अबब! 4 एकर शेतात चक्क 35 लाखाचे उत्पन्न, लाल केळी लागवड

लाल केळी लागवड : knowledge is Power अस म्हटल्या जाते. आणि हेच ज्ञान जर शेतीविषयी असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही याची प्रचिती आणली आहे ती करमाळा तालुक्यातील उच्चशिक्षित तरुणाने. या तरुण शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरून त्याच्या फक्त 4 एकर शेतात लाल केळी लागवड करून चक्क 35 लाखाचे उत्पन्न घेतले असून तुम्ही नक्कीच विचार करत असाल की काय शेतात सोन पेरतो की काय हा शेतकरी? चला तर जाणून घेऊया या उच्च शिक्षित शेतकऱ्याची ही यशोगाथा.

इंजिनियरिंग सोडून धरली शेतीची कास

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात एक इवलंसं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे वाशिंबे. या गावात हा तरुण शेतकरी राहतो. 4 एकर शेतात चक्क 35 लाखाचे उत्पन्न घेणारा हा भाऊ काही अडाणी नाही तर सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपला प्रवास शेतीकडे वळविला. घरी शेती तशी जेमतेमच. म्हणजे एकूण फक्त 4 एकर.

वाडवडीलांनी आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने शेती केलेली असल्यामुळे घरची परिस्थिती अगदीच सर्वसामान्य. त्यामुळे जिद्दीने हा भाऊ शिकला अन् सिव्हिल इंजिनिअर झाला. चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळवली. पण भावाचे मन गावात रमणारे. गाव म्हटल की सर्वांनाच हुरहूर लागते. कितीही श्रीमंत असो, गावाची आठवण अन् गावाची मनात असलेली जागा कोणालाही लपवता येत नाही. मग काय विचारता, तरुणाने चक्क त्यांच्या या इंजिनिअरिंग नोकरीला रामराम ठोकत गावाकडे कूच केली. अन् शेती करण्याचे मनात पक्के केले.

लाल केळी लागवड, यशस्वी शेतकरी अभिजित पवार, सोलापूर जिल्हा

पारंपरिक शेती नाही फायद्याची

आजपर्यंत वर्षानुवर्षे घरातील आहोबापासून ते बाबांपर्यंत सगळेच शेतात राब राब राबले. पण त्यांना शेतीतून नेहमीच अत्यल्प उत्पन्न मिळाले याचा विचार 4 एकर शेतात लाल केळी लागवड करून चक्क 35 लाखाचे उत्पन्न घेणाऱ्या भाऊच्या मनात होताच. त्यामुळे आपण जर शेती करायचं ठरवलंच आहे तर मग काहीतरी शिकून आधुनिक पद्धतीने शेती करू काहीतरी वेगळच करू अशी जिद्द भाऊच्या मनात होतीच. भाऊ लागले मग नवनवीन पिकांची लागवड करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करायला. उच्च शिक्षित माणूस, थोड्याच अवधीत आपल्या शेतात कशाचे उत्पन्न जास्त होईल याचा अंदाज येणार नाही अस कस होईल बर. मग या शेतकऱ्याने केली त्यांच्या मनात असलेली इष्ट शेतीम्हणजेच लाल केळी लागवड सुरू केली.

4 एकर शेतात चक्क 35 लाखाचे उत्पन्न देणारे पीक लाल केळी लागवड

तर मित्रांनो, या सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या शेतकरी भावाचे नाव आहे अभिजित पाटील. त्यांनी त्यांच्या 4 एकर शेतात चक्क 35 लाखाचे उत्पन्न घेतले तर नेमके काय पेरले? या तुम्हाला आतापर्यंत पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. तर या तरुण शेतकऱ्याने त्याच्या शेतात लाल केळी लागवड करून भरघोस उत्पन्न घेतले आहे. अशाप्रकारे आपल्या काळया माय माऊलीत लाल केळीची लागवड कडून अभिजित दादा यांनी चक्क नोकरीवाल्यांना लाजवेल अशी भक्कम कमाई केली आहे. पण त्यामागे त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, काहीतरी वेगळं करण्याचे धाडस अन् मेहनत या गोष्टी विसरता येणार नाहीत.

लाल केळीची संपूर्ण देशात आहे प्रचंड मागणी

4 एकर शेतात लाल केळी लागवड करून चक्क 35 लाखाचे उत्पन्न घेण्यासाठी या नावाने वेगळीच शक्कल लढवली. आपल्या राज्यात मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांमध्येच काय तर देशातील सर्वच भागात उच्च व श्रीमंत वर्गामध्ये लाल केळीला प्रचंड मागणी आहे. हेच अभिजित भाऊंनी हेरल. अन् आपल्या मनातील इष्ट शेती पूर्णत्वास आणून आज जी किमया केली ती राज्यातील इतर होतकरू शेतकऱ्यांसाठी एक आदर्शवादी उदाहरण म्हणून समोर आले आहे. लाल केळीची मोठमोठ्या श्रीमंत लोकांना लई हाऊस. त्यामुळे मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येदेखील लाल केळीला असलेली मागणी वाढतच असते हे तुमच्या लक्षात आलचं असेल. अभिजित भाऊंनी पहिल्या वेळी त्यांच्या फक्त चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली होती. मात्र यावर्षी त्यात भर घालून त्यांनी आणखी एक एकर क्षेत्रावर लाल केळी लागवड केली आहे.

4 एकर शेतात चक्क 35 लाखाचे उत्पन्न झाले तब्बल 60 टन लाल केळीचे उत्पादन

लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला 55 ते 60 रुपयांचा दर मिळत आहे. त्यांना फक्त चार एकर क्षेत्रावर 60 टन मालाचे उत्पादन झाले होते. यासाठी त्यांना खर्च वगळता 4 एकर शेतात लाल केळी लागवड करून चक्क 35 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी ABP वृत्तवाहिनीला दिली आहे.

आजपर्यंत हिरवी आणि पिवळी केळी आपण पहिली आहे, आता लाल केळीचं उत्पादनही आपल्या राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर घेण्यास सुरुवात झाली आहे. लाल केळी दक्षिण भारतात मुख्यत्वे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात लाल केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. देशभरातील बाजारात लाल केळीला मागणीही प्रचंड असते. आता महाराष्ट्रात देखील लाल केळीच उत्पन्न घेता येणार आहे महाराष्ट्रात लाल केळी कोणत्या भागात लागवडीसाठी योग्य राहणार आहे, तसेच लाल केळी लागवड करण्याचे फायदे काय आहेत? मानवी आहारात लाल केळीचे महत्व काय आहे आणि लाल केळी कशी लागवड करावी याबद्दल संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

👉 हे सुद्धा वाचा

10 गुंठे क्षेत्रात दुधी भोपळा लागवड देत आहे महिन्याला 70 हजाराचा नफा

राज्यात होणारी लाल केळी लागवड बद्दल महत्वाची माहिती

शेतकरी मित्रांनो 4 एकर शेतात लाल केळी लागवड करून चक्क 35 लाखाचे उत्पन्न घेणाऱ्या या शेतकऱ्याची यशोगाथा आपण पाहिली. आता केळी बद्द्ल विशेष माहिती जाणून घेऊया. आपल्या राज्यात क्षेत्राच्‍या व उत्‍पन्‍नाच्‍या दृष्‍टीने आंब्‍याच्‍या खालोखाल केळीचा नंबर लागतो. केळीच्‍या उत्पन्नात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. आपल्या देशात सुमारे दोन लाख वीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे.

केळी उत्‍पादन करत असलेल्या प्रांतात क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्‍यापारी दृष्‍टीने किंवा परप्रांतात विक्रीच्‍या दृष्‍टीने होणाऱ्या उत्‍पादनात आपल्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. देशातील एकूण केळी उत्‍पादनापैकी अंदाजे 50 टक्‍के उत्‍पादन महाराष्‍ट्र राज्यात होते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 44 हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली आहे आणि त्‍यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्र एकट्या जळगांव जिल्हयात आहे. म्‍हणूनच जळगांव जिल्ह्यास केळीचे आगार म्हटले जाते. मात्र लाल केळी लागवड करून सुध्दा शेतकरी बांधव आर्थिक उन्नती साधू शकतात.

विशेषकरून जळगाव भागातील बसराई केळी ही उत्‍तर भारतात पाठवली जाते. त्‍याचप्रमाणे सौदी अरेबिया इराण, कुवेत, दुबई जपान व युरोपमधील बाजारपेठेत केळीची निर्यात केली जाते. त्‍यापासून आपल्या राज्याला मोठया प्रमाणावर परकीय चलन प्राप्‍त होते. लाल केळी लागवड करण्याकडे आता शेतकरी वर्ग वळू लागला आहे.

केळीच्‍या 86 टक्‍केहून अधिक उपयोग केवळ खाण्‍यासाठी होतो. पिकलेली केळी उत्‍तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्‍ची फळे व खोडाचा गाभा भाजीसाठी वापरल्या जातो. आणि केळीपासून टिकावू पूड, मुरब्‍बा, चॉकलेट, जेली इत्‍यादी पदार्थ सुद्धा तयार केल्या जातात. केळीच्या वाळलेल्‍या पानाचा उपयोग (छप्पर) आच्‍छादनासाठी केल्या जातो. तसेच केळीच्‍या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्‍हणून वापर केला जातो. धार्मिक कार्यात सुद्धा केळीच्‍या झाडाचा मंगलचिन्‍ह म्‍हणून वापर केला जातो.

लाल केळी लागवड 2024, संपुर्ण माहिती

लाल केळी लागवड साठी जामीन कशी असावी?

ज्या जमिनीवर केळीची बाग लागवड करणार आहात ती जमीन केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्‍त अशी असली तर उत्तम आहे. याशिवाय गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्‍यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन केळीच्या पिकास चांगल्या प्रकारे मानवते. लक्षात घ्या क्षारयुक्‍त जमिन मात्र केळी पिकाच्या लागवडीसाठी अजिबात उपयुक्‍त नसते.

पूर्व मशागत आणि लाल केळी लागवड हंगाम याबद्दल माहिती

केळीची लागवड करण्यासाठी लागवडी पूर्वी लोखंडी नांगराने खोलवर नांगरुन कुळव्‍याच्‍या पाळया देऊन भूसभुसीत करून घ्याव्यात. त्यानंतर त्‍यामध्‍ये हेक्‍टरी 100 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत घालून संपूर्ण शेतात टाकण्यात यावे.

केळीच्‍या लागवडीच्या मोसमात हवामानानुसार बदल होत असतो. कारण हवामनाचा परिणाम हा केळीच्‍या वाढीवर, फळे लागण्‍यास व तयार होण्‍यास लागणारा कालावधी इत्यादींवर थेट होत असतो. जळगांव जिल्‍हयात लागवडीच्या कामास पावसाळयाच्‍या प्रारंभी सुरुवात होते. या दिवसांत या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्‍ये लागवड केलेंडर बागेस मृगबाग म्‍हणतात. सप्‍टेबर ते जानेवारी पर्यंत होणाऱ्या लागवडीला कांदेबाग असे म्हटल्या जाते. जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्‍ये केलेल्या लागवडीपासून भरघोस उत्पादन मिळते. या लागवडीमुळे केळी 18 महिन्‍याऐवजी 15 महिन्‍यात काढणीसाठी सुसज्ज होतात.

लाल केळी लागवड करताना केळीच्या बागेची निगा कशी राखावी?

लाल केळी लागवड केल्यानंतर बागेतील जमिन स्‍वच्‍छ व आणि भुसभुशीत असणे गरजेचे आहे. त्‍यासाठी प्रारंभीच्या कळत कोळपण्‍या देण्यात याव्या. पुढे हाताने चाळणी करावी. केळीच्‍या बुंध्‍याजवळ अनेक पिले येऊ लागतात ती वेळोवेळी काढून टाकावीत. लाल केळी लागवडीनंतर सुमारे 4 ते 5 महिन्यांनी झाडांच्‍या खोडाभोवती मातीवर थर देण्यात यावा. गरज असल्यास घड पडल्‍यावर झाडास आधार देण्यात यावा. सुर्यप्रकाशापासून हानी पोहोचू नये यासाठी केळीच्‍या घडाभोवती त्यांच्याच झाडाची वाळलेली पाने गुंडाळण्‍याची प्रथा आपल्याकडे आहे. थंडीपासून संरक्षणासाठी केळीच्या बागेच्या सभोवताली शेकोटया पेटवून धूर द्यावा.

इतर फळपिकांच्‍या तुलनेत केळी पिकाला अधिकचे पाणी लागते. दिवसेंदिवस पाऊस कमी होत आहे परिणामी पाण्याची पातळी खालवत आहे. त्‍यामुळे केळी खालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. केळीचे क्षेत्र वाढविण्यासाठी उपलब्‍ध पाण्‍याचे नियोजन करणे अगत्याचे ठरते. त्‍यासाठी ठिबक सिंचन योजना राबवल्या जात आहे, जेणेकरून केळीचे क्षेत्र टिकुन राहण्यास मदत होईल तसेच त्‍यामध्ये वाढ सुद्धा होईल.

केळी हे सर्व फळांमध्‍ये स्‍वस्‍त फळ असल्यामुळे गोरगरिबांसाठी अत्यंत उपयुक्‍त आहे. या पिकांचे क्षेत्र वाढीसाठी विशेष शासकीय सवलतीचा कार्यक्रम किंवा योजना सध्या तरी उपलब्ध नाही. इतर जिरायत व बागायत पिकांप्रमाणे कर्जपुरवठा मात्र राज्य सरकारकडून उपलब्‍ध करुन दिला जातो. वाहतूकीसाठी रेल्‍वेकडून मालगाड्या उपलब्‍ध केल्‍या जातात. पण त्‍यात अल्‍पशी सवलत असते. केळी उत्‍पादन टिकविणे, वाहतूक जलद व सवलतीच्‍या दराने करणे इत्यादींची व्‍यवस्‍था करणे या सर्व गोष्टी सरकारने उपलब्ध केल्यास केळी लागवड क्षेत्र वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम जाणवेल.

केळी बागेसाठी खत व्‍यवस्‍थापन कसे असावे?

लाल केळी लागवड साठी खालील प्रमाणे खताचे व्यवस्थापन करावे.

सेंद्रीय खते – शेणखत 10 किलो प्रति झाड किंवा गांडूळ खत 5 किलो प्रति झाड पुरविण्यात येण्याची शिफारस असते.

रासायनिक खते – केळीसाठी प्रति झाडास 200 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्‍फूरद व 200 ग्रॅम पालाश् देण्‍याची शिफारस कृषितज्ज्ञ करत असतात. जमिनीतून रासायनिक खते देताना त्‍यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्‍यासाठी खोल बांगडी पध्‍दतीने किंवा कोली घेवून खतांचा पुरवठा पिकाला करणे फायदेशीर ठरते.

जैवकि खते – अझोस्पिरीलम – 25 ग्रॅम प्रति झाड व पी एस बी 25 ग्रॅम प्रति झाड केळी लागवडीच्‍या वेळी देण्यात यावे.

प्रती झाडामागे युरियाचे प्रमाण

लागवडीनंतर 30 दिवसांच्या आत प्रती झाड 82 ग्रॅम युरिया देण्यात आला पाहिजे. तसेच लागवडीच्या 75 दिवसानंतर, 120 दिवसानंतर आणि 165 दिवसानंतर प्रत्येक वेळी सुद्धा प्रती झाड 82 ग्रॅम युरिया झाडांना पुरविण्यात यावा. त्यानंतर 210 दिवसांनी, 255 दिवसांनी आणि 300 दिवसांनी प्रत्येक झाडाला 36 ग्रॅम युरिया देण्यात यावा.

लागवडीनंतर 30 दिवसांच्या आत सिंगल सुपर फॉस्फेट हे प्रती झाड फक्त एकवेळाच देण्यात यावे. तसेच म्युरेट आणि पोटॅश लागवडीनंतर 30 दिवसांनी, 165 दिवसांनी तसेच 255 आणि 300 दिवसांनी प्रत्येक कालावधीच्या वेळी प्रती झाड 83 ग्रॅम इतके देण्यात यावे, अशी शिफारस करण्यात येते. दिलेल्‍या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्‍य ते बदल करावे.

केळीला पाणी देण्याची प्रक्रिया

लाल केळी लागवड केल्यानंतर एक महत्वाची बाब म्हणजे केळीला पाणी मोठ्या प्रमाणावर लागते. पाणी खोडाजवळ साठून राहणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक असते. जमिनीचा मगदूर व झाडाचे वय लक्षात घेवून पाण्‍याच्या पाळया मधील अंतर ठरविल्या जाते. भारी सुपिक व खोल जमिनीतील पिकांना 7 ते 10 सेमी पाणी प्रती पाळीस लागते. उन्‍हाळयामध्ये 6 ते 8 दिवसांनी तर हिवाळयात 9 ते 15 दिवसांनी पाणी देतात. अति उष्ण उन्‍हाळयामध्ये 5 ते 6 दिवसांनी पाणी देणे गरजेचे असते. केळीचे एक पिक घेण्‍यास (18 महिने) 45 ते 70 पाण्‍याच्‍या पाळया आवश्यक असतात. पाण्‍याची कमतरता असल्‍यास केळीच्‍या वाफयाच्‍या मधल्‍या जागेत तनिस, गवत, पालापाचोळा व पॉलीथीनचे लांब तुकडे यांचे आच्‍छादन करणे फायदेशीर ठरते. त्‍यामुळे पाण्‍याच्‍या दोन पाळया चुकविता येऊ शकतात.

खते आणि वरखते यांचे प्रमाण कसे असावे?

या झाडाची मुळे उथळ असतात. त्‍यांची अन्‍नद्रव्‍यांची मागणी अधिक असते. त्‍यामुळे वाढीच्‍या सुरुवातीच्‍या काळात (पहिले वार महिने) नत्रयुक्‍त जोरखताचा हप्‍ता देणे आवश्यक असते. प्रत्‍येक झाडास 200 ग्रॅम नत्र 3 समान हप्‍त्‍यात लावणीपासून दू तिसऱ्या व चौथ्‍या महिन्‍यात द्यावे. प्रत्‍येक झाडास प्रत्‍येक वेळी 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड खताबरोबर देण्यात यावी. शेणखताबरोबर 400 ग्रॅम ओमोनियम सल्‍फेट प्रत्‍येक झाडास लावणी करतेवेळी देणे उपयुक्‍त असते.

दर हजार झाडास 100 कि नत्र 40 कि स्‍फूरद व 100 कि पालांश ( प्रत्‍येक खोडास) 100 ग्रॅम नत्र 40 ग्रॅम स्‍फूरद, 40 ग्रॅम पालाश म्‍हणजेच हेक्‍टरी 440 कि. नत्र 175 कि. स्‍फूरद आणि 440 कि पालाश द्यावे.

मोहोळ आणि फळधारणा हंगाम विषयी महत्वाचे

लाल केळी लागवड नंतर सुमारे 10 ते 12 महिन्‍याच्‍या अवधित झाडावर लॉगर येण्याची शक्यता असते. बसराई जातीचे लोंगर 7 ते 12 महिन्‍यात बाहेर पडतात. वाल्‍हा जातीत 6 ते 7 महिने लागतात. लालवेची, सफेदवेलची व मुठळी जाती 9 ते 13 महिने लागतात. तर लालकेळीस लॉंगर येण्‍यास 14 महिने कालावधी लागतो. केळीचे झाड चांगले वाढलेले असल्‍यास लागवडीनंतर साधारणपणे 6 महिन्‍यांनी खोडास फुलोरा तयार होण्यास सुरूवात होते. 9 ते 10 महिन्‍यांनी केळीचे फूल खोडाबाहेर पडते. तसेच 3 ते 5 महिन्‍यात केळीचे घड तयार होतात. हिवाळ्यात मात्र घड तयार होण्‍यास अधिकचा कालावधी लागतो.

घडाने आकार घेतल्‍यानंतर त्‍याच्‍या टोकास असलेले वांझ केळफूल त्‍या घडातील केळयांच्‍या शेजारी फणीपासून थोडया अंतरावर कापून टाकतात. त्‍या केळफूलाचा भाजीसाठी उपयोग होतो शिवाय ते काढून घेतल्‍यामुळे घडातील केळी चांगली पोसून त्‍याचे वजन वाढते.

लाल केळीचे औषधी गुणधर्म

मित्रांनो लाल केळी लागवड विषयी विस्तृत माहिती आपण पाहिली. आता या अत्यंत गुणकारी असलेल्या लाल केळीचे औषधी गुणधर्म काय आहेत त्याबद्दल माहिती घेऊया.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत गुणकारी

लाल केळीचे सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवणे सोप्पे होते. लाल केळ्यामध्ये कमी ग्लायसेमिक प्रमाण असल्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असते. मधुमेहाच्या रुग्णांनी लाल केळीचे सेवन केल्यास त्यांना चांगलाच फायदा होतो.

