ण जगातील विविध देशांत केली जाते. यात प्रामुख्याने चीन, भारत, फिलीपिंस, जमैका, आफ्रिका, मेक्सिको, जपान, थायलंड आणि इडोनिशिया या देशांचा समावेश आहे. आले हे आपल्या देशात पूर्वापार चालत आलेले मुख्य मसाला पिक असून याची लागवड मुख्यत्वेकरून समुद्रकिनारी पट्यात केली जात असायची.
मात्र आता आधुनिक शेती विकसित झाल्याने पाणी देण्याची सुविधा असल्यामुळे देशातील विविध भागात आले (ginger) लागवड केल्या जाते. जगातील एकुण उत्पादनापैकी सुमारे ५० टक्के उत्पादन आपल्या देशात होते.
2014 साली केलेल्या सर्व्हेक्षण अनुसार देशात आले लागवडीखालील क्षेत्र 83940 हेक्टर आहे. तसेच 3.06 लाख टन वार्षिक उत्पादकता नोंदविण्यात आली होती. सुके आद्रक (सुंठ) निर्यात जवळपास 6580 टन इतकी आहे. या निर्यात पासुन 22.95 कोटी इतके चलन देशाला मिळते.
भारतात प्रामुख्याने कर्नाटक, तामिलनाडू, पुर्व भारतातील आसाम, त्रिपूरा व उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे आले पिकाची लागवड केल्या जाते. सध्या पठारावर्ती महाराष्ट्र, आंध्रप्रदेश कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे मोठ्या प्रमाणात लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. आले लागवड तंत्रात सुद्धा सुधारणा होताना दिसून येत आहेत. आले पिकाची लागवड आधी पारंपारीक पध्दतीने व्हायची. मात्र आता आले शेतीस आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे.