गाढव पाळा आणि सरकारकडून मिळवा चक्क 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान, गाढव पालन अनुदान योजना

गाढव पालन अनुदान योजना संपूर्ण माहिती

शेतकरी बांधवांनो गाढव पालन करणे हे तुम्हाला थोड विचित्र वाटत असेल. गाढव म्हणजे आपल्याकडे मूर्ख लोक असा ठप्पा लागलेला आहे. मात्र आज या लेखातून गाढव किती मेहनती प्राणी आहे तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत गाढव पालन करण्याचे किती फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आहे. आणि जर का तुम्हाला गाढव पालन करण्याचे महत्त्व पटले आणि गाढव विकत घेण्यासाठी भांडवल उभे करायचे असले तर तुमच्यासाठी अत्यंत सुखद बातमी आहे.

आता तुम्ही गाढव पालन करून सरकारकडून गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळवू शकता. हो हे शक्य आहे. यासाठी केंद्र सरकारची नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत गाढव पालन अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून गाढवे पालन करण्यासाठी आता केंद्र सरकारकडून तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे ही गाढव पालन अनुदान योजना योजना आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत.

नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत गाढव पालनसाठी अनुदान योजना

केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजने अंतर्गत अनेक बदल केले आहेत. या योजनेत गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या यांचे पालन करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येत होत. मात्र आता या योजनेत इतर काही प्राण्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. आता घोडा, खेचर आणि गाढव या प्राण्यांचे पालन करण्यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येणार आहे. जर तुम्हाला गाढव पालन करायचे असेल तर यासाठी सरकारकडून गाढव पालन अनुदान योजना या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. देशात गाढवांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्यामुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील गाढवांची संख्या वाढविण्याचे उद्दीष्ट

गाढव हा एक अत्यंत मेहनती प्राणी असून या गाढवाचे दूध अतिशय महाग विकल्या जाते. गाढवाचे दूध विकून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या एका व्यावसायिकाची यशोगाथा आपण एका लेखात दिली आहे. गाढव हा प्राणी ओझे वाहण्याच्या कामात येतो. या प्राण्याला खाण्यासाठी काही विशिष्ट लागत नसल्यामुळे खाद्याचा खर्च सुद्धा खूप कमी येतो. अगदी मिळेल ते खाऊन जीवन जगणारा हा प्राणी आहे. मात्र 2012 साली आणि 2019 मध्ये जी पशुगणना झाली त्यामध्ये गाढवांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे दिसून आले आहे. तब्बल 60 टक्क्यांनी गाढवांची संख्या घटली आहे देशातील गाढवांची संख्या वाढावी या हेतूने केंद्र सरकारच्या वतीने आता गाढव पालनासाठी गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंत भरघोस अनुदान देण्यात येत आहे.

गाढव पाळा आणि सरकारकडून मिळवा 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान, गाढव पालन अनुदान योजना संपूर्ण माहिती

पशुपालन व्यवसायात गाढवाचे महत्व

गाढव या प्राण्याची जरी नेहमीच हेंडसाळ केल्या जाते तरीही या गाढवाचे दूध अनेकांना लाखो रुपये कमवून देण्यास उपयुक्त ठरले आहे. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा जगभर एक मोठा व्यवसाय बनला आहे. आपल्या राज्यात सुद्धा बहुसंख्य शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. दुग्धव्यवसाय शेतीपेक्षा अनेक पटींनी अधिक नफा देतो.

ग्रामीण भागातील लहान शेतकरी पशुपालन व्यवसाय अगदी कमी खर्चात सुद्धा सुरू करू शकतात. ग्रामीण भागात पशुपालन करण्यासाठी गाय, म्हैस, बकरी यांसारखी चांगली दुभती जनावरे पाळली जातात. मात्र यामध्ये गाढव प्राण्याची सुद्धा भर घातली तर तुम्हाला इतर सर्व प्राण्यांचे पालन करून जेवढे उत्पन्न मिळत नाही, त्यापेक्षा कित्येक पटीने उत्पन्न गाढव पालनातून मिळू शकते. कसे ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. आता गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत 50 लाखापर्यंत अनुदान मिळत असल्यामुळे तर गाढव पालन करणे म्हणजे दोन्ही बाजूने फायदाच फायदा.

गाढवाच्या एक लिटर दुधाची किंमत पाहून व्हाल थक्क

गाढव पालन अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी तसेच बेरोजगार तरुणांसाठी लाभदायक का आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही इतर प्राण्याच्या पालनाची आणि गाढव पालनाची तुलना जाणून घ्या. आपण जे गाय, म्हैस, शेळी दुधाच्या व्यवसायासाठी पळतो त्या प्राण्यांच्या दुधाची मागणी शहरे आणि खेड्यांमध्ये जास्त असते हे मान्य आहे. मात्र या सर्व प्राण्यांच्या दुधका 50 ते 80 रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त भाव मिळत नाही. मात्र तुम्हाला हे जाणून नवल वाटेल की भारतातच नाही तर संपूर्ण जगात गाढवाच्या दुधाची आणि त्यापासून बनलेल्या इतर पदार्थांची उदा. गाढवाच्या दुधाचे चीज यांना प्रचंड मागणी असते.

तुम्ही विचार करत असाल मी गाढवाच्या दुधाची किंमत प्रती लिटर किती असते तर इतर सर्व पाळीव प्राण्यांच्या तुलनेत गाढवाच्या दुधाची किंमत कित्येक पटीने जास्त आहे. गाढवाच्या दुधाची किंमत 7 हजार रुपये प्रति लीटर आहे. आणि तुमच्याकडे कितीही दूध असेल तरी ते दूध घ्यायला मोठमोठ्या कंपन्या नेहमीच तयार असतात. गाढवाचे दुधाला गाजर देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा प्रचंड मागणी आहे. गाढवाचे दूध इतर प्राण्यांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात निघते हे जरी मान्य केले तरी हे दूध तुम्हाला इतर प्राण्यांच्या तुलनेत हजारो रुपयांचा नफा मिळवून देऊ शकते. या सर्व कारणांमुळे गाढव पालन अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

तुती लागवडीसाठी सरकार देत आहे लाखोंचे अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

गाढवाचे दूध का आहे इतके महाग?

नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत गाढव पालन अनुदान योजना राबवून गाढव पालनासाठी आता सरकार 50 लाखांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं आर्थिक जीवन कसं उन्नत करू शकता यासाठी तुम्हाला गाढव पालन करण्यास प्रेरणा देणारा हा लेख आहे. गाढवाच्या दुधाची किंमत ऐकून तुमच्या मनात प्रश्न येत असेल की गाढवाचे दूध इतके महाग का असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे की प्रचंड मागणी मात्र अपुरा पुरवठा. माहितीचा अभाव असल्यामुळे आणि गाढवाला निरुपयोगी प्राणी समजून गाढव पालन करण्यास बरेच लोक तयार होत नाहीत त्यामुळे गाढवाच्या दुधाचा खूप तुटवडा पडतो. याशिवाय गाढवाचे दूध देण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे मागणीच पूर्ण होत नसल्यामुळे गाढवाचे दूध अत्यंत महाग आहे.

गाढव पाळा आणि सरकारकडून मिळवा चक्क 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान, गाढव पालन अनुदान योजना संपूर्ण माहिती

आता गाढवाच्या दुधाचा उपयोग काय आहे असे विचाराल तर गाढवाच्या दुधात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. श्रीमंत लोकांना चिरकाल तरुण राहण्याची हौस असते. या कारणास्तव बाजारात गाढवाच्या दुधाला सर्वाधिक मागणी असते. याशिवाय गाढवाचे दूध बहुतेक सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाते. तसेच विशेष म्हणजे गाढवाच्या दुधाच्या चीजला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूपच जास्त मागणी आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 1 किलो पनीर बनवण्यासाठी 25 लिटर गाढवाच्या दुधाचा वापर केला जातो आणि गाढवाच्या दुधापासून बनवलेल्या एक किलो चीजची किंमत सुमारे 82 हजार आहे. गाढवाच्या दुधापासून बनवलेले चीज हे जगातील सर्वात महाग चीज आहे. ज्याला पुले चीज सुद्धा म्हटल्या जाते. तर आता गाढव पालन करण्यासाठी असलेली सुवर्णसंधी जाणून घेऊन गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्यास तयार आहात ना?

गाढव पालनातून महिन्याला 5 ते 10 लाखांचे उत्पन्न

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की इतर कोणी करत नाही म्हणून आपण सुद्धा का करावा गाढव पालन करून गाढवाच्या दुधाचा व्यवसाय? तर तुम्हाला सांगू माहीत करून देऊ इच्छितो की, भारतात सुद्धा असंख्य लोक आता गाढव पालन करण्याकडे वळलेले आहे. अनेक जणांनी तर गाढवाच्या दुधाचा व्यवसाय करून लाखो करोडो रुपये सुद्धा कमावले आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी वर्ग फक्त पारंपरिक शेती आणि पारंपरिक पशुपालन करण्यातच गुंतले आहेत.

शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची तसेच नाविन्याची जोड देणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. इतर राज्यात विशेषतः गुजरात सारख्या राज्यात गाढवाच्या दुधाचे महत्त्व समजणारे बरेच लोक आहेत. गाढव पालन करण्यास सुरुवात करून आता ते महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. कोणत्याही सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पटीने उत्पन्न हे लोक केवळ गाढव पालन करून गाढवाच्या दुधाचा व्यवसाय करून कमावत आहेत.

महाविद्यालयीन शिक्षणासोबतच गाढवपालन करणारे काही तरुण आहेत. यामुळे त्यांना वर्षाला 5 ते 10 लाख रुपये मिळत आहेत जे त्यांना कोणत्याही सरकारी नोकरीतून मिळणार नाहीत. असे मानले जाते की तो दिवस दूर नाही जेव्हा बाजारात गाढवाचे दूध पॅकेटमध्ये विकले जाईल आणि लोक त्याचा आरोग्यासाठी नक्कीच वापर करतील. चला तर गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत जाणून घेऊया.

गाढव पाळा आणि सरकारकडून मिळवा चक्क 50 लाख रुपयांपर्यंत अनुदान, गाढव पालन अनुदान योजना संपूर्ण माहिती

गावरान कोंबडी पालन व्यवसाय या पद्धतीने करून मिळवा लाखोंचा नफा

अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट आणि प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा वरील उपयुक्त माहिती वाचून गाढव पालन करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर त्यासाठी गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत लाभ कसा मिळतो याबद्दल जाणून घ्या. सर्वात आधी तुम्हाला नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. सदर वेबसाईट ची लिंक https://nlm.udyamimitra.in/ ही आहे. या लिंक वर क्लिक करून तुमच्यासमोर या वेबसाईटचे होम पेज येईल. त्यामध्ये आधार कार्ड OTP च्या साहाय्याने नोंदणी करून घ्यायची आहे.

गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती तसेच इतर माहिती द्यायची आहे. तसेच तुमचे गाव तालुका, जिल्हा, राज्य व्यवस्थित निवडायचे आहे. एकदा का नोंदणी प्रकिया पूर्ण झाली की सदर वेबसाईट वर लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून लॉग इन करायचे आहे. नंतर तुम्हाला apply Online for schemes हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर केंद्र सरकारच्या विविध पशू पालनासाठी असलेल्या योजना तुम्हाला दिसतील. त्यापैकी subsidy for donkey business या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल.

या अर्जात सुद्धा तुमची वैयक्तिक माहिती व्यवस्थित भरून तुम्हाला संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे. यासाठी तुमचे आधार कार्ड सारखे मागितलेले वैयक्तिक आणि इतर कागदपत्रे सुद्धा अपलोड करायची आहेत. एवढं करून तुम्ही तुमचा अर्ज यशस्वीरीत्या भरला की तुमच्या अर्जाची छाननी होऊन तुम्हाला गाढव पालन अनुदान योजना अंतर्गत लाभ देण्यात येईल. तुम्ही केलेल्या या ऑनलाईन अर्जाची सद्यस्थिती सदर वेबसाईट वर जाऊन कधीही तपासून शकता. इतर काही अडचण आल्यास तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशू अधिकाऱ्यास भेट द्या. ते तुमचे शंका निरसन करतील.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!