लाल केळी विविध पोषकतत्वांनी युक्त

लाल केळीमध्ये भरपूर Nutrition घटक असतात. एका लहान लाल केळीमध्ये फक्त 90 उष्मांक असतात आणि त्यात प्रामुख्याने पाणी आणि कर्बोदके असतात. जीवनसत्व ब ६, मॅग्नेशियम आणि क जीवनसत्व या उच्च घटकांमुळे लाल केळीचे पौष्टिक मूल्य अधिक असते.

उच्च रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी लाभदायक

लाल केळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. पोटॅशियम हे रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितल्या जाते. परिणामी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी लाल केळीचे सेवन करणे फायद्याचे असते.

डोळ्यांसाठी आहे खूप फायदेशीर

लाल केळी डोळ्यांसाठी खूप गुणी असल्याचे मानल्या जाते. केळी रोज खाल्ल्याने दृष्टी सुधारते. लाल केळी मध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाची मूलद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात. याशिवाय बीटा-कॅरोटीनॉइड आणि अ जीवनसत्व यामध्ये आढळतात, जे डोळ्यांसाठी उपयुक्त ठरते.

लाल केळी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल तर आपण रोज किमान 2 लाल केळी खाल्ली पाहिजेत. लाल केळ्यामध्ये क जीवनसत्व आणि ब जीवनसत्त्व ६ मोठ्या प्रमाणात असते. या गुणधर्मामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती सशक्त होण्यास हातभार लागतो.

राज्यात विविध भागात केळी लागवडीचा हंगाम आणि वाहतूक

केळीचा हंगाम मुख्‍यकरून राज्यात ठाणे, वसई भागात जूलै ते मार्च व खानदेश भागात सप्‍टेंबरमध्‍ये असतो. केळीचे फळ चांगले तयार होऊन गुबगुबित झाले, गरगरित झाले की, ते पूर्ण तयार झाले असे समजावे. पूर्णपणे तयार झालेला घड तीन ते चार दिवसांत पिकतो. त्‍यामुळे तो वाहतूकीसाठी योग्‍य ठरतो. त्‍यासाठी 75 टक्‍के पक्‍व असेच घड काढतात. 75 टक्के पिकलेले केळीचे घड काढल्यास लांबवर वाहतूक करणे सोपे होते.

या फळपिकांसाठी सरकारकडून विमा मंजुर

राज्यात 202-22, 2022-23 आणि 2033-24 या तीन वर्षांमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व 3), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपन्यांमार्फत विमा योजना राबवली गेली असून त्यानुसार विमा मंजुरी देण्यात आली आहे.

आंबिया बहार सन 2021-22 साठी 2 लाख 79 हजार 391 रूपये व सन 2023-24 साठी 344 कोटी 59 लाख 8 हजार 284 रूपये असा एकूण 344 कोटी 61 लाख 87 हजार 636 रूपये एवढ्या निधीची मागणी करण्यात आली होती. हा निधी राज्य सरकारने मंजूर केला असून केवळ 2021-22 आणि 2023-24 सालांतील आंबिया बहारासाठी वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे वरील फळबाग पिकांचा विमा उतरवलेल्या फळबाग शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

राज्यातील शेतकरी भाऊंनी काहीतरी वेगळं करायची आली आहे वेळ

शेतकरी मित्रांनो, हा इतका शिकलेला भाऊ जर नोकरी सोडून शेतीची कास धरून लाल केळी लागवड मूळे यशस्वी होत असेल तर आपण का होऊ शकत नाही याचा विचार करा. कोणतीही कल्पना ही सत्यात उतरण्यासाठी ती आधी मनात अस्वी लागते. मग ती कल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी लागते ती प्रचंड जिद्द, ज्ञान, मेहनत अन् संयम. या सर्व गुणांची सांगड घातली तर क्षेत्र कोणतेही असो, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुठलीच शक्ती रोखू शकत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या शेतात अशाचप्रकारे नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची वेळ आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब केला, त्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपण वेळोवेळी वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो. एक दिवस आपली सुद्धा यशोगाथा लोकांनी वाचावी इतर प्रगत शेतकरी होऊन आपण खूप प्रगती करावी ह्या सहृदय शुभेच्छा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment